आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे, तुम्ही माझी वाट बघताय? लिहून गेले होते ना आज उशीरा येणार. बाहेर गेले होते कामासाठी.
बरोबर आहे गाणे...
पुढचे द्यायचे ना.... तुम्ही, कृष्णा, झिलमिल, रेणु कुठे चुकता कधी? अक्षरे जुळली की बिनधास्त द्यायचे नवीन कोडे...
आज कोणीच नाही आले.. कृष्णा पण नाही?
कावेरि पण नाही आली chocolate घेउन.

कोणीच आले नाही, म्हणुन मी पण कंटाळा केला कोडे देण्याचा. आताही नाही देत. बुधवारी सगळे आले की देईन. तो पर्यंत जर आधी कोणी आले तर त्यांनी द्या.

नवीन वर्षाच्या सर्वांनी शुभेच्छा Happy

कारवी ताई चॉकलेटचं आहे माझ्या लक्षात... Happy

नविन वर्षाचं पहिलं कोडं माझं Happy

कोडे क्र. ६९१( मराठी)
ल अ भ ब म,
झ ख ध ए म,
ध प ज ए ज म,
ए ज म म म..
ब म ए म ज म म म.....

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी

६९२ मराठी
प प ज त य ज
प स त ह ह
ह व अ न प ग अ न
ह अ अ ज त अ न.

तुम्ही लोकांनी १ गोष्ट नोटीस केली का???

या बाफचा पार्ट १ & २ .... पहा ..
१)पार्ट १:
दिनांक : ५/३/२०१६
एकूण कोडे संख्या : ४६१
प्रतिसाद संख्या : २००० पेक्षा जास्त..
एकूण पेजेस : ६८

२) पार्ट २ :
दिनांक :१०/१/२०१७
एकूण कोडे संख्या : ६९२-४६१ = २३१
एकूण पेजेस : ६०
प्रतिसाद संख्या : १७७६

म्हणजे ८ पेजेसमधे आपल्याला (४६१-२३१ = २३०) कोडी सोडवायचीत.. Uhoh
म्हणजे पार्ट २ मधे कोडी कमी आणि गप्पा जास्त ... Proud
अर्थात क्ल्यु संदर्भातचं... Happy
आणि हे सगळं फक्त ३ महिण्यांमधे... : Uhoh

चला बाय..........

2005-2015
संगीत - अवधूत गुप्ते

मुव्ही: सनई चौघडे...

उत्तर--->
प्रेमात पडतो जो तो येता जाता,
पण सावरलो तुझा होता होता...

मला अस ऐकू आलयं..चुकलं असेल तर सॉरी...

चाँद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना
तू भी सुन बेखबर, प्यार कर, प्यार कर
आई है चाँदनी, मुझसे कहने यही
मेरी गली, मेरे घर, प्यार कर, प्यार कर

अनघा ताई.. Sad
सस्मित Happy

चावी प्लिज....

६९५ :
प्यार भरी ये घटाएं राग मिलन के सुनाये
हाथों मे हाथ है तेरा मेरा साथ है
देख समां छाया प्यारा प्यारा

किसलिये मैंने प्यार किया
दिलको युं बेकरार किया
शाम-सवेरे तेरी राह देखी
रात-दिन इंतजार किया

६९७. हिन्दी (२००७-२०१७)

च र अ म ज फ च ह र
ज क छ म द ल प म ह ह
ज अ स स ल त ल र ल
अ अ क म ह म ह ह

२) पार्ट २ :
दिनांक :१०/१/२०१७
एकूण कोडे संख्या : ६९२-४६१ = २३१
एकूण पेजेस : ६०
प्रतिसाद संख्या : १७७६>>>
कावेरिताई, गप्पांचा धागा जास्त झाला कोड्यांपेक्षा त्यामुळे असे! Happy

कावेरिताई, गप्पांचा धागा जास्त झाला कोड्यांपेक्षा त्यामुळे असे! >>>. Lol
आलात का तुम्ही...कितना मीस किया मैने आपको... Sad

Pages