आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेन्नई एक्सप्रेस
1 2 3 4
get on the dance floor
बुटी शेक बुटी शेक
दप्पन कूथु हार्ड कोर
शोल्डर हिचक मिचक
बॉडी हिचक मिचक
गिम्मे गिम्मे गिम्मे सम मोर

क्लू :-
नायक डबल मिनींग विनोदाचा बादशहा
गायक मंगेशकर घराण्यातील एक

७१०
मराठी

जीवा शिवाची बैल जोड
लावी पैज ठेऊनी (आपली) कुड

डौल मोराच्या मानचा रे डौल मानचा
येगं रामाच्या बाणचा रे येगं बाणचा
हे का?

चित्रपट : तांबडी माती
गायकः हृदयनाथ मंगेशकार
पडद्यावर दादा कोंडके.
लता मंगेशकर यांचा हा चित्रपट

वन टू थ्री फोर,गेट आॅन द डान्स फ्लोर
मला एवढंच माहिती! >>> Lol
झालं की ते आता...
दुसरं कोद आलय...

>>>झालं की ते आता...>>>मी मागचंच पेज रिफ्रेश केलेलं!
>>>दुसरं कोद आलय...>>>ते पण झालं!

धन्य आहात अगदी!

नशीब उद्या नाही लिहिलं...
सत्यजीतजी मघाशी कय केलेल तुम्ही हं ???

७११.

हिंदी (७०-८०)

द क अ ब ग प द ज द
ज क अ प
अ ज क त प य प अ ज अ

एखादे अक्षर चुकीचे असल्यास क्षमस्व...
जसे येतयं तसे लिहले आहे...

७१२ हिन्दि ६०-७०
अ ह त स म ल च
द झ ज अ ब म ल च
ह ह त ह ह ब
त ह ज क स ह ब
च क उ उ न म ल च
द झ ज अ ब म ल च

अरेवा पंडीतजी!

छान आहे गाणं कृष्णा हे...>>> आणि ऐकताना पण मस्त वाटते... लता मंगेशकर आणि किशोरकुमार दोघांचे आवाज अफलातुन आलेत गाण्यात!

हो रिमिक्स झालंय त्याचं...
तुम्ही असे च्र्प्स सारखे का लिहिताय.... ?
एनीवे...
७१२ हिन्दि ६०-७० उत्तर
आओ हुजूर तुमको सितारों में ले चलू
दिल झूम जाये ऐसी बहारों में ले चलू

७१३ मराठी जुने पारंपारिक
व व व व व
व क म व
व ग ग
प प म व
म प भ य
व व व

क्ल्यू देउन जाते
खड्या, पल्लेदार आवाजाचा गायक
गाण्यात वर्णन केलेले भान हरपलेले / मंत्रमुग्ध वातावरण 'त्याच्या'शीच जोडले जाते.

अजून कल्यु लागेल. डोक्यातले सगळे भारूड, लावण्या, लोकगीते, कोळीगीते वैगेरे उगाळून झाले..

पल्लेदार आवाजाचा गायक अशी लोकगीते गाणारे शाहीर साबळे डोळ्यापुढे आले तरी जमेना..

अरे आज आहात तुम्ही....ओके
३) नेमका तो पारंपारिक प्रकार सोडलात तुम्ही....ज्यात लिहिणारा शेवटी स्वतःचे नाव गुंफतो.
४) पल्लेदार आवाजाचा पण लोकगीत गाणारा नव्हे.....अजून कुठे लागते पल्लेदार गायकी आणि खडा आवाज...माईक नसेल तरी लांबवर पोचणारा...? गायकाचे नाव एका खलनायकाचे आहे.
५)
२रा क्ल्यू का सोडलात? खास करून "तुम्हाला" क्लिक व्हायलाच हवा हा क्ल्यू
"तो" आणि "ती" वेगळे काढताच येणार नाही. तो + ती = मंत्रमुग्ध वातावरण, हरपलेले भान -- हेच समीकरण
६)
पहिल्या ओळीत ५ व मध्ये --- 'ती' आहे, आणि 'त्या'च्याशी सम्बंधित ठिकाण आहे + १ क्रियापद आहे

अजित कडकडे! Happy
वृंदावनी वेणू वाजे

वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे
वेणूनादे गोवर्धन गाजे

नेमका तो पारंपारिक प्रकार सोडलात तुम्ही....ज्यात लिहिणारा शेवटी स्वतःचे नाव गुंफतो.>>>
बहुतेक पारंपरिक गीतात लिहिणारा नांव गुंफातोच आरत्या पासून पोवाड्या पर्यंत...
पल्लेदार आवाज लागतो माईक शिवाय मला पोवाडा वाटला क्षणभर पण तो आणि ती म्हटल्यावर गवळण क्लिक झाली!! Happy

येस... बरोबर आहे. Happy
अभंग आहे की गवळण, नेमके माहीत नव्हते. म्हणून पारंपारिक म्हटले.
पोवाडा नाही.... नाट्य-गीतासाठी होता तो क्ल्यू... म्हणजे त्यावरून कडकडे / कारेकर आठवले असते
तो = कृष्ण आणि ती = वेणु
माझे आवडते गाणे आणि गायकही.
द्या आता पुढचे कोडे

७१४.
मराठी
सोप्पे एकदम

य व ग ह झ र
य स म ग झ र

अग्गबाई ! क्रुश्नाजी आणि कारवी ताई तुम्ही दोघे आज इथे आहात होयं... Happy

मला नाही येत बाई क्रुश्नाजी हे कोडे... Sad

मला नाही येत बाई क्रुश्नाजी हे कोडे...>>>>

सोप्पय कि आधीच्या गाण्याच्या अनुषंगानेच विचार करा...
महाराष्ट्रातल्या एक थोर परंपरेतील...

Pages