अमेरिकेतील चालू घडामोडी (राजकीय)

Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15

ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तेच तर. एव्हढे स्पष्ट बोललेलं लोकांना कळत नाही. मतितार्थ, मतितार्थ. लोकहो मतितार्थ समजून घ्या! शब्द काही का असेनात.
शिवाय ट्रंप ला वाटते ते खरे. आपल्याला काय वाटते ते खरे नाही. शब्द काय अर्थ दर्शवतात तेहि खरे नाही. आपण काय ऐकतो तेहि खरे नाही.
खरे काय ते फक्त स्पायसर, कॉन्वे इत्यादींनाच माहित आहे, तेंव्हा आपण आता काही बोलायचे नाही.

केली अ‍ॅन ची वादावादी मी अनेकदा पाहिलेली/ऐकलेली आहे. बिनदिक्कत पणे ती काहीही आर्ग्युमेण्ट्स फिरवते. आधी जे बोलली ते ब्लेटण्टली तसे नव्हतेच म्हणून सांगते. दुसरे पोलाइटली ऐकून घेतात व स्वतः बोलायचे थांबतात याचा प्रचंड गैरफायदा ती इतके दिवस घेत होती. पण आता लोक थेट कन्फ्रण्ट करू लागले आहेत.

ही क्लिप पाहा
https://www.youtube.com/watch?v=RodRV9pxAL0

ओबामा ने वायरटॅप केले असे तुला वाटते का या प्रश्नावर आधी कायच्या काय उत्तर दिले. नंतर म्हणे मी ते जनरल वायरटॅप करण्याच्या पद्धतीबद्दल बोलत होते. नंतर म्हणे मी स्वतः इव्हेस्टिगेशन करू शकत नाही. प्रश्नांचा व गैरलागू मुद्द्यांचा धुरळा उडवून मूळ प्रश्न बाजूला टाकून देते ती.

धुरळा उडवत राहणे आणि तो सेटल होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करणे हीच ह्या कॅम्पेन आणि अ‍ॅड्मिनीस्ट्रेशन ची स्ट्रॅटेजी आहे ना? Happy

धुरळा उडवत राहणे आणि तो सेटल होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करणे हीच ह्या कॅम्पेन आणि अ‍ॅड्मिनीस्ट्रेशन ची स्ट्रॅटेजी आहे ना? >>> असं करत राहिल्याने कोणीही ट्रंप आणि त्याच्या अ‍ॅडमिनिस्त्रेशनला सिरियसली घेणार नाही. मला स्पायसर आणि कॉनवे दिसले की ट्रेवर नोआचा एअर फ्रेशनर आठवल्याशिवाय रहात नाही. Happy

ब्रेटबार्टने रायन टेप प्रसारित करून नक्की कुणाला तोंडावर पाडलं आहे रायन ला, ट्रंपला, ट्रंप प्रशासनाच्या रायन स्पॉन्सर्ड हेल्थ केअर बिल ला नक्की कुणाला? काय विचार होता ह्या टेप मागे?
कुशनरने क्रिस्टीचा काटा काढला, बॅनन कुशनरचा काढणार (?) मग सगळा केऑस झाल्यावर ट्रंप बॅननला ला हकलणार असं सगळं होईल असं दिसतंय

निवडणुकी दरम्यान रायनने हे अनेकदा म्हटलंय, पण ते आत्ताच उकरून काढलं म्हणजे ब्राईटबार्टला (बॅननला) रायनचा काटा काढायचा असणार. हे हेल्थकेअर बिल नाही आलं तरी व्हाईट हाउस, ट्रंप, केलीं अन कोणाचं काही बिघडत नाहीये. लिबरल आणि फेक मिडीया सोडून कोणीच ट्रंपला सिरीयसली घेत नाही.
तो काय एक कोलांटी मारेल ... की ते पटेलच सगळ्याना. की रायनचं बिल किती बेकार आहे ते.

रीवाईज्ड ट्रॅव्हल बॅनवर परत हवाईच्या फेडरल जजने कंट्री वाईड टेम्पररी स्टे आणलाय.
https://www.washingtonpost.com/local/social-issues/lawyers-face-off-on-t...
मेरीलॅन्ड आणि वॉशिंगटन चे निकालही लवकरच येतील.

अमितव, ट्रंपने टेनेसी मधे नुकतेच मोठे भाषण दिले. अँड्र्यू जॅकसनची फार स्तुति केली. या जॅकसन प्रेसिडेंटची महति अशी की त्याने सुप्रीम कोर्टाचा निर्णय धुडकावून जॉर्जियातून हज्जारो रेड इंडियन ना ओक्लाहोमात हाकलले, म्हणजे त्यांची जमीन घेऊन गोर्‍या लोकांना तिथे काळ्या गुलामांच्या मदतीने कापसाची व इतर शेती करता येईल. त्याने सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निर्णय धुडकावून लावला म्हणून तो ट्रंपचा हिरो.
तर घटनेतील तरतुदी धुडकावून लावायचे काम लिंकन, एफ डी आर यांनी पण केले आहे.
ज्या ट्रंपने एक साधा नागरिक असताना इतक्या भानगडी केल्या नि त्यातून तो सुटला (कधी कधी पैसे दिले, पण तुरुंगात गेला नाही.), तो राष्ट्राध्यक्ष झाल्यावर काय काय करू शकतो.

इतके राष्ट्राध्यक्ष आले नि गेले, माझे आपले जसे चालायचे तसेच चालू आहे. ते तसेच राहो अशी आशा आहे.

अमित खरा जोक तर tax returns चा होता रे. Rachel Maddow म्हणतेय कि हे टॅक्स रिटर्न्स नि हा एव्हढा एव्हढा टॅक्स भरला नि White House म्हणते कि fake news. एकदा दाखवूनच का टाकत नाहीत

न्यायाधिशावर कॉमेन्ट देणार्यानी हे लक्षात ठेवावे कि जेव्हा ते निर्णय देतात तेम्व्हा ते सर्वकश विचार करुनच देतात. मग त्या न्यायाधिशाचे स्वत:चे मत काहिही असो. भारतात गेली काही वर्षे कोणावरही विश्वास न ठेवण्याची एक साथ उठली आहे. तसे अमेरिकेत किम्वा पाश्चात्य देशात तसे नाही. त्यामुळे लगेच कोणीही उठुन तो न्यायाधिश अशा विचाराचा आहे म्हणून त्याने तसा निर्णय दिला म्हणुन लोक लगेच मोर्चे काढत नाहीत. सर्व निर्णय हे कायद्याप्रमाणे दिले जातात मग तुम्हाला आवडो वा नावडो.

न्यायाधिशावर कॉमेन्ट देणार्यानी हे लक्षात ठेवावे कि जेव्हा ते निर्णय देतात तेम्व्हा ते सर्वकश विचार करुनच देतात. मग त्या न्यायाधिशाचे स्वत:चे मत काहिही असो. >> :ऐतेनः मग लिबरल न्यायाधीश आणि कोन्झार्वेटिव्ह न्यायाधीशांवरून असं म्हणून उरावर बसून लोक गम्मत म्हणून भांडतात का?

जस्ट फॉर द रेकॉर्ड, भारतातही कोर्टाच्या निर्णयावर शंका सहसा घेतली जात नाही. खटले उभे करताना बरोबर पुरावे न देणे वगैरे आरोप पाहिले आहेत पण कोर्टाचे निकाल प्रोसीजर/प्रीसीडन्स प्रमाणेच बघितले आहेत सहसा - मोठ्या राजकीय खटल्यांमधे.

निर्णय कायद्याप्रमाणेच दिले जातात हे खरे आहे. पण ३०० वर्षे जुन्या कायद्याच्या इण्टरप्रिटेशन ला बराच स्कोप आहे. कॉन्झरर्वेटिव्ह किंवा लिबरल बाजूला झुकणारे निर्णय त्यातूनच येतात.

हे सगळीकडेच होते. ट्रम्प ने 'सो कॉल्ड जज' म्हणून जे ध्वनित केले तसला प्रकार अमेरिकेत काय किंवा भारतात काय कोठेच सहसा होत नाही - एक दोन वेळा चमत्कारिक निर्णय वाचायला मिळतात पण 'बाय रूल' तसे दिसत नाही.

>> भारतातही कोर्टाच्या निर्णयावर शंका सहसा घेतली जात नाही

पण म्हणूनच वरच्या कोर्टात अपील करायच्या तरतुदी आहेत ना? Happy

हो ती जी काय चॅलेंज करायची प्रोसेस आहे ती दोन्हीकडे एकाच पद्धतीची आहे (*), असे मला म्हणायचे आहे. निर्णय चॅलेंजच होत नाही असे नाही.

त्याचे इम्प्लिमेन्टेशन जरी वेगळे असले तरी - म्हणजे इथली फेडरल सर्किट कोर्ट आहेत तसे भारतात बहुधा नाही. बाकी जिल्हा न्यायलय->हायकोर्ट->सुप्रीम कोर्ट ही प्रोसेस दोन्हीकडे आहे, पण अमेरिकेत ती राज्याच्या अखत्यारीतील खटल्यांकरताच वापरली जाते. फेडरल अखत्यारीतील खटल्यांकरता सर्किट कोर्ट्स->सुप्रीम कोर्ट ही दुसरी प्रोसेस आहे. उदा: कॅलिफोर्नियाचे बहुचर्चित ९वे सर्किट कोर्ट. याचा कॅलिफोर्निया राज्याच्या अखत्यारीतील खटल्यांशी काही संबंध नाही. त्यासाठी स्टेट कोर्ट्स आहेत.

जाम फनी आहे. असले जोक मारले की मजा येत, ती कर्कश्य बडबड ऐकण्यापेक्षा. >>>

साहेबांचा हा स्ट्रॅटेजिक मास्टरस्ट्रोक आहे. वे अहेड ऑफ हिज टाइम. ओबामाने मला ही वायरटॅप केले व अँगेला मर्केल ला ही. असे त्याने एस्टॅब्लिश केले. पुढे जेव्हा निष्पन्न होईल की पहिली थाप होती, तेव्हा हा काहीही बोलतो म्हणून आपोआप दुसरीही थापच होती असे लोक समजतील. ओबामाला मदत करण्याकरता तो असे बोलला आहे Proud

>> भारतात गेली काही वर्षे कोणावरही विश्वास न ठेवण्याची एक साथ उठली आहे. तसे अमेरिकेत किम्वा पाश्चात्य देशात तसे नाही
हे म्हणणं नक्कीच नाईव्ह आहे. पण विश्वास न ठेवण्याची साथ म्हणजे शेवटी ती लीगल स्ट्रॅटेजी म्हणावी लागेल. जर न्यायाधीशाचा/कोर्टाचा निकाल पटला नसेल तर त्यावर आणखी वरच्या कोर्टात अपील करण्याची तरतूद कायद्यानेच केली आहे (दोन्हींकडच्या [पाश्चात्य आणि भारत]).

न्यायाधीश हे अनबायस्ड निकाल देतात ह्यावर न्यायपद्धतीवर विश्वास असणार्‍याने विश्वास ठेवायला हरकत नसली तरी न्यायाधीशांची स्वतःची माणूस म्हणून काही तत्त्वनिष्ठता असणारच. तेच अमित म्हणतोय की म्हणूनच कॉन्झर्व्हेटिव्ह आणि लबरल न्यायाधीश असतात. म्हणून त्यांनीं दिलेले निर्णय अनबायस्ड नसतात असं नाही तर ते त्यांच्या तत्त्वनिष्ठतेला अनुसरून असतात. ती तत्त्वं अमान्य असणार्‍यांनां ते निर्णय पटणार नाहीतच.

म्हणून त्यांनीं दिलेले निर्णय अनबायस्ड नसतात असं नाही तर ते त्यांच्या तत्त्वनिष्ठतेला अनुसरून असतात. ती तत्त्वं अमान्य असणार्‍यांनां ते निर्णय पटणार नाहीतच. >> हे करेक्ट आहे. फक्त त्यांना हे करण्याचा स्कोप फक्त जेथे कायद्याचे इण्टरप्रिटेशन क्लिअर नाही, तेथेच करता येतो. जेथे घटनेत क्लिअर आहे तेथे त्यांच्या स्वतःच्या मताचा काही उपयोग नाही.

उदा: मॅरेज च्या व्याख्येबद्दल एखादा जज घटनेतील कोणतेतरी कलम घेउन इण्टरप्रिट करेल. कारण घटने त्याचा स्पष्ट उल्लेखच नाही.

ओबामा ने वायरटॅप केले असे तुला वाटते का या प्रश्नावर आधी कायच्या काय उत्तर दिले. नंतर म्हणे मी ते जनरल वायरटॅप करण्याच्या पद्धतीबद्दल बोलत होते. नंतर म्हणे मी स्वतः इव्हेस्टिगेशन करू शकत नाही. >>>>>>
आज आंगेला मर्केल च्या बाजूला उभा राहून म्हणतोय की आपल्या दोघांना ही वायर टॅप केलं म्हणे Happy
काही खर नाही नुसता गोंधळ Happy

इतके राष्ट्राध्यक्ष आले नि गेले, माझे आपले जसे चालायचे तसेच चालू आहे. ते तसेच राहो अशी आशा आहे.>>> +१

हा सगळा गोंधळ दुसर्‍या जास्तं सिरियस गोंधळांवरून (सेशन्स चे पर्जरिंग स्टेटमेंट, हेल्थ बिल, फंडिंग कट्स आणि असेच काही) मिडियाचे लक्ष्य वळवण्यासाठी घातला असे वाटायला खूप वाव आहे. सगळ्या वावड्या ऊठवून दिल्या आणि संशयाचे वातावरण तयार केले की पब्लिक एखादी मोठी हॉट न्यूज फॉलो करून बाकी कडे दुर्लक्ष्य करते. पण कायदा आणि मिडिया कसे सोडेल?
आज काल महाशय सगळं वाचून दाखवतात 'आपले तोंड आप्ल्याच कह्यात नाही' ह्याची जाणीव ईतर एअर फ्रेशनर घेवून फिरणार्‍यांनी चांगली करून दिली आहे असे वाटते.

>> 'आपले तोंड आप्ल्याच कह्यात नाही' ह्याची जाणीव ईतर एअर फ्रेशनर घेवून फिरणार्‍यांनी चांगली करून दिली आहे असे वाटते.
Lol

पण मिडीया हेल्थ बिल, बजेट कट्स ना पण प्रसिद्धी देत्येय ना? कायदा आणि मिडीया काही सोडत नाहीये हे अगदी खरं
मिल्स on व्हील्स कट करणार, तर त्यामुळे कशी गैरसोय होऊन उलट परिणाम होईल इ. बऱ्याच बातम्या ऐकल्या. मार ए लागो च्या व्हिजीट कमी केल्या तर ३ पब्लिक प्लान वाचतील असल्या आचरट Proud बातम्या ही वाचल्या.

या सगळ्याने माझं कामाच्या ठिकाणी लक्ष कमी झालंय. आणि न्यूज जंकी झालोय मी. Sad अरे!!! युरेका !!! हाच प्लान असणार. लिबरल नॉट बिलोन्गिंग टू कंट्री लोकांना असल्या बातम्या वाचायला लावून त्यांना कामावरून काढून टाकायचं. आणि अमेरिकन लोकं आणायचे.

अनेक वर्षांपूर्वी जेंव्हा प्रथम अमेरिकेत आलो तेंव्हा मला असे कळले की कायदे, बजेट हे सगळे फक्त सिनेटर व काँग्रेसमन यांचा काही वैयक्तिक फायदा होईल याच हेतूने बनतात. त्यांचा फायदा परत परत निवडून येण्यात, स्वतःची प्रसिद्धी, उदो उदो होण्यात, किंवा आर्थिक दृष्टीने असतो. देशाचा, जनतेचा त्यात संबंध नाही. जर चुकून काही इतर लोकांचा फायदा होत असेल तर त्याला सरकार जबाबदार नाही.

पण साधारणपणे आपल्या पक्षाचे म्हणणे मानण्यात आले तर पक्षातील सगळ्यांचाच फायदा म्हणून पक्ष स्तरावर मारामार्‍या करायच्या. जनतेत अनेक लोक असतात ज्यांना त्यातल्या काही गोष्टी पटतात, मग ते सगळीकडे जाऊन स्वतःचे मत म्हणून त्याला पाठिंबा देतात.

रिपब्लिकन कँपेन मधल्या लोकांचा रशियाशी असलेला काँटॅक्ट , रशियाचा ट्रंप निवडी मधे असलेला हात, ह्या बद्दल दोन आठवड्यापुर्वी खर्या खोट्या बातम्या येत होत्या, त्या सगळ्या, साहेबांनी स्वतः वायर टॅपिंगचा व्हिक्टीम झाल्याचा कांगावा केल्यापासून बंद झाल्यात किंवा कमी तरी झाल्यात. म्हणजे, साहेबांची पिव्ह्ट करण्याची स्ट्रॅटेजी चांगलीच वर्क झालीये....

होणारच. ज्याला कुणाला असे मूळ प्रश्नापासून लक्ष दूर करायचे असेल तो असेच काहीतरी बोलतो. ट्रंपची तर ख्यातीच आहे, विचार न करता काही पण बोलून टाकायचे, खरे असो खोटे असो.
पण अक्कल असायला पाहिजे ती मीडीयाला की हे असले बरळणे (जे मूळ प्रश्नापासून लक्ष वळवते, ते ) सोडून द्यावे. पण त्यांना सुद्धा सनसनाटी गोष्टींतच जास्त इन्टरेस्ट! नि पब्लिक तर काय, एक मिनिटभरसुद्धा त्याम्चे एकाच गोष्टीवर लक्ष टिकत नाही.
सगळाच वेड्यांचा कारभार!

>>रिपब्लिकन कँपेन मधल्या लोकांचा रशियाशी असलेला काँटॅक्ट , रशियाचा ट्रंप निवडी मधे असलेला हात, ह्या बद्दल दोन आठवड्यापुर्वी खर्या खोट्या बातम्या येत होत्या, त्या सगळ्या, साहेबांनी स्वतः वायर टॅपिंगचा व्हिक्टीम झाल्याचा कांगावा केल्यापासून बंद झाल्यात किंवा कमी तरी झाल्यात.<<

शक्यता नाकारता येत नाहि; किंवा त्या रशिय्न स्पोक्समन ने म्हटल्याप्रमाणे हिलरी कँपेन्मधली मंडळीहि त्यांच्या संपर्कात होती - तेंव्हा तेरी चुप, मेरी भी चुप, असला काहितरी प्रकार असावा... Proud

बजेट मधे डिफेन्स, होमलॅण्ड सिक्युरिटी आणि व्हीए तिन्ही ला फण्डिंग वाढवले - हे त्याच्या कॅम्पेन प्रॉमिस प्रमाणेच आहे. मात्र त्याकरता इतर अनेक चांगल्या कार्यक्रमांना कात्री लागेल असे दिसते.

सर्वात आश्चर्याचे म्हणजे इण्टिरियर, ट्रान्स्पोर्ट आणि अर्बन डेव्ह - या तिन्हीचे कमी झालेले फन्डिन्ग. ट्रम्प च्या कॅम्पेन मधल्या बोलण्यावरून अमेरिकेत इन्फ्रा. प्रोजेक्ट्स बरेच सुरू होतील असे वाटत होते. बर्‍याच फायनान्शियल अ‍ॅनेलिस्ट्स नी सुद्धा कोणत्या कंपन्यांना फायदा आहे वगैरे भाकिते केली होती. पण तसे काही होईल असे वाटत नाही.

महत्त्वाचे म्हणजे व्हीए सोडले, तर इतर कोणत्याही "दुर्लक्षित अमेरिकन्स" ना यातून फार काही फायदा दिसत नाही.

राज तू लिंक दिलेल्या लेखातली हि वाक्ये

Challenged by Zakaria as to whether Kislyak had any similar meetings with Hillary Clinton, Peskov was vague.
"If you look at some people connected with Hillary Clinton during her campaign, you would probably see that he had lots of meetings of that kind," he said.

तेरी भी चुप वगैरे पेक्षा गिरे तो भी टांग उप्पर वाला प्रकार आहे हा.

>>तेरी भी चुप वगैरे पेक्षा गिरे तो भी टांग उप्पर वाला प्रकार आहे हा.<<

हो हो, बरोबर आहे. "वुड प्रॉबेब्ली" असं म्हणण्या ऐवजी त्याने ट्रंपसारखं छातीठोक उत्तर द्यायला हवं होतं. इंटरेस्टींग्ली, झकेरियाची त्या उत्तरानंतरची रिअ‍ॅक्शन नोंदनीय होती... Lol

Pages