बाळगुटी आणि इतर माहीती

Submitted by webmaster on 6 June, 2008 - 00:14

बाळगुटी आणि इतर माहीती.

विशेष सूचना: हे फक्त मायबोलीकरांना आलेल्या अनुभवावर आधारीत सल्ले आहेत. कोणताही उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावा.

या अगोदरचे हितगुज इथे पहाता येईल
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/54450.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना, गायिच दुध दिल तर ते पचतय की नाही हे कस ओळ्खायच? म्हणजे न पचण्याची लक्षण कोणती? मुगडाळ-तांदुळाची पेज दीली तर चालेल का ? अंगावरच दुध वाढण्यासाठी काही आता करता येईल का? कारण त्याची भुक जरा जास्त आहे अस मला वाटतय, म्हणुन हे सगळे प्रश्न. ३ महीने पुर्ण अस्लेल्या बाळाला दिवसातुन साधारण किती वेळा फीडींग कराव?
आणी एक माझ्यासाठी पोट कमी करण्यासाठी काही उपाय सांगा. माझ्याकडे sona belt आहे तो use केला तर चालेल का आता?

शिल्पा,
शतावरी कल्प दोन वेळा घे, सकाळ संध्याकाळ दुधातून. अश्वगंधा चूर्ण, किंवा आसव काहीही चालेल. आसव असेल तर जेवणानंतर दोन चमचे तेव्हढ्याच पाण्यातून दोन्ही वेळा.
खाण्यात बाजरीची भाकरी, दुध, डिंक अळीवाचे लाडू, मेथी इ. गोष्टी असू देत.

गाईचं दुध डायल्युट करून उकळून गार करून दे. पचलं नाही तर जुलाब, गॅसेस होतील. किरकिर वाढेल.
३ महिने पूर्ण झाले असतील तर डाळ तांदुळाची अगदी पातळ पेज (almost पाण्यासारखी) द्यायला हरकत नाही.
पण पेज आणि गाईचे दुध एकदम चालू करू नकोस. ४ दिवसांनी नविन गोष्ट चालू करावी.
कितीवेळा पाजायचे हे प्रत्येक बाळावर अवलंबून आहे. तुझ्या बाळाच्या भूकेप्रमाणे तू स्केड्यूल ठरव आणि ते पाळ.
पोटपट्टा पोट कमी करण्यासाठी चालेल. सिझेरियन नसेल तर सिटअप्स सुरू कर.

लहान मुलांमधे baby eczema असेल तर आंघोळी आधी ऑइल मसाज दिला तर चालतो का?. चालत असेल तर कोणत ऑइल चांगल?

सायली, बाळाला तेलाची अ‍ॅलर्जी नाही न ते बघ. बरेचदा अशा मुलांना तेल चालत नाही. माझ्या मुलीला तेल अजिबात चालत नाही. अगदी मिनरल ऑईलपण. तेल चालत असेल तर बदामाच तेल मुलांना चांगल.

तेलाची अ‍ॅलर्जी नसावी. माझ्या मोठ्या मुलाला पण baby eczema होता. पण dry skin होती बाकी काही अ‍ॅलर्जी नव्हत्या. तो आता ३ वर्षाचा आहे. आता त्याला eczema नाहीये. डॉ. ना पण विचारणार आहे. पण इथल्या डॉ ना ऑइल मसाज माहीत असेल का ते माहीत नाही. नेट वर वाचलं तर ऑलिव्ह ऑइल किंवा बदाम तेल चालतं अस लिहील आहे.

सायली, मी दोन्ही तेलं वापरई आहेत पण माझ्या डॉ. मैत्रिणीचं मत पडलं की ऑलिव्ह ऑईल बदामापेक्षा चांगलं.

गुटि मधल्या काहि घटक्कान्नि बाळाला ग्यासेस चा त्रास होउ शकतो का? माझा मुलगा ६.५ महिन्याचा आहे. त्याला मागच्या वीक मधे सर्दि झालि होति. तेव्हा गुटि वरच्या महितीप्रमाणे गुटि करुन दिली, आता सर्दि बरी आहे, पण गेसेस खुप होत आहेत (अजुन गुटि चालु आहे), तो रात्रि निट झोपत नाहिये. आई म्हणते दुध पुरत नसेल, पण मला तसे वटत नहिये.. ऑवा-शेपा चे पानि द्ययचा विचार आहे, ते कसे द्ययचे ते कोणि सान्गु शकाल का?

गुटीतली औषधे जास्त प्रमाणात दिली गेल्यास त्रास होऊ शकतो. शक्यतो गॅसेसचा नाही होणार. उष्णता वाढून रॅश येणे इ. होऊ शकतो. गॅसेस असतील तर बाळहिरड्याचे वेढे वाढव. शोपा आणि वावडींग, ओवा किंचीत भरडून किंचीत साखर (कणभर), पाण्यात टाकून एक उकळी आणायची. आणि गाळून कोमट पाणी चमच्याने पाजायचे. चमचा हाता लावून फार गरम नाही ना ते पाहा आधी. तसेच चव घेऊन पाहा. फ्लेवर्ड वॉटरसारखे लागले पाहीजे, औषधासारखे नाही. नाहीतर बाळ पाणी पिणार नाही. गरम (सोसवेल इतक्या) कापडाने छाती, पोट, पाठ पण शेक.

एक्झिमा असेल तर एलादी तेल वापरून फायदा होईल. चंदनबलालाक्षादी पण चालेल. १-२ दिवस वापरून पाहा. त्रास झाला नाही तर कंटीन्यू कर.

धन्यवाद, कालच डॉ. कडे जाऊन आले. एक्झिमा नाही आहे. ऊष्णतेमुळे रॅश आली आहे. सध्या कमी कपड्यांवर ठेवते आहे तिला. थोडी रॅश कमी वाट्ते आहे. पुढ्च्या आठवडयापासून तेल मसाज परत चालू करेन. ती आत फक्त ३ आठवड्याची आहे.

आश्विनी, माझ्या २ वर्षाच्या मुलीला गेल्या १ महीन्यापासुन सारखी सर्दी होत आहे. भारतातुन सितोपलादी चुर्ण आणले आहे. ते तिला किती आणि कसे द्यायचे?
आगावू धन्यवाद.

सिंडे Happy

सर्दी जर जास्त असेल तर दिवसातून ३ वेळा दे. आणि एकावेळी मात्रा १/४ पेक्षा थोडी कमी ठेव. ते मधाचं मात्र एकदम बरोबर. Happy

जादू, गुटीची लिंक शोधून देते जुन्या मायबोलीवरून.

धन्यवाद आश्विनी.
२ दिवस सितोपलादी चुर्ण ३ वेळा दिल. स्वरा ची सर्दी बरीच कमी झाली आहे. पण सतत च्या सर्दी मुळे की काय तिच खाणं खुपच कमी झालय. अगदी पहील्यापेक्षा अर्ध. वजन पण कमी वाटतयं. भुक लागावी म्हणून काही देता येइल का तिला?

खाण्याची लगेच घाई करू नकोस. साधं वरण भात तूप, भाज्यांची सुप्स इ. हलकं अन्न घेऊदे. जशी भूक वाढेल तसे जेवण वाढव. पाणी कोमट पिऊ दे चांगली भूक लागेपर्यंत.

माझ बाळाला आता ४ महीने पुर्ण झाले आहेत. अजुन माझ आणी फॉर्मुला मिल्कच चालु आहे. २-३ वेळा तांदुळ-मुगडाळीचि पेज देऊन पाहिली पण तो थुकुन टाकतो. दिवसभर थोडी थोडी लाळ गळत असते पण आम्हि जेवायला बसलो की जास्त गळते आणी तो एकटक आमच्या तोंडाकडे बघुन आम्च्यासारखे तोंड हलवायचा प्रयत्न करतो, अस म्हणतात की अशी लक्षण असणं म्हणजे तो लवकर जेवणार, हे खर आहे का? यावर मी काय करु? अजुन मी त्याला पाणी नाही देत आता चालु करायचे आहे. शोपा वावडींगाचे पाणी चांगले अस ईथेच वाचल. माझाकडचा वावडींग ४ महीने जुना आहे तो खराब होतो का? कारण डबिच्या तळाला थोडी पावडर दीसते आहे. तसा वापरला तर चालेल का? ३० मीली पाण्यासाठी किती प्नमाण घेऊ शोपा-वावडींगाचे? किती वेळ ऊकळु ते पाणी?

कोणी मदत करेल का माझी? pls माझ्या वरच्या प्रश्नांचि ऊत्तरे द्याना? मी खुप गोंधळली आहे, वावडिंग खराब होऊ शकतो का?

शिल्पा, मी मालती कारवारकरांचं 'वंशवेल' बघून हे लिहितेय. तुम्ही बाळाच्या डॉकटरांना पण एकदा विचारून घ्या.

'वंशवेल'नुसार:
*पहिले सहा महिने फक्त दुधावर भर द्यावा. (चार ते सहा महिन्यांच्या बाळाला ६-७ औंस दूध दिवसातून पाचवेळा). कारण बाळाच्या शरिरात तोवर म्हणावे तसे पाचक रस तयार झालेले नसतात.
*पाचवा महिना लागला की वरच्या दुधात दूधःपाणी प्रमाण ४:१ असावं.
*तसंच निरनिराळ्या भाज्या शिजवून त्यांचं सूप देता येतं. (उदा: टोमॅटो, पालक, गाजर, लाल भोपळा, फरसबी ) भाताची पेज, वरणाचं पाणी, कडधान्यांचं पाणी (कडधान्य शिजवून), मटण, मासे ह्यांचं पाणी मीठ घालून, रव्याची खीर, केळं कुस्करून दूध्-साखरेसह.
*मऊ भात, खिचडी (तांदूळःमूग २:१ धुवून, वाळवून, भाजून घेतलेले)-तूप्-मीठ घालून. उकडलेला बटाटा कुस्करून, उकडलेल्या अंड्यातलं पिवळं.

एक पदार्थ एका वेळी देऊन १-२ दिवस थांबून बघावं. पदार्थ पचला तर आणखी नव्याची भर घालावी.

चार महिने ठेवलेले आख्खे वावडिंग खराब होणार नाहीत. खराब झाल्यावर (साधारण वर्षभर इ. ठेवलेले) त्याला पांढरा बुरा येतो. तसा बुरा आलेला नाहीना हे पाहा. शंकास्पद वाटले तरी वापरू नये.

साधारण भांडंभर पाण्यात चिमुटभर शोपा आणि तितकेच वावडिंग थोडेसे भरडून टाकायचे आणि पाण्याला उकळी आणायची. एखाद दुसरा साखरेचा कण घाल. पाणी फ्लेवर्ड वॉटरप्रमाणे वाटले पाहिजे. औषधाप्रमाणे चव नको. कोमट (आधी स्वत:च्या हातावर टेस्ट करून) पाणी चमच्याने भरवावे.

पेज अगदी पातळ करून बघ. आणि त्यात किंचित मीठ आणि तूप घाल.

हाय शिल्पा, माझेही बाळ साडेचार महिन्याचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी त्याला सफरचंद, पेअर शिजवुन देते.पीच (मी अजुन दिले नाही), मोसंबी रस, केळ दूधात कुस्करुन देते. आंबा,मेलन वर्गातील आणी बेरी वर्गातील(स्ट्रोबेरी, चेरी इ.) फळे देउ नयेत.
गाजर्,बटाटा,भोपळा, रताळे शिजवुन प्युरी करुन देउ शकतेस.वरणाचे पाणी (डाळ शिजताना त्यात पालक ,टोमॅटो ,भोपळा वगैरे टाकलास तरी चालेल), डाळ-तांदुळाची पेज कधी तूप-मीठ घालून तर कधी तूप साखर-गूळ (अगदी कमी )घालून द्यावे.पेज करण्यासाठी डाळ तांदूळ (१:२) धुवून, वाळवून, भाजुन मिक्सर मधे बारीक पाउडर करुन घ्यावी.
हे सगळे मी माझ्या बाळाला देतेय आणी तो देखील आवडीने खातोय, पचवतोय. Touch Wood.

अश्विनी, धन्यवाद, मधे मला गुटि बद्दल शन्केला (अनुस्वार कसा द्यायचा?) उत्तर दिल्या बद्दल. माझा अजुन एक प्रश्न आहे. मी अमेरिकेत असते. ईकडे डोक्टर सान्गतात कि मुल १ वर्शाचे होईपर्यन्त मध देऊ नका. माझा मुलगा आता ७ महिन्याचा आहे, त्याला गुटि मधे मध घातला तर चालेल का? मी घालत होते पण परवाच कोणितरि शन्का काडली म्हणुन विचारले. मुख्य म्हणजे अमेरिकेमधे विकत घेतलेला मध चालेल का? कि भारतातलाच चालतो?

हो, मध देऊ नये असं अमेरिकन डॉक्टर्स म्हणतात. मी नेहमीच सांगते की मध द्यायचा असल्यास स्वतःच्या जबाबदारीवर द्या. मी स्वतः माझ्या दोन्ही मुलांना दहाव्या दिवसापासून मधात गुटी दिली होती. तेंव्हा तुम्ही ठरवा द्यायचा की नाही ते. मी भारतातील आणि अमेरिकन दोन्ही मध दिलेला आहे.

अजून काही दिवस चालू ठेव. प्रमाण निम्मे कर. मध्ये बंद ठेव आणि परत दे काही दिवसांनी फ्लू सिझन संपेपर्यंत.

दात येतानाची काय काय लक्षण असतात ते कोणी सांगेल का मला? झोप कमी होण हे त्यातलच एक आहे का? कारण माझ बाळ साडे चार महीन्याच आहे आनी गेले ४-५ दीवस तो पहील्याईतका झोपत नाहीय, किरकीर पण वाढ्लीय, ईतर काही आजार नाही अगदी थोडी सर्दी आहे. जवळ कीवा घेउन बसल तरच शांत राह्तो. काहीही हातात मिळाले (कपडा, ई) की अधाशासारखा वचावचा चावतो, हे सगळ आताच चालु झालय(४-५ दि) त्यामुळे नक्की कशामुळे ते कळत नाहीये. खाणपिण, सु, शी सगळं व्यवस्थित आहे. आधी तो दीवसा झोपुन रात्री जरा त्रास द्याय्चा पण सध्या दिवसापण झोपत नाहीय कशामुळे असेल?
please help me. Dr. ला पण विचारले पण ती पण sure नाहीय अजुन २-४ दि. अशीच situation असेल तर मग check करुया बोललीय.

Pages