Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता विक्र्या कसली वाट पाहतोय?
आता विक्र्या कसली वाट पाहतोय? सरळ डीएने टेस्ट करून डिव्होर्स घ्यावा की!
काहिही काय rmd
काहिही काय rmd
अगदीच वास्तव होईल मग सिरीयल.
दक्षिणा
दक्षिणा
मला तर लॉजिकच कळत नाहीये. लपतछपत डिव्होर्स घेऊन काय होणारे? घरी काय एकदम सांगणार का मग की आजपासून आमचा डिव्होर्स झालाय? म्हणजे मग घरच्यांना उगाच अॅटॅक येणार नाहीत, नाही का? 'आता झालाय ना? तर असूदे!' असं म्हणतील का सगळे? कायच्याकाय!!
मला तर अजूनही त्या बाळाच्या फीडींगचं रहस्य उलगडलं नाहीये. मोनिका त्याला हातही लावत नाही म्हणे. मग जन्मापासून बाळ उपाशी आहे का? का नुसतं 'ओ ले? काय जालं' वगैरे ऐकून पोट भरतंय त्याचं?
बाळ नको होतं म्हणून ती समजा
बाळ नको होतं म्हणून ती समजा नीट नाही करणार पण थोडी माया निर्माण झाली बाळाला बघितल्यावर हे दाखवायला काही हरकत नव्हती असं मला वाटतं. मी नाही बघत पण मध्ये एक सीन बघितला त्यात तिची आजी तिला बोलत होती त्यावरून वाटलं मला, ती बाळाकडे अजिबात बघत नाहीये असं. इतकं टोकाचं नको होतं दाखवायला.
मला तर अजूनही त्या बाळाच्या
मला तर अजूनही त्या बाळाच्या फीडींगचं रहस्य उलगडलं नाहीये.>>>> मलाही. मो बाळाला हातही लावत नाहीये महणजे मग बाळाला दुध वैगेरे कोण देतंय? आणि घरातल्या बाकीच्यांना काही माहित आहे की नाही. काहीबी दाखवुन राहिले.
इतकं टोकाचं नको होतं दाखवायला
इतकं टोकाचं नको होतं दाखवायला.>>> सिरेलीत सगळं टोकाचंच असतं अन्जु. अधलं-मधलं काही नाही.
सिरेलीत सगळं टोकाचंच असतं
सिरेलीत सगळं टोकाचंच असतं अन्जु.>>> हम्म्म true.
विकऱ्याने बारश्याच्या दिवशी
विकऱ्याने बारश्याच्या दिवशी तोंड उघडलं एकदाचं. आजीने मोला घराबाहेर काढलं.. बाळासकट.
बारसं झालं?? काल कि परवा मी
बारसं झालं?? काल कि परवा मी थोडावेळ बघितली तर सगळे मिळून बाळीच नाव ठरवत होते.
विकऱ्याने बारश्याच्या दिवशी
विकऱ्याने बारश्याच्या दिवशी तोंड उघडलं एकदाचं. आजीने मोला घराबाहेर काढलं.. बाळासकट >>>>>>. खरच कि काय? कथानक पुढे सरकता सरकेना आनि दोन्ही लिड अॅक्टर्स इतके मंद कि बघवता बघवेना, म्हणुन सोडुन दिलं होतं पहाण. पण कथा इतकी पुढे सरकली असेल तर पहायला हवी परत.
किंवा आजीला कळणे हे मो / वि यापैकी कोणाचं स्वप्न तर नाही?
मला पण स्वप्नच वाटतंय.
मला पण स्वप्नच वाटतंय.
मा आणि स चं लग्न होण्याआधीच सच्या ऐमुळे मोडणार बहुतेक. तशीही तिला मो जास्त आवडतेय. जोड्या बदलून टाका म्हणावं.
जोड्या बदलतिल पण मालिका
जोड्या बदलतिल पण मालिका संपेल त्या दिवशी.
स्वप्न असण्याची शक्यता आहे
स्वप्न असण्याची शक्यता आहे थोडीफार. पण होऊही शकतं कारण मग सलील आणि मा च लग्न काही त्याची आई होऊ देणार नाही. वि मा तोंड उघडणार नाहीत एकमेकांबद्दल काय वाटतं सांगायला, कळी बंद्च
सलीलची आई कसली त्रासिक आहे, आणि सलील मित्रा बरोबर राहत होता ना, अचानक प्रशस्त घरात कसा काय गेला ?
स्वप्न असण्याची शक्यता आहे
स्वप्न असण्याची शक्यता आहे थोडीफार.>> अरे काय आमच्या उत्साहवर पाणी
विकऱ्याने बारश्याच्या दिवशी तोंड उघडलं एकदाचं. आजीने मोला घराबाहेर काढलं>> आजीनी प्रेक्षकांच्या मनातली गोष्ट केली विकुला थोथरीत वाजवुन. त्या मोनीका ऐवजी त्या मान्शीला पण द्यायची होती एक. मग तै, सईल, ऐ असे बोलणे तरी बंद झाले असते.
हा एपिसोड अजून अॅप वर आलेला
हा एपिसोड अजून अॅप वर आलेला नाही बहुतेक. सैलची ऐ वॅलिंटाइन डेला किती उत्साहाने तू हे कर ते कर करत होती. तर निर्मला अगदी काहीच माहीत नसलयसारखी मी मात्र उशीरा येइन आणि मान्शी लवकर आली पाहिजे उद्या. असा निरोप ठेवते. निर्मलेला काय दुबईरिटृन पतीबरोबरे व्ही डे साजरा करायचा होता कि कॉय. बारसे प्लस साखरपुडा झाला कि नाही?
विक्र्याने एका दमात तोंड
विक्र्याने एका दमात तोंड उघडून सांगून टाकल्याचा प्रोमो पाहिला, तो एपिसोड झाला का?
विक्र्याने एका दमात तोंड
विक्र्याने एका दमात तोंड उघडून सांगून टाकल्याचा प्रोमो पाहिला >> काय सांगतो तो ?
विक्र्याने एका दमात तोंड
विक्र्याने एका दमात तोंड उघडून सांगून टाकल्याचा प्रोमो पाहिला, तो एपिसोड झाला का?>>>
छे असले काही होणार नाही! इक्रान्त ला विकान्तला पडलेले स्वप्न असेल ते बघा!
असे काही झाले तर सिरेल संपवावी लागेल ना!
कुरुडी तो सांगतो या मुलिचं
कुरुडी तो सांगतो या मुलिचं नाव मी इशा ठेवलंय ती माझी मुलगी नाही, आणि मी ही गोष्ट तुमच्यापासून लपवली त्याबद्दल मला माफ करा आणि हवी ती शिक्षा द्या.
मग आजी आधी विक्र्या आणि मग मो च्या थोतरीत लावून देते.
मो चे आजोबा या घरातून तु निघून जा असं सांगतात.
आणि मग मो बाळाला घेउन दारातून बाहेर पडलेली दाखवली आहे.
आणि मग मो बाळाला घेउन दारातून
आणि मग मो बाळाला घेउन दारातून बाहेर पडलेली दाखवली आहे. >>>> मलातर हे नक्कीच स्वप्न असेल असे वाटतेय.... कारण विक्रांत बाळाला जाऊ देईल असे वाटत नाही, त्याच्या साठीच तर त्याने ईतके सहन केलेय
कुरुडी तो सांगतो या मुलिचं
कुरुडी तो सांगतो या मुलिचं नाव मी इशा ठेवलंय ती माझी मुलगी नाही, आणि मी ही गोष्ट तुमच्यापासून लपवली त्याबद्दल मला माफ करा आणि हवी ती शिक्षा द्या.
मी नाही बघितलं. मिसल बहुतेक.
मग आजी आधी विक्र्या आणि मग मो च्या थोतरीत लावून देते.
मो चे आजोबा या घरातून तु निघून जा असं सांगतात.
आणि मग मो बाळाला घेउन दारातून बाहेर पडलेली दाखवली आहे.>>> हे कधी दाखवल
नताशा असं प्रोमोत दाखवलं गेले
नताशा असं प्रोमोत दाखवलं गेले २-३ दिवस. नक्की घडेल कि नाही देव जाणे
धन्स दक्षिणा..... हे जर
धन्स दक्षिणा..... हे जर स्वप्न नसेल तर देर आये दुरुस्त आये असंच म्हणावं लागेल....
ईथले वाचुन आज खुकखु पाहीले.
ईथले वाचुन आज खुकखु पाहीले. बोलला एकदाचा विक्रांत सगळं.
आमच्यामुळे नाईलाजास्तवे माझा भाऊ पण बघत होता, त्याने विचारले कि हा (विक्रांत) नेहमीच रडत असतो का? बर्याचदा ॲड मध्ये पण हा रडवेला दिसतो.
अजुन एक गोष्ट आली का कुणाच्या लक्षात
आज विची आजी त्याच्या थोबाडीत मारते तेव्हा, मानसीने अगोदरच तोंडावर हात ठेवलाय
आज विची आजी त्याच्या थोबाडीत
आज विची आजी त्याच्या थोबाडीत मारते तेव्हा, मानसीने अगोदरच तोंडावर हात ठेवलाय >>>> मानिनी , आज्जी कडक आहे कबूल , पण म्हणून लगेच तिला "विची" वैगैरे म्हणणं जरा जास्तचं होतायं हं ..
स्वस्ति >>>>
स्वस्ति >>>>
अखेर बोळा निघाला विक्रांतचा
अखेर बोळा निघाला विक्रांतचा एकदाचा ! हुश्श
आणि मग मो बाळाला घेउन दारातून
आणि मग मो बाळाला घेउन दारातून बाहेर पडलेली दाखवली आहे.>> असं आहे का ? बाळ तर मला दिसलं नाही .
नीट बघायला पाहिजे
नाही काल एकटीच बाहेर पडताना
नाही काल एकटीच बाहेर पडताना दाखवलिये पण पाऊल उंबर्यात अडखळते. बाळावरचे वात्सल्य जागे झाले असेल. किंवा मग विक्रांतकडच्यांना मानसिक त्रास द्यायचा विचार असेल बाळाला घेऊन जाऊन त्याची आबाळ करुन
किंवा मग विक्रांतकडच्यांना
किंवा मग विक्रांतकडच्यांना मानसिक त्रास द्यायचा विचार असेल बाळाला घेऊन जाऊन त्याची आबाळ करुन >>>>>
नाही नाही. वि ची आजी "थांब" ओरडेल, मो ला आशा जागृत होईल की चला परत घेत्ये, आजी ओरडेल - तुझं पाप घेऊन जा वगैरे वगैरे
आणि नाईलाजास्तव मो ला बाळाला घेऊन बाहेर पडावं लागेल. किंवा त्यापुढे असही होऊ शकतं की वि बाळाला ठेव म्हणेल.
पण वि चा हा स्टँड चुकला - सुरूवातीपासून तो बाळाचा स्वीकार करायला तयार होता. अगदी मो कोमात का कायसं असताना तो स्वतःला बाळाचे बाबा म्हणवून घेत होता. मग आता त्याने मोनिका शी घटस्फोट घेतोयं पण बाळाचा सांभाळ करणार आहे असं म्हणायला हवं होतं.
रच्याकने - मा हॉस्पिटल मधे कशी पोचली ? तिच्याकडे गाडी नाहीये. इतक्या पटकन रिक्षा \ टॅक्सी बरी मिळते तिला.
बिचारा सलील, मोडणार लग्न त्याचं आता.
Pages