आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडे क्र.५०५
(हिन्दि)
अ म क अ र ह त ह म भ म
द न क ह र ह अ स म त ख
अ त म क ग ह म च क न ह ग त...

नवीन / जुने काहीतरी क्लू द्या>>>> ताई नविन आहे.
१)आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.>>>>हे पण लक्शात घ्या...

अजून घ्या क्लू...
१)गाण्यात रंग,वस्र ,पाणी,यांचा उल्लेख आहे.
२)रंगपंचमी साठी सुटेबल ....

५०५.

हिंदी

इतना मज़ा, क्यूँ आ रहा है
तूने हवा में भांग मिलाया
दुगना नशा क्यूँ हो रहा है
आँखों से मीठा तूने खिलाया
हो तेरी मलमल की कुर्ती गुलाबी हो गयी
मनचली चाल कैसे नवाबी हो गयी तो

मुळात गाण्यात रिपीट होणारी अक्षरे देखिल द्यायल हवीत ना! ती मह्त्वाची असतात गाणे ओळखायला!

बलोबल..बलोबल...कस होत कोड???
मुळात गाण्यात रिपीट होणारी अक्षरे देखिल द्यायल हवीत ना! ती मह्त्वाची असतात गाणे ओळखायला!>>>पन गान्यचि
सुरुवातिचि अक्श्र द्यायचि असा नियम आहे ना???म्ग पुर्न गानच द्यायला लागल अस्त मला..

चांगलं होतं, म्हणजे सगळ्यांनी ऐकलेलं असलेलं गाणं.
पण कृष्णा म्हणतात तसे रिपीट होणार्‍या ओळी यायला हव्यात.

कावेरी, गाणं छान होते! माहितीतले होते! तुला त्याबद्दल फुल मार्कस! Happy
फक्त प्रचलीत ओळी गाण्यातल्या त्या यायला हव्या!..

बर्‍याच हिंदी गाण्यां मधे सुरुवार शेरो शायरीने होते... गाणे वेगळ्याच शब्दाने सुरु होते तेंव्हा ते शब्द देणे अपेक्षित..

५०६.

मराठी

म र म
क ह त म म

घ्या सोप्पे

ref : ५०६. मराठी

अग्गबाई ....सोप्पे पणाची व्याख्या तरी काय म्हणते मी, नटवर्य कृष्णा ?
कोणाला संशय पण येणार नाही, की इतके संधि-समास सोडवायला लागणार आहेत.

५०६
मृगनयना रसिक मोहिनी ।
कामिनी होती ती मंजूळ मधुरालापिनी ।
नवयौवनसंपन्‍न रम्य गतिविलासिनी ॥

आह्लादक मुखचंद्रहि होता ।
होती दृष्टि ती प्रेम-रस-वाहिनी ॥

@कारवी, बर्याच दिवसांनी आलात इकडे.

५०७
हिंदी
स ह म च ज ल
अ य ह क प ल
म ठ र ज च ल
थ य द स थ ल
अ क य म प प प ह
स क य म प प प ह

Mi online yayachya adhich sopi gani takun olakhali geliyt... Nishedh>>>>>उगि उगि बाला....पुध्च्य वेलि लव्क्र याय्च ....

Pages