निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही हल्ली त्या झाडावरच सुकलेल्या दिसतात. आताची पिढी काही उत्सुक नसते ह्यांच्यासाठी.

होला आणी चिंचा दोन्ही फोटो मस्त...
जागू मी काय म्हणते, तू एक पक्षी अभयारण्य काढ Wink ... काय सारे पक्षी येतात तुझ्याकडे आसर्‍याला...

कालपरवा काय मज्जा आली...
निसर्गाबद्दल माहिती असलेले चालतेफिरते एन्सायक्लोपेडिआ होते माझ्याबरोबर...
सुपर्ब सफर होती ती... बरेच देशी वृक्ष, त्यांची वैशिष्ट्ये अस सगळं बघायला मिळालं.. पुस्तकात वाचलेल्या झाडांच प्रत्यक्षदर्शन झालं.. बर्‍याच शंकांच निरसन झालं.. मज्जाच मज्जा आली..

काल पहिल्यांदा मी दयाळ बघितला... Wink
अन तारकासमुह सुद्धा पाहिलेत..

फोटो येतीलच काही इथं इव्हेन्च्युअली..

हो टिना मी सगळ खुप मिस केल. पण तुमच्या आनंदात सहभागी.

जागू मी काय म्हणते, तू एक पक्षी अभयारण्य काढ Wink ... काय सारे पक्षी येतात तुझ्याकडे आसर्‍याला...

पण वाघ नको त्यात. मला भिती वाटते. Lol

आणि सिताफळाचं फुल खाल्ल्यावर सुद्धा... पण ती फुल जास्त खाल्ल्यानं डॉक सुद्धा दुखत..
वाघ आला तर माझ्या अभयारण्यात पाठवून दे... मी ठेवेल त्याची सारी बडदास्त...

सर्वांना कळकळीचे आवाहन..कृपया आपले चरणकमल इथेसुद्धा लागु द्या...
तुमच्या निसर्गाभ्यासाचा लाभ सार्‍यांना होऊ द्या...
कस्काय ला मेमरी अन तांत्रिक बाबींचे बरेच लिमिटेशन्स आहेत जे इथ नाही तर प्लीज निसर्ग अन इतर माहिती इथे सुद्धा मेन्शन करायला विसरु नका _/\-_

नितीन मी मिसल्या ना...
पता नही कुठल्या धुंदीत होती आणल्यास तेव्हा.. त्या गुंजांचा फोटो दे ना इथं...जिप्सी कडे आहे शायद..
मला एकच लाल गुंजा (हे एकवचन आहे कि अनेकवचन?) मिळाली... तीपन विसरुन आली मी तिथचं Sad

व्वा मस्त गप्पा आणि प्र.ची..
जागु पक्षांचे फोटो खुप सुरेख टिपतेस तु.. विलायती चिंच खुप आवडीची... फोटो ही खुप छान!

अरे वा ईन मीन तीन, बरेच दिवसा नंतर आलात.. सफेद गुंज मस्तच!!

जागूचे पक्षी मला बघता येत नाहीत क्रोमला प्राॅब्लेम आहे Sad

पांढर्‍या गुंजा मस्तच!

सध्या सोनसावर फुलली आहे मस्त एआरएआयच्या टेकडीवर! काल झाडाखाली सोन्याच्या फुलांचा सडा पडला होता.

आज पुण्यात अक्षरधारा बुक गॅलरी मधे लेखक श्रीनिवास पंडित यांच 'जंगल रुजवणारा पायेंग आणिक काही माणसं' आणि विलास गोगटे यांच 'जैविध्य कथा जैवविविधतेची' अशा दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा होता. प्राध्यापक श्री. द. महाजन यांच्या हस्ते तो पार पडला.
नक्की वाचावी अशी दोन पुस्तके मिळाली.

बॉटनीचे प्राध्यापक असलेल्या श्री द. महाजन यांनी या दोन्ही पुस्तकांची अतिशय छान ओळख करुन दिली.
'जंगल रुजवणारा पायेंग आणिक काही माणसं' या पुस्तकाची ओळख करुन देताना ते निसर्गाबद्दल तसेच त्यातल्या काही संज्ञेबद्दल अगदी भरभरुन बोलले.
जादव पायेंगची त्याच्या कामाची सुरुवात कशी झाली, त्याच्या आजुबाजुची परिस्थिती, त्याम्च्यावर आलेली संकट, त्यातून काढलेला मार्ग, त्यांच्याबद्दल लोकांना कसं कळलं, जंगलात प्राणि दाखल झाल्यावर ओढवलेला जनमाणसाचा राग या सार्‍यांबद्दल ते अगदी सुंदर बोलले.

सोबत असलेल्या श्री रघुनाथ ढोले यांनीही त्यांच्या कार्याची संक्षिप्त ओळख करुन दिली.
ते चालवित असलेल्या नर्सरीला ज्याचं देवराई असं नामकरण त्यांनी केलयं त्याबद्दल, ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी काही माहित पुरवली.
भारताच्या ५०व्या स्वातंत्रदिनी मनाशी केलेला निश्चय, तो पुरा करतानाचा प्रवास, त्यात आलेल्या अडचणी, त्यावर केलेला अभ्यास असं सार काही सांगितल. वेळेअभावी अजुन भरपूर काही बोलायच शिल्लक राहिलेलं होतं ज्याकरता आणखी एक कार्यक्रम ठेवायचं तेथील प्रशासनाने ठरवलयं.
एकंदर मस्त अनुभव होता.
निसर्गासाठी निसर्गात काम करणार्‍या लोकांसोबतचा संवाद खुप काही शिकवून जातो.

लय दिसांनी आपल्या धाग्यावर येतेय. फोटो easily टाकता येत नाही म्हणून फार हळहळ वाटते, या धाग्यावर आलं की. आता आळस झटकून फोटो अपलोड करेन.
टीना, ममो चा व्हेज कार्व्हिंग चा धागा बघितला. किती कल्पकतेने सजावट केली आहे. मस्त. तुम्ही सिताफळाची फुलं पण खायचे की काय!! मला त्यांचा वास खूप आवडायचा. मस्त हिरव्या चाफ्यासारखा असतो ना. अरेरे, तू आधी भेटली असतीस तर मीही फुलं खाऊन बघितले असते Proud
दिनेशदा, गुलाबी कांचन अप्रतिम दिसतोय. खूप दिवसांनी हा 'बेबी पिंक' कलर बघायला मिळाला Happy माझ्या कॉले़जच्या दिवसांमध्ये हा रंग फार 'इन' होता Happy आता फारसा दिसत नाही.

सोमवारी मी, शांकली, निलीमा आणि शांभवी सगळे मिळुन कात्रज घाटात एक दुपार घालवली..
फुलारलेला काटेसावर, सोनसावर्/गणेरी, उंदिरमारी, पांगरा, पळस, फळावर आलेला कहांडळ/भुताचं झाड, महारुख, वड, शिरीष, टेनिसबॉल, पुण्यातील एकमेव व्हाईट शेविंग ब्रश ट्री, जंगली बदाम, पांढरी सावर, सिल्व्हर ओक, फळांनी लदबदलेले उंबराचे झाड आणि असे बरेच वूक्ष बघुन आलो .. फोटो थोपूवर, कस्काय वर टाकलीएत सो परत इथं टाकल्यावर बोर होतील म्हणुन देत नाही..
एकंदर खुप मज्जा आली.. आणि खुप माहितीही भेटली..काही झाडांबद्दल असलेले कन्फ्युजन सुद्धा दूर झाले..
रम्य तो दिवस..

जागू,
कोकिलाबेन मस्तच...
मी राहते त्या शेजारी मंदिरात एक पिंपळवूक्ष आहे.त्यावर दिसते हि अधुनमधुन..
परसदारी आंब्याची झाडं आहेत त्यावर वेडे राघु, कोतवाल वगैरे दिसतो.. आणि बाजुला असलेल्या चार मजली बिल्डींगच्या गच्चीवर घारी दिसतात..
कात्रज घाटातून येताना खंड्या दिसलेला...आणि पन बरेच जण दिसले पण त्यातले काही ओळखता आले नाही.
तू खंड्यांचे फोटो देते तेव्हा बहोत जळजळ होते मला... मला नेहमी तो प्रवास करताना गाडीतून दिसतो... ग्लिम्प्स अगदी Sad

टीना, शांकली सोबत झाडांची ओळख करुन घेत फिरण्यासारखा आनंद नाही... अगदी ध्यास घेतलेला असतो झाडांचा तिने. अशीच ओढ एकेकाळी मलाही होती.. पण आता नजर तृप्त झाली आहे.

दिदा,
ती चालती बोलती डिक्शनरी आहे...
मराठी नावं नाही नावे अन जोडीला बोटॉनिकल नावे सुद्धा सांगते ती.. भारीच मेमरी ब्वा...
तूमची नजर तृप्त नका होवू देवू..मी अजुन पहिलीतच आहे आणि मला तुम्हा सार्‍यांच गाईडन्स हवयं..

हा माठ मी इथे पहिल्यांदाच बघितला ( भारतात मिळतो असे जागू म्हणाली, मी नाही बघितला ) शिजवून मात्र लाल
माठासारखाच रंग आला..

laal maath.JPG

सध्या पूर्व दुतगती महामार्गावर सगळीकडे गुलाबी फुलांची झाडे फुलली आहेत. कोणी सांगू शकेल का त्यांचे नाव?

मदत हवी आहे -

मी कढीपत्त्याचं रोप आणलं तेव्ह बर्यापैकी उंच होतं पण एकदम वरतीचं पानं होती. कुंडी लहान पडली म्हणून रोपाची जरा हलवाहलव झाली. त्यात का अति उन्हामुळे - सकाळी ८ ते दुपारी १२ - सगळी पानं वाळली Sad . मी पाणी घालत्ये रोज, काल खत पण घातलं. पुन्हा पानं फुटायची शक्यता आहे का ? अजून काही खत घालू का ? मी थोडं ताक घातलं एकदा पण बुरशीचं आली मातीत. काल ती माती काढून टाकल्ये.

इन जनरलचं झाडं टिकतचं नाहीयेत. ऊन जास्त म्हणून दुसरीकडे ठेवावं तर सुकून जातायतं.

निर्मल, टॅबेबुइया असणार तो. यात पिवळा आणि गर्द गुलाबी असे दोन प्रकार आहेत. पण मूंबईत जास्त करुन गुलाबीच दिसतो.
कढीपत्ता ला जास्त पाणी घालूनही चालणार नाही. पालवी फुटायची असती, तर दोन चार दिवसातच फुटली असते. आता माती बदलून,
त्यात बुरशीनाशक मिसळून नवे रोप लावावे लागेल.

Pages