मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

आता स्मायलीज वगळता काही प्रॉब्लेम वाटत नाहीये मला. अपग्रेडवर काम केलेल्या सर्वांचे अनेक आभार. Happy

मला अजुनही प्रॉब्लेम येतोच टाईप करताना. बॅक स्पेस डिलीट द्याव लागतचं अक्षर खोडायच असेल तर. हे फिक्स नाही का करता येणार?
निळा रंग आता मायबोलीचा ब्रँड कलर असणार आहे का ? लुक अजुन खूप कॉम्पॅक्ट करता आल तर खूप छान होईल. पण जे आहे ते ही छान आहे. मिसळपावचा लुक बघून (माफ करा , तुलना करण्याचा हेतू नसून दुसर्‍या मराठी साईटचं उदा द्यायचा आहे.) तस वाटतं एवढच. नॅव्हिगेशन तुलनेने तिथे सोप वाटल. तिथे अकाऊंट नाही काढल त्यामुळ ग्रुप मधले लिखाण वगैरे तत्सम बाबी कशा वर्क होतात माहित नाही. पण छान सुटसुटीत वाटला ले आउट जेव्हढ बघितला त्यावरून.

आता बघितल कि कमेंट पोस्ट केल्याचा मेसेज ग्रीन कलर मध्ये येतोय. तस का? एकच कलर ठेवला तर ब्रँडींगला सोप जाईल. Happy

एक लो हॅन्गिंग फ्रुट : धागाकार्त्याचं नाव प्रतिसादात पूर्वी वेगळ्या रंगात यायचं तसं करा ना. सवय झाल्येय म्हणून.
आणि एक: क्रोम मध्ये मायबोलीचा वरचा लोगो landing पेज वर घेऊन जात नाहीये. आयई मध्ये जातोय. स्ट्रेंज. काल मला वाटतं क्रोम मध्ये पण घेऊन जात होता.

आधी मला हे नवीन रुप आवडले नव्हते.
सईने म्हटल्याप्रमाणे हे उर्ध्वश्रेणीकरणाचे काम करायला बराच त्रास टीमने घेतला आहे.हळूहळू नवीन रुपाची सवय होईलच.फाँट मोठा करण्याचे आवर्जून पहा.खूप गोरी मायबोली वाचताना डोळ्याला त्रास होतोय.

एक लो हॅन्गिंग फ्रुट : धागाकार्त्याचं नाव प्रतिसादात पूर्वी वेगळ्या रंगात यायचं तसं करा ना. सवय झाल्येय म्हणून. << +१
प्लस सबमिटेट बाय पण वर आल तर खुप छान होईल. हव तर त्यावर एक पोल घ्या. नक्कीच मेजॉरीटी पब्लि क ला आवडेल ते.

आता हे बदलत रुप आवडायला लागला आहे!

छान वाटतेय नविनीकरण.. सुरवातीलाच ६ ऑप्शन ठेवुन तिथुन आवडीच्या ठिकाणी जायचं हे छान Happy मोबाईल वर फाँट छान वाटताहेत.. एकुणच छान..
मायबोलीच्या नविनीकरणासाठी ज्यांनी हातभार लावलाय त्यांचे अभिनंदन! Happy

क्रोम आणि स्मार्टफोन वर आता मायबोली बरीच नीट दिसते आहे. पण फायरफॉक्स वर अजूनही खूपच लहान फोन्ट दिसत आहे (वर्जन 50.1.0). हा known issue आहे का? नसेल आणि स्क्रीनशॉट वगैरे हवा असल्यास सांगा.

बादवे ... <strong>निवडक १० गायब का झालेत?</strong>

बाकी स्मायली वगैरे गायब झाल्याने पूर्वीच्या धाग्यांवर जिथे हसलो होतो तिथे अता :हहगलो: वगैरे दिसू लागले आहे :D :D

कृपया या धाग्यात लिहिलेली घोषणा वाचा:
खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. प्रत्येक धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.

तसेच
"अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील.."

मी पहील्यापासून आय ई वर आहे. मला काही प्रॉब्लेम आला नाहीये, फाँटस व्यवस्थित बघता येतायेत. मी पीसी वापरते. मोबाईल नाही. बाकी काही काही गोष्टीत अ‍ॅडमिन टीम सुधारणा करतेय, जसं पेज नं वर दिले परत ते छान झालं. नवीन मायबोलीच्या रुपाची सवय होतेय हळूहळू. सर्व टीमने घेतलेल्या आणि घेत असलेल्या मेहेनतीला सलाम.

मोबाईलसाठीच उर्ध्वश्रेणीकरण केले असेल तर ठीक आहे. पण संगणकासाठी फाँट खुपच बारीक वाटत असल्याने फारसा आवडला नाही. धन्यवाद !

इथे मायबोलीची तुलना मिपाबरोबर केली जातेय म्हणून लिहितेय. मला माबोचं उर्ध्वश्रेणीकरण आवडलं. मिपाचं अजिबात नाही. कारण मी माबो आणि मिपा दोन्ही मोबाईलवरुनच वापरत आलेय. आता माबो वापरणं खुपच सुटसुटीत झालंय. एकाच ठिकाणी स्क्रोलींग करावं लागतं त्यामुळे मस्त वाटतं तर मिपा मोबाईलवरुन वापरणं अतिकठीण झालंय. खाली उजवीकडे, डावीकडे सगळीकडे स्क्रोल करावं लागतं, फाँट साईजपण कमी करता येत नाहीये. मी तिकडे डोकावणं पार सोडलंय आता.

'शोध' search मध्ये 3241 results मिळाले. पण लिस्ट दहा पानांच्या वर (अंदाजे १०० reaults) दाखवत नाही. पुढे पहायचं असेल तर काय करायचं?

दुसर्‍यंनी लिहिलेली विपु एडिट करायची सोय सोय म्हणून ठीक आहे पण प्रयोजन कळले नाही. विपु काढून टाकायही सोय आहे ते पुरेसे आहे. फार तर एका फटक्यात सार्‍या विपु काढायची सोय द्या, तेही जमल्यास व फार अवघड नसल्यास.

आजचे बदल
मायबोलीचा मुख्य फाँट आणि त्याचा आकार बदलला आहे. वेगवेगळ्या सदस्यांना आलेल्या अडचणींमुळे हा बदल आवश्यक होता. आता बहुतेक सगळ्या ब्राऊझर मधून , मोबाईलमधून मजकूर नीट दिसेल अशी अपेक्षा आहे. आम्ही अनेक ब्राउझरवर चाचण्या करून पाहिल्या आहेत तरीही एखाद्या विशिष्ट ब्राउझर, वर्जन वर अडचण येऊ शकते. पण ती राहून गेलेली चाचणी तुमच्या कडून फीडबॅक आल्याशिवाय लक्षात येणार नाही.

कृपया अडचण आली तर आधी तुमच्या ब्राऊझरचे पान ताजे तवाने (Refresh) करून पहा.

आजचे बदल
मायबोलीचा मुख्य फाँट आणि त्याचा आकार बदलला आहे.
>>> नवीन फॉन्ट एकदम चिकणा दिसतोय. मस्तं!!! आवडला!!!

Pages