मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago
Time to
read
1’

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

आवडायला लागलीये मायबोली. हळू हळू सवय होईलच. ह्या ऊर्ध्वश्रेणीकरणावर काम केलेल्या आणि सतत करीत राहिलेल्या टिमचं मनापासून अभिनंदन.
विपूमधे आलेले दुसर्‍यांचे प्रतिसाद बदलण्याची सुविधा ठेवण्यामागे काय प्रयोजन आहे? ध चा मा करण्याची सुविधा कशासाठी?
कृपया ह्याचा विचार करा(च).

मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर.....

Admin-Team Posted
15 January, 2017 - 17:43
शेवटचा प्रतिसाद
6 दिवस ago
ह्याच पानावर शेवटचा प्रतिसाद ६ दिवस अगोदर असे का दाखवत आहे? लेख ६ दिवसा पूर्वी बदलला होता का?

एक शंका आहे.
उर्ध्वश्रेणीनंतर तपासून पाहीलेले नाही. पूर्वी एखाद्या भेट न दिलेल्या धाग्यावर सगळेच प्रतिसाद नवीन असे न दिसता काही नवीन असे दिसायचे. असे का होत असावे ? हे पण काही धाग्यांवरच होत असे. सगळ्याच नाही.

बरं.
वेमा, अ‍ॅडमिन किंवा अ‍ॅडमिन टीम यांच्यावतीने अधिकृत उत्तर देताय का अमितव ?
सदस्यनाम बदलल्याने प्रोफाईल बदलते असे म्हणायचेय का तुम्हाला ?

ग्रुप मधे डायरेक्ट जाता येत नाही.
संबंधीत धागा ओपन करून तिथे खाली लिहिलेल्या "ग्रुप नाव" वर क्लिक केले तरच जाता येते.
अन्यथा पहिल्या पानावरून धाग्याच्या नावाखाली जे "ग्रुप नाव" येते त्यावर क्लिक करता येत नाही. तसेच धागा उघडल्यावर सुध्दा उजव्या बाजूला येणार्‍या "ग्रुप नाव" वर सुध्दा क्लिक करून ग्रुप मधे जाता येत नाही.

@webmaster ,प्रतिसादकर्त्याचे नाव वर दिले तर बरे होईल,अनेकांची ही सूचना आहे पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात.कृपया तेवढे बघा.

very small font.PNG

अ‍ॅडमिन हे एकदा चेक करा... पानाच्या वरती जी लिंक येते आहे तिचा फॉण्ट साईज फारच छोटा दिसतो आहे.. (लॅपटॉप , फायफॉक्स )

आजचे बदल
१. ग्रूप मधे असलेल्या प्रत्येक पानावरून वर उजव्या बाजूच्या ब्लॉकमधे शीर्षकावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जायची लिंक पुन्हा सुरु झाली आहे.
२. ग्रूपच्या कुठल्याही पानावरून त्या त्या ग्रुपमधे नवीन मजकूर (नवीन धागा, नवीन प्रश्न इत्यादी) लिहण्याची सोय पुन्हा सुरु झाली आहे.

नवीन मायबोली खूप छान look..एक नम्र सूचना - धाग्याच्या पानावर गेलं की पहिलं पान दिसतं. latest चर्चा बघण्यासाठी परत 'शेवट' वर click करावं लागतं.त्याऐवजी आधीच शेवटाचं पान दिसलं तर प्रत्येक वेळी करावा लागणारा click वाचेल.

परत काही निरिक्षणे.

मेन मेन्यूच्या जागी कधी कधी ३ आडवे निळे पट्टे दिसताहेत, तोच मेनू आहे ते लक्षात येत नाही.

१ आठवडा ago , असे वाचायला फारच विचित्र वाटतेय, आणि ते अपडेटही होत नाहिये.

फाँट मधे अजून बराच साईझ चा फरक दिसतोय.

mb.png

>>मेन मेन्यूच्या जागी कधी कधी ३ आडवे निळे पट्टे दिसताहेत, तोच मेनू आहे ते लक्षात येत नाही.<<

मोबायल ॲप/वेबच्या युआय मध्ये तो सिंबल ड्राॅपडाउन मेनुकरताच वापरला जातो.

कुठल्याहि पानावरुन वेबपेज रिफ्रेश/रिलोड करता यावे - याकरता केलेली माझी सूचना अजुन पेंडिंग आहे...

फारेण्ड Proud वेमा = वेबमास्टर.
वेडमास्तर नव्हे, अस स्वत:च स्वत:च्या पोस्टवर खदखदून हसायला. Wink

पहिल्या पानावर शीर्षक स्तंभाची रुंदी अजून वाढवता येईल का? पुढील ३ स्तंभांना इतकी जागा लागत नाही. पहिल्यात धाग्याचे नाव मोठे असेल व / किंवा अधीक ग्रुप मधे असेल तर बरीच जागा व्यापली जाते एकाखाली एक.

वा वा!
मलाही फारएण्डसारखंच वाटलं होतं वेमांच्या स्मायल्या बघून! Uhoh Proud

> मेन्यूच्या जागी कधी कधी ३ आडवे निळे पट्टे दिसताहेत, तोच मेनू आहे ते लक्षात येत नाही
बहुतेक सगळ्या मोबाईल अ‍ॅपसाठी हे पट्टे वापरायचा संकेत आहे.

>१ आठवडा ago , असे वाचायला फारच विचित्र वाटतेय, आणि ते अपडेटही होत नाहिये.
ते अजून काढले नाही कारण ते का अपडेट होत नाही याचा शोध घेतो आहेच. याच कारणामुळे (चाचणि अजून सुरु असल्याने) फक्त काहीच पानांवर ते दिसतेआहे,, सगळ्या नाही.

>फाँट मधे अजून बराच साईझ चा फरक दिसतोय.
सध्या breadcrumb चा आहे तो खूपच लहान आहे याची कल्पना आहे. पण अजूनही त्या ओळीत मधूनच काही त्रूटी दिसतात. त्यामुळे त्या दुरुस्त होईपर्यंत मोठ्या करण्यापेक्षा आहे त्याच आकारात ठेवले आहे. चुकीच्या गोष्टी मोठ्या अक्षरात कशाला दाखवू? Happy

>बॅक बटन दाबले तर युजर लॉग आउट होतो.
हे पुन्हा तपासायला काही जमले नाही बुवा. मी तपासले तेंव्हा व्यवस्थीत चालले. IPAD , IOS version?

>पहिल्या पानावर शीर्षक स्तंभाची रुंदी अजून वाढवता येईल का? पु
हो विचार करतो आहो. पण डेस्कटॉप, मोबाईल , टॅबलेट सगळीकडे चालेल असा मधला मार्ग अजून शोधत आहे.

>कुठल्याहि पानावरुन वेबपेज रिफ्रेश/रिलोड करता यावे
तुमची अडचण समजली. पण त्यासाठी तुम्ही जो उपाय सुचवला आहे ( परत सारखे "नवीन लेखन" पानावर जाणे ) यापेक्षा काही जास्त सोपे करता येते का ते पाहतो आहोत. अर्थात ही अडचण जुन्या मायबोलीवरही होतीच की बरोबर?

मी कविता/गझल आणि इतर काही ग्रूप्सचा सदस्य नसतानाही त्यातले नविन लिखाण मला माझ्यासाठी नवीन मध्ये दिसते आहे.

क्रोम वर सीपीयू खूपच खात आहे मायबोली साईट. त्यामुळे कॉमेंट लिहिणे खूप संथ होतेय. जवळजवळ अशक्य. Waiting for cas.criteo.com अशा सारखे मेसेज सातत्याने येत आहेत. याचा अर्थ सतत इन्टरनेट एक्सेसिंग सुरुच राहत आहे. इथे खाली स्क्रीनशॉट पहा.

mb_temp.jpg

Pages