मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago
Time to
read
1’

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

@atuldpatil@, @श्रुति दामले
हा प्रश्न यापुढे यायला नको. अजून येत असेल तर कृपया सांगा.
@Anvita
तुमचे ब्राउझर ताजेतवाने (Refresh) करून पहा.

नावाच्या बॅकग्राऊंडला एक रंगीत पट्टी जरी दिली तरी पुरेसे आहे. त्याने धागाकर्त्याचे नाव वेगळे दिसेल

Navigation

नवीन लेखन करा

माझे सदस्यत्व
जाण्याची नोंद

>>>>>>>>>>>>>>

यामधे बराच गॅप आहे. अजुन काही समाविष्ट होणार आहे का ?

मायबोली हे संस्थळ ज्या उद्देशाने बनले ते उद्देश जुन्या सदस्यांना माहीत असतील. पण नवीन सदस्यांना ते माहीत असतील असे नाही. बरेचदा आणखी एक संस्थळ म्हणूनही सदस्य फिरत फिरत येतात. त्यांच्याकडून जे धागे वारंवार निर्माण केले जातात तो एक वादाचा विषय होऊ पाहतोय. यासाठी काही दिवस मॉडरेटर्सची व्यवस्था असावी जेणेकरून कुठले धागे काढायला नकोत, कुठले स्विकारार्ह आहेत याचा सर्वांनाच अंदाज येईल.

विचारपूस मध्ये आलेल्या निरोपा च्या खाली प्रतिसाद म्हणुन बटण आहे. त्यात प्रतिसाद लिहुन सेव्ह केल्यास त्या सदस्याला निरोप त्याच्या विचारपूस मध्ये दिसायला हवा ना? की विचारपूस हे वन-टु-वन चॅटींग म्हणुन आहे तर त्याचा लुक दोघां करता सेम असेल का?

गेले तीनचार दिवस माबो वेबसाईट अ‍ॅक्सेस केली की लॅपटॉप हँग होतो आहे. maayboli.com not responding असा मेसेजही येतो. अजुन कुणाला हा प्रॉब्लेम येतो आहे का?

फूल यांची ही सुचना आवडलि. हे शक्य आहे का प्लीज?----
एक नम्र सूचना - धाग्याच्या पानावर गेलं की पहिलं पान दिसतं. latest चर्चा बघण्यासाठी परत 'शेवट' वर click करावं लागतं.त्याऐवजी आधीच शेवटाचं पान दिसलं तर प्रत्येक वेळी करावा लागणारा click वाचेल.

@फूल, @राया
ही सोय या आधी होती आणि आताही आहे. धाग्याच्या नावावर क्लिक करण्याऐवजी प्रतिसादामधे जो आकडा दिसतो त्यातल्या दुसर्‍या आकड्यावर क्लीक केले तर जे प्रतिसाद तुम्ही अजून वाचले नाहित थेट तिथेच तुम्ही जाता.
(९/९) : ९ प्रतिसाद, ९ वाचले नाहीत : दोन्हीकडे टिचकी मारली तरी पहिल्या न वाचलेल्या प्रतिसादावर जाल
९२/७ : ९२ प्रतिसाद , त्यातले ७ तुम्ही वाचले नाहीत. ९२ वर टिचकी मारली तर पहिल्या पानावरच्या प्रतिसादावर जाल. ७ वर टिचकी मारली तर जे ७ तुम्ही वाचले नाहीत त्या पानावर तुम्ही जाल. ते शेवटचे किंवा त्या अगोदरचे पान असू शकते.
२२/' ' प्रतिसादः गेल्या वेळेस तुम्ही वाचले त्यानंतर नवीन प्रतिसाद अजून आलेले नाहीत.

maayboli_whatsnew.jpg

याही पेक्षा अधिक वेळ वाचवणारी सोय म्हणजे माझ्यासाठी नवीन टॅब. तिथे टिचकी मारलीत तर फक्त तुमच्या आवडीच्या ग्रूपमधले जे प्रतिसाद तुम्ही अजून वाचले नाहीत तेच फक्त दिसतील.

कोणत्याही धाग्यावर पुढचे पान यावर क्लिक केले की थेट प्रतिसाद दिसतील अशी सोय करता येईल का? बरेचदा प्रतिसादच वाचायला नवीन पान उघडलं जातं अशावेळी संपूर्ण लेख ओलांडून प्रतिसाद वाचायला लागण्यापेक्षा थेट प्रतिसाद वाचता आले तर मोठी सोय होईल.

@ जिज्ञासा,
वर मी दिलेला screenshot पहा. त्या पानावरून प्रतिसादांच्या संख्येवर टिचकी मारून थेट प्रतिसाद पाहण्याची सोय आधीच आहे.

प्रत्येक पानावरून ही सोय देणे सध्यातरी शक्य नाही.

मी मोबाईलवर यु सी ब्राऊझर तर डेस्क्टॉपवर क्रोम वापरते, पण दोन्ही ब्राऊझर वर गेले ३-४ दिवस माबो लोड व्हायला खुप वेळ घेतेय.

धाग्याच्या नावावर क्लिक करण्याऐवजी प्रतिसादामधे जो आकडा दिसतो त्यातल्या दुसर्‍या आकड्यावर क्लीक केले तर जे प्रतिसाद तुम्ही अजून वाचले नाहित थेट तिथेच तुम्ही जाता. >>> हायला , ये तो मन्ने पताही नही था , धन्यवाद वेबमास्तर.

कुणाच्याही अवलोकन मधे गेल्यावर सर्वात आधी "Groups audience:" दिसतोय
मग संबंधितांची माहीती दिसत आहे.
ज्यांनी बरेच गृप जॉईन केले आहे त्यांची लांबलचक लिस्ट ओलांडून गेल्यावर माहीती दिसते

मी कविता/गझल आणि इतर काही ग्रूप्सचा सदस्य नसतानाही त्यातले नविन लिखाण मला माझ्यासाठी नवीन मध्ये दिसते आहे. नवीन Submitted by माधव on 30 January, 2017 - 08:52
>> +1 मीदेखील आधी विचारले होते की "कविता, गझल, उपग्रह वाहिनी या ग्रुपमधे आलेले लिखाण मला कधीच वाचायचे नसते. त्या ग्रुपची मी सदस्यदेखील नाही. पण ते मला 'माझ्यासाठी नवीन आणि ग्रुपमधे नवीन' दोन्हीकडे दिसत राहते."

===
बादवे माबोवर कोणकोणते ग्रुप आहेत? त्यांची नावं एकत्रीत कुठे दिसतील? बर्याच ग्रुपना एकसाथ सबस्क्राइब किंवा अनसबस्क्राइब करता येते का?

ये तो मन्ने पताही नही था>>>> हे तर जुन्या माबोत पण होतं. बर्‍याच जणांना माहित नाही वाटतं.>>> होना मला पण माहीती नव्हतं. काल वाचल्यावर कळलं.

मायबोलीवर नवीन - ह्यात आपण प्रतिसाद वाचलेले आणि न वाचलेले, असे सर्व ग्रुपचे सर्व नवीन प्रतिसाद आलेले धागे दिसतात. (म्हणजे मायबोलीवरचं सर्वच नवीन लेखन दिसतंय) हे बरोबर आहे.

माझ्यासाठी नवीन - ह्यात आपण फक्त प्रतिसाद न वाचलेले, असे सर्व ग्रुपचे नवीन प्रतिसाद आलेले धागे दिसतात. (म्हणजे फक्त माझ्यासाठीचे न वाचलेले सर्वच नवीन लेखन दिसतंय) हेसुद्धा बरोबर आहे.

ग्रुपमध्ये नवीन - ह्यात काहीतरी चूक वाटतेय. येथे आपण फक्त प्रतिसाद न वाचलेले, असे फक्त आपल्या ग्रुपचे नवीन प्रतिसाद आलेले धागे दिसायला हवेत. (म्हणजे फक्त माझ्या ग्रुपचे न वाचलेले सर्वच नवीन लेखन दिसायला हवे) त्याऐवजी येथे मायबोलीवर नवीन सारखीच लिस्ट दिसतेय.

Pages