मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago
Time to
read
1’

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

माझ्याकडचं फायरफॉक्स ५०.१.० आहे, त्यातूनही अक्षरं कमालीची बारीक दिसत आहेत. क्रोमवरून टाईप करणं त्रासाचं म्हणून फाफॉच वापरते मी. माबो अशीच वाचत राहिले तर डोळ्याच्या खाचा निश्चितच आणि लवकरच होणार....
पानांचे क्रमांक वरती (प्रतिसादांच्या डोक्यावर) पूर्वीसारखेच असावेत या सूचनेला अनुमोदन

Screenshot_2017-01-17-13-00-38.png

मोबाईलवर 'माझ्यासाठी नवीन' पेजवर 'छोट्या जाहिराती' overlapping होतायत.

आणि प्रत्येक धाग्याच्या शीर्षकाखालचं ग्रुपचे नांवही गायब झालंय. कृपया ते परत आणावे.

मायबोलीचं नवीन रुपडं साकार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं सर्वप्रथम भरपूर कौतुक करतो.
सध्या क्रोमवर डेस्कटॉप वर पाहताना, वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे खूप मोकळी मोकळी जागा वाटते, पांढरं पांढरं दिसतंय सगळं. फॉन्ट मात्र छान आहे. क्रोम मधे टाइप करुन बॅक स्पेस केल्यावर होणारी अक्षरांची खिचडी अजूनही आहे. अजून एक सूचना जी सई ने केली होती. जिथे 'There are xx Comments' दिसतं तिथेच पुढच्या पानांच्या लिंक्सच मिळाल्या तर लेख वाचल्यावर गरज पडल्यास थेट शेवटच्या पानावर जायचा पर्याय मोकळा राहिल. त्यासाठी त्या पानावरच्या सगळ्या प्रतिक्रिया वाचून मग खाली जाऊन हव्या त्या पानावर जायची गरज नाही पडणार.
मोबाईल वरुन माबो पाहिली नाही अजून.
तुर्तास इतकंच.. Happy

>>पण क्रोममध्ये टाईप करता करता मधेच काही डिलीट करून परत टाईप करायचं असेल तर फार वैताग येतो.

बॅकस्पेस वापरुन काही अक्षरं डिलीट केल्यानंतर दोनदा एन्टर की दाबुन खाली या आणि मग पुन्हा दोनदा बॅकस्पेस दाबुन परत जा.
असं केल्यावर नंतर टाइप करताना अक्षरांची खिचडी होत नाही.

पोस्टकर्त्याने नाव वर येईल अशी सुविधा करता येईल का ? प्रतिसाद वाचताना नेमकं कोणी लिहिलं आहे ह्यात गोंधळ उडतोय

बॅकस्पेस वापरुन काही अक्षरं डिलीट केल्यानंतर दोनदा एन्टर की दाबुन खाली या आणि मग पुन्हा दोनदा बॅकस्पेस दाबुन परत जा.
असं केल्यावर नंतर टाइप करताना अक्षरांची खिचडी होत नाही.
>>>
इतकंही नाही करावं लागत. अक्षरं डिलीट केली की परत एकदा स्पेस देऊन ती डिलीट केली तरी भागतं. पण तेवढं तरी का करायला लागावं?! कारण त्याने टायपायचा टेंपो जातो; लिंक तुटते; वगैरे, वगैरे

देवनागरीचा फाँट आणि रोमन फाँट यात अजूनही आकारमानाचा बराच फरक आहे. या दोन फाँट मधे किमान २ चा फरक हवा तरच ते एकसारख्या आकाराचे दिसतात.
देवनागरी १० ठेवला तर रोमन ८ ठेवा..
युअर कमेंट हॅज बीन पोस्टेड या मेसेजची काय गरज आहे ? ( ती पण बर्‍याच मोठ्या अक्षरात ) पोस्ट झाली कि लगेच दिसतेच कि !

कोणताही धागा उघडल्यावर धाग्याच्या शिर्षकाच्याखाली Submitted by म्हणून जे धागाकर्त्याचे नांव दिसतेय, त्याचा फॉन्ट फारच बारीक आहे. तो कमीतकमी दुप्पट तरी मोठा हवा.

धाग्याचे शिर्षक साईझ लहान वाटतंय आणि त्या खाली येणारे गृप (ललित, विरंगुळा, विज्ञान) हे मोठं दिसत आहे (क्रोम वरुन)

प्रतिसाद देणार्‍या सदस्याचं नाव हे प्रतिसदाच्या खाली येतेय. त्यामुळे ते न दिसल्याने प्रतिसाद वाचताना हा कोणाचा (कोणत्या आय डीचा ) प्रतिसाद असेल याचा अंदाज बांधताना गंमत वाटतेय.

नवीन (प्रतिसाद)वर क्लिक केल्यावर सुद्धा धाग्याच्या पहिल्या पानापासून सुरुवात करावी लागतेय तेव्हा वैताग येतोय. डायरेकट् नवीन आलेल्या प्रतिसादांवर जायला हवे आहे पेज.

नवीन प्रतिसाद वर click केल्यावर डाइरेक्ट तिकडे जाता येत आहे, पहिले पान scroll down करून शेवट जायची गरज नाही (म्हणूनच पानांचे नंबर वरती दिले नाहीयेत का ?)

एकुणच प्रतेक पेज वर खुप ब्लॅन्क स्पेस आहे तर पेज अजुन कम्लिट लोड झाला नाहीये अस वाटत.

नविन रुपडं आवडलं... सवय नाहीये अजुन त्यामुळे मायबोलीबद्दल वाटणारा जिव्हाळा पटकन वाटत नाहीये या रुपात. पण एकदा सवय झाली की काही वाटणार नाही...
मला आवडलाय हा बदल..
पोस्टकर्त्याने नाव वर येईल अशी सुविधा करता येईल का ? प्रतिसाद वाचताना नेमकं कोणी लिहिलं आहे ह्यात गोंधळ उडतोय
>>>
+१
इंटरनेट एक्सप्लोरर वरुन पण फॉण्ट भयानक लहान दिसतोय. इंग्रजी अक्षर आणि लिंकांचा फॉण्ट फारच मोठा आहे/ दिसतोय.
स्मायल्या मिस करतेय Proud
वरती हेडरमधे मायबोलीचा लोगो नाहीये. तो असायलाच हवा.
मोकळी जागा फारच आहे, जाहिरातींसाठी का?

पुढच्या पानावर जाण्यासाठी लागणार्‍या लिकांची बटण वरती सुद्धा हवीत. हा बदल इग्नोर केलात तर जनता माफ नही करेगी Proud

अजुन आठवेल तसं लिहीन

प्रतिसादकर्त्याचे नांव अंत्यंत बारीक दिसते अर्थात उत्तर देताना पुर्व ग्रह दुषित विचार उत्तर देण्यापुर्वीच येतात ते येणार नाहीत! त्यामुळे वाचून मग प्रतिसाद देतील लोक! >>>>> सकारात्मक विचार ! आवडला.
नकारात्मक पण वाचून झाले हे ही खरेच.

आजचे बदल
१. प्रतिसादांच्या वरआणि खाली पूर्वीसारखीच पानांची यादी दिसायची सोय केली आहे.
२. प्रतिसादांच्या वर "This page has xx comments" असे यायचे ते काढून टाकले आहे.

नवं रुप विचार करूनच केलं असेल हे पटतंय पण सगळं इस्कटल्यासारखं वाटतंय आता!
आमचा आधीच हर्शे उल्हास त्यात फाल्गून मास. लवकर सगळं ठीक होवो. शुभेच्छा!

मायबोलीचं उर्ध्वश्रेणीकरण यशस्वीरित्या केल्याबद्दल भरपूर कौतुक आणि अभिनंदन.
फारसं काही न करताच चाचणी समितीत काम केलेल्या मायबोलीकरांच्या यादीत नाव आलेले वाचून लाजायला होतंय.

इथल्या सुचनांची दखल घेऊन त्यानुसार बदल करताय त्याबद्दल सर्वांच्या वतीने आभारच_/\_

Pages