सोनू निगम v/s अरिजित सिंग

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 January, 2017 - 15:09

तिला कॉफी आवडते, मला चहा आवडतो
तिला पाऊस आवडतो, मला पावसात ती आवडते
असं काहीतरी ते आहे ना, त्याप्रमाणे हल्ली आमचं असे चालते,
तिला अरिजित आवडतो, मला आजही सोनूच आवडतो..
त्याच्या दिवाना अल्बम पासून ते ये दिल दिवाना - परदेस पर्यंत..
कल हो ना हो.. पण आज फक्त सोनू निगमच
रंग दे बसंती चोला ऐकताना स्फुरण चढते, तर अभी मुझ मे कही ऐकताना अंगावर काटा येतो..
मै अगर कहू तुमसा हसीं हे सोनूपेक्षा गोड गाणारा कायनात मे नही है कही .. तर थोडक्यात त्याला तोड नाही,
असेच वाटत होते अगदी कालपरवापर्यंत ...
पण हल्ली सर्वांवरच अरिजितची जादू ओसंडून वाहतेय असे जाणवते.. आणि ते फार जवळून अनुभवतोयही.. त्यामुळे आमचा हा अरिजित विरुद्ध सोनू हा वाद हल्ली रोजचाच झालाय.
गंमत म्हणजे सुरुवातीला सर्वच गाणी एकाच साच्यात गाणारा दिसतोय, आणि हिमेश रेशमियाच्या म्युजिकप्रमाणे याचाही ओवरडोस होत हा दोनचार वर्षात बाहेर फेकला जाईल असे वाटणारा अरिजित हल्ली थोडा थोडा मलाही बरा वाटू लागलाय Happy
बरं आणि हल्ली बहुतांश बिग बॅनर चित्रपटात त्याचीच गाणी दिसतात.. एखादे गाणे चांगले आहे म्हणत ऐकावे आणि ते त्याचेच निघावे हे सवयीचे झालेय.. अर्थात या दरम्यान काही टुकार गाणीही करत असावा, कल्पना नाही. पण गायक त्याच्या गाजलेल्या गाण्यांनी ओळखला जातो, जी त्याला हल्ली बरीच मिळत आहेत. अगदी शाहरूखचा आवाज म्हणूनही आता सर्रास वापरू जाऊ लागल्याने त्याच्या आता फार काळ विरोधातही राहता येणार नाही. उदाहरणार्थ आजच रईसचे नवीन आलेले गाणे चेक करूया म्हटले तर ते अरिजितचेच निघाले..
गाणे तसे ठिकठाकच आहे - ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=lpdRqn6xwiM
पण यातील ‘ओ जालिमा’ .. आहा! असं काही म्हटलंय .. की बस्स! Happy
मागेही चन्ना मेरेया गाणे ऐकताना त्यातील ‘अच्छा चलता हू..’ या ओळींना असे काही उचललेय.. की तिथून मी पुन्हा पुन्हा ऐकतो Happy

तर मग म्हटलं आता हे जालिमा ऐकून माझा बालमा पुन्हा अरिजितची रेकॉर्ड लावणार.. म्हणून याला काटशह द्यायला सहज सोनू ऐकायला घेतला..
थोड्याश्या शोधाशोधीत त्याचा हा एक विस्मरणात गेलेला गुण सापडला - https://www.youtube.com/watch?v=1U2G_F3sLUw

हि असली गायकांची मिमिक्री बस्स एक सोनूच करू शकतो. वर्सेटिलिटी की काय म्हणतात ती यापलीकडे आणखी काय असू शकते.
बघू आता हाच मुद्दा घेऊना उद्या ऊतरायचेय..
थोडी मदत तुम्हीही करा.. या गायकांमधील तेंडुलकर आणि कोहलीबद्दल चार शब्द तुमच्याकडूनही येऊ द्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष,
मला पण अरजितच आवडतो.
सोनू निगम आणि अर्जितची तुलना इतक्यात करता येणार नाही कार्ण सोनू कित्ती वर्षांपासून गातोय आणि अरजित आत्ता आत्ता सुरूवात करयोय.
अजूनही वर्साटाईल नक्की गाऊ शकेल.

अरिजित एकसुरी आहे, अजून तीन वर्षे जरी टिकला तरी सोनू शी तुलना करायच्या पातळीवर येणार नाही, सोनू निगम एवढा वर्सटाईल अजून तरी कोणी दिसत नाही.

गेल्या काही वर्षांपासून सुफी दर्द असणारी गाणी लोकप्रिय होत आहेत, त्याचा फायदा अरिजित ला होतोय, त्याच्या गायकीत ती करूण, दर्दभरी किनार आहे, तीच सुफिशैली राहत फतेह च्या आवाजात, किंवा इतर कोणाच्या विशिष्ट वेगळ्या आवाजापेक्षा अरिजित च्या आवाजात ऐकणे जास्त भिडते म्हणून आवडते, कारण त्याचा आवाज नॉर्मल आहे, नॉर्मल म्हणजे सर्वसाधारण. (सामान्य नव्हे) त्याची गाणी सिक्युरिटी गार्ड, इत्यादी सामान्य लोकं त्याच ताकदीने गाऊ शकतात हे काही व्हिडियोमध्ये बघितलंय.

म्हटलं तर मोहित चौहान ला अरिजितने रिप्लेस केलंय, मोहितनेही कोणाला तरी रिप्लेस केलं होतं, जो इतर कोणाला रिप्लेस करतो तो रिप्लेस होतो कालांतराने,

सोनू, किशोर,रफी, उदित सारखे स्वतःची खास जागा निर्माण करणारे आणि लाटेवर प्रसिद्ध होणाऱ्यांची तुलना होत नसते.

सॉरी इफ आय हर्ट एनीबडी'ज फिलींग्स.. Happy

नानाकळा , अजिबात सहमत नाहीये
अरिजित कडे टॅलेंट आहे Happy

सोनु आणि अरिजितची तुलना करणारच असाल तर मग रफी आणि सोनुची पण करा

ही तुलना पटत नाही पण निवडायचच असेल तर अर्थातच सोनू निगम! अरीजित चांगला आहे पण त्याला अजून स्वतःला सिद्ध करायचे आहे Sonu has been there done that long ago!

नो तुलना प्लीजच. सोनु सोनु है. बच्पनसे फेव्हरेट है आणि अरिजित पण आता आवडतो. पण तुलना नाही करु शय्त.

सोनू, किशोर,रफी, उदित सारखे स्वतःची खास जागा निर्माण करणारे आणि लाटेवर प्रसिद्ध होणाऱ्यांची तुलना होत नसते.>>> नानाकळा + १११११११

रफी, किशोर, आशा इत्यादी गायकांचे वैशिष्ट्य म्हणजे कलाकारानुरूप ते आवाज देत असत. भाव पोहोचवत असत. आता व्हॉईस कल्चर म्हणून मुंबईत अनेक ठिकाणी क्लासेस घेतले जातात. साधारण तसेच काम पूर्वी रफीसाहेब करत असत. जॉनी वॉकर साठी तेल मालिश साठी दिलेला आवाज / एहसान तेरा साठी शम्मीला दिलेला आवाज असो. हे आता पहायला मिळत नाही.

आताच्या संगीतात खूप प्रयोग आहेत हे खरे, पण ते श्रवणीय असतात का हा प्रश्न पडतो. गाण्याचे बोल हा प्रत्येक काळाचा नाराजीचा मुद्दा असणार. पण ते घसरत चाललेय यात दुमत नाही. म्हणूनच दंगल किंवा सुलतानची हरियाणवी लहेजाची अस्सल गाणी उचलून धरली जातात. ही गाणी स्वतंत्र ऐकायला छान आहेत. मात्र पडद्यावर ऐकताना त्या त्या कलाकाराने गायलेली वाटत नाहीत हा दोष कदाचित प्रेक्षकांचा असेल. कारण पूर्वीच्या गायकांनी निर्माण केलेले ट्रेण्ड्स... पण जर हा दंडक लावला तर आजचे गायक पसंतीस उतरणार नाहीत. जर हे दंडक झुगारून दिले तर निव्वळ पार्श्वगायनासाठी प्रचंड पर्याय संगीतकारांकडे आहेत. स्पर्धांमधूनही अनेक गायक उपलब्ध होताहेत. त्यामुळे पूर्वीसारखे काळ गाजवणारे गायक निर्माण होतील का शंकाच आहे. अशा काळात सोनू टिकून राहीला हेच विशेष. त्यानेही मॉड्युलेशन केलंच.

अरिजितचे स्वतंत्र अल्बम्स मला ऐकायला आवडतील. पडद्यावर नायकाच्या तोंडी त्याच्या आवाजात गाणे ऐकणे हे आजही मला झेपत नाही. रफीसाहेबांनी सुरूवातीला अमिताभला आवाज देताना जी मेहनत केली होती (एक नजर) ती किशोरकुमार वगळता नंतरच्या एकानेही केलेली नाही. त्यामुळे ती गाणी आज पाहताना झेपत नाहीत. अगदी तसे अरिजितच्या बाबत होतेय. आमीरखानला उदीत नारायणने आवाज दिला होता. त्याला सोनू निगम देखील आवाज देऊ शकतो. पण अरिजितसिंगच्या मर्यादा इथे उघड होतात. असो.

तो गायक म्हणून चांगला आहे पण पार्श्वगायक म्हणून कितपत चांगला आहे याचे आडाखे वेगवेगळे असणार.

सपनाजी व मी व्यक्त केलेल्या मतांमागची पार्श्वभूमी सोनू निगमच्या ह्या मुलाखतीत मिळेल. पूर्ण मुलाखत बघावी अशी विनंती.

https://www.youtube.com/watch?v=g4KLUXMRqFI

नानाकळा | 7 January, 2017 - 09:10
>>>>>
आपल्या अखंड पोस्टशी प्रचंड सहमत. किंबहुना हेच मी नेहमी तोडक्यामोडक्या शब्दांत माझ्या गर्लफ्रेंडला सांगत असतो. पण ती आईकतच नाही. आपली पोस्ट आप्लया नावासह मी तिला व्हॉटसप करतो. जमल्यास या धाग्याची लिंकही देतो. फक्त अश्या आशयाच्या पोस्ट अजून यायला हव्यात. नाहीतर तिला लिंक द्ययाचो आणि अचानक ईथे अरिजित फ्यान क्लब येऊन बागडायला सुरुवात करायचा. बाकी त्याची माझी काही पर्सनल खुन्नस नाही. धाग्यात मी त्याचे आणि त्याच्या मला आवडलेल्या गाण्यांचे कौतुकच केलेय. पण एका ठराविक जॉनरची गाणी गाणारा वाटतो. सध्या त्या जॉनरची चलती आहे आणि त्यात तो बेस्ट आहे म्हणून मार्केट चाललेय ईतकेच

Arthat sonu nigam ,,,, arjit thik ahe pan sonu best ahe for me
Ani kunitari rafi vs sonu mhatle ahe.. Tar ashi tulana nahi hou shakat pan ha rafijinchi gani sonu vyatirikt itar kunu titki chan nahi gau shakat ,,,, ani. Dev na karo pan sonu sonu nantar jar tyachi gani titki shi chan jar kuni gavu shakal tar to rahul vaidya asel as mala vatat....

खरं तर जुन्या गायकांइतकी नव्यांना किती संधी मिळेल हे सांगता येत नाही. पण नानाकळा यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची एक लाट असते. ती ओसरली की तो गायक विस्मृतीत जातो. रफी, किशोर, लता, आशा हे लिजंड सोडले तर त्यानंतर दीर्घकाळ स्मृतीत राहणारे नव्वदच्या दशकातले कुमार सानू, उदीत नारायण, कविता कृष्‍ण्मूर्ती, अलका याज्ञिक आणि त्यानंतर सोनू निगम या गायकांनी दीर्घकाळ राज्य केलं. पण, आता कितीही चांगला गायक असू द्या, पाच वर्षांपेक्षा जास्त करिअर शक्य नाही. कारण पैशाला पासरी झालेले गायनाचे टॅलेंट हंट शो फॅक्टरीसारखे हजारो गायक या बाजारात उभे करत आहेत. त्यामुळे यातून दीर्घकाळ टिकेल असा गायक यापुढे तरी होणे अवघड वाटते. अवांतर.. तडप तडप के, आँखों मे तेरी अजब सी अजब सी अदायें यांसारखी अप्रतिम गाणी गाणारा केके आजही टिकून आहे. पण, तो कधीच प्रसिध्दीच्या झोतात नसतो.

आता मूळ विषयावर माझं मत.. अरिजित चांगलाच आहे, पण सोनू हा सोनू आहे. आधी तो रफीची नक्कल करीत असला, तरी त्यानंतर त्याने स्वतःची शैली निर्माण केली आहे.

मला नाही आवडत अर्जित.
मोहित चौहानही नाही आवडायचा, अन हिमेश रेशम्मिया (अ‍ॅज अ सिंगर / अ‍ॅक्टर) सुद्धा. का ते सांगता नाही येणार.
पण यांची काही काही गाणी आवडतात. तरीही त्यांची इतकी मोठी लाट कशी आली याचं मला नेहमीच कोडं पडतं.

सोनू निगमची व्हर्सिटिलिटी, शान चा गोड आवाज, कुणाल गांजावालाच्या आवाजातला पंच या सगळ्याला मी प्रचंड मिस करतो.

आजच्या गायकांमधे मला पापोनचा बेस वाला आवाज आवडतो (मोह मोह के धागे, लबोंका कारोबार), पण त्यालाही फारशी गाणी मिळत नाहीत.

सोनू निगम

तो गायक म्हणून चांगला आहे पण पार्श्वगायक म्हणून कितपत चांगला आहे याचे आडाखे वेगवेगळे असणार.>>>+१०००

सोनू निगमची व्हर्सिटिलिटी, शान चा गोड आवाज, कुणाल गांजावालाच्या आवाजातला पंच या सगळ्याला मी प्रचंड मिस करतो.>> + १००
मला ही अर्जित फारसा नाही आवडत.

केव्हाही सोनू निगमच!
त्याला कुठे थांबायचं हे बरोब्बर कळलंय आणि म्ह्णून तो जास्तच आवडतो (श्रीयुत गंगाधर टिपरेंसारखा)

अरिजितची (मला थोडी थोडी लक्षात असलेली) गाणी बहुतेक उदास मूडची आहेत.
हर कामयाब इन्सान के पीछे एक औरत होती है, और हर उदास गाने के पीछे अरिजित... असा एक जोकच आला होता मध्यंतरी Happy

चैतन्य, सहमत आहे.

हे उदास गाण्यांचं काय फ्याड आलं असावं असं वाटतं. कुमार सानू वगैरे मंडळींची उदास गाणी फेमस होती ९० च्या दशकात, पण त्यावेळेस आणि आता आर्थिक-सामाजिक बरेच बदल घडलेत. तरी लोकं इतकी उदास राहत असतील तर काळजीचं कारण आहे.

दोन प्रकारच्या गाण्यांची लाट आहे, बिन्डोक हनीसॉन्ग्स+डान्ससॉन्ग आणि अरिजित+राहत उदासीभरे सॉन्ग.

अरिजित चे ते सुन रहा है काय हिट झाले, भाई त्यातून बाहेर पडत नाही व निर्मातेही पडू देत नाहीत. अगदी काही गरज नसतांना कट्यारमधे ते उत्साहवर्धक हिंदी गाणंही अरिजितलाच उसनं अवसान आणून म्हणायला लावलं.

मोह मोह के धागे, मनवा लागे टैप गाणे हिट होतात तरी वरील गाण्यांचाच रतीब चालू आहे.

एवढ्या लवकर सोनू निगमशी तुलना होणे हेच अर्जितचे यश नाही का?
सोनू कालपर्यंत निर्विवादपणे या जमान्यातील भारतातील नंबर एक गायक होता. आता त्याचा जमाना जात अर्जितचा आला आहे हे स्विकारायला हवे.
संगीताची शैली बदलतेय, अर्जित आज आहे उद्या नसेलही. पण आज तो टॉपला आहे हे नाकारूही शकत नाही.
तो काही हनीसिंग किंवा मिका नाही, किंवा गेल्या जमान्यातील बाबा सैगल नाही. त्याच्या गायकीत एक क्लास आहे. आज ज्या प्रकारच्या संगीताची चलती आहे त्यानुसार तो गातोय, उद्या वेगळे प्रयोग त्याला जमणारच नाही हे ठरवायची ईतकी घाई कश्याला?
मला तरी आवडतो अर्जित.
एखाद्या साधारण गाण्याला जो केवळ आवाजाच्या जादूने उचलून धरतो त्याची कोणाशी तुलना करत खुजा ठरवणे मला तरी नाही जमणार.

अर्जित अजुनतरी आवडत नाही. पुढे पाहू. पण कोण तो दुसरा, बाप रे नाव आठवेना... ऋन्मेषनेच धागा काढलाय त्यावर, त्याच्यापेक्षा बराय.

आतिफ अस्लम... ताई तो तर सगळ्यात सरस आहे.. सूर तालच्या पल्याड.. आतिफची गाणी आतिफनेच गावीत.. मै रंग शरबतो का तू मीठे घाट का पाणी..

>खरं तर तुलना ह्या दोघा गायकांची करावी अतीफ अस्लम वि. अरिजीत सिंग>> अगदी सहमत. मला खरतर आतिफ अजिबात आवडत नाही. गळा काढुन गातो नुसता. ऋन्मेष च्या त्या धाग्यावर पण म्हणालो होतो पण तिथे आतिफ फॅन क्लब होता. असो.. रफी, किशोर नंतर सोनु आवडतो मला. प्रचंडच व्हर्सेटाईल आहे तो. त्याचे ३-४ शोज बघितले आहेत आणि दर वेळी तो नवीन नवीन कमाल करतो. स्टेज वर तो अतिशय चांगला एंटरटेनर आहे. स्वतः ची गाणी अजून अवघड करून गातो आणि इतर गायकांची गाणी गातो तेव्हा असं कधीच वाटत नाही कि लहान तोंडी मोठा घास घेतोय. रफी च्या गाण्यांना योग्य न्याय देणं सोपं नाही. इतर बरेच गायक प्रयत्न करतात तेव्हा कीव येते त्यांची.
वरच्या काही प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे १. सद्ध्या सुफि गायकिचे दिवस आल्यामुळे आतिफ आणि अरिजित चे ही दिवस आले आहेत आणि २. ते चांगले गायक असले तरी चांगले पार्श्वगायक नाहीत असं माझं मत आहे.
सोनु च्या अनेक गाण्यात भाव जाणवतो जो अरिजित ला नेहमी जमतो असं नाही आणि आतिफ तर कोसो दूर आहे त्यापासून. "अभी मुझमे कहीं" सारखी गाणी सद्ध्या सोनुच गाऊ जाणे.
अरिजित चं "ऐ दिल है मुश्किल" त्याच्या साठी टर्नींग पॉईंट असू शकतं. चांगली गाणी मिळाली आणि व्हर्सेटॅलिटी जमली तर अरिजितही खुप पुढे येईल पण सद्ध्या तरी सोनु एके सोनुच.

आतिफला किशोर मुकेश रफी यांच्या पंगतीत बसवून तुलना कराल तर मलाही उगाच तो सुद्धा त्यांच्यासारखाच भारी आहे असा उगाचचा वाद घालायला आवडणार नाही.
निव्वळ गायकीचा विचार करता सोनू आतिफच्या कित्येक मैल पुढे आहे.
वर याच लेखात म्हटल्याप्रमाणे मला आजच्या तारखेला सोनूच सर्वात भारी गायक / पार्श्वगायक वाटतो त्यामुळे माझी आवडच जळली मेली बेसुरी आहे किंवा मला मुळातच संगीताची जाण किंवा संगीताचा कान नाही असेही आपण म्हणू शकत नाही.
बरं आतिफ सुरात कच्चा आहे हे देखील मी आतिफ फ्यान क्लब धाग्यावरच मान्य करून झालेय.

पण तरीही आतिफ हा मलाच नाही तर बरेच जणांना आवडतो. त्याचे एखादे गाणे त्यानेच गावे असे वाटते असे का?
तर एक्स फॅक्टर !
जर एखाद्यातला तो तुम्ही ओळखू शकलात आणि तो तुम्हाला भावला, तर त्याची कलाकृती त्याचे गाणे तुम्हाला अफाट आनंद देऊन जाते. तुम्हाला त्याची कोणाशी तुलना करायची गरजही भासत नाही. जरी कोणी सनी लिओन सुद्धा आतिफपेक्षा चांगली गाते असे म्हटले तरी तुम्ही हो बाबा बोलून पुढे जाल. आणि वाद घालण्यापेक्षा आतिफच्या गाण्यांचा लुफ्त घ्याल Happy

ऋन्मेष, सेम अरिजितलाही लागु पडतंच की.... मग त्याची तुलना सोनूशी कशाला?
मुळात अरिजित मधे फार टॅलेण्ट आहे हे माझं स्पष्ट मत आहे तरीही सोनू पेक्षा तो बेस्ट असू शकत नाही (सध्या पुर्त तरी)

Pages