तिला कॉफी आवडते, मला चहा आवडतो
तिला पाऊस आवडतो, मला पावसात ती आवडते
असं काहीतरी ते आहे ना, त्याप्रमाणे हल्ली आमचं असे चालते,
तिला अरिजित आवडतो, मला आजही सोनूच आवडतो..
त्याच्या दिवाना अल्बम पासून ते ये दिल दिवाना - परदेस पर्यंत..
कल हो ना हो.. पण आज फक्त सोनू निगमच
रंग दे बसंती चोला ऐकताना स्फुरण चढते, तर अभी मुझ मे कही ऐकताना अंगावर काटा येतो..
मै अगर कहू तुमसा हसीं हे सोनूपेक्षा गोड गाणारा कायनात मे नही है कही .. तर थोडक्यात त्याला तोड नाही,
असेच वाटत होते अगदी कालपरवापर्यंत ...
पण हल्ली सर्वांवरच अरिजितची जादू ओसंडून वाहतेय असे जाणवते.. आणि ते फार जवळून अनुभवतोयही.. त्यामुळे आमचा हा अरिजित विरुद्ध सोनू हा वाद हल्ली रोजचाच झालाय.
गंमत म्हणजे सुरुवातीला सर्वच गाणी एकाच साच्यात गाणारा दिसतोय, आणि हिमेश रेशमियाच्या म्युजिकप्रमाणे याचाही ओवरडोस होत हा दोनचार वर्षात बाहेर फेकला जाईल असे वाटणारा अरिजित हल्ली थोडा थोडा मलाही बरा वाटू लागलाय 
बरं आणि हल्ली बहुतांश बिग बॅनर चित्रपटात त्याचीच गाणी दिसतात.. एखादे गाणे चांगले आहे म्हणत ऐकावे आणि ते त्याचेच निघावे हे सवयीचे झालेय.. अर्थात या दरम्यान काही टुकार गाणीही करत असावा, कल्पना नाही. पण गायक त्याच्या गाजलेल्या गाण्यांनी ओळखला जातो, जी त्याला हल्ली बरीच मिळत आहेत. अगदी शाहरूखचा आवाज म्हणूनही आता सर्रास वापरू जाऊ लागल्याने त्याच्या आता फार काळ विरोधातही राहता येणार नाही. उदाहरणार्थ आजच रईसचे नवीन आलेले गाणे चेक करूया म्हटले तर ते अरिजितचेच निघाले..
गाणे तसे ठिकठाकच आहे - ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=lpdRqn6xwiM
पण यातील ‘ओ जालिमा’ .. आहा! असं काही म्हटलंय .. की बस्स! 
मागेही चन्ना मेरेया गाणे ऐकताना त्यातील ‘अच्छा चलता हू..’ या ओळींना असे काही उचललेय.. की तिथून मी पुन्हा पुन्हा ऐकतो 
तर मग म्हटलं आता हे जालिमा ऐकून माझा बालमा पुन्हा अरिजितची रेकॉर्ड लावणार.. म्हणून याला काटशह द्यायला सहज सोनू ऐकायला घेतला..
थोड्याश्या शोधाशोधीत त्याचा हा एक विस्मरणात गेलेला गुण सापडला - https://www.youtube.com/watch?v=1U2G_F3sLUw
हि असली गायकांची मिमिक्री बस्स एक सोनूच करू शकतो. वर्सेटिलिटी की काय म्हणतात ती यापलीकडे आणखी काय असू शकते.
बघू आता हाच मुद्दा घेऊना उद्या ऊतरायचेय..
थोडी मदत तुम्हीही करा.. या गायकांमधील तेंडुलकर आणि कोहलीबद्दल चार शब्द तुमच्याकडूनही येऊ द्या 
झोपा आता
झोपा आता
ना सोणू ना अर्जित.. फक्त कुमर
ना सोणू ना अर्जित.. फक्त कुमर सानू...
क्या फील से गाटा है सानू
कुमार सानू ते नाकात गाणारे का
कुमार सानू ते नाकात गाणारे का?
नाहि...ते हिमेस रेसमिया
नाहि...ते हिमेस रेसमिया
कुमार सानू ते नाकात गाणारे का
कुमार सानू ते नाकात गाणारे का?>>>>>> तुला माहित नाही का कुमार सानु..बरं..
मस्त धागा! अरजित उगाच
मस्त धागा! अरजित उगाच प्रसिद्ध आहे. तो यो यो हनि वाला किती खराब गाणी बनवतो. पण सोनु निगम मस्त आहे! छान गातो. आणि उगाच गळा फाडून गात नाही.
कुमार सानू ते नाकात गाणारे का
कुमार सानू ते नाकात गाणारे का?>>>>>>>>>>>>
(ओ अॅडमिन, स्माईली द्या लवकर)
ऋ, ह्या एका स्टेटमेंट मुळे मी तुझ्या फॅनक्लबातुन बाहेर पडत आहे.
सोनुच आवडतो :)
सोनुच आवडतो
नाकात गाणे हे टिका म्हणून का
नाकात गाणे हे टिका म्हणून का घेतात लोकं. कित्येक जण बोलतानाही नाकात बोलतात. त्याला व्यंग का समजावे. किंवा कमीपणा का मानावा. मला स्वत:ला नाकात गायला आवडते. बाथरूम वगळता ईतर ठिकाणी मी नाकातच गातो. मस्त सूर लागतो.
नाकात बोलणं गाणं हे व्यंग
नाकात बोलणं गाणं हे व्यंग बिंग आजिबात नाही. नाकात गातो ही टिका नाही.
पण तुला कुमार सानु माहित नाही म्हणजे ........
सोनू निगम...
सोनू निगम...
अरिजित खूप रडतो...काही गाणी आवडतात म्हणा.पण सोनू निगमच सरस आहे, व्हर्सेटाइल सिंगर आहे तो.सोनू निगमचि सर्वच गाणी छान आहेत...
सस्मित ते जुने गायक आहेत.
सस्मित ते जुने गायक आहेत. जेव्हा ते गात असतील तेव्हा मला पार्श्वगायक हा प्रकारही माहीत नसेल. हिरोच गाणे गातो असे वाटायचे वय ते..
अवांतर - शाहरूखसाठी कोणते गाणे गायले असतील हे सानू तर सांगा.
शाहरूखसाठी कोणते गाणे गायले
शाहरूखसाठी कोणते गाणे गायले असतील हे सानू तर सांगा.>>>>तुझे देखा तो ये जाना सनम ...
दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके...
अजून बरेच आहेत.
शाहरूखसाठी कोणते गाणे गायले
शाहरूखसाठी कोणते गाणे गायले असतील हे सानू तर सांगा.> काही गरज नाही सांगाय्ची. वेघेपेगाजा. गूगल कर आणि सानुने शाखा साठी गायलेली गाणी वाचुन रीलॅक्स हो.
सस्मित ते जुने गायक आहेत. जेव्हा ते गात असतील तेव्हा मला पार्श्वगायक हा प्रकारही माहीत नसेल. हिरोच गाणे गातो असे वाटायचे वय ते..>> वय काय रे तुझं?
माझ्या १७ वर्षाच्या भाच्याला पण कुमार सानु माहितीये.
सस्मित... :-)
सस्मित...
मला या धाग्याबाबत अजूनही असे
मला या धाग्याबाबत अजूनही असे वाटते की सोनू निगमशी तुलना हा खट्याळपणा आहे. त्याच्या शी तुलना न करता अरिजितच्या जवळपास जाणारे ईतर गायकांशी तुलना करा. त्याच्यासारखा करिष्मा आजच्या तारखेला कोण दाखवतेय?
रुम्नेश्भोउ ... वेद घलुन
रुम्नेश्भोउ ... वेद घलुन पेद्गवल जताय... मि नहि त्यत्लि अनि कदि लवा अत्लि असा प्रकर आहे तुम्चा..
अरिजित हा मोहित चौहान च्या
अरिजित हा मोहित चौहान च्या गळ्यावर पाय देऊन पुढे आलाय... तुलना करायची तर त्याच्याशी करता येईल. तरी मोहित चौहान अरिजितपेक्षा सरसच केव्हाही... अरिजित हा सांप्रतकाळचा हिमेसरेशमिया म्हणता येईल फारतर... मागे नाहीका त्याची ३६ ची ३६ गाणी एकामागोमाग हिट झाली होती का काय ते!
>>>>अरिजित हा मोहित चौहान
>>>>अरिजित हा मोहित चौहान च्या गळ्यावर पाय देऊन पुढे आलाय... तुलना करायची तर त्याच्याशी करता येईल.
काय संबंध तरी आहे का?
मोहीत चौहान हा पण अरिजीत पेक्षा जुना आहे ... आठवा डुबा डुबा रहेता हू..
समकालीण लोकाण्ची तुलना करा. अतीफ अस्लम आणि अरीजित हे समकालीन आहेत.
अहो, डुबा डुबा १९९८ ला आलं
अहो, डुबा डुबा १९९८ ला आलं आणि गाजलं आणि गेलं... एकच गाणं. ते गाणं म्हणून गाजलं. मोहित चौहान हा गायक म्हणून केव्हा गाजायला लागला. २०१० नंतर... बॉलिवूडमध्ये त्याची सुरुवातच २००२ मध्ये झाली, मस्सकली + तुम से ही ह्या दोन गाण्यांनी त्याला ओळख मिळवून दिली. तरी त्याला अधिक प्रसिद्ध व प्रथितयश व्हायला २०१० साल उजाडले त्यानंतर सलग चार वर्ष मोहितने गाजवलेत.... पी लू तेरे ओठोसे.. इत्यादी गाणी लै गाजली. तो प्लेबॅक सिंगर म्हणून परफेक्ट होता कारण तो मोहित चौहान गातोय हे समजायचे नाही, खूपच गोड वाटलं की आपण सहज विचारतो तेव्हा कळायचं की तो मोहित आहे.. तसा गाणारा अजून एक बेनी आहे.
पण रोमांटिक गाण्यांत अरिजितने जो मूड पकडलाय त्याने इतर सर्वांना भूइसपाट केलंय...
या सर्व घडामोडींमागे एक 'किशोरकुमार' थेरी आहे (मीच शोधून काढली
). सवडीने लिहायला लागेल.
येस... अरिजित व्स किशोर कुमर
येस... अरिजित व्स किशोर कुमर असा कम्पर करु शक्तो
किशोरकुमार थेरी थोडक्यात अशी
किशोरकुमार थेरी थोडक्यात अशी की किशोरकुमारच्या आवाजाची भारतीय हिंदीसिनेसंगीत जगतात आपली एक अशी मागणी कायम आहे. जोवर किशोरकुमार होता तोवर तोच ही मागणी पूर्ण करायचा. एक अल्लड, कॉमनसा वाटणारा, मिश्किल, रोमांटिक, खोडकर, प्रेमळ, ज्याच्या आवाजाशी आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या भावभावना चटकन रिलेट होऊ शकतात, जणू तो आपलीच सुखे-दुखे-आनंद आपल्याच आवाजात गातोय अशी भावना निर्माण व्हावी असा.
रफी हा देव होता, त्याची गाणी स्वर्गीय प्रसाद वाटायचा, स्वर्गातून दिव्यत्वाचा पाऊस पडतोय आणि ऐकणारा चिंबचिंब होऊन जातोय असं.. त्यामुळेच रफीला रिप्लेस करणं किंवा पर्याय देणं अशक्य आहे. जसा सूर्य एक तसा रफी एकच. बाकी कॉपीबाज आले गेले कैक... त्यांना स्वत:चे असे स्थान निर्माण करता आलेच नाही. कायम आयुष्यभर रफीची कॉपी म्हणून गात राहिले. त्यात वैषम्य वाटण्यासारखेही काही नाही, रफी ग्रेटच, त्याची कॉपी म्हणून ओळखल्या जाणे हाही एक बहुमानच.
पण ते काही असो. माणसाला किशोर लागतोच. किशोर हा आवाज नाही, गायकी नाही, सामान्य जगणं आहे. अमितकुमारने किशोर बनायचा प्रयत्न केला, त्याला नाही जमले कारण त्याने बापाची नक्कल करण्याचा प्रयत्न केला, त्याला खरा किशोर कळलाच नाही. तो कुमार सानुला कळला... सोचेंगे तुम्हे प्यार करे के नही.. ह्या गाण्यात ऐका.. एक दर्द आहे. ह्यात तो किशोरची कॉपी करत नाही. हा दर्द किशोरकुमार आहे. हा ज्याने ज्याने आणला तो हिट होत गेला. आधीच्याला रिप्लेस करत गेलाय. कुमार सानु नंतर अभिजीत, शान, बहुतेक बंगाली गायकांनीच तो आवाज आणलाय. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल चक्क पंजाबी गायक मिका सिंग हाही किशोरकुमार आहे. "लगे चारसो चालीस व्होल्ट छुने से तेरे === वादा तेरा वादा", दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे रे === बारा महिने में बारा तरिकेसे तुझको प्यार जताउंगा रे.... मिकाची गाणी किशोरने कशी गायली असती हे इमॅजिन करुन बघा.. मिकासिंग किशोरकुमार गातोय हे पटेल... (वाचक म्हणत असतील नक्की गांजा मारलाय नानाने आज..)
आतिफ अस्लम हा सुखविंदर+किशोरकुमार मिक्स आहे... त्यानंतर कुणाल गांजावाल, मोहित चौहान, जावेद अली, उसके बाद अरिजित.... सर्व गाण्यांचे व्यवस्थित विश्लेषण करुन लिहायला मोठा लेख होइल... लोक नक्कीच म्हणतील कुठून पैदा केलाय एवढा चांगला गांजा...

अवांतरः अरिजितचे प्रसिद्ध गाणे आहे एक, बांते ये कभी ना तू भूलना. त्याची एक ओळ मी रफी आणि किशोरच्या शैलीत गायली आहे. (असं माझं वैयक्तिक मत आहे)
१. https://soundcloud.com/sandeep-daange/ogg-6
२. https://soundcloud.com/sandeep-daange/ogg-5
हे पूर्ण गाणं माझ्या स्वतःच्या आवाजातः https://soundcloud.com/sandeep-daange/2qjaibhrjbxw
(हे गाणं गाण्याआधी मी अरिजितने कसं गायलं, मूळ गाणं नक्की कसं आहे ते ऐकलं नव्हतं, कोणा सिक्युरिटीगार्ड मुलाने गायलेली क्लिप आलेली, तेवढं दोन वेळा ऐकलं होतं, त्यानंतर आमच्या नाशिकमधल्या एका मुलीने गायलेलं ते एकदाच ऐकलेलं, मी रेकॉर्ड करण्याआधी दोन तीनदाच ऐकलंय, त्यामुळे काही चूकभूल असल्यास मला माफी करा..).
- (किशोरचा पंखा, रफीचा भक्त) नानाकळा
"रफी हा देव होता, त्याची गाणी
"रफी हा देव होता, त्याची गाणी स्वर्गीय प्रसाद वाटायचा, स्वर्गातून दिव्यत्वाचा पाऊस पडतोय आणि ऐकणारा चिंबचिंब होऊन जातोय असं.. " नि " माणसाला किशोर लागतोच. किशोर हा आवाज नाही, गायकी नाही, सामान्य जगणं आहे. " हे एकदम पटले. तुमच्या सनुच्या थिअरीचा विचार केला पाहिजे.
सोनूचा आवाज खूप आवडतो.
सोनूचा आवाज खूप आवडतो. व्हर्सटाइल आहे.
अरिजितचा आवाज कंटाळवाणा वाटतो. कित्येकदा एकसुरी/फ्लॅट वाटतो त्याचा आवाज. त्याची उगाच सोनूशी तुलना कशाला?
मुका सिंग ची किसोर कुमर शी
मुका सिंग ची किसोर कुमर शी तुलन पातात नाहीय..
बाकि माल असं वताते कि प्रत्येकाचा तेम असतो.. जस शरुक चा 1995 तो 2005 , शाल्मन च 2010 त आता पर्यंत, हरेठिक रॉसन 2000 मदे... तसेच चिंगर च पं आह.. एक काल मुकेस चा, एक रफी च, एक किसोर चा
एक काल सानू चा 1991 ते 95, एक काल सोनू चा, आता आरिजित चा आह तेम.. हे सत्य आह.. नाकार्ता येउ शाक्त नाही...
तुलना नाही ती... :-) एकाच
तुलना नाही ती...
एकाच रंगाच्या दोन छटा. तुलना नाही होत.
पंजाबी गायक मिका सिंग हाही
पंजाबी गायक मिका सिंग हाही किशोरकुमार आहे. "लगे चारसो चालीस व्होल्ट छुने से तेरे === वादा तेरा वादा", दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे रे === बारा महिने में बारा तरिकेसे तुझको प्यार जताउंगा रे.... मिकाची गाणी किशोरने कशी गायली असती हे इमॅजिन करुन बघा.. मिकासिंग किशोरकुमार गातोय हे पटेल... >>>>+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११
दोघेही फेव्हरेट आहे माझे....
हरेठिक रॉसन
हरेठिक रॉसन
_>>>>
आधी मला वाटले आपण चर्चा करता करता हॉलीवूडला पोचलात. मग नंतर ताण दिल्यावर समजले अरे हा तर आपला हृतिक रोशन
आतिफ अस्लम हा सुखविंदर
आतिफ अस्लम हा सुखविंदर+किशोरकुमार मिक्स आहे...
>>>>>
अमान्य
आतिफ अस्लम हा आतिफ अस्लम आहे.
गायकीच्या ईतिहासातील ही नवीन कॅटेगरी आहे. आणि आजच्या तारखेपर्यण्त त्या कॅटेगरीत तो एकटाच आहे. सिंगिग कॉम्पिटीशनमध्ये बरेच स्पर्धक आतिफची गाणी गातात. पण ती फक्त त्याची गाणी असतात, शैली वेगळी असते. आतिफ बनणे सोपे नाही. त्यासाठी आतिफ म्हणूनच जन्म घ्यावा लागेल.
आतिफ अस्लम हा आतिफ अस्लम आहे.
आतिफ अस्लम हा आतिफ अस्लम आहे.
गायकीच्या ईतिहासातील ही नवीन कॅटेगरी आहे. >> पाकिस्तान कोक स्टुडियो जर त्यांच्या अॅप वरून ऐकले तर बरेच जण त्या प्रकारचे गाताना जाणवतात.
Pages