सोनू निगम v/s अरिजित सिंग

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 January, 2017 - 15:09

तिला कॉफी आवडते, मला चहा आवडतो
तिला पाऊस आवडतो, मला पावसात ती आवडते
असं काहीतरी ते आहे ना, त्याप्रमाणे हल्ली आमचं असे चालते,
तिला अरिजित आवडतो, मला आजही सोनूच आवडतो..
त्याच्या दिवाना अल्बम पासून ते ये दिल दिवाना - परदेस पर्यंत..
कल हो ना हो.. पण आज फक्त सोनू निगमच
रंग दे बसंती चोला ऐकताना स्फुरण चढते, तर अभी मुझ मे कही ऐकताना अंगावर काटा येतो..
मै अगर कहू तुमसा हसीं हे सोनूपेक्षा गोड गाणारा कायनात मे नही है कही .. तर थोडक्यात त्याला तोड नाही,
असेच वाटत होते अगदी कालपरवापर्यंत ...
पण हल्ली सर्वांवरच अरिजितची जादू ओसंडून वाहतेय असे जाणवते.. आणि ते फार जवळून अनुभवतोयही.. त्यामुळे आमचा हा अरिजित विरुद्ध सोनू हा वाद हल्ली रोजचाच झालाय.
गंमत म्हणजे सुरुवातीला सर्वच गाणी एकाच साच्यात गाणारा दिसतोय, आणि हिमेश रेशमियाच्या म्युजिकप्रमाणे याचाही ओवरडोस होत हा दोनचार वर्षात बाहेर फेकला जाईल असे वाटणारा अरिजित हल्ली थोडा थोडा मलाही बरा वाटू लागलाय Happy
बरं आणि हल्ली बहुतांश बिग बॅनर चित्रपटात त्याचीच गाणी दिसतात.. एखादे गाणे चांगले आहे म्हणत ऐकावे आणि ते त्याचेच निघावे हे सवयीचे झालेय.. अर्थात या दरम्यान काही टुकार गाणीही करत असावा, कल्पना नाही. पण गायक त्याच्या गाजलेल्या गाण्यांनी ओळखला जातो, जी त्याला हल्ली बरीच मिळत आहेत. अगदी शाहरूखचा आवाज म्हणूनही आता सर्रास वापरू जाऊ लागल्याने त्याच्या आता फार काळ विरोधातही राहता येणार नाही. उदाहरणार्थ आजच रईसचे नवीन आलेले गाणे चेक करूया म्हटले तर ते अरिजितचेच निघाले..
गाणे तसे ठिकठाकच आहे - ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=lpdRqn6xwiM
पण यातील ‘ओ जालिमा’ .. आहा! असं काही म्हटलंय .. की बस्स! Happy
मागेही चन्ना मेरेया गाणे ऐकताना त्यातील ‘अच्छा चलता हू..’ या ओळींना असे काही उचललेय.. की तिथून मी पुन्हा पुन्हा ऐकतो Happy

तर मग म्हटलं आता हे जालिमा ऐकून माझा बालमा पुन्हा अरिजितची रेकॉर्ड लावणार.. म्हणून याला काटशह द्यायला सहज सोनू ऐकायला घेतला..
थोड्याश्या शोधाशोधीत त्याचा हा एक विस्मरणात गेलेला गुण सापडला - https://www.youtube.com/watch?v=1U2G_F3sLUw

हि असली गायकांची मिमिक्री बस्स एक सोनूच करू शकतो. वर्सेटिलिटी की काय म्हणतात ती यापलीकडे आणखी काय असू शकते.
बघू आता हाच मुद्दा घेऊना उद्या ऊतरायचेय..
थोडी मदत तुम्हीही करा.. या गायकांमधील तेंडुलकर आणि कोहलीबद्दल चार शब्द तुमच्याकडूनही येऊ द्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अर्थातच हिट स्टाईल कॉपी करायला लोकं बघणारच. पण आतिफला पर्याय नाही. गाण्यात आतिफ अस्लम इफेक्ट साधायचा असेल तर आतिफ अस्लमच हवा!

भाऊ आतिफ यायच्या आधीपासूनच्या सीजनमधे आतिफसारखेच गाणारे आहेत. आता कॉपी वगैरे काय ते तूच बघ. मला गाण्यांशी मतलब आहे.

हरेठिक रॉसन
_>>>>
आधी मला वाटले आपण चर्चा करता करता हॉलीवूडला पोचलात. मग नंतर ताण दिल्यावर समजले अरे हा तर आपला हृतिक रोशन Happy

ह्ये ह्ये ह्ये माजा ब्रोसेर मदे नित दिसत न्हायीय..

असामी ओके.
मी त्यांना ऐकले नाही त्यामुळे माहीत नसावे मला.
आपण असे म्हणूया की आतिफने त्या शैलीला एका उंचीवर नेले आणि माझ्यासारख्या लोकांपर्यंत आणि भारतातल्या घराघरात पोहोचवले.

खरं तर या अशा तुलना निरर्थक असतात.. पण वाचायला रंजक ठरतात. Happy
तरिही, सोनू निगम हा एक निव्वळ गायक नाही.. अलिकडच्या दोन दशकांतील एक निश्चीत बेंचमार्क आहे. त्याच्या गायकी ला स्वताची ओळख आहे, व्यक्तीमत्व आहे, वैचारीक बैठक आहे, अनेक अनेक वर्षांचा रियाज, शिक्षण, जिज्ञासू व्रुत्ती आणि कलात्मक परख आहे. सोनू हा 'स्टुडीयो' गायक नाही. आणि निव्वळ हीट गाण्यांचा मोहताज देखिल नाही.
सोनू नक्की काय चीज आहे हे अधिक समजून घ्यायचे असेल तर इंडीयन आयडॉल परत चालु झाले आहे त्यात तो जे मार्गदर्शन करतो (प्रात्यक्षिकही) ते जरा पहा, ऐका. (आयडॉल स्पर्धा नेहेमीप्रमाणे मसाला मामला आहेच...! तरिहि.)
असो. हे माझ्या संगितीक अल्पमतीनुसार. अधीक ग्यानी रसिकांची मतही वाचायला आवडतील.

https://www.youtube.com/watch?v=cs1e0fRyI18
Hawayein – Jab Harry Met Sejal

हे गाणे मला आवडले. पुन्हा पुन्हा रीपीट मोडवर ऐकायची ताकद होती या गाण्यात. पण अरीजित स्टाईल करायच्या नादात यातील गोडवा काढून आर्तता भरली आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकायला बोअर होतेय. हेच मेलोडीचा टच दिला असता आणि सोनूकडून गाऊन घेतले असते तर.. मै अगर कहू तुमसा हसीन, इस जहान मे नही है कही.. झाले असते.

हा... नाईट शिफ्ट वाला रूनमेश आलेला दिसतोय.. सकाळी लॉग आऊट करून डे शिफ्ट वाल्या रूनमेश ला हॅण्डव्हर करेपर्यंत यांचे कंमेंट्स येत राहतील.
2 जण तरी नक्कीच आहेत या आयडी मागे.

अदिती, आणखी कुठला काढला? एक तो अंड्याच्या कन्फेशनवाला का.. दुसर्‍याच कोणीतरी तो आज वरती काढलाय..
असो, गेले दोन दिवस मी याच आशयाची पोस्ट ईतर दोनेक धाग्यांवर टाकलेली. आता पुन्हा हे गाणे ऐकताना सोनू आठवला.. आणि हा धागाही आठवला.. त्या दोघांमधील हा नेमका फरक उदाहरणासह नोंदवावासा वाटला ईतकेच.

पण अरीजित स्टाईल करायच्या नादात यातील गोडवा काढून आर्तता >>>>>+११११११११११११११११११११११११११११

सोनू इज द बेस्ट!
अरिजित च्या आवाजात कसलही नाविन्य अस नाही..तेच तेच इमोशन ...एखाद दुसर च गाण याच आवड्त..

हे असलं भैताड गाणं ऐकण्यापेक्षा सोनुचं 'हस मत पगली प्यार हो जायेगा' ऐक जा.
माझी पारायणं चालली आहेत त्या गाण्याची Happy
सोनु आणि श्रेया. माय फेव्हरेट.

पण सोनू हा सोनू आहे. आधी तो रफीची नक्कल करीत असला, तरी त्यानंतर त्याने स्वतःची शैली निर्माण केली आहे.>> सुरुवातीच्या काळात रफी स्वतः के.एल. सेहगलची नक्कल करायचा. हे सगळं चालायचंच... त्यातून बाहेर पडून स्वतःचं स्थान निर्माण करणं आणि ते दिर्घकाळ टिकवणं हे महत्वाचं. ते रफी व सोनू दोघानाही जमलं.
आता अरजितचं बघू काय होतं ते...!

मला दोघंही आवडतात, पण सोनू निगम just unbeatable!
गरम पराठ्यावर लोण्याचा गोळा कसा हळूवार घरंगळत जातो..
पाहता पाहता केव्हा वितळतो कळतही नाही... तसं सोनूचं गाणं वाटतं... सहज प्रेमात पाडणारं... Happy

शेअर करा अमा तुम्ही
त्यातून चांगली गाणी समजतील
पण त्याची प्लेलिस्ट मी सलग ऐकू शकत नाही. सुटी सुटी गाणी चांगली वाटतात

व्होकल क्लोन म्हणजे अरीजित टाईप आवाज काढून गाणारे इतर (दर्शन रावल वगैरे)
जसा बाबुल सुप्रियो हा कुमार सानू चा व्होकल क्लोन होता

तिला पाऊस आवडतो, मला पावसात ती आवडते>>> अर्रे अस्सच त्या नेहा कक्कर चं गाणं आहे ना? ते तर ह्या वर्षी आलंय! रुन्म्या २०१७ ला लिहुन गेला :आश्चर्य चकीत बाहुली:

सोनू निगम जास्त व्हर्सेटाइल आहे. त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायला मिळाली हे ही खरेच.
रेफ्यूजीदिवाना हे अक्खे अल्बम, मुझे रात दिन बस मुझे चाहती हो, ये दिल दिवाना , सतरंगी रे, कल हो ना,
मेरा रंग दे बसंती चोला, सरफरोशचा टायटल ट्रॅक, अभि मुझ में कहीं तर अलीकडचा मास्टर पीस आहे.

अरिजीतही टॅलेंटेड आहे. पण सोनूच्या मानाने त्याला लिमिटेड रेंजची गाणी मिळत आहेत असे वाटते. माझ्या आवडीची काही अरिजित स्पेशल गाणी..
लाल इश्क , दंगल मधले नैना, दुआ, राबता , समझावां, चन्ना मेरेया , कलंक टायटल ट्रॅक, सूरज डुबा है यारो, राझी टायटल ट्रॅक, बोलना, सुनो ना संगें मरमर की ये मिनारे , तेरा यार हूँ में

अर्रे अस्सच त्या नेहा कक्कर चं गाणं आहे ना? ते तर ह्या वर्षी आलंय! रुन्म्या २०१७ ला लिहुन गेला :आश्चर्य चकीत बाहुली:
>>>

ती माझी मैत्रिण आहे. तरी हल्ली आमची chatting कमी झालीय..

सोनू निगम मस्त गातो.बहका मै बहका त्यानेच गायलंय ना गझिनी मधलं? आणि कैसे मुझे तू मिल गयी?
मला ह्रितीक वाल्या अग्निपथ ची पण आवडतात गाणी.

कैसे मुझे तू मिल गयी>> सोनू ने वाचायच्या आत डिलीट करा.
आपली बेनी दयालबरोबर तुलना केलेली पाहून रागावेल हां Happy

सोनू आमच्या पिढीचा लिजेंड आहे. त्याची खोऱ्याने सुंदर गाणी आहेत.
मी अनु तुम्ही तर फार मोठा अपराध केलाय त्याची अशी आणि चुकीची गाणी शोधून Happy आमची पिढी तुम्हाला माफ नाही करणार

मी आधी लिहिलंही असेल.. सोनू निगमचं 'तनहाई' मला खूप म्हणजे खूप आवडतं.. तेवढं एकच गाणं त्याने म्हटलं असतं तरी पुरलं असतं त्याचा आवाज आवडण्यासाठी ( पण बाकीचीही बरीच आवडतात Lol )

Pages