सोनू निगम v/s अरिजित सिंग

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 January, 2017 - 15:09

तिला कॉफी आवडते, मला चहा आवडतो
तिला पाऊस आवडतो, मला पावसात ती आवडते
असं काहीतरी ते आहे ना, त्याप्रमाणे हल्ली आमचं असे चालते,
तिला अरिजित आवडतो, मला आजही सोनूच आवडतो..
त्याच्या दिवाना अल्बम पासून ते ये दिल दिवाना - परदेस पर्यंत..
कल हो ना हो.. पण आज फक्त सोनू निगमच
रंग दे बसंती चोला ऐकताना स्फुरण चढते, तर अभी मुझ मे कही ऐकताना अंगावर काटा येतो..
मै अगर कहू तुमसा हसीं हे सोनूपेक्षा गोड गाणारा कायनात मे नही है कही .. तर थोडक्यात त्याला तोड नाही,
असेच वाटत होते अगदी कालपरवापर्यंत ...
पण हल्ली सर्वांवरच अरिजितची जादू ओसंडून वाहतेय असे जाणवते.. आणि ते फार जवळून अनुभवतोयही.. त्यामुळे आमचा हा अरिजित विरुद्ध सोनू हा वाद हल्ली रोजचाच झालाय.
गंमत म्हणजे सुरुवातीला सर्वच गाणी एकाच साच्यात गाणारा दिसतोय, आणि हिमेश रेशमियाच्या म्युजिकप्रमाणे याचाही ओवरडोस होत हा दोनचार वर्षात बाहेर फेकला जाईल असे वाटणारा अरिजित हल्ली थोडा थोडा मलाही बरा वाटू लागलाय Happy
बरं आणि हल्ली बहुतांश बिग बॅनर चित्रपटात त्याचीच गाणी दिसतात.. एखादे गाणे चांगले आहे म्हणत ऐकावे आणि ते त्याचेच निघावे हे सवयीचे झालेय.. अर्थात या दरम्यान काही टुकार गाणीही करत असावा, कल्पना नाही. पण गायक त्याच्या गाजलेल्या गाण्यांनी ओळखला जातो, जी त्याला हल्ली बरीच मिळत आहेत. अगदी शाहरूखचा आवाज म्हणूनही आता सर्रास वापरू जाऊ लागल्याने त्याच्या आता फार काळ विरोधातही राहता येणार नाही. उदाहरणार्थ आजच रईसचे नवीन आलेले गाणे चेक करूया म्हटले तर ते अरिजितचेच निघाले..
गाणे तसे ठिकठाकच आहे - ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=lpdRqn6xwiM
पण यातील ‘ओ जालिमा’ .. आहा! असं काही म्हटलंय .. की बस्स! Happy
मागेही चन्ना मेरेया गाणे ऐकताना त्यातील ‘अच्छा चलता हू..’ या ओळींना असे काही उचललेय.. की तिथून मी पुन्हा पुन्हा ऐकतो Happy

तर मग म्हटलं आता हे जालिमा ऐकून माझा बालमा पुन्हा अरिजितची रेकॉर्ड लावणार.. म्हणून याला काटशह द्यायला सहज सोनू ऐकायला घेतला..
थोड्याश्या शोधाशोधीत त्याचा हा एक विस्मरणात गेलेला गुण सापडला - https://www.youtube.com/watch?v=1U2G_F3sLUw

हि असली गायकांची मिमिक्री बस्स एक सोनूच करू शकतो. वर्सेटिलिटी की काय म्हणतात ती यापलीकडे आणखी काय असू शकते.
बघू आता हाच मुद्दा घेऊना उद्या ऊतरायचेय..
थोडी मदत तुम्हीही करा.. या गायकांमधील तेंडुलकर आणि कोहलीबद्दल चार शब्द तुमच्याकडूनही येऊ द्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Comparison होऊच शकत नाही. सोनूचा आवाज अप्रतिम आहे. अरिजित बद्दल चिकवा वर लिहिलेली पोस्ट इकडे टाकत आहे -

अरिजितच्या आवाजाला अजिबात फिरत नाही. नुसता एका सुरात रडत राहतो. चुकून आवाज चढवायची वेळ आली तर आवाज फाटतो त्याचा. आशिकी २ मध्ये जरा बरा वाटला होता. त्यानंतर गंडत गेला. लेटेस्ट उदाहरण पी एस २ मधल्या मेरा आसमां जल गया चं आहे. याचं original तामिळ गाणं (chinnanjiru nilave) कितीतरी सरस आहे. अरिजितने एका सुरात ओढलं आहे गाणं. हीच तऱ्हा पी एस २ anthem ची. Original गाणं रहमानच्या आवाजात आहे आणि हिंदीत अरिजितने वाट लावली आहे.

ओह कैसे मुझे वेगळ्या चं आहे का.तो फार पुढे नाही आलेला दिसत.
सोनू ची जबरदस्त आणि वेगळ्या शैलीत गायलेली गाणी खूप आहेत.

सचिन खरे तर लता मंगेशकर यांना बोलावे लागेल.
पण हो. सोनू निर्विवादपणे दोघात सरस आहे यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
सचिन कोहली हा वादाचा विषय आहे. माझे मत सचिनला आहे पण तो इथला विषय नाही.

सोनू ऑल टाईम फेव्ह. कधिही.

कभी मुझमें कहीं ..हे गाणं ऐका (अग्निपथ) नाही प्रेमात पडलात तर... Wink
हळूवार मोरपीस फिरवल्या सारखं त्याचं गाणं!

मुझे रात दिन बस मुझे ह्या गाण्याची तर कित्तेक पारायणं झालीत.. अरिजित च्या ऐवजी कुणी सोनू ला बेसुरा म्हणा...आता तलवारी परजत येऊ Rofl

सोनू इज बेस्ट
कितीही अवघड गाणं असो सहज गातो

आजच सतरंगी रे ( दिल से ) ऐकले

सोनू चांगला असुनही हल्ली काहीच नवी गाणी कसा काय गात नाही? मला तरी काहीच माहित नाहीत त्याची नवी गाणी. सगळी आमच्या लहानपणचीच आठवतात.

https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/sonu-nigam-say...
सोनू निगम ने बॉलिवुडातल्या राजकारणाला कंटाळून हिंदीत नविन सिनेमासाठी गाणे बंद केले. शेवटचे गाणे लालसंग चढ्ढा मधे गायले होते म्हणे. अजून साउथ सिनेमाजमधे गातो, लाइव शोज, फेस्टिवल सिंगिंग इ. मधे पैसा कमवतो.

"याला विनम्रता बोलतात" - भलतीच विनम्रता आहे. Happy बाकीच्या गायकांना त्याने कमी रेटिंग पण दिलंय (ए. आअर. रहमान ला २)

स्वताला अरिजित पेक्षा कमी रेटिंग घेणे ही विनम्रता

कोणाला तरी पाच दिले तो काय मग सोनू च्या लेव्हलचा झाला का..
ए आर रेहमानला सिंगर म्हणून हे क्लिअर केले.
आणि त्या मिकासिंग ला रेटिंग दिले हेच खूप

बाकी त्याने शेवटी म्हटले की या स्केलवर मला पाच. कारण कमी दिलेले दुखावले जाऊ नयेत Happy

सोनू निगम ने बॉलिवुडातल्या राजकारणाला कंटाळून हिंदीत नविन सिनेमासाठी गाणे बंद केले
,>>>>

फार सडके राजकारण
इथे चर्चेलाही नको ते..

पण लाईव्ह शो/ फेस्टिव्हल सिंगिंग मध्ये जुनाच सिलेंडर पुरवुन पुरवुन वापरावा लागेल ना? ते स्केलेबल कसं होतं?
इंडिअन एक्स्पेस मध्ये लिहिलेलं राजकारण नाही वाटलं. त्याला नव्या लोकांबरोबर स्पर्धा करायची नाहीये, ऑडिशन द्यायची नाहिये असा फील आला. असो.

हो. असं त्या बातमीत लिहिलंय असा मी अर्थ काढला.

ऑडिशनला भिकारीगिरी/ स्वयंवर म्हणतोय ना तो? अदर दॅन ऑडिशन राजकारण असेल ही, पण त्याचा त्या बातमीत उल्लेख नाही.
रच्याकने: करिनाने लालसिंगसाठी आयुष्यात पहिल्यांदा ऑडिशन दिली असं ही वाचलेलं, त्यामुळे ऑडिशन 'न देणे' हे टॅलेंट असण्याचं लक्षण मानत असतीलही ही मंडळी.

अमितव, बरोबर आहे तुझं ऑब्झर्वेशन ऑडिशन बद्दल. हे इतरत्रही वाचलंय कि एस्टॅब्लिश्ड बॉलिवूड अ‍ॅक्टर्स/स्टार्स ऑडिशन देत नाहीत.

माझ्या कभी खुशी कभी गम चे काय इथे फेरफटका..
मी सोनूची बाजू मांडतोय. तो स्वताला 5 आणि अरिजितला 7 समजतो असे बिलकुल नाहीये हे समजायला अवघड नाही.
असो Happy

अरे रॉकी व राणी मध्ये सोनू निगम ने एक गाणे गायले आहे. ऐका अल्बम

अरिजित ला चार गाणी आहेत व सोनू ने रो लैन दे हे गाणे गायले आहे.

अरिजित बेसूर गातो असं काही जण म्हणालेत. मला वाटतं की तो ठरवून काही ठिकाणी बेसूर होतो. ठरवून बेसूर होणे आणि सूर न कळल्यामुळे बेसूर होणे ह्यात फरक आहे. ठरवून केल्यास मूळ सुरापासून किती off जायचं आहे त्यावर गायकाची हुकूमत असते. तो सेम बेसूर स्वर पुन्हा लावू शकतो. सूर न कळणाऱ्या लोकांना सेम बेसूर स्वर पुन्हा लावता येत नाही. अरिजीत हा पहिल्या प्रकारात मोडतो असं माझं मत आहे. आतिफ अस्लम पण साधारण त्यातलेच (हा एक माणूस आहे की दोन?). पण तरी हे ऐकताना ज्यांना बेसूर आहे हे जाणवलं, त्यांनी रावसाहेबांप्रमाणे गल्ली चुकलं काय हो ते हे कळण्याइतपत आपण कानसेन आहोत ह्याबद्दल स्वतःची पाठ नक्कीच थोपटावी.

सोनू निगम हा सूर न चुकवता गाण्याच्या पाठशाळेतला गायक आहे. तो मला आवडतो. तसा मी पारंपरिक संगीत ऐकणारा श्रोता आहे. तरीपण मला अरीजितची काही गाणी आवडतात - अगर तुम साथ हो, कट्यार काळजात घुसली मधली कव्वाली, लाल इश्क, इत्यादी.

Tech lihile aahe na
>>>>

आमा मला म्हणायचे होते की रो लैन दे शब्दावरून जसे गाणे वाटते ती तर अरिजीत स्पेशालिटी आहे. पण ते सोनूच आणि बाकी चार त्याची याची गंमत वाटली Happy

हा एक माणूस आहे की दोन?
,,>>>>>

हा हा.. जतींन ललित, नदीम श्रवण प्रमाणे आतिफ अस्लम .. गायकाची जोडी Wink

Pages