सोनू निगम v/s अरिजित सिंग

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 January, 2017 - 15:09

तिला कॉफी आवडते, मला चहा आवडतो
तिला पाऊस आवडतो, मला पावसात ती आवडते
असं काहीतरी ते आहे ना, त्याप्रमाणे हल्ली आमचं असे चालते,
तिला अरिजित आवडतो, मला आजही सोनूच आवडतो..
त्याच्या दिवाना अल्बम पासून ते ये दिल दिवाना - परदेस पर्यंत..
कल हो ना हो.. पण आज फक्त सोनू निगमच
रंग दे बसंती चोला ऐकताना स्फुरण चढते, तर अभी मुझ मे कही ऐकताना अंगावर काटा येतो..
मै अगर कहू तुमसा हसीं हे सोनूपेक्षा गोड गाणारा कायनात मे नही है कही .. तर थोडक्यात त्याला तोड नाही,
असेच वाटत होते अगदी कालपरवापर्यंत ...
पण हल्ली सर्वांवरच अरिजितची जादू ओसंडून वाहतेय असे जाणवते.. आणि ते फार जवळून अनुभवतोयही.. त्यामुळे आमचा हा अरिजित विरुद्ध सोनू हा वाद हल्ली रोजचाच झालाय.
गंमत म्हणजे सुरुवातीला सर्वच गाणी एकाच साच्यात गाणारा दिसतोय, आणि हिमेश रेशमियाच्या म्युजिकप्रमाणे याचाही ओवरडोस होत हा दोनचार वर्षात बाहेर फेकला जाईल असे वाटणारा अरिजित हल्ली थोडा थोडा मलाही बरा वाटू लागलाय Happy
बरं आणि हल्ली बहुतांश बिग बॅनर चित्रपटात त्याचीच गाणी दिसतात.. एखादे गाणे चांगले आहे म्हणत ऐकावे आणि ते त्याचेच निघावे हे सवयीचे झालेय.. अर्थात या दरम्यान काही टुकार गाणीही करत असावा, कल्पना नाही. पण गायक त्याच्या गाजलेल्या गाण्यांनी ओळखला जातो, जी त्याला हल्ली बरीच मिळत आहेत. अगदी शाहरूखचा आवाज म्हणूनही आता सर्रास वापरू जाऊ लागल्याने त्याच्या आता फार काळ विरोधातही राहता येणार नाही. उदाहरणार्थ आजच रईसचे नवीन आलेले गाणे चेक करूया म्हटले तर ते अरिजितचेच निघाले..
गाणे तसे ठिकठाकच आहे - ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=lpdRqn6xwiM
पण यातील ‘ओ जालिमा’ .. आहा! असं काही म्हटलंय .. की बस्स! Happy
मागेही चन्ना मेरेया गाणे ऐकताना त्यातील ‘अच्छा चलता हू..’ या ओळींना असे काही उचललेय.. की तिथून मी पुन्हा पुन्हा ऐकतो Happy

तर मग म्हटलं आता हे जालिमा ऐकून माझा बालमा पुन्हा अरिजितची रेकॉर्ड लावणार.. म्हणून याला काटशह द्यायला सहज सोनू ऐकायला घेतला..
थोड्याश्या शोधाशोधीत त्याचा हा एक विस्मरणात गेलेला गुण सापडला - https://www.youtube.com/watch?v=1U2G_F3sLUw

हि असली गायकांची मिमिक्री बस्स एक सोनूच करू शकतो. वर्सेटिलिटी की काय म्हणतात ती यापलीकडे आणखी काय असू शकते.
बघू आता हाच मुद्दा घेऊना उद्या ऊतरायचेय..
थोडी मदत तुम्हीही करा.. या गायकांमधील तेंडुलकर आणि कोहलीबद्दल चार शब्द तुमच्याकडूनही येऊ द्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रीती - पिंकी अशी गायिकांची जोडी आठवली
पिया पिया ओ पिया पिया
इन गलियों मे शोर मच जाएगा
आया रे आया कोई आया रे
मैने कोई जादू नाही किया

वगैरे गाणी होती त्यांची

जतींन ललित, नदीम श्रवण प्रमाणे आतिफ अस्लम .. गायकाची जोडी >> अच्छा, लालन सारंग सारखं Wink

ठरवुन बेसुर अगदी बरोबर.
'बिनते दिल' मध्ये ती फिरत मला अरेबिक वातावरण निर्मिती करते असं वाटतं. अरेबिक संगितातील सूर भारतीय किंवा वेस्टर्न सप्तकापेक्षा वेगळे आहेत का कसं वाचलं पाहिजे.
आता बेसुरच विषय निघाला आहे तर आपले १२ स्वर बटणं असलेल्या कुठल्या वाद्यात कोंबायचे तर ते मूळ भारतीय श्रुतींपासून थोडे पुढे मागे करावेच लागतात. बटणं असलेल्या (पेटी, ऑर्गन, पियानो इ.) लिहिलंय कारण बटणं असलेली वाद्ये प्रि-ट्युन्ड असतात. तारा असलेल्या वाद्यांत ट्युनिंग करणे सहज शक्य असते आणि भारतीय १२ स्वरांचे त्यांच्या अचूक वारंवारतेने ट्युनिंग करता येते. उ.दा. सारंगी पेटी पेक्षा गोड का वाटते.

हे टँपरिंग करतात म्हणजे खालचा सा आणि वरचा सा याचे बारा समान भाग करतात आणि त्यात हे बारा स्वर बसवतात. हे केल्याने एकच वाद्य कुठल्याही पट्टीत आपण वाजवू शकतो... काळी चारचा 'रे 'काळी पाचचा 'सा' बनून सगळं गणित बरोबर जमतं.
आता हे टँपरिंग न करता ही पेटी बनवता येईल (केलीच आहे) पण ती एकचा पट्टीसाठी असेल.
आपल्या कानांना या टँपरिंगची सवय झाली आहे. तर सुरात बेसुर हे ही रिलेटिव्ह असू शकतं इतकंच सांगायचं होतं. त्यावर निबंध झाला Proud

खरं म्हणजे मूळच्या पाश्चात्य संगीताचे १२ सूरही equitempered नाहीत. नैसर्गिक स्वर हे बहुतेक सर्व संगीतात श्रवणानुभव योग्य असण्यावर अवलंबून होते. फक्त त्यात scale बदलता येत नाही, कारण मग त्यांचं गुणोत्तर बदलतं. त्यामुळे जेव्हा बटणाधारित वाद्ये निर्माण झाली आणि त्यात scale बदल करण्याची गरज पडली, तेव्हा लोकांनी वाजवण्याच्या सोयीसाठी equitempered scale वापरायची ठरवली आणि पुढे जागतिक संगीतावर त्याचा प्रभाव पडला.

ह्यात अनेक शब्द किंवा अमुक एक मी असं का म्हणालो हे अनेकांना कळणार नाही, याची मला कल्पना आहे. इथे धाग्याच्या तो विषय नाही. सर्व स्पष्टीकरणासकट नंतर कधीतरी वेळ काढून मला यावर लिहायला आवडेल.

आता विषय निघालाच आहे तर, सहज डोक्यात आलं म्हणूनः पं. जसराजांची जसरंगी हिदुस्तानी कंठ संगीतात त्यांनी केली ती पेटी आणि टँपर्ड पट्टी हाताशी होती म्हणूनच ना? नाहीतर ते शक्यच झालं नसतं.
इतर सुसंगत धागा असेल तर तिकडे बोलू शकतो.

रोचक मुद्दा. जसरंगी करताना कुठले राग निवडले आहेत त्यावर आहे. काही combinations मध्ये गुणोत्तर चांगलं जुळून येतं. यावर वेगळा धागा काढू.

कुठले राग निवडले आहेत त्यावर आहे >> हो. तोच विचार आलेला डोक्यात. आधीच जसरंगी ओडव रागात हवी (हो ना?), त्यात सुरांचं बंधन आणि परत सुश्राव्य तर हवंच... फारच बंधन होतील. तसं जर का असेल तर मग अगदीच मानलं!

झाली के सहा वर्षे धाग्याला. अजुनही परिस्थिती नाही बदलली बरं. सोनू आता हिंदी गात नसला तरी त्याने जे केले त्याच्या किंचीत देखील अरिजीतने केलेले ऐकले नाही.

हो
आरिजीत त्याच्या शैलीत सरस आहे पण सोनूची उंची गाठू शकत नाही आता याबद्दल दुमत नाही मला तरी...

Pages