निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिने>>>>>>>>>>>> काही काही गोष्टी मन लावुन अनुभवण्यातच जास्त मजा असते...>>>>>>> कर्रेक्ट!

अरे व्वा...
फायनली लाल झालेच टोमॅटो...
वालाच्या या चपट्या शेंगा बहोतच टेस्टी लागतात.. आम्ही घरी याचाच वेल लावतो... यावर्षी नाही लावला पण..
तू हे सारं कुंडीत मॅनेज करते म्हण्जे खतरनाक आहेस... _/\_ स्विकारावा.

टोमॅटो झाडावर असताना कुंडीजवळ गेल्यावर एक उग्र पण छान वास येतो.. मला खुप आवडतो तो !>>>>>+११११११११११११११

मला तर ते टोमेटो फ़ार आवडतात. Happy

आज नेहमीप्रमाणे रुमचं दार उघड ठेवून गॅलरीच्या रुममधे बसली होती तोच बाहेर एकच गलका झाला... डोकावून पाहिलं तर हे एवढे पक्षी... म्हटलं कसली सभा भरलीए ? शिवरायांच्या स्मारकाबद्दल तर बाचाबाची नव्हे.. फिर सोचु ते बनणारे मुंबईत अन चर्चा इथवर कशी आली.. मग दिसल कि बाहेर एका टोस्टच्या तुकड्यासाठी एवढी चिडीमार चाल्लीए...

जवळपास १० १२ जंगली सातभाई ५ १० मिनीटांसाठी दंगा घालत होते... मज्जा आली बघताना.. लगेच फोटो काढले.. मोबाईलमधे काढले सो इतके काही स्पष्ट अन छान नैये.

आत्ताच काही दिवसांपूर्वी किरण पुरंदरे यांच 'प्क्षी आपले सख्खे शेजारी' वाचलं तेव्हापासुन त्यांच निरिक्षण करण्यात आणखी मज्जा येतेय...

हे काही फोटो.. (क्रोममधे बघा (खासकरुन अन्जू + शोभा) Wink )

टोमॅटो झाडावर असताना कुंडीजवळ गेल्यावर एक उग्र पण छान वास येतो.. मला खुप आवडतो तो !>>>
अन् हात लावल्यावर लागणारा मऊ थंडावा.. Happy

तर खरतर सातभाई पहिल्यांदा एवढा जवळून पहिला म्हणुन नेमका कोणे याबद्दल जरा कन्फ्युजच झाली मी..
मग शोधाशोध केल्यावर नक्की करुन मिळालेली जराशी माहिती शेअर करते...

या पक्ष्याचं मराठी नाव : जंगली सातभाई
इंग्रजी नाव : Jungle babbler
Scientific Name : Turdoides striata (हे इटॅलिक मधे लिहिलयं असं समजा Wink Proud )

हे पक्षी सहसा ६ ते १०च्या संख्येने एकत्र आढळतात म्हणुन नाव सातभाई असे पडले. समाजप्रिय पक्षी.

आकाराने साळूंकीपेक्षा मोठा.

मातकट रंग, डोळे पांढरे, चोच व पाय पिवळसर, कर्कश्श असा के के आवाज..

आहारामधे सहसा किड्यामाकोड्यांचा समावेश असतो पण त्याचबरोबर धान्य, छोटी फळे सुद्धा खातात.

प्रजननाचा कालावधी वर्षभर असतो. स्वतःची टेरिटोरी मेंटेन करतात. सापांसारख्या प्राण्यांवर समुहाने हल्ला करुन स्वतःचे रक्षण करतात. (तसेच कधी कधी प्रिडेटर्सला भुलवण्यासाठी मेल्याचे सुद्धा सोंग करतात असे आढळून आले आहे.)

झाडांवर घरटी बांधुन त्यात हिरवट निळ्या रंगांची ३ ते ४ अंडी घालतात. इतर पक्षी (जातभाई) सुद्धा पिल्लांना खाऊ पिऊ घालण्यात पालकांना मदत करतात.

आजची सकाळ, सोन सकाळ म्हणावी...
पित- कांती,झळकावत देव चाफा फुललाय...:)
(पहिले वहिले कुंडीतले फुल.)

टोमॅटो झाडावर असताना कुंडीजवळ गेल्यावर एक उग्र पण छान वास येतो.. मला खुप आवडतो तो !+१०००

टीना, सात भाई माहिती मस्तच!! यानां झगडालु पण म्हणतात!

Pages