निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपारीच्या फुलांना बटनफूल असंही नाव आहे. गोव्यात बुत्यां(व) असा उच्चार करतात कारण पोर्ट्युगीज़मध्ये 'बटन'चा उच्चार बुत्यां(व) करतात असे मला एकांनी सांगितले. ही फुले गुंडीसारखी दिसतात म्हणून बटन नाव पडले.

आमच्या लहानपणी त्याला भूतेव ची फुले अस काहीतरी म्हणत अस मला आत्ता थोड़ास आठवतय आणि त्याचा अर्थ सुद्धा हिराच्या वरच्या पोस्टमुळे केळला. छान दिसतात ति फुले.

बटण फुलं मस्तच.. अदिजो छान उपक्रम.. कल्पना छाने..
मी बरेचदा फळांमधील बिया जमवुन ठेवते.. अन मग त्या रुजवुन त्याची रोपे तयार करते..
जास्वंद सुंदरच..

भारतात, थंडी पडलीय कि नाही ? आमच्याकडे सध्या उन्हाळा आहे. सगळीकडे आंबेच आंबे आहेत. इथले आंबे बेताचे गोड असतात. पण चवीला चांगले असतात.

आहाहा! इसको बोलतेय गुलाब!! काय मस्त रंग आहे. Made my day!

फुलपाखरू अर्थात सुंदर Happy आणि ते तुम्ही टिपल्याबद्दल तुमचं विशेष कौतुक!

जागू, नाही गं...मी अजून जुन्याच पद्धतीने अपलोड करते आहे ..म्हणजे जे काही १ २ आत्तापर्यंत केलेत ते. वेळखाऊ पद्धत आहे. एकदा शांततेत बसून पिकासा वरून कसे इकडे डिस्प्ले करायचे ते बघावं लागेल. मुहुर्त मिळाला की!

सुंदर गुलाब सायु.

अनुराग्जी छान फोटो.

सुलक्षणा मी पण पिकासावरून टाकतेय पण काहिंना दिसत नाही. माझ्या पिसीवर फ्लिकर बॅन आहे.

जागू पिकासावरून परत टाकता यायला लागले का फोटो? का जुनेच अपलोड आहेत? मला कसरतीचा फोटो दिसत नाहीये.

मी खुप दिवसांनी ट्राय करतेय. अजुन मलाही कळत नाहीये काहीच. हा फोटो दिसत नाही म्हणजे अजुन तोच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे नि.ग. थंडावला आहे.

मायबोलीनेच जर साईझ वाढवून दिली तर हा प्रॉब्लेम येणार नाही. पिकासा बंद पडल्याने सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येतोय.

मला नाही दिसत काही फोटो, जागूचा कसरत फोटोपण नाही दिसत. मी क्रोमला शरण नाही गेलेय अजून, तिथे गेलं की दिसतील बहुतेक.

बाकी दिसतायेत ते सर्व सुरेख आहेत.

हुश्श. क्रोमवर बघितले सर्व फोटो. प्रस्तावना पारिजात, मोरपीस आणि कसरत फोटो दिसत नव्हते ते दिसले. मस्तच आहेत सर्व.

Pages