निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग आता सगळ्यांनी क्रोम वापरा हाच एक उपाय.>>>>>>..आज्ञा शिरसावंद्य! मी पण क्रोमला आत्ताच शरण गेले. "प्राजक्ताचा" फोटो मस्तच Happy

सारे फटू मस्त..
क्रोम जिंदाबाद.. मला आठवत नाही मी किती वर्षापासुन वापरतेय ते.. पण त्या व्यतिरिक्त इतर ब्राउजर आवडलेच नाही कधी.. आत्ताच्या जगातही इंटरनेट एएक्स्प्लोरर वापरणार्‍यांना सलाम _/\_

सीड बाँब साठी बिया जमवण्याचे काम चालले आहे हे मी मागे लिहिलेच आहे. त्यात काही रानअबोलीच्या बियाही होत्या. त्या बिया:

IMG_20161204_132951.jpg

पसरून ठेवलेल्या असताना मधेच चुटचुट आवाज करत त्या उकलायच्या Happy
उकलल्यावर:

IMG_20161204_133143.jpg

कशी सुरेख रचना आहे!

रेणु कर्दळ खुप सुंदर आहे.

राघु आमच्याकडे सप्टेंबर मध्ये येउन गायब होतात.

अदिजो, बियांचा आकार कसला सुपर्ब आहे .. रानअबोलीचा फोटो टंका न कुणतरी..

तुला मोठे बुलबुल भेटतात गं जागू Wink .. मला तर पेठेत आल्यापासुन चिमणी दिसायची मारामार झालीये..

रेणु कर्दळ खुप सुंदर आहे.>>+१

वेडा राघु मस्त्च..

साध्या अबोलीच्या बियाही पाणी टाकल्यावर चुट चुट आवाज करतात फुटतात.

अबोलीच्या झाडावर पाणी ओतले की कोरड्या बिया आवाज करत फुटतात

सायु, हा पण गुलाब खूप सुंदर!! माझ्या वडिलांच्या भाषेत सांगायचं तर, 'भयंकर सुंदर'!!
रेणु, कमळं मस्तच. माझं मोस्ट फेवरिट फूल.
जागूताई, थोडे खंड्या आणि बुल्बुल आमच्याकडे पण पाठवा Happy अम्ही या वर्षी पासून पक्षीखाद्य ठेवतो आहोत बागेत. आत्ता पर्यंत चिमणी, टिट, मॅगपाय, कोकीळ हे भेट देतायेत.

निसर्ग उद्यानात तीन परदेशी पाहुणे
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/3-foreign...

राघूचा फोटो सुरेख! दहिसरला बरेच पक्षी पाहिले पण अजून राघू दिसायचा आहे. हिवाळ्यात एकमेकांना खेटून बसलेल्या राघूंचे फोटो पाहिले की खूप इर्षा वाटते मला का नाही बघायला मिळत म्हणून...

आमच्याकडेही तशेच बसतात. सोबत इतर पक्शिही असतात.

सुलक्षणा येतील नक्की पक्षी.

सायु मस्त गुलाब

टिने तुझ्यासाठी

आपल्याकडे हमिंग बर्डस फार दिसत नाहीत का ? >> नाही... आपल्याकडे हमिंगबर्डचा मावसभाऊ सनबर्ड दिसतो. Happy

सुप्रभात.
काश्मिर की कली

काश्मिर का कला Lol

आणि काश्मिर का फुल.

फुल खिले है गुलशन गुलशन

वा ...मस्त फोटो आणि माहिती , गप्पा!
हाय निगकर्स....कसे आहात?
आज सकाळी फार मस्त अमेझिंग अनुभव आला. शब्दात मांडता येईल की नाही ............माहिती नाही. प्रयत्न करते.
जनरली माझ्या स्वयंपाकघराच्या सिटाउटमधून(sit out) समोरच्या कडुलिंबावरच्या हालचाली दिसतात. बुलबुल, होले, चिमण्या कावळे, नाचण, फुलचुखे, शिंजीर कधी चक्क किंगफिशर, भारद्वाज,वेडे राघू...इ.इ.
सध्या वेडे राघू खूप वेडेपणा करत कडुलिंबावर सुखेनैव संचार करत असतात.
आज सकाळची कामं आवरल्यावर म्हटलं गच्चीत जाऊ. एक प्लॅस्टिक खुर्ची ठेवलेलीच आहे उन्हात बसायला.
तसं उन कडकच होतं. हातात मोबाइल. मेसेजेस वाचताना तंद्री लागलेली, उन्हानेही मस्त गुंगी आली होती.
अचानक पाठीमागून बाळाच्या खेळण्यातल्या/खुळखुळ्या सारखा आवाज आला आणि त्याच वेळी डोक्यावरून अगदी जवळून खेळातलेच हिरवेगार विमान पंख पसरून निवांतपणे ग्लाइड करत जावं तसं काही तरी एकत्रित फीलिंग आलं. सगळा अर्ध्या सेकंदाचा खेळ.
पुढे पाहिलं तर एकच वेडा राघू अगदी जवळून उडत गेला. त्याचा तो आवाज करत. आवाजाचं वर्णन बहुतेक जागू करेल.
झालं काय....या वेळी गच्चीत कुणीच नसण्याची सवय या राघूंना असल्याने तो उडत आलेला असणार....कडूलिंबावर जाण्यासाठी आणि वाटेत मी बसलेली, पण मीही तंद्री लागल्याने अगदी स्थिर . त्यामुळे त्यालाही अगदी तिथपर्यंत येईपर्यन्त काही कळलं नसणार. माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली नसणार.
मग त्याने अचानक गिरकी घेतली आणि कडुलिंबावर पसार.
मग वाटलं अगदी सूर्याच्या अगेन्स्ट त्या हिरव्या पाखराचा पंख पसारलेला अगदी खालून असा अप्रतीम फोटो मिळाला असता.
पण मी आलेल्या अद्भुत अनुभवाने चकित होऊन स्तिमित झाल्याने काहीच सुचलं नाही. अगदी डोक्याच्या जवळून संथ उडत जाताना काहीतरी शीळ घालत गेलेला वेडा राघू .

Pages