आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -१

Submitted by मानव पृथ्वीकर on 5 March, 2016 - 09:41

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४४५ साठी क्ल्युज-

१९५०-६० चे कृष्ण धवल गाणे
चिरपरिचीत टांगेवाला संगीतकार
नायिकेचा पहिलाच चित्रपट
नायकाला आव्हान करणारी/ उद्युक्त करणारी नायिका

४४५

आए हैं दूर से,
मिलने हज़ूर से
ऐसे भी चुप न रहिये,
कहिये जी कुछ तो कहिये
दिन है के रात है

तुमसे मेहमान क्या, मुझपे अहसान क्या
लाखों ही ज़ुल्फ़ों वाले, आती हैं घेरा डाले
मेरी क्या बात है

सुप्रभात!
सॉरी कृष्णाजी!
माझा पीसीला प्रॉब्लेम आला नन्तर... मग अपडेटीन्गला त्याने तासभर घालवला. आणि तेवढ्यात ऑफीस सुटायची वेळ
झाली म्हणुन राहिले. Proud

हे घ्या

४४६
क फ क प क प य
क क ह ह ह अ य
क म ह ध ल क त स
क क ह ह ह अ य

हिन्दी

छान गाणं..

बालगीत असल्यासारखे
कधीकाळाचे चांगला सुवर्ण संगीतकार

रेणु... Lol
अगदी परफेक्ट!

८०च्या दशकातील थोडे अनवट गाणे.
गायक सदाबहार किशोरदा!

अगगग! किती उलगडून सांगितलेस!
"निश्चयाचा महामेरू..... " माहितीय ना! Wink

जाउ दे सान्गुनच टाकते!

४४६

कितने फूल कितने पेड़ कितने पंछी यहाँ
कौन कहता है हम हैं अकेले यहाँ
कितनी मीठी है धुन, लहरों की तू सुन
कौन कहता है हम हैं अकेले यहाँ

(नविन निश्चल आणि बालकलाकार)

जाउ दे सान्गुनच टाकते! >>>>

आता असाच नियम आहे! नविन!

आपण कोडे द्यायचे. दुसर्‍याने ओळ्खून क्ल्यु द्द्यायचे
आणि उत्तर पुन्हा कोडे देणार्‍यानेच द्यायचेच! Wink

मला वाटते आता क्ल्यु देणार्‍याने पुढचे कोडे द्यायला हवे! Wink Happy

<<आणि उत्तर पुन्हा कोडे देणार्‍यानेच द्यायचेच! << Lol

आणि मग पुढची अक्षरे हा नियम सान्गणार्याने द्यावीत . Wink

आता इतके क्ल्यु देऊनही प्रयत्नच करत नसेल कोणी सोडवण्याचा, तर पुन्हा कोडे देण्याची शिक्षा कशाला?

आता इतके क्ल्यु देऊनही प्रयत्नच करत नसेल कोणी सोडवण्याचा, >>> ओ, आम्ही ती अक्षरे जमिनीत पेरतो, त्याला खतपाणी घालतो आणि त्यांच्याकडे टकामका बघत बसतो पण टकुर्‍यात अंकुर फुटेल तर शप्पथ! नाविलाज को क्या विलाज ? Happy

यांच्याकडे टकामका बघत बसतो पण टकुर्‍यात अंकुर फुटेल तर शप्पथ! नाविलाज को क्या विलाज ? स्मित>>>

माधव! बरोबर! Happy

चला द्या पाहू नविन अक्षरे!
नवागडी नवं राज! Happy

४४७ साठी क्ल्युज

१. जुन्या जाणत्या व्यक्तीकडुन गाणं आहे, त्यामुळे काळही तोच ५०-६० चा
२. नायिकेचा ती हसरी खेळकर असतांनाचा पिक्चर
३. सोनेरी केसांचा नायक त्रिमुर्तीपैकी एक
४. वाळवंटातले म्रुगजळ.

पुरे नं?

४४७: हिंदी

अ ज प म अ क
म द ब न छ
अ म त द क य द

आते जाते पहलू में आया कोई
मेरे दिल बतला ना छुपा
आज से मैं तुझे दिल कहूँ या दिलरुबा

४४८ साठी क्ल्युज

१. गाणं सदाबहार पण दुसर्या ओळीमुळे जास्त परिचीत.
२. ठोकळा नायक
३.नायिका तीच,
आणि
४.संगीतकार- रागदारीवरील गाण्यांचा उपयोग

४४८:
अकेली मत जय्यो राधे जमुना के तीर (अ ज अ = ओ जी ओ ???)
तू गंगा की मौज मै जमुना का धारा हो रहेगा मिलन

माधवजी, तुम्हीपण?
मला नाही द्यायचे क्ल्यु, जा Uhoh
सारखे सारखे एकाच नायिकेचे गुणगान का गाऊ मी?
मी काय नायक आहे का, " माझा गुन्हा काय" विचारायला? आणि तरी शिव्या खायला?

Pages