"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

पेट्रोल पंपांवर कॅश मिळणार पण डिसीसी बँकांना कॅश व्यवहाराला बंदी?

पंपवाले बिन्काळापैकावाले सभ्य कधीपासून झाले?

गैरसोय आहे.
पण गरीबांच्या आडून प्रमाणाच्या बाहेर आग पाखड करणारे नेमके कुणाच्या बाजूचे आहेत ? उठसूठ पीरपीर लावलीय. कंटाळा आला तेच तेच वाचून.

फेसबुकवर काही पोस्टीं होत्या की 'हा RBI चा निर्णय आहे, सरकारचा संबंध नाही'. न्यूज आली आहे का? लिंक?

बाकी, गैरसोयी सांगू नयेत. दुःखाचा तमाशा मांडून तुम्ही महान कर्मयोग्याचे काम कलंकित करीत असून त्यात खोडा घालीत आहात!! Wink

डोक्यात खिळा मारण्याचा वाक्प्रचार नावारुपाला आणण्यात आलेला दिसतो.

फॉर्वर्ड्स द्यायचे झाले तर येथे पूर आणता येईल.

उदय - काळा पैसा बाहेर काढण्याचे विविध उपाय ह्यावर काही लिहावेत अशी विनंती! तसेच त्यातले आधीच्या सरकारने किती योजले होते तेही एक वेगळा धागा काढून सांगावेत कृपया!

'ह्या देशाचा नागरीक' ह्या नात्याने प्रथमच काहीतरी त्रास सहन करावा लागत आहे ह्याचासुद्धा लोकांना प्रामाणिक आनंद झालेला आहे. हे पचत नसल्याने होत असलेला बेताल विरोध गुलाम नबी आझादांनी केलेल्या वक्तव्यांसारखा तोंडघशी पडू लागला आहे. केजरीवाल आणि ममता बॅनर्जींसारखा भर रस्त्यात अपमानीत होऊ लागला आहे. राहुल गांधींच्या 'ताफ्यासकट पैसे काढायला जाण्यासारखा' हास्यास्पद होऊ लागला आहे.

फेसबुकवर काही पोस्टीं होत्या की 'हा RBI चा निर्णय आहे, सरकारचा संबंध नाही'. न्यूज आली आहे का? लिंक?>>> बहूतेक संसदेतल्या चर्चेत पियुष गोयल राज्यसभेत म्हणाले कि आरबीआय ने प्रपोजल दिले आणि कॅबिनेटने त्या निर्णयाला मंजुरी दिली.

ह्या देशाचा नागरीक' ह्या नात्याने प्रथमच काहीतरी त्रास सहन करावा लागत आहे ह्याचासुद्धा लोकांना प्रामाणिक आनंद झालेला आहे.

Proud

धन्यवाद

>>>>प्रथमच<<<< Proud म्हणजे चांगल्या कारणासाठी प्रथमच हो, जरा समजून घ्या की?

<'ह्या देशाचा नागरीक' ह्या नात्याने प्रथमच काहीतरी त्रास सहन करावा लागत आहे ह्याचासुद्धा लोकांना प्रामाणिक आनंद झालेला आहे.>

त्या नागरिकांना मे २०१४ पर्यंत कोणताही त्रास सहन करावा लागला नाही हे स्पष्टपणे सांगितल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

भारती विद्यापीठात आश्चर्याचा सुखद धक्का! सर्व कर्मचार्‍यांचे सहा महिन्यांचे पगार आगाऊ देण्यात आले. Wink

(आता ह्या कर्मचार्‍यांची 'थोडीशी गैरसोय' झाली हे कबूल आहे, कारण पगार पाचशे आणि हजाराच्या नोटांत झाले आहेत म्हणे, पण एकदम एवढी रक्कम हातात येणे हे सुखदच नाही का?)

राहुल चे पैसे काढणे हास्यायास्पद होऊ लागले आहे @बेफिकीर
97 वर्षाच्या मातोश्री ज्यांना 4 मुले आहेत, त्यांनी जाऊन पैसे काढणे पण तितकेच हास्यास्पद, नव्हे केविलवाणे झाले आहे.

राहुल चे पैसे काढणे हास्यायास्पद होऊ लागले आहे @बेफिकीर
97 वर्षाच्या मातोश्री ज्यांना 4 मुले आहेत, त्यांनी जाऊन पैसे काढणे पण तितकेच हास्यास्पद, नव्हे केविलवाणे झाले आहे.

सार्‍या देशाला ठाऊक असलेली राहुल गांधींची परिस्थिती येथे सांगितली जाणे इतके पर्सनली का घेत आहात सिंबा?

हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांच्या बंदीचा फटका दूधविक्रेत्यांना बसला असून शुक्रवारपासून (१८ नोव्हें.) या विक्रेत्यांना दूधपुरवठा करण्यास मोठे व्यापारी आणि कंपन्यांनी नकार दिल्यामुळे छोटय़ा दूधविक्रेत्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी ठाण्याच्या घरोघरी पोहोचवले जाणारे दूध बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली असून संतप्त दूधविक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन आपली व्यथा मांडली आहे. मोठे व्यापारी आणि कंपन्यांच्या आडमुठेपणामुळे ही दूधकोंडी निर्माण झाली असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप केला आहे. ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने या विषयी जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी साकडे घालण्यात येणार आहे.
नागरिकांकडे सध्या जुन्या नोटा असल्यामुळे दुधाचे बिल या जुन्या नोटांमधून मिळत असून ते स्वीकारण्यास मोठे व्यापारी आडमुठेपणा करीत आहेत. त्यामुळे कंपन्यांकडून होणारे दूध वितरण शुक्रवारी थांबणार असल्याचे या संदर्भात गोकुळ, महानंद आणि अमुल या दूध वितरण कंपन्यांच्या वितरकांकडून कळवण्यात आले आहे. – दिनेश घाडगे, उपाध्यक्ष, ठाणे दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्था

लोकसत्तेतील बातमी . नक्कीच फिअर माँगरिंगचा प्रकार असणार.

ओळखीतल्या एका ब्रांच मॅनेजरने सांगितले - ग्रामीण भागात आणि शहरी भागातदेखील, एखाद्या बँकेचे मॅनेजर किंवा स्टाफ ,जे विरोधी विचारसरणीचेआहेत, ते स्वतः देखील हा गोंधळ वाढवायला मदत करत आहेत. काही ठिकाणी गावातल्या "दादा" लोकांच्या भीतीपोटी मागच्या दारानी व्यवहार होत आहेत. त्यामुळे पुढच्या रांगा हटत नाहीत. खखोदेजा.

आज पर्यंत टोटल शहीद झालेल्यांची संख्यआ ४७ लहान मुले, म्हातारे, फ्रस्ट्रेशन ने आत्महत्या करणारे
http://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/if-demonetisatio...
गैरसोय नाहीच हे खरे नाही.

अ‍ॅ डवान्स मध्ये पगार देणे खूप लोकांनी केले आहे. भिवंडीत एका उद्योजकाने ५ को टी अश्या पद्धतीने निकालात काढले आहेत. आत्ता हातात कॅश दिसली तरी नंतर हे एम्प्लोयी सफर करनार.

सकाळी घरातून निघताना रेडिओवर ऐकले बिग ९२.७ एफ एम सिद्धर्थ आरजे सेक्स वर्कर्सची परिस्थिती जाणून घ्यायला त्यांच्याशी बोलत होता. त्यांना पण त्रास होतो आहे कारण सुटे नाहीत. व हातात कॅश नाही म्हणजे उपाशी च राहायची वेळ . ह्यांचे सेविन्ग काय असेल. रोज थोडा थोडा स्वैपाक करतो म्हट ल्या बायका. एका निर्णयाने सरकारने अगदी प्रत्येक प्रत्येक नागरिकाला त्रास होईल अशी व्यवस्था केली आहे. मत देताना ह्या त्रासाची आठवण राहील.

<ओळखीतल्या एका ब्रांच मॅनेजरने सांगितले - ग्रामीण भागात आणि शहरी भागातदेखील, एखाद्या बँकेचे मॅनेजर किंवा स्टाफ ,जे विरोधी विचारसरणीचेआहेत, ते स्वतः देखील हा गोंधळ वाढवायला मदत करत आहेत>

हो हो नक्कीच. रांगेत उभे राहणारे असंख्य लोकही काँग्रेसने पाठवलेत इति उद्योगपती बाबा रामदेव.

शुगोल,

असे काही नसते.

काल यू पी मधील एका आमदाराने रांगबिंग न मानता थेट आत जाऊन स्वतःच्या खात्यातून पैसे काढले. लोकनेत्यांना तेवढी सवलत मिळायलाच हवी. ब्रँच बंद झाल्यानंतर रांग विस्कळीत झाली. त्यातच हे आमदार आले आणि त्यांच्यासाठी खास ब्रँच उघडण्यात आली. ब्रँच उघडल्यावर रांग पुन्हा लागली म्हणे! पण रांगेतील कोणाला नाही मिळाले पैसे! फक्त साहेबांना मिळाले. नंतर बाहेर येऊन साहेब मुलाखत देताना म्हणाले की बघा ह्या नागरिकांचे किती हाल हाल होत आहेत.

तेव्हा तुम्ही लिहिलेत तसे काहीही नसते. काही लोकनेत्यांना ही सवलत मिळणे रास्त आहे.

एखादी व्यक्ति असंख्य वेळा येतेय हे तर सिद्ध झालंच आहे, त्यामुळेच शाईचा प्रयोग करावा लागला ना! कोणी का पाठवेना त्यांना! काळे पैसेवाले कोणीतरी पाठवत आहे हे नक्की.

>>>>एखादी व्यक्ति असंख्य वेळा येतेय हे तर सिद्ध झालंच आहे, त्यामुळेच शाईचा प्रयोग करावा लागला ना! कोणी का पाठवेना त्यांना! काळे पैसेवाले कोणीतरी पाठवत आहे हे नक्की.<<<<

काळा पैसा भारतात आहे कुठे? जो होता तो पांढरा झालाही आगाऊ पगार वाटपातून किंवा गंगा-यमुनेत फेकून!

<एखादी व्यक्ति असंख्य वेळा येतेय हे तर सिद्ध झालंच आहे, त्यामुळेच शाईचा प्रयोग करावा लागला ना! कोणी का पाठवेना त्यांना! काळे पैसेवाले कोणीतरी पाठवत आहे हे नक्की.>

असे होईल याची कल्पना सरकारला नसावी हे नवल नाही का? तेच तेच लोक रांगांत उभे राहत असल्याच्या, जनधन खात्यांत अचानक ठेवी वाढल्याच्या , उद्योगांतील नोकरदार वर्गाच्या खात्यांत पैसे जमा होत असल्याच्या बातम्या इंडियन एक्स्प्रेससारख्या राष्ट्रद्रोही वृत्तपत्रानेही छापल्या. त्याच्याही कितीतरी नंतर ती शाई आली. बाकीच्या पळवाटा अजूनही बंद आहेत. नव्या पळवाटा खुल्या होत आहेत.

Pages