"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. स्मित कुठल्या बँकेत दहा मिनिटांत पैसे मिळतात आणि कुठल्या एटीएममध्ये पैसे आहेत, हे मला जाणून घ्यायचं आहे. मीही उद्या तिथे जाईन<<<<

तुम्ही विचारलेत की सुरळीत व्यवहार कुठे चालू आहेत. ते मी सांगितले. तुम्ही सुरळीत 'बँकिंग व्यवहार' असे स्पेसिफिकली म्हणत असाल तर मलकापूर बँकेत अवश्य बघा. कॉसमॉसमध्येही बघा! Happy

अवांतर - मुळात रोखीचे व्यवहार कमी झालेले असून तरीही प्रत्येकाची दिनचर्या व्यवस्थित सुरू आहे असा माझा अनुभव! Happy

लोकांना बँकेतून दहा मिनिटात पैसे मिळत असतील तर चेक पेमेंट का करावं लागत असेल? {गहन विचारात बुडालेली स्मायली}

चिनूक्स,

माझे मूळ विधान परत देत आहे.

>>मला बँकेत दहा मिनिटांत पैसे मिळाले. एटीएमला जाण्याची गरज एकदाही पडलेली नाही. <<

मी एटीएम म्हणालो नाही, बँकेत पैसे मिळाले म्हणालो. तुम्ही एटीएम विचारलेत. Happy

कॉसमॉस बँकेत केवळ त्यांच्याच खातेदारांना पैसे मिळतात. त्यांच्याकडेही परवा पैसे नव्हते. त्यांचं एटीएमही कालपर्यंत बंद होतं. असो.

<एकदाच गेलो कारण तेव्हा हा विषय अगदी ताजा होता आणि सेफ्टी म्हणून दोन हजार काढून घेतले होते. >\
हे कशाबद्दल आहे?

माझ्या घरी कामाला येणारी बाई तीन दिवस ५ तास आणि एक दिवस ९ तास रांगेत उभी होती फक्त दिड हजार रुपये बदलण्यासाठी. ( आम्ही तिला पैसे देवू शकलो नाही कारण आमच्याकडेच काल संध्याकाळपर्यंत नवे- जुने कोणतेही पैसे नव्हते). ती बाई रोज शिव्या घालतेय सरकारला.

बाजारात कोणालाही विचारलं तर उत्तर मिळतंय कि धंदा निम्म्यावर आलाय. पण काय करणार, काही इलाज नाही. होईल हळूहळू ठीक.

>>>>हे कशाबद्दल आहे?<<<<

तुम्ही नीट वाचलेले दिसत नाही. कोची विमानतळावर एक एटीएम सुरू असताना आणि गरज नसता २००० रुपये काढून घेतले होते. जवळ असावेत म्हणून! रांगेत सहा, सात माणसे होती. विमानतळ असला तरी प्रकरण ताजे असल्यामुळे गर्दी अपेक्षित होती, पण नव्हती. तारीख ११ नोव्हेंबर. Happy

<आमच्या भागात सर्व व्यवहार सुरळीत चाललेले आहे. मला बँकेत दहा मिनिटांत पैसे मिळाले. एटीएमला जाण्याची गरज एकदाही पडलेली नाही. एकदाच गेलो कारण तेव्हा हा विषय अगदी ताजा होता आणि सेफ्टी म्हणून दोन हजार काढून घेतले होते. >

यात कोची विमानतळाचा उल्लेख दिसला नाही. असो.

>>>>यात कोची विमानतळाचा उल्लेख दिसला नाही. असो.<<<< Lol

अहो तेवढं फोडून लिहिले नाही इतकेच. असो. इतकेच म्हणायचे होते की एटीमची गरज भासली नाही, तरीही एकदा एटीम मिळाले त्यावर थोडे पैसे काढून ठेवले सेफ्टी म्हणून Happy

आजही सर्व बँकेबाहेर रांगा होत्या.. ए टी एम मशीन्स रिकामी होती..

हेतू जो काय चांगला असेल तो असो... पण लॉजिस्टिक पुर्ण गंडलेले आहे. किती लोक पैसे भरण्यासाठी / काढण्यासाठी येतील. याचा काडीचाही अंदाज सरकारला नव्हता. बँकेबाहेर रांगा कश्या लावायच्या याचेही कुठलेही नियोजन नव्हते. अनेक दुकानांनी ५०० / १००० च्या नोटा स्वीकारणार नाही याचे बोर्ड तत्परतेने लावले. आणि २००० रुपयांच्या नोटा वितरणात आल्यानंतर कमीत कमी हजाराची खरेदी करावी लागेल असेही बोर्ड लावलेत ( ते कितपत नियमात बसणारे आहेत ? )

मला एक बॅग घ्यायची होती, त्या दुकानदाराने शेजारच्या दुकानातील कार्ड स्वॅपिंग सुविधा वापरली. आणखी काही खरेदी करायची होती, ती मात्र रोख पैसे नसल्याने टाळावी लागली.

एकंदर नियोजनशून्य कारभार, असेच चित्र दिसतेय. लोकांची सहनशक्ती संपत आलीय.

>>>>एकंदर नियोजनशून्य कारभार, असेच चित्र दिसतेय. लोकांची सहनशक्ती संपत आलीय.<<<<

जे चुकलेले आहे ते चुकलेले आहे म्हणण्यात लाज कसली म्हणा! अंमलबजावणी निराशाजनक आहेच. वरही एका प्रतिसादात लिहिले होते. मात्र अंमलबजावणी सुरळीत व्हावी ह्यासाठी आधी प्रयत्न केले असते तर गोपनीयता राहिली नसती. मगाशी एका वाहिनीवर दाखवले की सहा महिनेही लागतील सगळे सुरळीत व्हायला. काय होते ते पाहायचे! पण दिनेश, हा संताप, चीड वगैरे सार्वत्रिक आहे असे दाखवले जाणे कितपत योग्य आहे असा प्रश्न पडू शकतो. आमच्या येथील रस्ते नेहमीसारखेच फुलून वाहत आहेत, विक्रेते जोरात आहेत. कारभार ठप्प झालेला नाही. कॅश नाही, कॅश नाही हा ओरडा योग्य आहे, पण माणसं उपाशीतापाशी व अन्नान्नदशा होऊन फिरत आहेत असे नव्हे. विरोधकांनी असे चित्र निर्माण केलेले आहे.

बेफिकीर,
अहो, कोथरूड म्हणजे जग नव्हे. मुंबई, पुणे, कोथरूड, प्रभात रस्ता, दादर हे संपन्न प्रदेश आहेत. त्या पलीकडे एक मोठ्ठं जग आहे. त्या जगातल्या लोकांचं काय?

आत्ताच व्हॉट्स अ‍ॅपवर आलेला एक मेसेज सूचक आहे.

डॉक्टरांबाबतच्या निर्णयाविरोधात डॉक्टर रस्त्यावर उतरतात, शेतकर्‍याबाबत शेतकरी वगैरे वगैरे! मग काळ्या पैश्याविरोधातील निर्णयात काळे पैसेवाले का रस्त्यावर उतरत नाहीत? Wink

चेंबूर वडाळा कलिना गोवंडी मानखुर्द ..... बरीचशी ए टी एम बंद आहेत... ब्यांकांजवळ गर्दी आहे.

काहेअ‍ॅ ए टी एम दोन चार तासातच बंद होतात.

बेफिकिरभौ नशिबवान आहेत. दगडूशेट किंवा खुन्या मारोतीने त्याना आशिर्वाद दिलेला दिसतोय

>>>>कोथरूड म्हणजे जग नव्हे.<<<<

टीव्हीवर ते संपन्न अन् मागास प्रदेश दिसतात की? लोकं नैसर्गीकपणे (दामटून नव्हे) ह्या निर्णयाचे स्वागतही करताना दिसतात. राजकारणही सुरू असलेले दिसते. Happy

I got 10000 rs from hdfc bank hinjewadi on 11th nov. Waiting time 1 hour. Very well managed. Bank employees provided tea coffee etc.
Travelling in small towns since 12th nov. Could withdraw rs 2000 twice from sbi atms. Waiting time 15 20 mins. Cab drivers took old currency since they found no issues in depositing it in banks.
Couldnt find any cash in any airport ATMs.

बेफिकिरभौ नशिबवान आहेत. दगडूशेट किंवा खुन्या मारोतीने
त्याना आशिर्वाद दिलेला दिसतोय>>>>>खुन्या मारुती नव्हे अचे ,खुन्या मुरलीधर.पत्र्या मारोती.बेफींना पैशाची काही काळजी नाही हो ,त्यांचं वेगळं पडतं

मी याच धाग्यावर विचारलेला का प्रश्न ? नसेल तर पुन्हा विचारते.
कुठल्या बँकेत दहा मिनिटात पैसे मिळतात तिथे मला खाते उघडायचे आहे. इतक्यात डिटेल्स मिळाले तर उद्या उघडता येईल. जनता बँकेबद्दल कुणीतरी सांगितलेलं होतं, पण आज त्या बँकेत पण म्हा मिनिटात मिळत नाहीत असं कळालं.

( काल रात्री हाच प्रश्न विचारला होता तेव्हां गुरगांव चं उत्तर दिलेलं होतं. ते ही सॅलरी काउंटरचं. मला पुण्यातून गुडगाव, गुरगाव की गुडगावाला स्कूटीवर जाता येईल का ?)

मला नाहीच ना पैशाची फिकीर. लेकिन दुनिया बडी जालीम है अनिलभाईसाब. केवल हरीनाम से काम नही चलता, दाम मांगती है हर एक चीज का...

सिम्बा.. देशद्रोह कसला त्यात ?

प्लानिंग चुकले हे खरे नाही का ? आणि हा त्रास सोसणारे कितीजण काळा पैसा असणारे आहेत ? आज उद्धव ठाकरे पण एकदम मवाळ भाषा बोलत होते ( शरद पवार काही बोलल्याचे वाचलेच नाही मी कुठे ? ) काही वेगळी व्यवस्था झालीय का ?

हवाईदलाची विमानेच वापरायची होती तर ती पहिल्याच दिवशी वापरता आली असती. हवाई दलाच्या विमानाची उड्डाणे
गोपनीयच असतात कि. पोलिसांनाच कामाला लावायचे होते ( रांगा नियोजनांच्या ) तर पोलिस स्टेशनवरही नोटा
बदलून द्यायची सोय करायला हवी होती..

हे पहा चिनुक्स,

तुमचे विचार राष्ट्रद्रोही आहेत हे स्पष्टच दिसतंय.

ताबडतोब अ‍ॅडमिन यांचे कडे सवतःची आयडी क्यान्सल करण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन करा पाहू.
ते सन्माननीय देशभक्त साम्गताहेत, ते नेहेमी खरे असते. चला चट्कन.

www.maayboli.com/user/3/guestbook

या लिंकेवर जा व स्वतःच्या आयडिची आत्महत्या करा.

मग काळ्या पैश्याविरोधातील निर्णयात काळे पैसेवाले का रस्त्यावर उतरत नाहीत? >>> उतरले की राव आणि तातडीने राष्ट्रपतींना दम पण देऊन आले.

वरचे ताजे प्रतिसाद वाचुन त्या वाॅट्सॲपच्या जोकची (झी न्युज, आज तक, एन्डिटिवी) सत्यता पटली...
>>>
हे मात्र खरे.

लॉजिस्टिक गंडलेले दिसत आहे. बाकी ज्यांच्या ज्यांच्याशी बोलतोय भारतातल्या त्यातल्या प्रत्येकाची प्रतिक्रिया ही राजकीय पार्श्वभुमीनुसार येत आहे. भारताचे फॉक्सिफिकेशन पूर्णपणे झाले आहे असे समजावयास आता हरकत नाही.

ओळखीतले/नात्यातले सगळे भगवे समर्थक खुष आहेत. यात रिटेल धंदावाले जास्त आहेत (दुकान, डाक्टर, एजंट टाइप्स). धंदा डाउन आहे, दुकानात द्यायला कॅश नाहिये. पण खुष.
जे भगवे नाहीत ते नोकरी करत असले तरी असंतुष्ट आहेत.

श्री. उपेंद्र टन्नू यांच्या फेसबुक पोस्टवरून...
यात आमच्या सारख्या लहान शहरात /जिल्ह्यात रहाणार्‍यांचे हाल लिहिलेयत.

दै.प्रजापत्र
संपादकीय
लोकप्रतिनिधी गप्प, सरकार खोट्या आश्‍वासनात मग्न, सामान्यांच जगणं अवघड झालयं सहन करायचं तरी किती?

नरेंद्र मोदींनी हजार आणि पाचशेच्या नोटा बंदीचा निर्णय घेवून आज आठ दिवस झालेत. ऐतिहासिक निर्णय, काळ्या पैशाविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक, देशाला एका वेगळ्या वाटेवर घेऊन जाणारा निर्णय, तमाम काळ्या पैश्यावाल्यांचे धाबे दणाणतील अशीगोष्ट अशा वेगवेगळ्या विश्‍लेषनांनी मोदी भक्तांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. सोशल मिडीयांच्या भिंतींवर मोदी भक्तांचा या निर्णयाचं समर्थन करणारा अक्षरक्ष: उन्माद पहायला मिळतोय. एखाद्या निर्णयाबद्दल आनंद वाटणे समजू शकते मात्र या निर्णयाला उन्मादाचे स्वरुप आले आहे. उन्माद यासाठी की, तमाम ‘नमो’रुग्णांनी या निर्णयाला थेट राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र प्रेमाशी जोडून टाकले आहे. मोदींनी काहीही केले की हे नमो रुग्ण त्याला थेट राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक बनवतात. मग सर्जिकल स्ट्राईक बद्दल प्रश्‍न विचारणारा देशद्रोही ठरवला जातो. नोटा बंदीच्या निर्णयाविरोधात कोणी बोलायला लागलं तर त्याला भ्रष्टाचारी किंवा काळ्या पैशांचा समर्थक ठरवलं जातं. समाज माध्यमांच्या तमाम भिंतींवर सध्याही ऑनलाईन झुंडशाही पहायला मिळत आहे. रात्रंदिवस नमो पुराणात गुंतलेल्या आणि वास्तवापासून दूर सोशलमिडीच्या आभाशी जगात जगणार्‍या या नमो रुग्णांचा जमिनीवर काय चालले आहे याच्याशी काहीच संबंध नसतो. आज आठ दिवसांपासून व्यवहार ठप्प आहेत. बँकांच्या बाहेर लांबच्या लांब रांगा आहेत. दिवस दिवस रांगेत उभा राहून पैसेच मिळत नसल्याने लोक अक्षरश: रडत आहेत. बीड सारख्या जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या 82, ग्रामिण बँकेच्या 51, जिल्हा बँकेच्या 59, खाजगी बँकांच्या 8 अशा दोनशे शाखा आहेत. नागरी बँकांच्या आणखी शंभर शाखांची भर यात घातली तर त्या तिनशे शाखा होतील. यातील सुमारे दोनशे शाखा तालुक्याच्या ठिकाणच्या अकरा गावांमध्ये आहेत. आणि जिल्ह्यातील उरलेल्या 1331 गावांसाठी केवळ शंभर शाखा आहेत. मग ज्या सामान्य माणसांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे नरेंद्र मोदी आणि तमाम नमो रुग्ण सांगत आहेत. त्या 1331 खेड्यांमधील शेतकर्‍यांने नोटा बदलण्यासाठी जायचे कुठे? प्रसार माध्यमांमध्ये सांगायला आणि समाज माध्यमांमधून भिंती रंगवायला टपाल कार्यालय आणि बँकींग एजंटकडे नोटा बदलता येतील असे सांगीतले जात आहे. प्रत्यक्षातले वास्तव वेगळेच आहे. बहुतांश: एटीएम दोनचार तासातच बंद पडत आहेत. बँकांमध्ये दररोज प्रोग्राम बदलावा लागत आहे. बीड सारख्या जिल्ह्यात स्टेट बँक ऑफ हैद्राबादने नागरी बँकांना 4 दिवसांपूर्वी रोकड दिली होती. त्यानंतर स्टेट बँकेतून पैसेच मिळायला तयार नाहीत. त्यामुळे मिळालेले पैसे वाटायचे कसे हा प्रश्‍न बँकांसमोर आहे. ग्राहक बँक व्यवस्थापनासमोर धाय मोकलून रडत आहे. भाजीपाला खरेदी करायचा तर पैसा नाही. पन्नास पन्नास हजार रुपये पगार असणार्‍याच्या खिशातही शंभर रुपयाची नोट नाही. आणि दोन हजार रुपयाची नोट असेल तर तीनशे रुपये बील झाल्यानंतर दुकानदार उरलेले पैसे परत देऊ शकत नाही. त्यामुळे ती नोट मोडता येत नाही. अशी विचीत्र परिस्थिती आहे. अगदी सामान्य शेतकरी, शेतमजूर, हातावर पोट असणार्‍या व्यक्तीपासून ते सात पिढ्यांना पुरेल इतके कमाऊन ठेवलेल्या प्रत्येकालाच रोजचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्‍न पडला आहे. ऑनलाईन बँकींग, कार्ड पेमेंट या सार्‍या गप्पा महानगरांमध्ये ठिक असतात. पण पन्नास रुपयाचा भाजीपाला भाजीमंडईतून घ्यायचा तर तिथे कोणते डेबीट कार्ड किंवा क्रेडीट कार्ड चालणार आहे याचे उत्तर एकदा या निर्णयाच्या उन्मादात बहकलेल्या नमो भक्तांनी द्यायलाच हवे. या निर्णयाबद्दल सर्वांगीण चर्चा अजूनही होऊ शकते. मोदींनी हा निर्णय घेणे गरजेचेच होते का? या बद्दल वेगवेगळे प्रवाद असू शकतील. अशा स्वरुपाचे निर्णय अधून मधून घ्यावे लागतात. या पूर्वीच्या सरकारांनीही ते घेतलेले आहेत. परंतू कुठलीही पूर्व तयारी न करता हा निर्णय घेण्यात आल्याने सामान्यांना जगणे अवघड झाले आहे. खाजगी रुग्णालयात डॉक्टर पैसाच स्वीकारायला तयार नाहीत. मेडिकलवरही तिच परिस्थिती आहे. आम्ही तुमची पाचशेची नोट घेतो. पण तुम्हाला सुट्टे देऊ कोठून हा सर्वांचा प्रश्‍न आहे. तालुक्याच्या ठिकाणी नोटा बदलायला यायचे तर बसमध्ये कंडक्टर बसू देत नाही. अशी विचीत्र परिस्थिती आहे. दिवस दिवस उभा राहून बँकेतून हजार रुपये मिळत नाहीत. आणि सामान्यांचे जगणे इतके अवघड झाले असतानाही मायबाप सरकार कर वसुलीसाठी सवलत देत वसुलीच्या मागे लागले आहेत. जर कर वसुलीसाठी सवलत देता येते तर सामान्यांचा छळ का मांडला आहे. याचे उत्तर मिळत नाही. विशेष म्हणजे देशभर जी उन्मादाची परिस्थिती आहे त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात कोणी बोलले की त्याला भ्रष्टाचारी ठरवून नमो रुग्ण मोकळे होत असल्याने पुढारीही या विषयावर उघडपणे बोलायला तयार नाहीत. नको ते विषय देश प्रेमाशी जोडून इतर सर्वांना देशद्रोही ठरवायला नमो रुग्णांची फौज ऑनलाईन सज्ज असल्यामुळे कोणालाच ही कोंडी फोडण्यासाठी बोलायचे नाही. त्यामुळे सामान्यांची बाजू घ्यायची तरी कोणी हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. या निर्णयाला कोणी विरोध करू लागला तर त्याला सिमेवरच्या सैनिकांचे किंवा आणखी कुठलेतरी उदाहरण दिले जाते. सिनेमाच्या रांगेत थांबताच ना असले सल्ले दिले जातात. पण सिनेमाच्या रांगेत कोणी उपाशी पोटी थांबत नसतो. याचे भान या नमो रुग्णांना नाही. सैनिकांच्या कामाबद्दल, ज्या बिकट परिस्थितीत ते सीमांचे रक्षण करत आहेत. त्याबद्दल आदरच आहे. पण त्याच सैनिकांच्या गावात असलेल्या कुटूंबांनाही आज जगणे आवघड झाले आहे. याचे भान नमो रुग्णांना आहे का. जो शेतकरी समाजासाठी पिकवतो, जो मजूर देशाची अर्थव्यवस्था घडविण्यात त्याच्या परिने जमेल तितके योगदान देत असतो. त्याच्यावर आज उपाशी मरण्याची वेळ आली आहे आणि पंतप्रधान मला पन्नास दिवस द्या पासून काळ्यापैशावाले माझे काहीही करू शकतात. इथपर्यंतची भावनिक आवाहनं करून मुळ प्रश्‍नापासून देशाला बाजूला ढकलत आहेत. सामान्य नागरीकांना कोणीच वाली राहिलेला नाही. हे सहन तरी किती दिवस करायचे हाच प्रश्‍न आहे.

आम्ही काही आठवडे त्रास सहन करु, वेळ पडल्यास उपासमार सहन करु, पण तुम्ही घेतलेल्या "कल्याणकारी" निर्णयाचे स्वागतच करु अशा अर्थाची पोस्टर्स हातात घेतलेली देशप्रेमी फौजेची फोटो मी बघितली आहेत.

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा आणि हाच उपाय होता असे मानणे भाबडेपणाचे ठरेल असे मला वाटते. जर काळ्या पैशा विरुद्ध लढा देण्याचा प्रखर निर्धार होता तर सर्वोच्च न्यायालयाला ६०० लोकान्ची यादी देताना किती खळ-खळ केली होती. का? मग सर्वोच्च न्यायालयानेच फटकारल्यावर फटाकारल्यावर रडत-खडत नावे दिलीत.

काही लोकांना अजिबात कसलाच त्रास सहन करायला लागला नाही हे अमान्य करण्यात कोणतीही अडचण नाही. माझे ८०% व्यवहार चेक/ कार्डाने होतात. बाकीच्या व्यवहारांपुरती नगद सुदैवाने आहे. (१००.५०.१० च्या नोटांमध्ये दोन तीन महिन्यातून एकदा पैसे काढून ठेवायची सवय आहे).

पण म्हणून दुसर्‍या कोणालाच त्रास होत नसेल असं मी गृहित धरायचं का?

-----
उदय , यांनी डायरेक्ट डोक्यातच खिळा ठोकलाय.

cash withdrawal साठी दिलेल्या वेगवेगळ्या सवलती पाहता (जसं लग्न असेल तर २.५ लाख ,शेतकर्‍यांसाठीची मर्यादा वाढवली, महाराष्ट्रात नाटकवाल्यांना जुन्या नोटा घ्यायची मुभा दिली, जुन्या नोटा सरकारी देयके भरण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत चालतील, इ.) लोकांची जराशी नाही तर भरपूर गैरसोय होतेय हे सरकारला पटलेले आहे. फक्त ते सांगायला आदर्णीय पंतप्रधान किंवा आदर्णीय अर्थमंत्र्यांऐवजी सनदी अधिकार्‍यांना पाठवलं जातंय.

Pages