"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Yuro, maany aahe. Mee pudhe lihile aahe na ki ase barech options nighatil. tyaatale je best asu shakatil te waparave.

Gondhal Udalay he many kele ki shantpane pudhache option shodhata yetil.

गैरसोय नाहीच, प्लानिंगमधे चुका नाहीच, सगळं काही आलबेल आहे
-- अशा प्रतिसादांनाच मी रिप्लाय देतेय. निर्णय कशासाठी यावरील वादाशी, निर्णयाशी, त्याच्या फळाशी, सध्यातरी माझे देणेघेणे नाही.
उद्या सरकार म्हणाले की बँकांमधे खूप पैसा जमा झालाय नी करापोटी सरकारला खूप पैसा मिळालाय तर माझ्या खात्यात १५ लाख किंवा १० रुपये जमा होणार आहेत. किंवा रस्ते बांधायला पैसे आहेत, टोल प्रकार रद्द, किंवा शिक्षण वा घरकर्ज ५% पेक्षा कमीने मिळायला लागले तर मला वाटेल की चांगला निर्णय होता. पण तरीही आत्ता गैरसोय होती याला मी कधीही नकार देणार नाही. पुढच्या वेळी जे पण सरकार हा निर्णय परत घेईल त्यांनी या अनुभवावरून शिका नी कमीतकमी गैरसोय होईल अशी तयारी करा असेच मी सांगेन.

इथे लोक गैरसोय आहे हेच मान्य करत नाहीयेत. गैरसोय आहे म्हणणारे मात्र निर्णय बरोबर असण्याची शक्यता आहे, लवकरच कळेल असे म्हणतायत.

लोक परत परत रांगेत नोटा बदलायला येतआहेत त्यामुळे बाकीच्यांची गैरसोय होतेय हे मान्य केलं नसतं तर शाई लावण्याची प्रक्रिया आली असती का? सगळं आलबेल आहे तर कशाला शाई प्रकरण? निर्णय सांगा ८ तारखेला नी बसा गप्प. लोकांना काय, दोन्ही बाजूने बोलणारच ना!

बरं आता उपाय नाहीत दिला ते बरंच केलं. चहा घेता घेता ते काम झालं.
आता सकारात्मक उपाय देता येत असतील तर बघा.

>>> <<माबोवरचे नवीन लेखन बघितले की माबो कॉग्रेसचे / डाव्याविचाराचे मुखपत्र वाटत आहे.>>> सोला आणे सच , हल्ली तर जरा जास्तच झालयं .>> <<<< Lol हे कोण म्हणाले? सोळा आणे सच्च बोल्या....
त्यातिल कित्येकांना असे वाटते की माबोवर नमोविरोधी/नोटाविरोधी पोस्टींचा रतीब लावला की "देशातिल अराजक/असंतोष एस्टॅब्लिश" होईल... Lol आणि वंचित/तळागाळातले(?) वगैरेंचे ब्रेनवॉशिंग होऊन यांच्यामागे त्यांची रांग लागेल...... Proud बिच्चारे.... टारगेट कुठाय, अन हे निशाणा साधताहेत कुठे... Biggrin

बायदिवे, नोटा रद्द केल्याच्या निर्णयानंतर अचानक काश्मिरातला दंगा थांबला असे म्हणताहेत, कशामुळे थांबला? "दंगेखोरसेना देखिल पोटावरच उप्प्स, आय मीन हजारपाचशेच्या नोटांवरच चालते" हे सिद्ध होतय का? Wink

<<<< उद्या सरकार म्हणाले की बँकांमधे खूप पैसा जमा झालाय नी करापोटी सरकारला खूप पैसा मिळालाय तर माझ्या खात्यात १५ लाख किंवा १० रुपये जमा होणार आहेत. किंवा रस्ते बांधायला पैसे आहेत, टोल प्रकार रद्द, किंवा शिक्षण वा घरकर्ज ५% पेक्षा कमीने मिळायला लागले तर मला वाटेल की चांगला निर्णय होता. पण तरीही आत्ता गैरसोय होती याला मी कधीही नकार देणार नाही. पुढच्या वेळी जे पण सरकार हा निर्णय परत घेईल त्यांनी या अनुभवावरून शिका नी कमीतकमी गैरसोय होईल अशी तयारी करा असेच मी सांगेन. >>>>>>>

माझ्या खात्यात १५ लाख किंवा १० रुपये जमा होणार आहेत.

किस खुशी मे ?

मला वाटतं की सुरुवातीला ८ नोव.तारखेच्या रात्रीपासून नोटा लेगल टेंडर राहाणार नाहीत असे जाहीर केले आणि मग टप्प्याटप्प्याने त्या स्वीकारल्या जाणार्‍या ठिकाणांची व्याप्ति वाढवीत नेली. (असे खरेच आहे का, की सुरुवातीच्या डीमॉनेटाय्झेशनच्या घोषणेतच हे सर्व होते? तसे असेल तर प्रतिसाद बाद समजावा. ) म्हणजे वीज बिले, सरकारी करभरणा, सरकारी इस्पितळे, औषधाची दुकाने, खाजगी इस्पितळे(इथे जुन्या नोटा स्वीकारायची सक्ती आहे का? नक्की माहीत नाही.) पेट्रोल पंप्स, बेस्ट, रेल्वे. त्या ऐवजी सुरुवातीपासूनच सांगितले असते तर रोकड भरण्याच्या रांगा डिफ्युज़ झाल्या असत्या. पुन्हा सांगितलेली डेड्लाइनही वाढवीतच नेली आहे. तर आधीच ही वाढवलेली तारीख जाहीर केली असती तर कितीसा फरक पडला असता?
एकदा लीगल टेंडर नाही म्हटल्यावर कागदी चलनाची नक्की काय पत राहाते, जेणेकरून काही ठिकाणी त्याचे मूल्य विनिमयासाठी कायम राहाते? तसे ते सिलेक्टिव्ली कायम राहात असेल तर दूध, भाजीपाला, फळे, अंडी, किराणा यासाठीही मोकळीक ठेवता आली नसती का? कायदेशीर बाबी मला माहीत नाहीत. कुणीतरी इथे लिहा.
सद्य परिस्थिती : मुंबईत मार्केटांमधल्या उलाढाली जाणवण्याइतपत मंदावल्या आहेत. सफाळे, पालघर, जालना इथून भाजी घेऊन येणार्‍या बायका सध्या दिसत नाहीत. रस्त्यांवर गिर्‍हाइकांची गर्दी कमी झाली आहे. सर्वत्र मरगळ दिसते. बाजारात रोकड येताच याचा वचपा काढला जाईल असे वाटते. सुरुवातीचे तीन दिवस बाजारात आणलेल्या नाशिवंत मालाला गिर्‍हाइक नाही म्हणून तो सडला. आता असा माल बाजारात येतच नाहीय. तो कदाचित उगमाच्या ठिकाणीच सडतोय. रोकड स्थिती सुधारल्यावर भाव नक्कीच उसळी घेतील. कारण जे पैसे रांगा लावून खात्यात जमा केलेले आहेत, ते लगेचच काढले जातील. सध्याच विद्ड्रॉवलसाठी रांगा वाढत आहेत. पुरेशी रोकड मिळत नाहीय आणि शंभर रुपयांच्या नोटांची तीव्र टंचाई आहे.
खात्यात रोकड जमा करण्यासाठीच्या रांगा आधीच्या मानाने किंचित कमी होउ लागल्यात.
ता. क. : हे सर्व मुंबईतले वर्णन आहे.

>>> पुढच्या वेळी जे पण सरकार हा निर्णय परत घेईल त्यांनी या अनुभवावरून शिका नी कमीतकमी गैरसोय होईल अशी तयारी करा असेच मी सांगेन. <<<< हे कोण लिव्हलय? आँ?
पुढच्या वेळी असले निर्णय घ्यायला, परत अशीच परिस्थिति यायला आधी मोदी जाऊन कॉन्गी/लालबावटी सरकार यायला हवे ना? तरच परत परत काळा पैका जमा होईल ना? एनि चान्सेस ऑफ कॉन्गी/लालबावटे फॉर कमिन्ग बॅक इन सेन्ट्रल सत्ता???? Proud

१. दर गावात बँक,
२. देशातल्या प्रत्येक माणसाकडे ईलेक्ट्रोनीक चीप असलेले आधार कार्ड,( ज्यात त्या माणसाच्या प्रत्येक बँक
अकाँऊट , पासपोर्ट वैगेरेची माहीती असेल)
३. देशातल्या प्रत्येक माणसाकडे बँक अकाँऊट
४. त्या बँक अकाँऊट ला निगडीत रुपये कार्ड (प्लॅस्टीक )
५. देशात प्रत्येक भागात वाय फाय कनेक्टीव्हीटी

फक्त ईतक सगळ केल्यावरच ५०० व १००० च्या नोटा रद्द करायला पाहीजे होत्या.

खरं तर निर्णय नक्कीच चांगला आहे पन अंमलबजावणी तेवढ्या योग्य प्रकारे करता येत नाहीये, आपला देश एवढा मोठा आणि इन्फ्रास्ट्रक्चर कुठे एवढं भारी आहे..
हायकोर्ट आणि लोअर कोर्टात नोटबंदी विरोधी याचिका दाखल झाल्या आहेत, त्यांच्यावर स्थगिती आणता येणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय!!! हे चांगलं चिन्ह नाही...मोदी द्वेषी आता एकवटत आहेत असं काहीसं दिसतय. लढा झाला पाहिजे तर तो यासाठी की जे भरडले जतायेत त्यांना कशी मदत करता येईल.

माझा एक प्रश्न-कम-आशा आहे, जर नोटबंदी विरोधात याचिका दाखल होत आहेत, तर मग अशा पण याचिका कोणी करू शकतं का की ह्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, निर्णय मागे घेऊ नका?

हे सर्व कधी होईल ?

मोदी सरकार आता २०१९ पर्यंतच असेल
मग काँग्रेस सत्तेत आल्यावर एका वर्षभरात हे सर्व उरकुन टाकेल

>>>> मग काँग्रेस सत्तेत आल्यावर एका वर्षभरात हे सर्व उरकुन टाकेल <<< Lol
अहो २०१९ पर्यंतची वाट बघायचीही तयारी नाहीये...... आत्ताच खेचा खाली मागणी लावलीये.... Wink त्याकरताच तर इतकी पेटवापेटवी आहे ना... बाकी कुणाच्या हातात कोलित मिळाल्यावर कोण काय करणार हे वेगळे सांगायला ब्रह्मदेव नकोय...., नै का? असो.

आमच्याइकडे वेगळाच परिणाम दिसतोय....
बाप घरात नोटांच्या थप्प्या आणुन टाकत असलेल्या "लक्ष्मिधरांचे" सुपुत्र , त्याच्या माजोरी पद्धतीने गाड्या उडविणे, ठिकठिकाणच्या बाजारपेठात पाचशे हजार रुपये नुस्ते कॉफीवर उडविणे, बार मधे बसुन "दौलत जादा" करण्यास शेपाच्शेच्या नोटा शब्दशः हवेत उडवित त्या "स्त्रीच्या अंगावर टाकणे", चारचाकी गाड्या बेफाम वेगात चालविणे, सिग्नल /झेब्रा क्रॉसिंग न पाळणे, कुणी हटकल्यास उद्दाम वर्तणूक करुन हाणामारीवर उतरणे, वगैरे बाबि दिसेनाशा झाल्यात.
इतकेच काय, कॉन्वेण्ट स्कुलच्या बाहेर एरवी दिसणारी पोरांना शाळेला सोडायला येणार्‍या चारचाक्यांची गर्दीही कमी झालीये.....!
सगळे कसे, एक समान, एका लायकीने भूतलावर वावरताहेत... आक्षी समानतेचे "लाल स्वप्न" नमोंनी एका झटक्यात प्रत्यक्षात आणलय... Biggrin

chaar chaki ka kami jhalya bar?
ajun petrol pampawar 500 chya junya notes chalatat na?

साती, माझी मुंबई ही फेस-बुक आणि वॉट्स अ‍ॅप सारख्या वर्चुअल जगात वावरणारी नाही. ती खर्‍याखुर्‍या, वास्तव जगातली आहे. त्यामुळेच ती इथे दिसत नाही! (इथे स्मितली कल्पावी.)

आज माझ्या कामासाठी सुमारे पन्नास किलोमीटर ड्राईव्ह केले. हे नेहमीपेक्षा बरेच कमी आहे, पण येथे एक पोस्ट टाकायला पुरेसे वाटत आहे.

सर्व एटीएम्स बंद होती. बँकांमध्ये जाणवेल इतपत गर्दी होती पण तुफान चेंगराचेंगरी किंवा रांगाच्या रांगा नव्हत्या.

एकजात सर्व दुकाने व्यवस्थित सुरू होती. गिर्‍हाईके माल घेत होती. ह्यात एकुणएक प्रकारची दुकाने होती. रस्ते गर्दीने भरलेले होते. कुठेही निषेधाच्या पाट्या, व्यथित चेहरे नव्हते.

झालेल्या प्रकारामुळे काहीही त्रास होत नसून सगळे व्यवस्थित आहे असे तीन, चार जणांचे म्हणणे 'आजच्या तारखेला' ऐकले.

जेथे फिरलो तो भाग पुणे शहराच्या तुलनेत तसा मागास म्हणावा लागेल. पिरंगुट, पौड, मुळशी, पवना वगैरे!

जनतेला निर्णय आवडलेल आहे. त्रास सोसण्याची जनतेची तयारी आहे. निर्णयाची अंमलबजावणी पूअर आहे. ह्या तीन गोष्टी अधोरेखित झाल्या.

आता जमिनी व सोन्यावर कुर्‍हाड येणार आहे.

जय हिंद!

सर्व एटीएम्स बंद होती. बँकांमध्ये जाणवेल इतपत गर्दी होती पण तुफान चेंगराचेंगरी किंवा रांगाच्या रांगा नव्हत्या.

चेंगराचेंगरी क्लोज्ड कंपार्टमेंंटात होते.

रस्त्यावर मारोतीच्या शेप्टागत रांग लावल्यास चेंगराचेंगरी होते का?

बेसिक्स फारच कच्चे आहेत.

माझी स्वत:ची गैरसोय अजून झालेली नाही, मी राहाते त्या भागात असलेल्या बँकांमधे आता चेंगराचेंगरी करणार्‍या रांगा नाहीत, एटीएम बर्‍यापैकी सुरू आहेत. आमच्या कामवाल्या बायकांना कुणालाही पैसे बदलून घ्यायला तकतक पडली नाही. तासाभरात काम झालं. आज मला एका येणं असलेल्या व्यवहारात्ल्या रकमे पैकी चारहजार शंभरच्या नोटांत हातात पडलेत. त्यामुळे तर मी अगदीच निवांत झालेय. पण आज बँकेतून पैसे काढण्याविषयी जाऊन चौकशी केली तेव्हा चेकनेही सहा हजार फारतर मिळतील असं सांगितलं. कारण कॅश पुरेशी नाही..
पण याही पलिकडे मोठ्ठं शहर आहे, आणि बर्‍याच ठिकाणी लोकांना गैरसोय सहन करावी लागते आहे हे खरंच आहे. पुरेशी रोकड उपलब्ध नाही हीच आणि हीच मूळ तक्रार आहे. त्यात देशभक्तीविरोधी काय आहे (सोशल मीडियावर फिरणार्‍या पोस्ट्स, इ) हे मला कळलेलं नाही अजून. अल्पना म्हणली तसं आणि मीही आधी लिहिलंय तसं - या निर्णयाबद्दल गुणावगुण चर्चा करण्याची अर्थशास्त्रीय अक्कल मला नाही पण निदान राबवताना हा केऑस होणार याचा अंदाज सरकारला यायला काहीच हरकत नव्हती. कलकत्त्यात तर आता आरबीआय ने खराब झालेल्या शंभरच्या नोटा परत वापरा असं बँकांना सांगितलं आहे..

रच्याकने, कलकत्त्यात कुठले रिक्षावाले पेटीएम स्वीकारतायत म्हणे? आमच्याकडे दिसले नाहीत ते... एवढ्या मोठ्ठ्या महानगरातले एक टक्का रिक्षावालेसुद्धा पेटीएम वर नसतील. दुकानदार नाहीयेत. तर ते कुठून येणार बिचारे..
इथे वरच्या कुठल्यातरी पोस्ट मधे वाचलं म्हणून लिहितेय..

अशी पोस्ट टाकण्यापेक्षा त्यांना शिकवा की पेटीएम कसे वापरायचे ते. एकाला शिकवले तर सगळे शिकतील

>>>>रच्याकने, कलकत्त्यात कुठले रिक्षावाले पेटीएम स्वीकारतायत म्हणे? <<<<

काल टीव्हीवर दाखवले. चॅनलची चूक झाली असेल.

जमिन, फ्लॅटस, दुकाने हायवेच्या जवळच्या जमिनींची चौकशी सुरु झालेली आहे !!

Pages