दोन दिवस झाले मनात एक रुखरुख लागुन राहिली आहे, कुठे बोला म्हणून सर्वांनाच सांगते.
परवा मी आणि माझा नवरा खाली पार्किंग लॉटमधे थांबलो होतो, आमच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या काकांच्या मुलाने स्विफ्ट डिझायर कार घेतली. त्याला गाडी चालवण्याचा सराव जास्त नसल्याने दोन तीन ठिकाणी कार घासली होती. तर ते त्या बद्दल सांगत होते आणि तक्रार करत होते. (वय 60 दोन्ही काकांचे)
आता मुलांना काही बोलायचे नाही, बिलकुल ऐकत नाहीत पार्क करताना काळजी घेत नाही वै. वै.
यातच त्यांचे एक शेजारी पण सुरु झाले.
आता आम्ही पण काही बोललो तर ऐकत नाहीत. मुले तर ऐकत नाहीतच पण सुना जास्तच..
आता इथे काहीही कारण नसताना सुनेचा उल्लेख मला खटकला.
मी त्यांना विचारले, नक्की त्रास कोणाचा होतो? मुलाचा कि सुनेचा?
मी म्हणाले, शेवटी आपल्या मुलांना आपण पाठीशी घालतो आणि सून
बाहेरची म्हणून नावं ठेवतो.
जरा कुरबुर झाली माझी, पण आता उगाच बोलल्यासारखे वाटत आहे.
पण खुप घरात मी बघते आहे की सुनेला जाणूनबुजून वेगळे काढल्यासारखे वागतात. किती अपेक्षा, किती कुरकर तिच्याबद्दल...
हा चुकुन दोनदा झाला आहे
हा चुकुन दोनदा झाला आहे
चुकीच्या वेळी धागा काढलात ,
चुकीच्या वेळी धागा काढलात , लोकं नोटेतं गुंतलीयतं नाही तर १०० चं पोटेंशियल नक्की आहे धाग्यात

नाही तर १०० चं पोटेंशियल
नाही तर १०० चं पोटेंशियल नक्की आहे धाग्यात >>> ईथे पण पाचशेवर बंदी का
हा चुकुन दोनदा झाला आहे >>> काही हरकत नाही, तो फक्त ग्रूप सभासदांसाठी झाला आहे. आणि मी तिथेही प्रतिसाद देऊन आलोय. माझ्यासाठी हा जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. मी वयात आलोय आणि लवकरच आमच्याही घरात माझ्या गर्लफ्रेंडच्या रूपाने सून येणार आहे. ती आमच्या घरात कशी वावरेल, कशी रुळेल याबाबत खूप एक्सायटमेंट आहे. त्यामुळे अश्या सासूसुनेच्या गंमती या धाग्यावर वाचायला मला आवडतील
त्यामुळे अश्या सासूसुनेच्या
त्यामुळे अश्या सासूसुनेच्या गंमती या धाग्यावर वाचायला मला आवडतील ---
सासु सुन गंमतीचा धागा नव्हे हा. सासरची प्रत्येक व्यक्ती कशी सुनेला परकीच समजते आणी वागवते, त्याबद्द्ल आहे हे. आमच्या सासरी मी अजुनही परकीच आहे (धा वर्षे झाली तरी)- नॉनसेन्स! (हे सिंघम मुव्हीमध्ये कमिशनर अजय देवगणला संबोधतो तसे वाचावे. राग आला सासरच्यांचा की मी हाच शब्द, याच टोनमध्ये बोलते.)
धाग्यावर निगेटीव्हीटीच शेअर
धाग्यावर निगेटीव्हीटीच शेअर केली पाहिजे असे गरजेचे आहे का? असतील काही सासूसुनांची धमाल नाती तर त्यांनी शेअर करायला काय हरकत आहे. राहिला प्रश्न परकेपणाचा तर आज तुम्ही सून आहात पण उद्या सासू बनाल. आज तुम्ही जे आपल्या सासूकडून अपेक्षा करत आहात तसे सुनेशी वागा. बघा मग किती धमाल येईल. जी धमाल सून म्हणून मिस केलीत ती सासू म्हणून कराल. क्योकी सास भी कभी बहू थी, क्योंकी कैकयी भी कभी सीता थी, लोकांनी आपल्याशी काय कसे वागायचे हे त्यांच्यावर सोडा पण आपण कोणाशी काय कसे वागायचे हे आपल्याच हातात असते ना
अरे हा काय सासु सासु कर्तोय?
अरे हा काय सासु सासु कर्तोय? परत एकदा:
सासु सुन गंमतीचा धागा नव्हे हा. सासरची प्रत्येक व्यक्ती कशी सुनेला परकीच समजते आणी वागवते, त्याबद्द्ल आहे हे.
बहुतांश सूना या नवरा व मुलं
बहुतांश सूना या नवरा व मुलं सोडली तर सासू सासरे कधि खपतात याचीच वाट बघत असतात.त्यात आता मोबाईल फोनमुळे या सूना स्वतःच्या आईला विचारुन सासरचे निर्णय घेतात.हे थांबले पाहीजे तर बोलायचा हक्क आहे.
राया, तुम्ही आणि धागाकर्ती
राया, तुम्ही आणि धागाकर्ती स्त्री आहात म्हणून हे नाते घेतले ईतकेच.
बाकी ते नणंद की काय नाते असते ते एका घरात तसेही नांदत नाही.
असो, पण सासरची प्रत्येक व्यक्ती आपल्याला परकीच समजते हे ठरवूनच ईथे पोस्टी लिहायचा हट्ट का हे समजले नाही. चर्चा दोन्ही बाजूने का होऊ शकत नाही?
I agree with raya. But then
I agree with raya. But then the boy king has to have the last word everywhere.
नाहीतर काय! अर्ध्या हळकुंडात
नाहीतर काय! अर्ध्या हळकुंडात पिवळा.
राया, तुम्ही आणि धागाकर्ती
राया, तुम्ही आणि धागाकर्ती स्त्री आहात म्हणून हे नाते घेतले ईतकेच.--
कधी कधी सासु, नणंदा जवळिकीने वागवितात. माझ्या बाबतीत म्हणायचे तर सासरेच परक्यासारखे वागवतात. मी कॉलेजला छोटे (त्यांच्यामते)( कपडे घालुन जायची, तो राग अजुन आहे म्हणे. मी गाडी चालवते, एकटी प्रवास करते, मला घरात चप्पल घालुन फिरायची सवय आहे (फक्त घरातच वापरते मी ती चप्पल) तर काय तर म्हणे, नसती नाटके. स्वतंत्र मताची, स्वतःच्या पायावर उभी असलेली सुन कधी अशा विक्षिप्त, असुरक्षित लोकांना जवळ्ची वाटुनच घ्यायची नसते. तरी आम्ही अजुनही एकदाही मोठ्या मोठ्याने भांडलो नाही आहोत. सासु निदान बोलुन टाकते आणी मलाही बोलु देते. किती तरी फॅमिली सिक्रेट्स ह्यांची पण सुनेला काहि सांगत नाहीत. मग इथुन्तिथुन कळतात. वेळ आली की मदत तर मीच करते. नवर्यापेक्षा जास्तं
अमा, खरं तर ईथे सहमत असहमत
अमा, खरं तर ईथे सहमत असहमत होण्याचा प्रश्न उदभवत नाही.
कारण ईथे सासरच्या लोकांचे असे वागणे चूक की बरोबर यावर कोणी मत मांडत नाहीये. जे वाईट वागणे आहे ते चूकच आणि जे चांगले वागणे आहे ते चांगलेच म्हणावे.
राया, आपले स्वानुभव ऐकून वाईट वाटले. जो जसे अनुभव घेतो तसे तो जगाबद्दल मत बनवतो हेच खरे. आमच्या घरात, ओळखीच्या पाळखीच्यांत चांगल्या अनुभवांचा टक्का जास्त आहे ईतकेच. पण म्हणून वाईट अनुभव कोणी नाकारत नाहीये.
या सासुरवास केसमध्ये पूर्वीच्या काळापेक्षा आता स्थिती बदलली आहे वगैरे नियम लागू होत नाही, कारण नेहमीच सासू सासर्यांची पिढी आणि आपली पिढी यात एक जनरेशन गॅप राहणारच. किंबहुना आता या जनरेशन गॅपमधील अंतर खूप झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात खरे तर हे नाते आणखी कॉम्प्लीकेटेड होत जाणार.
माझ्यामते यावर विभक्त कुटुंब पद्धती हाच एक उपाय आहे. महिन्यातील एखादा वीकेंड आणि पारंपारीक सणवारांना एकत्र या एवढेच. फक्त जेव्हा त्यां वयोवृद्धांचे हातपाय साथ सोडतील तेव्हा त्यांना आधार द्या. बाकी ईथे नवरा-बायको एकमेकांना बोअर होतात, लोकं लिविंग रिलेशनशिपला एक पर्याय बघू लागलेत. ज्यांना हे जमत नाही पण मनातून इच्छा आहे असेही कैक आहेत, अश्यात एकमेकांचे कुटुंबकबिले सांभाळत राहणे आजच्या पिढीला गैरसोयीचे वाटू शकते.
ह्या केसेस सासुरवास या
ह्या केसेस सासुरवास या कॅटेगरीत येत नाहीत. 'मानसिकता' हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 'सुन आणि मानसिकता' हे एकत्र वाच आणि मग लिही. तुला तुझ्या बायको बरोबर वेगळे रहायचे असेल तर रहा ना बाबा. विषय काय आहे? वेगळे राहुन मानसिकतेत काही फरक पडत नाही.
हे २-३ जणचं १०० करतील वाटतयं
हे २-३ जणचं १०० करतील वाटतयं
हे २-३ जणचं १०० करतील वाटतयं
हे २-३ जणचं १०० करतील वाटतयं ---
नाही हो, मी चालले येथुन. हा विषय कुठल्याकुठे नेत होता असे वाटले म्हणुन थांबले इथे. बाय बाय.
ह्या केसेस सासुरवास या
ह्या केसेस सासुरवास या कॅटेगरीत येत नाहीत. 'मानसिकता' हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
>>>>
एक्झॅक्टली राया, हल्लीचा सासुरवास हा शारीरीक छळाचा नाही तर मानसिक छळाने जास्त ओळखला जातो. स्त्री शिकली, प्रगती झाली, स्वताच्या पायावर उभी राहिली, मग तिचा शारीरीक छळ करणे आता शक्य नाही. मग करा मानसिक छळ.
पण हा एक झाला ठरवून केलेला मानसिक छळ.
मी वर उल्लेखला आहे तो जनरेशन गॅपमधून झालेला मानसिक कोंडमारा !
पहिल्या केसमध्ये लागलीच पडत्या फळाची आज्ञा घेत वेगळा संसार थाटायचा.
दुसर्या केसमध्ये ईतका उशीर होऊ द्यायचा नाही की अकारण संबंध बिघडले जातील.
जर तुम्ही वेगळेच राहाल तर ना रहेगी सास ना होगा सासुरवास
यॅनीवेज, मी सुद्धा आता जातोय. डीअर झिंगदी मदील लव्ह यू झिंगदी स्वॉन्ग रिपीट मोडवर दहाबारा वेळा ऐकत थांबलेलो. अगदी ही पोस्ट लिहिताना देखील कानात तेच वाजत होते म्हणून ईतकी सुमधुर पोस्ट लिहिली गेली. आणि हाच सांगायचा मुद्दा आहे की तुमचा स्वभाव चांगला वाईट ही एक गोष्ट झाली पण तुमच्या आसपासचे वातावरण कसे अहे यावरून तुम्ही रिअॅक्ट कसे करतात हे ठरते. म्हणून भांड्याला भांडे वाजणार नाही हेच बघितले तर.. वेगळी मानसिकता राखणारे असे काही एलियन नसतात, आपल्यातलेच असतात
कोनि किति बोलले तरि सासु ति
कोनि किति बोलले तरि सासु ति सासु अनि सुन ति सुन.
sorry for grammatical mistakes.
सासु ति सासु अनि सुन ति सुन.
सासु ति सासु अनि सुन ति सुन. >>>>> +१
आई ती आईच ,,सासु ती सासुच
सासरे ते सासरेच्,,आनि आपले बाबा ते बाबाच...
तात्पर्य कोनीच कोणाची जागा घेऊ शकत नाही.
अवास्तव अपेक्षा टाळल्या एकमेकांकडुन ,,की जगण बर्यापैकी सोप होत.
डबल प्रतिसाद
डबल प्रतिसाद
ओ सासू आन सून मैत्रिणी
ओ सासू आन सून मैत्रिणी मैत्रीणी असल्याचे माबोवर आहे का?
मला एक जुना अनुभव आठवला.
मला एक जुना अनुभव आठवला. आम्ही चुलत सासरी दिवाळीला गेलो होतो व परत निघताना सर्वांना नमस्कार करून निघत होतो. तर मोठ्या नणंदेने फराळाची पिशवी हातात ठेवली व म्हणे हे तुला व तुझ्या मुली ला. दादा काय आमचा आहे. !!!!" त्या नंतर मी कधीच त्यांच्याकडे आपुलकीने गेले नाही. हे आपल्याला बाहेरची च समजतात तर मग तसेच राहावे. आत तर प्रश्नच येत नाही.
वाइट असे वाट्ते की नवरे लोक पण काही बाजू घेत नाहीत. बायको एकटी पडते आहे तर....
धिस इज नॉट डन. काल फोन वरून वाचले त्यामुळे लिहीता आले नाही.
पण सून बाहेरची ही मानसिकता आहे नक्की. ती आपल्या मुलाची लाइफ पार्टनर आहे. व तिला तिच्या मतासकट रिस्पेक्ट द्यावा असे नसतेच. होतच नाही.
श्री
ऋन्मेष-तुमचे म्हणणे बरोबर आहे
ऋन्मेष-तुमचे म्हणणे बरोबर आहे की सतत नकारात्मक विचार करण्यात अर्थ नाही पण जिथे कायम परकेपणाने वागवतात तिथे अपेक्षा करताना का मागे पुढे बघत नाहीत.
बहुतेक आईवडील बराच खर्च करून मुलीचे लग्न करून देतात, आणि अपेक्षा करतात की आता तरी मुलीला सांभाळतील, तिचे मन ही जपतील.
तीने कमावले पाहिजे, घरची कामे, सणवार, नातीगोती, मोठ्यांचा आदर हे केलच पाहिजे. शिवाय नवर्याची ऊठबस.. बर्याचदा सुन हे सगळे करतच असते पण तिचे कौतुक मात्र होताना दिसत नाही.
मला असे वाटते की दुसर्याच्या मुलाला आपलेसे करायचे असेल तर आपल्या पोरापेक्षा जास्त प्रेम करावे लागेल.
जमत नसेल तर किमान नावं तर ठेऊ नका..
विभक्त कुटुंबातही हा त्रास
विभक्त कुटुंबातही हा त्रास होतोच, ऊठताबसता जाणवत नाही इतकेच.
अमा हे खूप वेळा माझ्या बाबतीत
अमा हे खूप वेळा माझ्या बाबतीत हि घडले आहे
लग्नाला specific time होऊन सुद्धा तुमच्या कडे असे आणि आमच्या कडे असे खूप वेळा बोलले जायचे. कंटाळून शेवटी
लग्न होऊन सुद्धा मी तुमच्या कडे नाही का असे मी स्पष्टच विचारले.
पुन्हा तसे नाही घडले पण हि खूपच आगाऊ आहे असे भाव त्याच्या तोंडावरून दिसले.
राहिला प्रश्न परकेपणाचा तर आज
राहिला प्रश्न परकेपणाचा तर आज तुम्ही सून आहात पण उद्या सासू बनाल. आज तुम्ही जे आपल्या सासूकडून अपेक्षा करत आहात तसे सुनेशी वागा. >>> मित्रा , तुला काठावर उभं राहून बोल्लयला सोपं आहे रे .ना तु सासु होणारेस ना सुन .
.
प्रत्येक मुद्द्यावर बोलायला खूप आहे , पण संध्याकाळी आरामात लिहिन . आता ऑफिसमध्ये कामाचा डोंगर .
आज तुम्ही सून आहात पण उद्या
आज तुम्ही सून आहात पण उद्या सासू बनाल. आज तुम्ही जे आपल्या सासूकडून अपेक्षा करत आहात तसे सुनेशी वागा >>> ह्या वाक्यासाठी शंभर टाळ्या .

सगळ्या सासवा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेत असाव्यात
मग आजच्या सुनांनी उद्या सासवा झाल्यावर बदला घेतला तर बिघडलं कुठे ?
श्री हे लुप मधेच चालु राहिल
श्री
हे लुप मधेच चालु राहिल मग... कुठेतरी ब्रेक हवा ना.
ह्या लेखावरुन मला बेफिचा एक
ह्या लेखावरुन मला बेफिचा एक लेख आठवला सुनेवरचा.ऋन्मेऽऽष तु तो एकदा वाचायला हवा.
सासु सासर्यांबरोबर एकत्र
सासु सासर्यांबरोबर एकत्र रहाणे सुनांनी आधी बंद केले पाहिजे.
एकत्र रहाणे हाच आधी सुनेवरचा अन्याय आहे. कमीत कमी स्वताच्या पायावर उभ्या असलेल्या मुलींनी तरी एकत्र कुटुंब नाकारले पाहिजे. एक वेळ लग्न नाही केले तरी चालेल, पण असले दुसर्याच्या घरात जाऊन वर त्यांची बोलणी ऐकणे नको
आमच्या सासरी मी अजुनही परकीच
आमच्या सासरी मी अजुनही परकीच आहे (धा वर्षे झाली तरी) >> राया डिट्टो
अगदी कोणी वाइट वागत नाही (सिनेमामध्ये दाखवतात तसे) पण परकेपणानी वागवले की खूप दु:ख होते!! महत्वाच्या विषयांची चर्चा फक्त सासू, सासरे आणि नवरा ह्यांच्यामध्ये होते. मग नवर्याकडून ते कळणार!! म्हणजे सूनेचे मत मांडायला काही चान्सच नाही....आणि मांडायचे तर नवर्यासमोर. मग त्याला ते महत्वाचे वाटले आणि पटले तर तो तिकडे कळवणार
कमीत कमी स्वताच्या पायावर उभ्या असलेल्या मुलींनी तरी एकत्र कुटुंब नाकारले पाहिजे. एक वेळ लग्न नाही केले तरी चालेल, पण असले दुसर्याच्या घरात जाऊन वर त्यांची बोलणी ऐकणे नको >>>> +१
स्वधा ते सुन च्या ऐवजी सून करणार का??
Pages