सून आणि मानसिकता

Submitted by सुहृद on 15 November, 2016 - 06:44

दोन दिवस झाले मनात एक रुखरुख लागुन राहिली आहे, कुठे बोला म्हणून सर्वांनाच सांगते.

परवा मी आणि माझा नवरा खाली पार्किंग लॉटमधे थांबलो होतो, आमच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या काकांच्या मुलाने स्विफ्ट डिझायर कार घेतली. त्याला गाडी चालवण्याचा सराव जास्त नसल्याने दोन तीन ठिकाणी कार घासली होती. तर ते त्या बद्दल सांगत होते आणि तक्रार करत होते. (वय 60 दोन्ही काकांचे)

आता मुलांना काही बोलायचे नाही, बिलकुल ऐकत नाहीत पार्क करताना काळजी घेत नाही वै. वै.

यातच त्यांचे एक शेजारी पण सुरु झाले.

आता आम्ही पण काही बोललो तर ऐकत नाहीत. मुले तर ऐकत नाहीतच पण सुना जास्तच..

आता इथे काहीही कारण नसताना सुनेचा उल्लेख मला खटकला.
मी त्यांना विचारले, नक्की त्रास कोणाचा होतो? मुलाचा कि सुनेचा?

मी म्हणाले, शेवटी आपल्या मुलांना आपण पाठीशी घालतो आणि सून
बाहेरची म्हणून नावं ठेवतो.

जरा कुरबुर झाली माझी, पण आता उगाच बोलल्यासारखे वाटत आहे.

पण खुप घरात मी बघते आहे की सुनेला जाणूनबुजून वेगळे काढल्यासारखे वागतात. किती अपेक्षा, किती कुरकर तिच्याबद्दल...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साबा इतक्या चान्गल्या आहेत की मलाच त्याना आता आराम करा असे म्हणावेसे वाटते. मला वाटते की मला स्वतःला मुलाना असे आपल्या घरात नवीन व्यक्तीला स्विकारणे खूप अवघड जाईल. त्यामानाने त्या खूपच समजून घेतात. आधी वाटायचे की काही इशु असेल तर मुलालाच सान्गतात मला नाही, इ. पण आता काही वाटत नाही. मीही माझ्या घरी काही असेल तर आधी आईशी वेगळे बोलेन आणि मग नवर्याला सान्गेन, तसेच आहे. Happy छोट्या गोश्टिन्पेक्शा नाती महत्वाची असे वाटते.
अर्थात, महत्वाच्या बाब्तीत निर्णयस्वातन्त्र्य(नोकरी, मुले, इ.) , मानसिक- शारिरीक छळ, इ सर्व त्याला अपवाद असले पाहिजेत.

विद्या.

त्यातून ऋन्मेष चालू घडामोडींवर जास्ती धागे काढतो. >>> असं काही नाही हा. एकदा बस्स लग्न होऊ द्या माझे (माझ्याच गर्लफ्रेंडशी हं).. मग आमच्या घरची सून म्हणजे मायबोलीचीच सून असल्यासारखे कसले एकेक धागे विणतो बघा Happy

सध्या तरी माझी गर्लफ्रेंड माझ्या आईच्या स्वभावावर फार इम्प्रेस आहे. आणि माझ्या घरात माझी बायको बनून येण्यापेक्षा तिची सून बनून येण्यासाठी जास्त एक्सायटेड आहे. आणि मी मग माझी प्रेमळ आई सासू या भुमिकेत शिरल्यावर सूनेशी कशी वागते हे बघण्यास उत्सुक आहे Happy

मी काही समाजनियमाविरुद्ध जाऊन घरजावई होणार नाहीये. जर आम्ही वेगळे झालो नाही तर मी माझ्याच घरी माझ्याच आईच्या छत्रछायेखाली वावरत असणार. त्यामुळे कदाचित माझ्यावर कोणाचे प्रेम जास्त आहे हे दाखवायला दोन्ही बायका माझी छान काळजी घेत असतील. त्या केसमध्ये माझा माबो वावर अंमळ वाढलाच असेल Happy

(Marathi Typing Problem continues..) which browser to use to avoid that?..

Anyways

Remember the dialog in "Sholay"
"Nahi to aaj kal ki bahuyen,,Doli se utari nahi aur angan mein deewar khadi kar dee".
That was 41 years ago...

Considering that.. I will say daughters in law are much nicer now a days Wink

..

(Marathi Typing Problem continues..) which browser to use to avoid that?.. >> मोझिला फायरफॉक्स वापरून पहा.

ऋन्मेऽऽष ->मग तू माबो कर्तोस का हे बघण्यास मी उत्सुक आहे. :प <<< रुन्म्या तुला लग्न झाले की शंभर विषय मिळतील शतकी धागे काढायला ....
माझ्याच आईच्या छत्रछायेखाली वावरत असणार.<<< फसाद की जड यही है! सांभाळ रे बाबा Happy
सातीअक्का दुर्गा, जगदंबा भारी Happy

कदाचित माझ्यावर कोणाचे प्रेम जास्त आहे हे दाखवायला दोन्ही बायका माझी छान काळजी घेत असतील. >> खयाली पुलाव छान आहे.
पण तुझं भजं नाही केलनी दोघींनी तर नशीब समज.

सर्व सुनांनी एकजुटीने ह्या 'गैरसोयीच्या' काळातही धाग्याला शंभरी क्लबमध्ये नेऊन ठेवल्याबद्दल त्यांचं पेशल अभिनंदन. Proud

जर आम्ही वेगळे झालो नाही तर मी माझ्याच घरी माझ्याच आईच्या छत्रछायेखाली वावरत असणार. त्यामुळे कदाचित माझ्यावर कोणाचे प्रेम जास्त आहे हे दाखवायला दोन्ही बायका माझी छान काळजी घेत असतील. >>>> खट्याळ सासू , नाठाळ सून बघितला आहेस का रे ?? चपाती-भाजी सारखा , आम्लेट-शिरा खायची वेळ नको येउ दे .

आणि माझ्या घरात माझी बायको बनून येण्यापेक्षा तिची सून बनून येण्यासाठी जास्त एक्सायटेड आहे. >>>> पण , खरचं , ऐकुन खूप बर वाटलं .काही मुली बघितल्या आहेत अशा , सासूवर उदंड प्रेम करणार्या आणि सासवाही , सूनेला माया लावणार्या . दोघींबद्दल ही मला अतिव आदर आहे .

आमच्या सूनबाईंच स्वप्न पूर्ण व्हावं हीच गजाननाचरणी प्रार्थना !

सासू ही सासूच असते शेवटी Happy जर नवरा बायको चे नाते घट्ट असेल तर इतर कोणी नीट वागले न वागले तर खूप फरक पडत नाही आणि जास्त मनःस्तापपण होत नाही. बर्‍याच सासवा हल्ली सुनेशी पटवून घेतानापण दिसतात.

That was 41 years ago...
अजून ४१० वर्षे असेच चालू रहाणार आहे.
आजकालच्या मुलांना कसलीहि शिस्त नाही, वाट्टेल तसे वागतात- रात्री उशीरा पर्यंत बाहेर भटकणे, सिनेमे बघणे, वडीलधार्‍यांचे न ऐकणे हे असलेहि अजून ४१० वर्षे चालेल.

बाप आपल्या मुलावर ओरडतो पण जेंव्हा त्याला नातू होतो, नि मुलगा त्या नातवावर (स्वतःच्या मुलावर) कधी ओरडला की हाच बाप मुलावर पुनः ओरडतो - अरे ओरडतोस काय आपल्याच मुलावर?

संसार म्हणजे मज्जा, उग्गाच डोक्याला त्रास करून घेऊ नये - शेवटी घरचेच लोक!

आणि माझ्या घरात माझी बायको बनून येण्यापेक्षा तिची सून बनून येण्यासाठी जास्त एक्सायटेड आहे
>>
माझीही एक मैत्रिण अगदी हेच म्हणते. माझी सासू नसत्रतर नवर्‍याला कधीच सोडून गेले असते असं म्हणते... मस्करीत असेलही पण ऐकायला छान वाटतं.

सगळ्याच सासवा वाईट नसतात, सगळ्याच सुना चांगल्या नसतात
सगळ्याच सुना वाईट नसतात, सगळ्याच सासवा चांगल्या नसतात

एकंदरीत हे प्रत्येक माणसा माणसावर डेपेण्ड करतं.

माझी एक मैत्रिण सतत रडत असते की त्यांच्या घरात सगळ्यांचा पगार सासूच्या हातात देण्याची पद्धत आहे. कोणीही पैसे मागितले तरी सासू 'का हवेत' असं न विचारता देते.
मला आवडेल खरंतर हे असं... बिना जबाबदारीनं जगणं... पण तिला आवडत नाही... त्यावरून तिचं आणि तिच्या नवर्‍याचं सतत वाजतं.

याउलट तिच्या नवर्‍याचं म्हणणं आहे आमच्या घरात अनेक वर्षांपासून आईच्या हातात पैसे द्यायची पद्धत आहे. आत्ताही चालू ठेवली तर कुठे बिघडलं? आणखी काही वर्षांनी आईला जबाबदारी पेलवणार नाही तेंव्हा तुलाच सगळं करायचंय... तोपर्यंत एंजॉय!!!

सगळेच आपल्या आपल्या जागी बरोबर.... दृष्टीकोनाचा दोष!

Pages