सून आणि मानसिकता

Submitted by सुहृद on 15 November, 2016 - 06:44

दोन दिवस झाले मनात एक रुखरुख लागुन राहिली आहे, कुठे बोला म्हणून सर्वांनाच सांगते.

परवा मी आणि माझा नवरा खाली पार्किंग लॉटमधे थांबलो होतो, आमच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या काकांच्या मुलाने स्विफ्ट डिझायर कार घेतली. त्याला गाडी चालवण्याचा सराव जास्त नसल्याने दोन तीन ठिकाणी कार घासली होती. तर ते त्या बद्दल सांगत होते आणि तक्रार करत होते. (वय 60 दोन्ही काकांचे)

आता मुलांना काही बोलायचे नाही, बिलकुल ऐकत नाहीत पार्क करताना काळजी घेत नाही वै. वै.

यातच त्यांचे एक शेजारी पण सुरु झाले.

आता आम्ही पण काही बोललो तर ऐकत नाहीत. मुले तर ऐकत नाहीतच पण सुना जास्तच..

आता इथे काहीही कारण नसताना सुनेचा उल्लेख मला खटकला.
मी त्यांना विचारले, नक्की त्रास कोणाचा होतो? मुलाचा कि सुनेचा?

मी म्हणाले, शेवटी आपल्या मुलांना आपण पाठीशी घालतो आणि सून
बाहेरची म्हणून नावं ठेवतो.

जरा कुरबुर झाली माझी, पण आता उगाच बोलल्यासारखे वाटत आहे.

पण खुप घरात मी बघते आहे की सुनेला जाणूनबुजून वेगळे काढल्यासारखे वागतात. किती अपेक्षा, किती कुरकर तिच्याबद्दल...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या वृद्ध आईवडिलांप्रति असलेली आपली जबाबदारी टाळून, त्यांच्या म्हातारपणात त्यांची साथ सोडायला लावून, आपल्या विभक्त संसारात रममाण होण्याचा सल्ला, आपल्या भावाला द्यायला लावाल?>>>>. ही जबाबदारी फक्त भावाचीच असते का ???? लग्न होऊन सासरी गेलेल्या बहिणीची ही नसावी का ???
म्हातारपणात साथ म्हणजे न्क्की काय अपेक्षित असत मला हेच कळत नाही.डोळ्यांसमोर आपल्या मुलाने असण ही साथ असेल तर अशीच साथ मुलीला तिच्या आई-वडिलांसाठी का नसावी ???

डोळ्यांसमोर आपल्या मुलाने असण ही साथ असेल तर अशीच साथ मुलीला तिच्या आई-वडिलांसाठी का नसावी ???>>> नक्कीच असावी. ह्याकरीता माझे एक स्वप्न आहे. एकाच घरात मुलगा, त्याचे आईवडील आणि मुलगी आणि तिचे आईवडील यांचे एकत्र सहजीवन असावे. दोघं आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतात.

म्हातारपणात साथ म्हणजे न्क्की काय अपेक्षित असत मला हेच कळत नाही.डोळ्यांसमोर आपल्या मुलाने असण ही साथ असेल तर अशीच साथ मुलीला तिच्या आई-वडिलांसाठी का नसावी ???++११११
भावाला हि सेम नियम च ना. त्याची हि wife कोणाची तरी मुलगी आहेच ना.
माझ्या माहेरी माझे आई वडील एकटेच असतात आणि सासरी दीर आणि शेजारी हि खूपसे नातेवाईक म्हणजे सासूचे माहेरचे सर्वच.
मा इथे सुट्टीच्या दिवशी किंवा कोणत्याही सणाला सासरी सर्व एकत्र हवेच असतात हा अलिखित नियम. मान्य
मा त्या सणाला एखादा दिवस माहेरी जाऊन आईला मदत म्हणून का होईना जाण हे चूक का असावं??
म्हणजे माझ्या घरी कोनि नको जाऊ असं बोलत नाही पण सणाला सुनेनी सासरी असायलाच पाहिजे हे का???

नक्कीच असावी. ह्याकरीता माझे एक स्वप्न आहे. एकाच घरात मुलगा, त्याचे आईवडील आणि मुलगी आणि तिचे आईवडील यांचे एकत्र सहजीवन असावे. दोघं आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतात.>>>> असं मलाही फार वाटायच Happy . एक कुठलीतरी हिन्दी सिरियल लागायची , दूपारच्या वेळी . त्यात असे रहायचे सगळॅ एकत्र . आणि त्या जोडप्याचा आंतरदेशिय विवाह असतो .

अजून मी प्रतिक्रिया वाचलेल्या नाहीत त्या आधीच लिहिते

माझ्या मते मायबोलीवर या आधी " कोणाशी तरी बोलायचं " या हेड खाली पूर्वी असे बरेच धागे असायचे.जुन्या मायबोलीवर जास्त होते कि काय ? असं वाटत . सध्या बर्याच दिवसात किव्वा महिन्यात या विषयावर धागा काढला गेलेला नाही . त्यातून ऋन्मेष चालू घडामोडींवर जास्ती धागे काढतो. त्यामुळे हा ऑल टाईम फेवरीट धाग्याचा विषय बाजूलाच पडलेला आहे . तेव्हा नवीन मेम्बर्स "सासरची प्रत्येक व्यक्ती कशी सुनेला परकीच समजते आणी वागवते" या विषयावर हो जाओ सुरू Happy Wink

आजकाल सगळ्या बाबतीत " ठराविक एका लिमिटनंतर" एन्जॉय करा असे सल्ले मिळताहेत. आणि असे केल्याने त्रास देणारा/ छळणारा पराभूत होतो ही मनगढन थिअरी... ते लिमिट काय ते सांगत नाही कोणीच. Wink

कमाल आहे.

>>>>बरेचदा हे ऑब्झर्व्हड आहे की दोन्ही बॉइज्/मुलगे असणार्‍या नव्या सास्वाना आपण बोलतो ते हर्टिंग आहे वगैरे जाणीवही नसते कारण मुलगी नसल्याने/भाच्या पुतण्या वगैरे संसार फार जवळून पाहत नसल्याने सासरी गेलेली मुलगी हा परस्पेक्टिव्ह समजत नाही.<<<

असं काहीच नाही हो. चार मुली असलेल्या बाई एक्दम ढालगज सासू म्हणून पाहिल्या आहेत. अर्थात मुली सुद्धा ढालगज असतात अश्यांच्या आणि त्याम्णा सासू हाजी हाजी करणारी मिळालेली असते.

आणि समजूनच घ्यायचे नाही असे असेल तरच समजत नाही.
असो.

मी असंच करते.
'भवानी' एंजॉय करत्येय म्हटल्यावर 'जगदंबा' गप्प रहातात.
स्मित

माझ्यासारखा स्वयंपाक येत नाही म्हटलं तर मग आता तुम्हीच करा. तुमच्या लेकालाही ना तुमच्या हातचेच आवडते फार..

तुला कुठे नीट जायला यायला नको म्हटलं तर कुठल्याहीसमारंभाला येताना साडी आणि दागिने घेऊन या, समारंभात घालते, जाताना घेऊन जा. (लोकांना यात सूनेचा छळ वाटतो, प्रोग्राम झाल्याझाल्या सासू सगळं गुंडाळून परत घेऊन जाते. मी एंजॉय करते. मला साड्या दागिन्यांना घरात जागा लागत नाही.)

रत्नागिरीचे लोक चांगले नाहीत म्हटलं तर- मग काय वाचाळ मेले, तुम्ही किती छान, काही बोलतच नाही. नेहमी अगदी शांत असता. (की चूपचाप गप्प बसायला लागते त्यांना)

खरंतर 'भवानी' एंजॉय करत्येय म्हणून 'जगदंबेचाच' मानसिक छळ होतो.>>>>>> साति सेम पिंच,

आज ११ वर्शे झालि या घरात येवुन. पण वागणुक तिच. मनातल्या मनात कुड्त राहिल्याने माझि तब्बेत फार खालावलि

आता मि जास्त विचार न करता देते सोडुन. आता करा हि तुम्हिच आणि भरा हि तुम्हिच

साती.. Lol

मी इथे लिहायला लागले तर मी एकटीच पाचशे करेन.. म्हणून नाही लिहित. Wink

तरी पण मागच्या पानावर स्वस्ति का कोणीतरी म्हणालेय ना, तिचा खांदा दुखत होता तर साबा बाम लाऊन, शेकून द्यायच्या. तर माझा बरेच दिवस हात दुखत होता (खरेतर दोन्ही हात पण डावा जास्तच) तर जेव्हापासून माझा हात दुखायला लागला त्याच्या बरोबर दुसर्‍या दिवसापासून साबांचा हात दुखायला लागला. त्यांच्यासाठी घरगुती, डाॅक्टर सगळे उपाय झाले पण त्यांचा हात काय दुखायचा थांबला नाही. मी आपली दुखर्‍या हाताने सगळी कामं आपटत होते. नवरा रोज मालिश करायचा हाताला. नंतर नंतर मी हाताबद्दल तक्रार करणंच सोडून दिलं. तर मग माझा हात बरा झाल्याच्या समजूतीने साबांचा हात पण लग्गेच बरा झाला. Uhoh
हे प्रत्येक वेळी होतं, माझं काय दुखत असेल तर त्यांना पण लगेचच दुखायला लागतं ते पण माझ्यापेक्षा जास्त. Proud
मी आता त्यांच्या कसल्याच गोष्टीकडे लक्ष देणं सोडून दिलंय.

हे प्रत्येक वेळी होतं, माझं काय दुखत असेल तर त्यांना पण लगेचच दुखायला लागतं ते पण माझ्यापेक्षा जास्त. फिदीफिदी>>>>>>>>>>>फिदीफिदी फिदीफिदी

हे प्रत्येक वेळी होतं, माझं काय दुखत असेल तर त्यांना पण लगेचच दुखायला लागतं ते पण माझ्यापेक्षा जास्त. >> आमच्याकडे पण हे सेम अस्सच्च होतं Proud

साती .. Lol

सातींच्या आयडीया भारी आहेत पण त्या जमविणे कठीण असते. आपल्यालाही आपला इगो सोडणे जssरा कठीणच जाते. Happy
पण कालांतराने मी स्वयंपाकाबद्दल शिकले. आधी मी स्वयंपाक करताना माझ्या साबा सारख्या सुचना (सा.सु.) करत बाजुलाच उभ्या रहायच्या.(माझ्या लग्नाच्या ५-६ वर्षापर्यंत) नंतर नंतर मी डायरेक्ट 'आई तुम्हीच करा ना मग मी तोपर्यंत माझी सिरीयल बघते' असे सांगुन त्यांनी उत्तर द्यायच्या आत पळुन जाऊन टिव्ही बघत बसायची. असे २-३ वेळा झाल्यानंतर मात्र मी किचेनमध्ये असेपर्यंत साबा तिकडे फिरकतही नाहीत Proud (आता माझ्या लग्नाला १० वर्षे झाली)

मीही हे ऑब्झर्व्ह केलं आहे की मला झालेला विकार लगेच त्यांनाही होतो! पण मला वाटलं, की आपल्याच मनाचे खेळ आहेत. पण इथे वाचून हे नक्कीच काहीतरी सायकॉलॉजीकल दुखणे असावे असे वाटू लागले आहे.
स्वधा, आमच्याकडे पण, मी जर काही वाढीव घेतले तर लगेच त्याही घेतात अन्यथा...नाही .. नको माझे झाले जेवण... असा जप चालू असतो!
आणि एक : स्वतःच्या कमी खाण्याचा अभिमान! "लागतंच किती मला.....!!!!!
हरे राम!!

हे प्रत्येक वेळी होतं, माझं काय दुखत असेल तर त्यांना पण लगेचच दुखायला लागतं ते पण माझ्यापेक्षा जास्त. >>> हीहीही..... आमच्यात तर सगळ्याच गोष्टींमध्ये बरोबरी.. Happy साडी पासुन त्रास होण्यापर्यंत...

तायांनो , तुम्ही विशय भरकवटताय हा !
विशय सून आणि मानसिकता आहे , सासूच्या कागाळ्या नाही . Wink

गॉसिपिन्ग बन्द करा बघू . Happy

'ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी!'
आणि
'घरोघर मातीच्या चुली' (आजकाल फार तर गॅसच्या शेगड्या)

अश्या दोन्ही म्हणी चपखल लागू पडतायेत! Wink

सासरच्यांना कदाचित असे वाटत असते की, आपली सुन कजाग आहे आणि आपला गरीब बिचारा मुलगा तिच्या तावडीत सापडला आहे. मुलाचे तिच्यापुढे काही चालत नाही.. त्यामुळे त्यांच्या मुलाने काहीही केलं तरी सुन जबाबदार..
माझ्यापुरतं बोलायचं तर नवरा आणि मी त्यांना सांगुन सांगुन दमलो कि असे काही नाहिये. आमचे स्वतः चे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत. पण ते म्हणतात आमचा मुलगा शांत आहे तो काही बोलणार नाही म्हणुन आम्ही बोलणार.. __/\__

Honestly, ही किती हास्यास्पद गोष्ट आहे की आपल्या निम्म्या वयाच्या सुनेशी ह्या सासवा इतकी स्पर्धा करतात Lol पण कधीपासून ते असंच चालू आहे...
मला 'तू बाहेरची आहेस' हे दाखवण्यासाठी इतके प्रयत्न केले गेले...मी इतकी मंद होते की मला त्यांचा अजेंडा समजायला २ ३ वर्ष लागले...मला आधी कळायचंच नाही की त्या exactly का तशा वागायच्या
जेव्हा संसार चक्क उध्वस्त व्हायची वेळ आली तेव्हा माझी ट्यूबलाईट पेटली की त्यांचा सगळा खेळ फक्त त्यांची 'सत्ता टिकवण्यासाठी' होता Lol
खूप त्रासदायक असतं हे सगळं...नोकरी आणि मानसिक/शारीरिक स्वास्थ्य सांभाळायचं की हे पॉलिटिक्स ला तोंड देत बसायचं आम्ही सुनांनी?

.नोकरी आणि मानसिक/शारीरिक स्वास्थ्य सांभाळायचं की हे पॉलिटिक्स ला तोंड देत बसायचं आम्ही सुनांनी????>>>> +१ कित्येक वेळेला हापिस पॉलिटीक्स परडवत पन Lol

साती..यांच्या सारखेच मी पण करते.
मुळात..भांडी-कुंडी, फ़र्निचर अश्या निर्जिव वस्तुनां जीव लावुच नये. सगळ्यात एक्स्पर्ट हि होवु नका. जरी असलात तरी बॅकफ़ुट वर रहायचे. काही बिघडत नाही गृहकृत्य दक्ष नसल्याने.
बर्‍यापैकी संघर्ष टळतो.
वेळेला मात्र पुढे व्ह्यायचे. जसे माणसे भरपुर आणि सा.बा एक्ट्याच करताहेत. सांगेल ते करयचे..मदत म्ह्णुन. आजारपण, वगैरे प्रसंगी मागे हटयाचे नाही. आपल्या आजारपणात फ़ार अपेक्षा नकोच. उगा थोडी करयची.. सरळ जबाबदारी देवुन टाकायची..गोडीत आणि घरातल्या चार-चौघात Happy
आणि मानसिकता म्हणाल तर ती इतक्यात बदलणार नाही.. आपण सासवा झाल्यावर बदलुया. Wink

भांडी-कुंडी, फ़र्निचर अश्या निर्जिव वस्तुनां जीव लावुच नये. सगळ्यात एक्स्पर्ट हि होवु नका. जरी असलात तरी बॅकफ़ुट वर रहायचे. काही बिघडत नाही गृहकृत्य दक्ष नसल्याने.
बर्‍यापैकी संघर्ष टळतो. >>> + १००००० .

आणि मानसिकता म्हणाल तर ती इतक्यात बदलणार नाही.. आपण सासवा झाल्यावर बदलुया. >>> आणि भेटु काही वर्शानी असचं कट्ट्यावर .. सासू आणि मानसिकता धाग्यावर Happy

बॅकफ़ुट वर रहायचे. >>>> एकदा बॅकफ़ुट वर राहिले की तुम्हाला बॅकफ़ुट वरच ढकलले जाते. सूना बाहेरच्या त्यांना काय माहित आपले रितिरिवाज, परंपरा, नातेवाइक, इत्यादी म्हणून तिला तिच्या मनाप्रमाणे काहीच करु दिले जात नाही. वाद नको म्हणून इतके वर्ष बॅकफ़ुट वर राहिले पण आता लक्षात आले की मी केलेली कोणतीच गोष्ट माझ्या सासूबाईंना पटत नाही. त्यांनी सांगायचे आणि आम्ही विनातक्रार तसे करायचे की मग सगळे खूश. सूनेने स्वत:च्या मनाप्रमाणे काही केलं की त्यात हजारो चूका काढायच्या आणि शेवटी त्या म्हणतील तसेच वागायला लावायचे. येथे कोणी मारत नाही, घालूनपाडून बोलत नाही, गोड बोलून स्वतःचे खरे केले जाते त्यामुळे अशा पद्धतीचे वागणे "छळ" या कॅटेगरीमध्ये कोणी टाकत नाही!!

हे प्रत्येक वेळी होतं, माझं काय दुखत असेल तर त्यांना पण लगेचच दुखायला लागतं ते पण माझ्यापेक्षा जास्त. >>> पुढच्यावेळेस माझं नरडं खुप दुखतयं म्हणुन सांगा , सासूबाईंच्या नरड्यावर उपचार होतील Proud

Pages