सून आणि मानसिकता

Submitted by सुहृद on 15 November, 2016 - 06:44

दोन दिवस झाले मनात एक रुखरुख लागुन राहिली आहे, कुठे बोला म्हणून सर्वांनाच सांगते.

परवा मी आणि माझा नवरा खाली पार्किंग लॉटमधे थांबलो होतो, आमच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या काकांच्या मुलाने स्विफ्ट डिझायर कार घेतली. त्याला गाडी चालवण्याचा सराव जास्त नसल्याने दोन तीन ठिकाणी कार घासली होती. तर ते त्या बद्दल सांगत होते आणि तक्रार करत होते. (वय 60 दोन्ही काकांचे)

आता मुलांना काही बोलायचे नाही, बिलकुल ऐकत नाहीत पार्क करताना काळजी घेत नाही वै. वै.

यातच त्यांचे एक शेजारी पण सुरु झाले.

आता आम्ही पण काही बोललो तर ऐकत नाहीत. मुले तर ऐकत नाहीतच पण सुना जास्तच..

आता इथे काहीही कारण नसताना सुनेचा उल्लेख मला खटकला.
मी त्यांना विचारले, नक्की त्रास कोणाचा होतो? मुलाचा कि सुनेचा?

मी म्हणाले, शेवटी आपल्या मुलांना आपण पाठीशी घालतो आणि सून
बाहेरची म्हणून नावं ठेवतो.

जरा कुरबुर झाली माझी, पण आता उगाच बोलल्यासारखे वाटत आहे.

पण खुप घरात मी बघते आहे की सुनेला जाणूनबुजून वेगळे काढल्यासारखे वागतात. किती अपेक्षा, किती कुरकर तिच्याबद्दल...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकत्र रहाणे हाच आधी सुनेवरचा अन्याय आहे. कमीत कमी स्वताच्या पायावर उभ्या असलेल्या मुलींनी तरी एकत्र कुटुंब नाकारले पाहिजे ------- Happy +१ पण वेगळे राहिलं की बोलत नाहीत असे नाही. आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याच ते कार्ट ही भावना असते. बोलायला नको हे कितीही खरं असलं तरी कोणी बोलणं थांबवलंय का? शक्य असेल ते; ऐकले न ऐकले / प्रत्युत्तर / बोलणे टाकून देणे करायचे. आपण अपसेट झालो कि आपण अश्या लोकांना आपलयाला दुःखी करण्याचे पॉवर देतो. नो निड. सच पीपल शुड नॉट बी considered इव्हन.

पण वेगळे राहिलं की बोलत नाहीत असे नाही >>>>>>

तसे बोलणारच. पण तुम्ही पण किंवा प्रत्येक् जणच दुसर्‍याबद्दल काहीतरी बोलत असतो. वेगळे राहिले की जे काय असेल ते इक्वल टर्म वर होते.

जगातल्या कुठल्याही सुबुद्ध समाजात असले एकत्र रहाणे हा प्रकार नाहीये. मुलांना/नवर्‍यांना तरी कसे रहावते असे एकत्र कळत नाही.

मला म्हणायचे आहे, एकत्र राहणे किंवा नाही याबाबत काही नाही.. दुस्वास का करावा... चुक झाली असेल तर सांगा पण मनं गढूळ नको. समजून घ्या, प्रेमाने सामाऊन घ्या , थोडी मोकळीक द्या,

समजून घ्या, प्रेमाने सामाऊन घ्या , थोडी मोकळीक द्या,>>>> ह्या प्रत्येकाच्या डेफीनेशन वेगवेगळ्या असतात ग.. समजुन घेण्याची क्षमता,मोकळीक देण्याची लेवल हे व्यक्तीगणिक बदलत जात्,म्हणुन तर समस्या असतात.

समजून घ्या, प्रेमाने सामाऊन घ्या , थोडी मोकळीक द्या,>>>> ह्या प्रत्येकाच्या डेफीनेशन वेगवेगळ्या असतात ग.. समजुन घेण्याची क्षमता,मोकळीक देण्याची लेवल हे व्यक्तीगणिक बदलत जात्,म्हणुन तर समस्या असतात.

घराघरात प्रचंड गटबाजी दिसून येते...सून आली कि प्रसंगानुसार गट तयार होतात डायनामिकली...आणि लढाया लढ्तात...मग कधी सून एकटी पडते, कधी, मुलगा आणि सून एक्टे पडतात....कधी सासू बाइ वरचढ व्हायला बघतात कधी सासरे, गट बदलत राह्तात आणि लढाया हि सुरुच राह्तात...अहंकार तेवत ठेवला जातो...

समजून घ्या, प्रेमाने सामाऊन घ्या , थोडी मोकळीक द्या >>>>> थोडं महत्व सुद्धा द्यायला हवं. घरातील मह्त्वाचे निर्णय घेताना तिला विचारून (कमीत कमी सांगून तरी) घेतले गेले पहिजेत. सासरच्या घरात तिचा काही रोल आहे, तिचं महत्व आहे असं तिला वाटायला नको का? नाहीतर "आम्ही मोठे" च्या नावाखाली कोणत्याच बाबतीत तिला विचारले जात नाही

माझा तुम्हा सर्व नव्या तरूण सुनांना पाठिंबा आहे. टोच्या म्हणतात ते ग्रेट स्वतंत्र संसार थाटावा. काय गैरसोय असेल ती पहिल्यांदा सहन करावी. पण निर्ण य स्वातंत्र्य आपल्याच हातात असावे. माझे फार लवकर लग्न झाले त्यामुळे मला असे राजकारण करायचे असते तेच माहीत नव्हते. मग प्रत्येक वेळी पड खा गप्प बस, एकट्याने रडणे मला कोणी समजावून घेत नाही असे वाटणे त्यामुळे आत्मविश्वासला तडा जाणे ह्या चक्रातून जावे लागले. वर्किंग लाइफ मधल्या आत्म विश्वासावरही परिणाम होतो.

आपण मुली एव्ढ्या स्वतंत्र विचाराच्या, सुशिक्षित आर्थिक दृष्ट्या सबल वाढवतो पण सासरी मात्र तिने पड खावी असे गृहित धरले जाते. ते आता कसे शक्य होईल. उगीच काहीच सहन करू नये.
आपला संसार आपल्या हातातच पाहिजे.

आपण अपसेट झालो कि आपण अश्या लोकांना आपलयाला दुःखी करण्याचे पॉवर देतो. नो निड. सच पीपल शुड नॉट बी considered इव्हन.>> perrrfect.

आता माझी विचारसरणी अशी झाली आहे, की एकत्र रहा किंवा वेगळे रहा. पण जे तुम्हाला 'आपलं' समजतात त्यांनाच तुम्ही 'आपलं' माना, मनातून. मायेची अपेक्षा त्यांच्याकडूनच ठेवावी.
आपल्या आई वडिलांना आपली एवढी किंमत असते, कमीत कमी त्यांच्या त्या feeling चा तरी मान ठेवावा Happy
बाकी आपल्या duties एक कर्तव्य म्हणून करत रहायच्या, *आपल्या सोयीप्रमाणे, आवडीप्रमाणे*,
That empowers a woman, I think. दुसर्‍या कोणाला नाही तर नाही पण आपल्याला तर नक्कीच महिती असतं की मी माझं कर्तव्य केलं.

श्री, Lol

सगळ्या सासवा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेत असाव्यात फिदीफिदी
मग आजच्या सुनांनी उद्या सासवा झाल्यावर बदला घेतला तर बिघडलं कुठे ?>>>> Lol

क्यों की सांस भी कभी बहु थी! Proud

Forcing a husband to separate from the family is an act of “cruelty” and a ground for divorce,

आलेय मोटे त्वांडाला साबन लावून वेगळे र्‍हायला!
सुप्रिम कोर्टानं सांगतलय र्‍हावा एकत्र नायतर नवरा काडीमोड घेव शकतो म्हनून!

मा लग्न आधीच सांगितलेले उत्तम कि मला नंतरच्या रुसव्या फुगव्यां पेक्षा आधीच वेगळं राहायचंय म्हणजे लग्ना नंतर जर मुलीला घर सोडावे लागते तर मुलांना का नाही
थोडं प्रॅक्टिकल पण विचार होऊ शकतो. आता हे ज्याच्या त्याच्या विचार नुसार.
मी फक्त माझं मत मांडलं

स्त्रीला होणाऱ्या ह्या सगळ्या त्रासांचं मूळ कारण आहे, स्त्रीने लग्न करून नवऱ्याच्या घरी नांदायला जाणं ह्या रीतीरिवाजात.

का म्हणून नेहमीच स्त्रीने लग्न करून नवऱ्याच्या घरी रहायला जायचे? का म्हणून स्रीनेच आपल्या सासरच्या लोकांशी जुळवून घ्यायचं? का म्हणून तिनेच आपले आई वडील, भाऊ बहीण, आपला देश सोडून सासरी जायचं?

आता फिरवा ना ते रितिरिवाज! लग्न करून नवर्याने बायकोकडे रहायला येणं, हा होऊ द्या रितिरिवाज. येऊ द्या कि नवऱ्यालाहि बायकोच्या घरी नांदायला. भोगू दे कि त्याला ते भोग जे वर्षानुवर्षे स्त्रीने नवऱ्याच्या घरी राहून भोगलेत. कळू दे कि त्याला सासू सासरे आणि मेव्हणा मेव्हणी यांनी आपल्याला कुटुंबात सामावून न घेण्याचं काय दुःख असतं ते!

किंवा दोन्ही रितिरिवाज समाजमान्य असू देत. घरजावयालासुद्धा प्रतिष्ठा येऊ दे. मग दोन्ही रितिरिवाजाचे पारडे समान असले कि कोणीच कोणाला त्रास देणार नाही.

आज तुम्ही जे आपल्या सासूकडून अपेक्षा करत आहात तसे सुनेशी वागा. >>>> बर्याचशा सासवा हा प्रयत्न करतात , परिणाम , त्यांच्या सुनांना ऐकुन घ्यावं लागत , "माझी सासू माझ्याशी कशी वागायची , ते तुला माहित नाही " किन्वा "ईतर सासवा बघ त्यांच्या सूनेशी कसं वागतात ते" Happy

हल्लीचा सासुरवास हा शारीरीक छळाचा नाही तर मानसिक छळाने जास्त ओळखला जातो. स्त्री शिकली, प्रगती झाली, स्वताच्या पायावर उभी राहिली, मग तिचा शारीरीक छळ करणे आता शक्य नाही. मग करा मानसिक छळ.>> हे बाकी अगदी बरोबर बोललास मित्रा . अगदी ठरवून छळ करतात असं नाही पण आपल्या बोलण्याने , वागण्याने सूनेला काय त्रास होतोय हे मात्र लोकाना कळत नाही , किन्वा कळत पण वळत नाहे . आणि हा मानसिक छळ हा जास्त घातक असतो . कोणाला सांगता ही येत नाही आणि सहनही होत नाही .

आई ती आईच ,,सासु ती सासुच
सासरे ते सासरेच्,,आनि आपले बाबा ते बाबाच...
तात्पर्य कोनीच कोणाची जागा घेऊ शकत नाही.
अवास्तव अपेक्षा टाळल्या एकमेकांकडुन ,,की जगण बर्यापैकी सोप होत >> लाख पतेकी बात अंकु . माझ्या सासूबाई प्रेमळ आहेत अगदी कजाग सासू कॅटेगरीतल्या नाहीत. मध्यंतरी माझा खांदा दूखावला होता , असह्य वेदना व्ह्यायच्या , नवरा नेमका बाहेरगावी होता . मी कळवळून अक्शरशः रडायचे तेन्व्हा आईच खांद्याला मलम लाव , शेकून दे वगैरे करायच्या . पण म्हणून मी त्याना कधी प्रेमानेही केसांना तेल लावून द्या नाही सांगू शकत . त्यासाठी माझीच आई लागते. Sad .

लग्नाला specific time होऊन सुद्धा तुमच्या कडे असे आणि आमच्या कडे असे खूप वेळा बोलले जायचे.>>> आमच्याकडे अजूनही ,"तुमच्याकडे आहे का गं , अशी पूजेचे ताम्हणं" असं बोललं जातं. मी आता दुर्लक्ष करायला शिकले आहे.

मी आणि माझा नवरा, दोघही आयटी मध्ये आहोत , जवळजवळ एकाच रॅन्कवर , जवळपास सारखाच पगार आहे . पण घरी त्याच्या कामाचं कौतिक जास्त . त्याचा कॉल चालू असेल तर लगेच दरवाजा बंद करून घेणार , तिकडे फिरकणार नाही , तो शनिवार-रविवार ऑफिसला गेला की बाबा कित्ती काम करतो . पण माझ्याबाबतीत यासगळ्या गोष्टी जरा जास्तच लाईटली घेतल्या जातात. एकदा आम्ही दोघही एकत्र ऑफिसला निघालो . सासर्यानी नेहमी प्रमाणे , अरे, तुझा फोन घेतलास का ? " असं विचारलं . हा , हो म्हणाला आणि मला विचारलं , तु घेतलासं ना तुझा फोन? . सासरे पटकन बोलून गेले , तीचं ठीक आहे रे . तुझा फोन ईम्पॉर्ट्न्ट आहे ना . तुझे सारखे कॉल चालू असतात .
आज ईतकी वर्श होउनही मी हा प्रसंग विसरले नाही. आपली सूनही नोकरी करते , ऑफिसमध्ये चांगल्या हुद्द्यावर आहे ,तिचही करियर तितकच महत्वाच आहे , हे यांच्या ध्यानीमनीही नाही .

नविन घराचे अर्धे हफ्ते मी भरते पण लोकांशी बोलताना नेहमी त्यांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया असते , "आमच्या राजेश*ने नविन घर घेतलय ना त्याचं .... ई.ई. " मग माझ्या चेहर्याकडे त्यांच लक्ष गेलं की त्यांचा सूर बदलतो.

आमची एक मामी आहे.मामा आमचे हिटलर , बायको , मुलांना एक्दम धाकात ठेवलेलं . नोकरी नाही त्यामुळे मामीचा पूर्ण वेळ घरकाम , साफ सफाई , स्वयंपाक याला वाहिलेला.
आता मुलगा आणि सून दोघही चांगल्या नोकरीत आहे. घरी बर्यापैकी पैका येतो . पण मामीची घरकामाची सवय सुटत नाही. घरकामाला एकही बाई नाही. मामी सगळं स्वत: करते आणि सूनेने मदत करावी म्हणून अपेक्शा ठेवते . वहिनीला नोकरी , मुलगी , घरकाम सगळं जमत नाही - मग हीची बडबड सुरू - मला जमतं तितकं मी करते. मी तरी काय काय करू . मध्यंतरी मामी आजारी पडली , सगळं मॅनेज होईना आणि सासूला तरी किती त्रास - म्हणून वहीनी ने संध्याकाळच्या जेवणाला आणि घरकामाला बाई ठेवली . मामीची तब्येत बरी झाल्यावर बडबडून , कामाला नावं ठेउन , दोन्ही बायका काढून टाकल्या , आणि आता परत मला कुट्ठे बाहेर जायला मिळत नाही , सगळा वेळ घरातच जातो असं म्हणून तक्रार करते.
घरी कोणी पाहूणे , नातेवाईक, मित्रमंडळी आली की मामा कौतुक करत असतात - ही या वयात ही सगळी काम करते , आमच्या कडे कोणी कामाला बाई नाही . आणि नेहा* ऑफिसमधून उशीरा येते , तिला तरी कुठे तरी वेळ मिळतो . म्हणजे लोकांच सूनेबद्दल वाईट मत - ईतका पैसा कमवते पण घरात काम करायला बाई नाही . स्वतः मदत करत नाही , सगळं सासूला काम . आम्ही घरातले म्हणून आम्हाला परिस्ठिती माहित आहे. आईने त्याना किती वेळा समजावलं , तुझं वयं झालं , त्या पोरीला जमत नाही , तु कामाला बाई ठेव आणि नातीकडे लक्श दे , तिच्याबरोबर वेळ घालवं - सारखं कामात काय असतेसं . पण ऐकुन घ्यायचं नाही . मला जमतं तेवढं मी करणार ( आणि बाकीच किंबहुना तेवढच माझ्या सूनेनेही करावं )

मानसिक छ्ळ म्हणतात तो हा असा. Happy

फारच चावट प्रतीसाद आलेत.:फिदी: पण सध्या टायपायला वेळ नाहीये, त्यामुळे पुढच्या सोमवारी दिवाळीतले उरलेले फटाके फोडायचा माझा मानस आहे.:खोखो:

पण म्हणून मी त्याना कधी प्रेमानेही केसांना तेल लावून द्या नाही सांगू शकत . त्यासाठी माझीच आई लागते. >> एकदा म्हणुन पहा. कदाचित त्यांनाही आवडेल

मित्रा , तुला काठावर उभं राहून बोल्लयला सोपं आहे रे .ना तु सासु होणारेस ना सुन . स्मित .
>>>>>
पण मी जावई आहे ना Happy (कोणाचा तरी होणारा)

तुम्हाला काय वाटते, तेव्हा मी मायबोलीवर असा धागा काढत असेन का, की माझे सासूसासरे मला जास्त भाव देत नाहीत, माझे लाड करत नाहीत, वगैरे वगैरे...
नक्कीच नाही.
कारण मुळात तसे घडण्याची शक्यता कमीच. जर त्यांच्या मुलीने त्यांच्या मनाविरुद्ध माझ्याशी भांडून लग्न केले असेल तरच हे शक्य, अन्यथा नाही..
का नाही?
याचा विचार करा..

माझ्यामते याची उत्तरे,
१) मुलगी मुलाबरोबर त्याच्या आइवडींलासोबत राहते, त्यामुळे जे काही रुसवे फुगवे नाराजी छळवाद आहे ते तिला डायरेक्ट सोसावे लागते.
२) उद्या आपल्या मुलीला जावयाने सोडून दिले तर तिचे काय होईल ही भिती जी मुलीच्या आईवडीलांना असते ती मुलाच्या आईवडीलांना नसते.

हे चित्र बदलताच वा समसमान होताच वरील समस्येचे अस्तित्वच उरणार नाही.

बाकी ईथे मुलांना / पुरुषांना काय कळणार मुलींची / स्त्रियांची दुखं हा सूर चर्चेत नसावा. या सासुरवास प्रकरणात स्त्रियांची दुखं समजणार्‍या स्त्रिया तरी कुठे त्यांच्याशी चांगले वागतात.

सचिन काळे,

>>>>स्त्रीला होणाऱ्या ह्या सगळ्या त्रासांचं मूळ कारण आहे, स्त्रीने लग्न करून नवऱ्याच्या घरी नांदायला जाणं ह्या रीतीरिवाजात.<<<<

ह्यावर मी वर्षभरापूर्वी एक अष्टाक्षरी रचली होती.

http://www.maayboli.com/node/55910

माझे आजही हेच मत आहे,

जमाना बदललेला आहे. माझ्या लग्नाच्यावेळी असे विचार मलाच काय, माझ्या कोणत्याही नातेवाइकालाही रुचले नसते. पण आज ते कदाचित अनेकांना पटतील. अंमलातही आणता येतील.

Happy

स्वस्ति खरच प्राथमिकता मिळत नाही, माझाही अनुभव असाच आहे... मी सरकारी क्षेत्रात काम करते... आणि नवरा खाजगी... त्यामुळे त्याला काम जास्त आणि मला कमी असा पक्का समज आमच्या घरी आहे

एका ठराविक लिमिटनंतर सुनांनी सासरच्यांचा जाच एन्जॉय करायला सुरूवात केली पाहिजे. भवान्या एन्जॉय करत आहेत म्हटल्यावर सासरची मंडळी गप पडतील.

वरील सर्व प्रतिसाद वाचताना असे जाणवले कि येथील बहुतेक स्त्रियांना एकत्र कुटुंबात होणाऱ्या त्रासावर, विभक्त कुटुंबपद्धती हाच एकमेव पर्याय आहे असं वाटतंय. कमीतकमी स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या मुलींनी तरी लग्नाआधीच सांगून, पहिल्यांदाच काय गैरसोय होत असेल ती सहन करून, वेगळा घरोबा करावयास हवा असं त्यांना वाटतंय.

अशा स्त्रियांना मला विचारावेसे वाटते कि खरोखरीच आपणांस वाटते का? कि ह्याच न्यायाला अनुसरून, आपण आपल्या होणाऱ्या वहिनीला, आपल्या वृद्ध आईवडिलांप्रति असलेली आपली जबाबदारी टाळून, त्यांच्या म्हातारपणात त्यांची साथ सोडायला लावून, आपल्या विभक्त संसारात रममाण होण्याचा सल्ला, आपल्या भावाला द्यायला लावाल?

आईवडिलांची साथ?
आईवडिलांना खरी साथ त्यांच्या उतारवयात लागते पण बरेच लोकं तेव्हा जबाबदारी उचलायला कांकू करतात. त्यापेक्षा वेळीच ब्रेक द्या त्यांना. त्यांमाही स्वताचा संसार स्वताचे आयुष्य स्वतंत्रपणे जगू द्या. आपणच आपल्या सोयीने त्यांची इच्छा ठरवतो बरेचदा..

एका ठराविक लिमिटनंतर सुनांनी सासरच्यांचा जाच एन्जॉय करायला सुरूवात केली पाहिजे. भवान्या एन्जॉय करत आहेत म्हटल्यावर सासरची मंडळी गप पडतील.
>>

काय भारी लिहिलंय.
मी असंच करते.
'भवानी' एंजॉय करत्येय म्हटल्यावर 'जगदंबा' गप्प रहातात.
Happy

माझ्यासारखा स्वयंपाक येत नाही म्हटलं तर मग आता तुम्हीच करा. तुमच्या लेकालाही ना तुमच्या हातचेच आवडते फार..

तुला कुठे नीट जायला यायला नको म्हटलं तर कुठल्याहीसमारंभाला येताना साडी आणि दागिने घेऊन या, समारंभात घालते, जाताना घेऊन जा. (लोकांना यात सूनेचा छळ वाटतो, प्रोग्राम झाल्याझाल्या सासू सगळं गुंडाळून परत घेऊन जाते. मी एंजॉय करते. मला साड्या दागिन्यांना घरात जागा लागत नाही.)

रत्नागिरीचे लोक चांगले नाहीत म्हटलं तर- मग काय वाचाळ मेले, तुम्ही किती छान, काही बोलतच नाही. नेहमी अगदी शांत असता. (की चूपचाप गप्प बसायला लागते त्यांना)

खरंतर 'भवानी' एंजॉय करत्येय म्हणून 'जगदंबेचाच' मानसिक छळ होतो.

Happy

सासर चा मानसिक त्रास्/छळ्/प्रेम्/कंफर्ट हा केस टु केस डिफर करतो.
बरेचदा हे ऑब्झर्व्हड आहे की दोन्ही बॉइज्/मुलगे असणार्‍या नव्या सास्वाना आपण बोलतो ते हर्टिंग आहे वगैरे जाणीवही नसते कारण मुलगी नसल्याने/भाच्या पुतण्या वगैरे संसार फार जवळून पाहत नसल्याने सासरी गेलेली मुलगी हा परस्पेक्टिव्ह समजत नाही.सासूपण जुनं होत गेलं की हळूहळू हे बारकावे कळून सास्वा सांभाळून्/दुसरी बाजू रिस्पेक्ट करुन बोलायला शिकतात.सुरुवातीला तर 'आम्ही असं करतो/आमच्या घरात हे/माझा मुलगा/सुना बाहेरुन आलेल्या/काल आलेल्या' वगैरे डायलॉग अनवधानाने कॉमन असतात.

'आमच्या घरी' ते 'आपल्या घरी' हा प्रवास दोन्ही पार्टी समजूतदार असला तर काही वर्षात चांगला होऊ शकतो.
परत, मालिकेतली 'सासू म्हंजे गोड गोड आई' वाली नाती पुरुषांनीही आपल्या बायका आणि आयांमध्ये लग्नाच्या दुसर्‍या दिवसापासून एक्स्पेक्ट करु नये.'कैदाशिण्/वैरीण किंवा सख्ख्याआईपेक्षा पण डियरेस्ट आई' या दोन सिरीयली/सोप ऑपेरी नात्यांच्या पलिकडे एक परस्पर समजूतीचं/अ‍ॅक्सेप्टन्स चं नातं हळूहळू निर्माण करता येतं हे सर्वांनी लक्षात घेतलं तरी पुरे.

त्यापेक्षा वेळीच ब्रेक द्या त्यांना. त्यांमाही स्वताचा संसार स्वताचे आयुष्य स्वतंत्रपणे जगू द्या.>>> आपला विचार चांगला आहे. पण आपण जेव्हा ब्रेक घेतो आणि त्याची जेव्हा दोघांनाही सवय होते. तेव्हा त्याचा परत जॉइंट होऊ शकत नाही. जॉइंटचा प्रयत्न केला तरी जॉइंटचा डाग रहातोच रहातो. आणि मग दोघांच्याही अडचणींमध्ये वाढच होते.

(परवडत असल्यास)शेजारी/एका सोसायटीत घरं करुन राहणे हा चांगला पर्याय वाटतो.सासू सुनेला आपापले स्वयंपाकघर्/भातुकली/सजावट आपल्या पसंतीने.

Pages