क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी मला अश्या सामन्यांना नेहमी अ‍ॅडलेडचा तो द्रविड आगरकर स्पेशल विजय आठवतो ज्यात ऑस्ट्रेलियाने ५५० मारूनही ते हरलेले. आणि मी जिंकायची आशा या परीस्थितीतही बाळगून असतो. कमॉन पुढचे दोन दिवस जबरदस्त खेळा. मॅरेथॉन खेळी पुजारा, मार द्विशतक. एक शतक रहाणेचे. कोहलीचे वेगवान दिडशतक .. अजून विजय गंभीरच बाद व्हायचे आहेत... साहा-आश्विनचे शेपूटही शतकी भागिदारीची वळवळ करू शकते.. सर जडेजा पाचपन्नास धावा वेगात ठोकू शकतो.. मिश्रा विकेट नाही तर बॅटींग तरी सिरीअसली करतो म्हणून अर्धशतक मारू शकतो..

जमून आले तर चौथ्या दिवस अखेर भारताच्या साडेसहाशे धावा, शंभर सव्वाशेचा लीड ईंग्लंडवर . आणि ईंंग्लंडचे फिरकीपुढे दिडशे-दोनशे धावात लोटांगण Happy

<< जमून आले तर चौथ्या दिवस अखेर भारताच्या साडेसहाशे धावा, शंभर सव्वाशेचा लीड ईंग्लंडवर . आणि ईंंग्लंडचे फिरकीपुढे दिडशे-दोनशे धावात लोटांगण >>तथास्तु ! आमेन !!

शेवट्च्या दिवसापर्यंत पिच कमी बाऊन्स मूळे (as oppose to variable one) कमी धोकादायक होईल असे वाटते. त्यामूळे पुढले दोन दिवस कसे खेळतो ह्यावर असेल.

<< शेवट्च्या दिवसापर्यंत पिच कमी बाऊन्स मूळे (as oppose to variable one) कमी धोकादायक होईल असे वाटते>> नासीर हुसेन व गावसकर आत्तांच पिच बघून हेंच म्हणाले. पिचवरचे 'क्रॅक्स' मात्र सामन्यात अनिश्चितता आणूं शकतात.

आताशी १/३ धावा झाल्यात! अजुन २/३ बाकी.. असेच लढत राहिल्यास त्याही होतील पार!

पण खेळपट्टी निव्वळ पाटा राहिली तर मात्र इंग्रज गोलंदाज पहिल्याच सामन्यात गाळठतील...

उद्द्या आपण टी पर्यंत खेळलो तर मॅच जिंकणार. (आज ३०० आणि उद्या २४० रन्स अपेक्षित)
मॅच वाचवायला उद्या लंच पर्यंत तरी खेळता आल पाहिजे.

सध्या बर चाललय. Happy

आता थोडावेळ मॅच बघितली. ज्या पद्धतीने चेंडू उसळतायेत वळतायेत ते बघता तशी अवघड होतेय खेळपट्टी. नविन फलंदाजाला खेळणे जड जाईल..

पुजारा व विजयचं शतकांसाठी मनःपूर्वक अभिनंदन !
<< ज्या पद्धतीने चेंडू उसळतायेत वळतायेत ते बघता तशी अवघड होतेय खेळपट्टी. >.> पण चेंडूच्या याच 'उंची'मुळे पुजारा एकदां शतकाच्या उंबरठ्यावर असताना व त्यानंतर आत्तां पायचित होताना वांचला, हेंही आहेच !

तिसर्‍या दिवशी खेळ संपल्यावर भारत ३१९/४. जर उद्या इतर भारतीय फलंदाजांनी यात अजून २००/२५० धावांची भर घातली तर मला वाटते की सामना अनिर्णित राहण्याची शक्यताच जास्त. कारण आज आपण खुप कमी धावगतीने धावा जमवल्या.

बाकी विजय आणि पुजाराचे शतकांसाठी अभिनंदन!!!

<< शेवटच्या पाच मिनिटांत दोन विकेट्स गेल्या.. >> त्यातल्या त्यात समाधान इतकंच कीं 'नाईट वॉचमन' गेलाय चौथा बळी.

उद्या कोहली-रहाणे शो बघायला मिळावा आणी विकेंड ची सुरूवात झोकात होवो. पुजारा-विजय जोडी मस्त खेळली. पुजारा ची सुरूवात आक्रमक होती आणी शेवटपर्यंत त्याने तो फ्लो राखला.

तो हसीब हमीद (वय वर्षं १९ फक्त) कसला सॉलीड तयारीचा आहे ! फिल्डिंग पाहिली परवा, आणि कालपासून जबरी आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय.
एक दिवास्वप्न.. इंग्लंडने ३२५-३५० चं लक्ष्य ठेवलंय आणि स्टान्स बदलेला गौतम गंभीर त्यांच्या बॉलर्सची पीसं काढतोय.

घरच्या कसोटी मालिकांत ' Pitches win matches ' , या आपल्या मानसिकतेतून बाहेर पडायला आपल्याला या कसोटीचं बहुमोल सहाय्य होणार आहे !

सध्या काही म्हणा सगल्याच संघातले मुस्लिम प्लेअर्स भलत्याच फॉर्मात आहेत. योगायोग असावा Happy

सध्या काही म्हणा सगल्याच संघातले मुस्लिम प्लेअर्स भलत्याच फॉर्मात आहेत. योगायोग असावा !

पुजारा ने रिव्ह्यू करायला हवा होता एलबीडब्ल्यू चा निर्णय. अश्विन, विको आणी सर चांगले खेळले. रहाणे आऊट झाला तो बॉल टिपीकल पाचव्य दिवशीच्या पीच वरून निघाल्यासारखा खाली राहीला. पण रहाणे चे दोन्ही ईनिंग मधले आऊट होतानाचं शॉट सिलेक्शन क्वेश्चनेबल होतं.

पण रहाणे चे दोन्ही ईनिंग मधले आऊट होतानाचं शॉट सिलेक्शन क्वेश्चनेबल होतं. >> हो. गंभीर नि राहाणे ने साफच निराशा केली. पण एक गोष्ट उल्लेखनीय आहे कि सहा बॅट्समन न घेताही आपण सामना अनिर्णित राखू शकलो. ह्या सामन्यात जेव्हधी इंग्लंडची फिरकी इफेक्टीव्ह ठरली तेव्हढी पुढे राहील असे मला वाटत नाही (बॅट्समननाही सवय होत जाते नि दोघेही नवखे आहेत ह्या प्रकारची सस्टेन्ड बॉलिंग करायला. मोईन अली कडे व्हेअरीऐशन कमी आहेत.) परत अ‍ॅण्डरसन येत असल्यामूळे एक फिरकी गोलंदाज बाहेर जाईल असे वाटते.

मिश्राने फारशी उल्लेखनीय बॉलिंग केली नाही. कदाचित डावखुर्‍या फलंदाजांच्या प्रमाणामूळेही असेल. माला असे वाटते कि जेंव्हा दोनच फिरकी गोलंदज घेऊन आपण खेळतो तेंव्हा आपण अधिक सरस बॉलिंग करतो. कदाचित अधिक ऑप्शन्स असले कि त्यांना हातळण्याबाबत कोहलीला सराव जरुरी असेल. अश्व्नि नि जाडेजा जेंव्हा एकत्र बॉलिंङ करतात तेंव्हा ज्या प्रकारे प्रेशर निर्माण करतात ते मिश्राबरोबर अजून होत नाही.

उमेश, शमी नि शर्मा ह्यतले कोणी तरी दोनच असतील असे धरून चालतो. पुढच्या सामन्यासाठी मिश्रा कि पांड्या कि नायर ? गंभीर बहुधा राहुलसाठी जागा मोकळी करेल तो फिट असेल तर.

पण रहाणे चे दोन्ही ईनिंग मधले आऊट होतानाचं शॉट सिलेक्शन क्वेश्चनेबल होतं. >>>>>>> तसे त्याचे बरेचदा असते. हूकपुलच्या फटक्यांवर बरेचदा फिल्डरच्या हातात कॅच देऊन मोकळा होतो. तर कधी या सामन्यात झाला तसा बाद होतो. धावा बनवायचा आणि आपले शॉट खेळायचा कसलातरी उतावीळपणा दिसतो त्याच्याकडे जो कसोटीला शोभत नाही.

अश्व्नि नि जाडेजा जेंव्हा एकत्र बॉलिंङ करतात तेंव्हा ज्या प्रकारे प्रेशर निर्माण करतात ते मिश्राबरोबर अजून होत नाही.>>>> +७८६, किती ते लूज बॉल टाकतो. कन्सिस्टन्सी कंट्रोल पेशन्समध्ये मार खातो. त्याच्या थोबड्यावर समजते याला आजचा दिवस खराब गेला आहे.

पुढच्या सामन्यासाठी मिश्रा कि पांड्या कि नायर ? >>>>>>> मिश्रा तर नकोच. पांड्या म्हणजे तीन वेगवान गोलंदाज करत होणार नाही बहुधा. यादव शमी यापैकी एकाला बसवायचे ठरवले तरच शक्य होईल बहुधा. तरीही पुढच्या सामन्यात चारच बॉलरने उतरू असे वाटतेय.

गंभीर बहुधा राहुलसाठी जागा मोकळी करेल तो फिट असेल तर. >>>>> हो असेच होईल कदाचित. पण राहुल फिट नसला तर बरे होईल. मला पर्सनली गंभीरला अजून एकदोन चान्स याच फ्लोमध्ये सलग मिळावेत असे वाटते.

सर्व वरच्या पोस्टमधील वाक्य कोट करत लिहिले तरी मी हेच असेच काहीसे ईथे लिहायला आलेलो Happy

राहूल रणजी मधे खेळला आणी चांगला खेळला. ही टीम दोन टेस्ट्स साठी आहे. तिसर्या टेस्ट मधे राहूल खेळेल असा अंदाज आहे.

राजकोटच्या पिचचा क्यूरेटर धिरज परसाना [ पूर्वीचा ऑलराऊंडर ] होता. त्याचा कसोटी सामन्यांबाबतचा वैयक्तीक कल व राजकोटला पहिलीच कसोटी मॅच असल्याने स्थानिक क्रिकेटबोर्डाचाही कल सामना पांच दिवसांचा व्हावा याकडेच होता. . खेळपट्टीवरून हें स्पष्ट झालंच. इतर ठीकाणीं आपल्याला चटक लागलेल्या ' होम अ‍ॅडव्हांटेज'चीच चलती असण्याची दाट शक्यता असल्याने तीन स्पीनर्स खेळवले जातील असं मला वाटतं. इंग्लंडकडे चांगले स्पीनर्स आहेत व फिरकीला साथ न देणार्‍या विकेटवरही ते प्रभावी ठरले, ही गोष्ट मात्र ' होम अ‍ॅडव्हांटेज' घेण्याच्या आपल्या निर्णयाला घातकही ठरूं शकते.

पहिल्या दोन कसोटींसाठी संघात कांहींही बदल करूं नये असं मला वाटतं; गंभीरला आणखी एक संधी न देणं त्याचा अनुभव पहातां व तो पुनरागमन करतो आहे हें लक्षांत घेतां त्याच्यासाठी अन्यायकारक व निवडसमितीसाठी दूरदृष्टीचा अभाव ठरेल. प्रत्येक सामन्याच्या कामगिरीवरून खेळाडूना पुढच्या सामन्यात खेळवायचं कीं नाहीं , हें ठरवणं मला तरी घातक वाटतं. म्हणूनच, रहाणे व मिश्रा यानाही दुसर्‍या कसोटीसाठी संघात स्थान असावं.

दुसरी मॅच विशाखापट्टाणम मधे आहे. मिश्राने तिथेच नुकतेच पाच घेतले होते त्यामूळे तो असेल असे वाटते. लूज बॉल टाकायची त्याची सवय परत उफाळून आलेली दिसतेय. बघूया काय होईल ते.

गंभीर ने मात्र ह्या मॅच मधे एखादे शतक काढले नाही तर तो परत येणे कठीण वाटते. भाऊंच्या पोस्ट मधे राहाणे कसा घुसला कळाले नाही. राहाणे माझ्या मते फिक्स आहे. तो संपूर्ण सिरीजमधे एखादी मॅच तरी पूर्ण फेल जातो पण पूर्ण सिरिज अजून तरी गंडलीय असे झाल्याचे आठवत नाही.

इंग्लंड अ‍ॅंडरसन ला कसे आणणार हे बघणे खरच कुतूहलाचे असेल. वोक्स त्यांचा सर्वात effective बॉलर होता. तो बाहेर जातो कि एक स्पिनर बलिदान देतो कि एक बॅटसमन कमी करतात ? तुम्ही काय कराल ?

' होम अ‍ॅडव्हांटेज' >> भाऊ seriously pl tell tell me you are not suggesting to roll out green tops for England ? Lol

Pages