क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शामी ने कूक ला मस्त सेट-अप करून आऊट केला. झहीरखान नंतर खूप वर्षांनी हे बघितलं. म्हणजे मी बघितलं. बाकी कुणी केलं असेल (अश्विन करतो, मी फास्ट बॉलर्स विषयी बोलतोय), पण मी बघितलं नाही.

जडेजा ला रन्स काढल्या तर टॅक्स वगैरे भरायला लागतो का? नाहीच काढत तो, कसला हट्टी आहे. उमेश यादव सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करतो बॅटींग मधे.

ऑसीज आर द वर्स्ट लूजर्स! फाफ वरचा आरोप हास्यास्पद आहे. असल्या घाणेरड्या मनोवृत्तीमुळेच ऑस्ट्रेलिया विषयी आदर नाही वाटत.

"अरे ऑसीज नी नाहि केलाय आरोप" - हो ते माहीत आहे मला. त्या व्हिडीओ फूटेज वरून रान उठलं. त्या बातमीत एक्स्प्लिसीटली लिहीलय की क्रिकेट ऑस्ट्रेलिया ने तक्रार नाही केली. पण त्यावर विश्वास ठेवणं कठीण गेलं. असो. बघू काय होतं ते.

न्यूझीलंड - पाकिस्तान पण मस्त चाललीये मॅच. न्यूझीलंड एकदम अ‍ॅट ईझ वाटताहेत. केव्हढा तो स्विंग! स्टुअर्ट बिन्नी सुद्धा ५-७ विकेट्स काढू शकेल. Wink

<< केव्हढा तो स्विंग! >> भाऊंना सांग > असामीजी, माझ्या तोकड्या ज्ञानानुसार, बेसुमार 'स्विंग' मुख्यत्वे हवामानावर अवलंबून असतो व बेसुमार 'स्पिन' फक्त खेळपट्टीवर; हवामान हवं तसं बदलतां येत नाही पण खेळपट्टी यजमान संघ हवी तशी बनवू शकतो ! समझनेवाले समझ जायेंगे, नपेक्षां, 'Agree to disagree' आहेच ! Wink

पण खेळपट्टी यजमान संघ हवी तशी बनवू शकतो ! >> एव्हढे सोपे नसते ना भाऊ ? पिच बनवणे हे अतिशय बॅलन्सचे काम असते. छोट्याशा घटकाने आखाडा बनू शकतो. स्विंग मुख्यत्वे हवेतल्या आद्रतेवर अवलंबून असतो जी भोवताली ठेवलेल्या गवताच्या प्रजातीवर नि कसे watering केले आहे त्यावर हायली बदलता येतो असे २००२ च्या आपल्या किवी दौर्‍याच्या वेळी वाचलेले होते.

भाऊ आणी असामी ने पिच वर जितकी चर्चा केली आहे, तितकी तर ICC च्या technical committee मधे सुद्धा होत नसावी. Wink

जयंत यादव खूप कॉन्फिडंट वाटला. बॉल खूप वळवत नाही, पण मैदानावरचा वावर, कोहली ला रिव्ह्यू घ्यायला लावताना चा perseverance मस्त वाटला. मला वाटतं हा पण 'द्रविड स्कूल ऑफ क्रिकेटींग बेसिक्स अँड जंटलमन-लाईक बिहेवियर' चा विद्यार्थी आहे.

LOL फेफे

जयंत यादव खूप कॉन्फिडंट वाटला. >> +१ old school बॉलर आहे असे वाचलय. चार पाच वर्षे रणजीमधे घासल्याचा अनुभव आहेच.

खूप उशीरा कां होईना, पण ' आपलं काम फक्त गोलंदाजी ' ही आपली परंपरागत वृत्ती आतां गोलंदाजांत अभावानेच दिसते. काल जयंत यादव ज्या तंत्रशुद्ध पद्धतिने व जबाबदारीने खेळत होता, त्यावरून पुन्हा याचं सुखद प्रत्यंतर आलं.

<<भाऊ आणी असामी ने पिच वर जितकी चर्चा केली आहे, तितकी तर ICC च्या ..>> फेरफटकाजी, ही चर्चा नाहीय; असामीजींचे गुगली खेळ्ताना उडालेली माझी तारांबळ आहे !! Wink

कुणीतरी सांगा रे त्या कोहलीला, प्रत्येक वेळीं चेहर्‍यावर तुसडेपणा आणून प्रतिस्पर्धी संघाला खुन्नस दाखवण्याची आतां गरज नाही त्याला ; तो जागतिक दर्जाचा फलंदाज आहे व एका चांगल्या संघाचा आक्रमक कर्णधार आहे, हें एव्हाना सार्‍या क्रिकेट जगताला माहित आहे व मान्यही आहे.

जडेजा जर विकेट्स सुद्धा काढणार नसेल, (रन्स ची अपेक्षा नाहीच आहे) तर त्याला का खेळवायचं??

फुटली जोडी एकदाची!
दुसर्‍या पहिल्या यादवाने दांडी उडवली!

पण काही म्हणा! मला आवडणारे गोलंदाजाना मिळणार्‍या बळींचे प्रकारात पहिले ३ क्रम!

१. दांडी गुल ह्याला पहिला नंबर.
२. यष्टीचित- ह्यात यष्टी रक्षकाचे श्रेय असतेच पण फलंदाजाना चकवुन मामा बनविणे.
३. यष्टीमागे स्लीप मध्ये झेल.

वरच्या सर्व प्रकारात गोलंदाजाचे स्कील महत्वाचे!

<< जडेजा जर विकेट्स सुद्धा काढणार नसेल, ..... तर त्याला का खेळवायचं?? >> १] 'सर' हा किताब तहहयात असतो २] धोनी कर्णधार नसूनही तो संघात आहे , याचा अर्थ त्याच्याकडे 'मेरीट'ही असावं.
Anyway, increasing number of people now feel that Jadeja's days are numbered; but, even this has happened number of times in the past !

आटोपला साहेबांचा डाव!
२०० धावांची आघाडी आजकालच्या प्रथेनुसार. फॉलो ऑन देत नाहीत! आणि देणेही योग्य नसते ठरले.

आस्ट्रेलियाने कलकत्त्यात आपल्याला फॉलो-ऑन दिला आणि हारलेले ते लक्ष्मण द्रविड मुळे तेंव्हापासुन तर जवळपास बंदच झालाय हा प्रकार. क्वचितच फॉलो ऑन दिला जातो!

<< क्वचितच फॉलो ऑन दिला जातो! >> चौथा डाव खेळण्याचा धोका - व तोही 'अनइव्हन बाउन्स ' असलेल्या विकेटवर म्हणजे विकतचं श्राद्धच !

जडेजा जर विकेट्स सुद्धा काढणार नसेल, (रन्स ची अपेक्षा नाहीच आहे) तर त्याला का खेळवायचं??
>>>>>
विकेट आश्विनच काढतो तरी आपण ४ ऐवजी ५ गोलंदाज खेळवतो Happy

बाकी Bowling in tandem असे ते काहीसे असते ना, त्या फंड्यानुसार आश्विनची जोडी त्याच्याबरोबर चांगली जमते. ईतर कोणापेक्षाही. त्यामुळे आश्विन अमिताभला साथ द्यायला म्हणून जडेजा शशीकपूर बनत संघात आहे असे समजू शकतो.

दोन्ही संघांची पहिली इनिंग संपल्यावर दोन दिवस शिल्लक असणार्‍या सामन्यांसाठी मुळात या फॉलोऑन नियमाची सुविधा नाहीच आहे. वेळ कमी शिल्लक आहे तरीही एका संघाने २०० + ची आघाडी घेतली आहे त्या बेस्ट टीमला जिंकायचा एक चान्स मिळावा म्हणून फॉलोऑन या नियमाला क्रिकेटमध्ये आणलेय. असे मला वाटते Happy

दोन्ही संघांची पहिली इनिंग संपल्यावर दोन दिवस शिल्लक असणार्‍या सामन्यांसाठी मुळात या फॉलोऑन नियमाची सुविधा नाहीच आहे.>>>

नाही कळले! Uhoh

ऋ, असा काही नियम नाही!

फोलो ऑन पहिल्या किंवा दुसर्‍या दिवशी पण देता येईल सामन्याचे चार अथवा साडेतीन दिवस शिल्लक असले तरी. केवळ २०० धावांची आघाडी मिळायला हवी पहिल्या डावात!

ऋ, असा काही नियम नाही!
>>>> अहो तसे नाही म्हणायचे होते मला. नियम मलाही माहीत आहे. जर सामना ४ दिवसांचा असेल वा पावसाने झाला तर हेच २०० ला १५० केले जाते.
पण फॉलोऑन ही कन्सेप्ट कसोटी क्रिकेटमध्ये का आणली यावर भाष्य केले मी Happy
त्यामुळे पुरेसा वेळ शिल्लक असेल तर आपले बॊलर दमवत फॊलोऑनच्या भानगडीत पडायची काही गरज नसतेच तशी

अहो तसे नाही म्हणायचे होते मला. नियम मलाही माहीत आहे. जर सामना ४ दिवसांचा असेल वा पावसाने झाला तर हेच २०० ला १५० केले जाते.>>

नाही काय आहे ना आमच्या लहानपणापसूनचा नियम आहे हा! आजकाल तुमच्या जमान्यात बदलला असेल माहिती नाही! Wink

<<... आमच्या लहानपणापसूनचा नियम आहे हा!..आजकाल तुमच्या जमान्यात बदलला असेल माहिती नाही! >>> हल्लीं जुने नियम बदलण्याचीही तसदी नाही घेत; सरळ वन-डे, टी-२० असे खेळाचे नवीन प्रकारच काढतात ! Wink

हल्लीं जुने नियम बदलण्याचीही तसदी नाही घेत; सरळ वन-डे, टी-२० असे खेळाचे नवीन प्रकारच काढतात !

अजून एक नवीन प्रकार काढा - अकरा ऐवजी सातच खेळाडू एका संघात. फक्त ३० षटके. सहा आउट, संपला डाव, दुसरा सुरु. थोडा जास्त वेळ लंच घेऊन एक हजार रुपये देऊन क्रिकेट बघा.

" याचा अर्थ त्याच्याकडे 'मेरीट'ही असावं." - दिसलं तं न्हाई ब्वा कद्दी Wink

"आश्विनची जोडी त्याच्याबरोबर चांगली जमते. ईतर कोणापेक्षाही. त्यामुळे आश्विन अमिताभला साथ द्यायला म्हणून जडेजा शशीकपूर बनत संघात आहे" - काय टोटल लागत न्हाई. अशी जोडी जमवून, एका साईड ने प्रेशर आणून, दुसर्या साईड ने विकेट्स काढल्याचं काही पहण्यात नाही (कुंबळे ने तयार केलेल्या प्रेशर चा जसा हरभजन ला उपयोग व्हायचा. मग कुंबळे रिटायर झाल्यावर हरभजन च्या विकेट्स चा ओघ आटला). तसंही अमिताभ १०-१२ गुंडांची पिटाई करत असताना शशी कपूर ने गेला बाजार २-५ गुंडांना लोळवायला काही हरकत नसावी. बरं हा अमिताभ बॅटींग मधे ५०-१०० धावा करतो, तेव्हा हा शशी कपूर निदान 'सातत्यानं' ३०-४० / ६०-७० धावा का बरं नाही काढत?

फेरफटका, आश्विनच्या दणकेबाज परफॉर्मन्समुळे तो झाकला जातो ईतकेच. मला आकडे चेक करावे लागतील. शोधतो साईड बाय साइड, किंवा कदाचित आकड्यात रिफ्लेक्ट होत नसावेही, पण त्याने त्याची भुमिका बजावली आहे असेच मला स्मरते. तसेच प्रेशर बनवायचे कामही तो करतो. गरजेनुसार सव्वादोन मिनिटात मेडन ओवर टाकून बाजूला होतो Happy

तसेच ईतर पर्याय जे चाचपलेत. प्रामुख्याने मिश्रा आणि मध्यंतरी हरभजनलाही खेळवून झालेय त्यात जडेजाची जागा घेईल असाही कोणी वाटला नाही. एक तो प्रग्यान ओझा होता त्यानेही काही भरीव कामगिरी केल्याचे स्मरत नाही. बाकी अक्षर पटेल, परवेझ रसूल की काही वगैरेही फार भारी नाहीच वाटत. आणखी डोमेस्टीक क्रिकेटमध्ये कोणी प्रॉमिसिंग असेल तर तुम्ही सांगा. पर्याय असेल तरच त्याच्या डोक्यावर टांगती तलवार येणार. मिश्राही ती ठेवू शकला नाही.

बाकी त्याच्या फलंदाजीबद्दल मी त्याची याच धाग्यावर बरेचदा खेचली आहे हे आढळून येईल. तरी मागच्या एकदोन मालिकेत जरा सिरीअसली घेतोय असे वाटत होते, पण या मालिकेत आणखी सुधारणा होण्याऐवजी त्याचे पुन्हा ये रे माझ्या मागल्याच सुरू झालेय. तर त्याबाबतीत तो केअरलेस एन्ड युजलेस आहे हे कबूल Happy

कुंबळे हरभजन दोघे तोडीस तोड होते. तो हिशोब वेगळा होता. ती जयवीरूची जोडी होती. ज्याच्या गोलंदाजी शैलीला खेळपट्टी साजेशी ठरेल, वा ज्याचा फॉर्म आणि लक जरा जास्त असेल तो त्या दिवशी प्रतिस्पर्ध्यांना गुंडाळायचा, पण दोघेही आपले मेन बॉलरच होते.

Test Bowlers

Rank
Name
Country
Rating

1 R. Ashwin IND 881
2 H.M.R.K.B. Herath SL 867
3 D.W. Steyn SA 852
4 J.M. Anderson ENG 844
5 Yasir Shah PAK 820
6 S.C.J. Broad ENG 805
7 R.A. Jadeja IND 796
8 M.A. Starc AUS 775
9 J.R. Hazlewood AUS 770
10 V.D. Philander SA 761

--------------------------------------------------------------------------

Test Allrounders

Rank
Name
Country
Rating

1 R. Ashwin IND 455
2 Shakib Al Hasan BAN 405
3 B.A. Stokes ENG 349
4 Moeen Ali ENG 347
5 V.D. Philander SA 314
6 R.A. Jadeja IND 296
7 M.A. Starc AUS 238
7 S.C.J. Broad ENG 238
9 C.R. Woakes ENG 234
10 H.M.R.K.B. Herath SL 223

-------------------------------------------------------------------------

ODI Allrounders

Rank
Name
Country
Rating

1 Shakib Al Hasan BAN 391
2 A.D. Mathews SL 352
3 Mohammad Nabi AFG 332
4 J.P. Faulkner AUS 315
5 M.R. Marsh AUS 299
6 Moeen Ali ENG 255
7 G.J. Maxwell AUS 247
8 R.A. Jadeja IND 246
9 B.A. Stokes ENG 244
10 K.J. O'Brien IRE 240

Happy

भास्कराचार्य, ओके धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल. बदल केलाय. फार फरक नाही. ज्या गोलंदाजांना थोडीफार ब्याटींग येते ते सारे ईथे जमा झालेत. चक्क सर जडेजा देखील Happy

Pages