क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज ची मॅच चुरशीची होणार असं दिसतय. रहाणे ची विकेट पाहिली नाही, पण जे वाचलं त्यावरून खूप क्लोज कॉल होता असं वाटलं. केदार जाधव आणी धोनी ची चांगली भागीदारी तुटली. पटेल, पंड्या पैकी कुणी उभं राहिलं तर धोनी ला त्याची ग्लोरी सिक्स मारायची संधी आहे.

आजचा सामना अटीतटीचा व्हावा अशी अपेक्षा आत्तां तरी वाटतेय. २४२ चा पाठलाग करताना भारत १३४-४. केदार जाधव छान खेळतोय व धोनीच्या खेळात पुर्वीची झलक दिसतेय !

नो ग्लोरी सिक्स फॉर धोनी!

धोनी चा बराच काळ चाललेला अ‍ॅप्रोच - मॅच शेवटपर्यंत खेचून, बॉलर्स वर दबाव आणून, मॅच जिंकणं - गेल्या काही मॅचेस मधे फसलाय. Is age catching up with Dhoni? तसं असेल, तर तो एक काव्यात्मक न्याय होईल.

राहाणे नि पांडे दोघेही त्या त्या जाग्या फिक्स करायचे चान्सेस फुकट घालवताहेत राव Sad

गुरकिरत पासून शोधाशोध करून शेवटी खरा ऑल राऊंडर सापडला का केदार जाधव मधे ? पार्ट टाईम ऑफ स्पिन, बॅट्समन, नि किपर पण हवा असेल तर Wink

<< किवीज छान खेळले. >> खरंय. शेवटीं मैदानावर खूपच दंव होतं. चेंडू ओला होत होता. तरीही दमदार गोलंदाजी व क्षेत्ररक्षण केलं पाहुण्यानी. सामना फिरला तो धोनीचा एक-हाती झेल तर अफलातूनच होता !!

पुढच्या सामन्यापर्यंत रैना फिट असला तर पांडेच्या जागी त्याला खेळवाल कि पांडेला अजून एक संधी द्याल ? जाधव आत राहिला पाहिजे.

क्षेत्ररक्षण केलं पाहुण्यानी >> भाउ किवीज नी दमदार क्षेत्ररक्षण केलं हि द्विरुक्ती आहे. एखादा सामना जो त्यांनी गलथान क्षेत्ररक्षणामूळे घालवलाय असा आठवतो का ? Happy

<<एखादा सामना जो त्यांनी गलथान क्षेत्ररक्षणामूळे घालवलाय असा आठवतो का ? >> असामीजी, खरंय. पण आज शेवटीं मैदान दंवामुळे खरंच ओलं, निसरडं झालेलं असूनही त्यानी कमाल क्षेत्ररक्षण केलं, याचं विशेष कौतुक, इतकंच !
<< पांडेच्या जागी त्याला खेळवाल कि पांडेला अजून एक संधी द्याल ? >> पांडेने आज तरी स्वतःसाठी निदान आणखी एका संधीवरचा हक्क नक्कीच सिद्ध केला आहे. ती केंव्हां द्यायची, हें मात्र सांगणं कठीण.

पांडेने आज तरी स्वतःसाठी निदान आणखी एका संधीवरचा हक्क नक्कीच सिद्ध केला आहे. ती केंव्हां द्यायची, हें मात्र सांगणं कठीण. >> मी मनिष पांडे बद्दल बोलत होतो.

<< मी मनिष पांडे बद्दल बोलत होतो. >> सॉरी !
आणखी एक - क्षेत्ररक्षणाच्या बाबतींत सध्यां तरी ' हम भी कुछ कम नही' , ही परिस्थिती आहे हेंही अभिमानाने नमूद केलंच पाहिजे !

' हम भी कुछ कम नही' >> एकदम अचूक. यादव सारखा उंच फास्ट बॉलर जे करतो ते बघून मस्त वाटते.

रैना ला आजारपणातून बाहेर आल्यावर लगेच संधी मिळावी की पांडे ला ह प्रश्न कठीण आहे. बहुदा धोनी रैना चा अनुभवाला पसंती देईल असा माझा अंदाज आहे. पण पांडे, लंबी रेस का घोडा वाटतो.

"राहाणे ला ओपन करून द्यावे का ?" - टू अर्ली टू कॉल. मुळात रहाणे ला वन-डे मधे म्हणावं असं लाँग रोप मिळाला नाहीये असं मला वाटतं. ज्या संधी मिळतात त्यात सुद्धा त्याची पोझिशन आणी रोल खूप शफल झालाय.

"पुढच्या सामन्यापर्यंत रैना फिट असला तर पांडेच्या जागी त्याला खेळवाल कि पांडेला अजून एक संधी द्याल ? " - रैना ने नक्कीच खेळावं, पण ते त्या अक्षर पटेल च्या जागी खेळावं. बॉलिंग ला (आपल्याच टीम चा) काळ, आणी बॅटींग ला (आपल्याच टीम वर) भार आहे.

विको अफाट खेळला. काय कन्सिस्टंसी आहे ह्या माणसाची लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट मधे!! ५३% रन्स एकट्या कोहली ने काढल्या.

कोहलिला साष्टांग नमस्कार. त्याच्यासारखा चेस करणारा बघितला नाहि राव. बेव्हन नि वॉ वेगळ्या तर्‍हेचे होते जिथे अर्धा गेम संपलेला असायचा. धोनीही त्यात जमा होईल. हा पठ्ठ्या सुरूवाती पासून शेवटप्रयंत त्याच इंटेसिईटीने खेळतो. स्टॅमिना आहे कि मस्करी.

धोनी ने आज वरती येऊन मस्त काम केले. त्याच्यासाठी परफेक्ट प्रकार होता. पांडे ह्यातून शिकेल तर मस्त होईल.

कोहली बाद होत नाही तर मॅच बोर आणि एकतर्फी होत जाते..
बरं झालं मी आज संध्याकाळी दिवाळीची शॉपिंग आटपून घेतली..
आणि मग सावकाश रात्री घरी येऊन हायलाईटस पाहिली..

ऋन्मेषजी, कालच्या धोनीच्या कामगिरीवर अवाक्षर नाही ? आमच्यासारख्याना धोनीवरून टपली मारायची ही सुवर्णसंधी कशी काय दवडली तुम्ही !! Wink

ऋन्मेषजी, कालच्या धोनीच्या कामगिरीवर अवाक्षर नाही ? आमच्यासारख्याना धोनीवरून टपली मारायची ही सुवर्णसंधी कशी काय दवडली तुम्ही !! Wink

कोहली अप्रतीम टायमिंग चे स्ट्रोक्स. शेवटी शेवटी एक एक्स्ट्रा कव्हर आणि मिडॉफला भेदून जो कव्हर ड्राईव्ह मारला तो अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारा होता.

बिच्चारा टेलर शेवटपर्यन्त नर्व्हस होता.. ६ वर जीवदान दिल्यापासून!

"ऋन्मेषजी, कालच्या धोनीच्या कामगिरीवर अवाक्षर नाही ? " - धोनी ने तोंडघशी पाडलं ना त्याला. तो स्वत;च म्हणाला की आता फिनिशर ची जवाबदारी झेपत नैये. कैतरी वेगळं केलं पाहीजे. Wink

"हा पठ्ठ्या सुरूवाती पासून शेवटप्रयंत त्याच इंटेसिईटीने खेळतो. स्टॅमिना आहे कि मस्करी." - +१

धोनी ने तोंडघशी पाडलं ना त्याला. तो स्वत;च म्हणाला की आता फिनिशर ची जवाबदारी झेपत नैये. कैतरी वेगळं केलं पाहीजे >> हे हेच लिहायला आलो होतो Happy पण खरच पांडेला खाली ढकलून धोनी वर आला हि चांगली गोष्ट केली. तो strike rotate नीट करू शकतो जर मनावर घेतले तर नि मधे एखाद दुसरा फोर सिक्स मारून average control मधे ठेवतो. विराट साठी त्या वेळी perfect partner होता. पांडे हे सगळे लवकर करायला लागेल अशी आशा धरूया. पांडे नि कोहली दोघेही u-19 साठी एकत्र खेळले होते. एक कुठे गेलाय नि दुसरा कुठे आहे.

"एक कुठे गेलाय नि दुसरा कुठे आहे" - ह्या वरून एक जुनं (बहुदा १९५० च्या दशकातलं) लता मंगेशकरचं गाणं आठवलं. 'अपनी अपनी किस्मत है, आबाद कोई, बरबाद कोई.'

पांडे खेळेल असं वाटतय. तो गेले काही वर्षं, डोमेस्टीक मधे खूप सातत्यानं परफॉर्म करतोय. एखाद-दुसरा सीझन गाजवणार्या खेळाडूंच्या तुलनेत त्याची कन्सिस्टंसी वेगळी जाणवते.

धोनी ने तोंडघशी पाडलं ना त्याला. तो स्वत;च म्हणाला की आता फिनिशर ची जवाबदारी झेपत नैये. कैतरी वेगळं केलं पाहीजे.
>>>.

फेरफटका, उलट मी मागे यावरून भांडत होतो की वयोमानानुसार भले तो आधीसारखा फिनिशर राहिला नसला तरी मिडल ऑर्डरचा फलंदाज म्हणून उपयुक्त ठरू शकतो. आणि मीच म्हणत होतो की त्याने चौथ्या क्रमांकावर पुढे यावे. किमान चेस करताना तरी तो या नंबरला ईतर कोणापेक्षाही चांगला न्याय देऊ शकतो.... मी त्या पोस्ट शोधून देऊ शकतो.

उलट माझ्या या मुद्द्याला असा विरोध होत होता की तेच काम करायचे असेल तर धोनीच कशाला हवा मनिष पांडे, केदार जाधव वगैरे मंडळीही आहेत वा तयार करू शकतो त्या रोलसाठी..
पण यात एक लक्षात घ्यायला हवे धोनी हा आजही एक उत्तम विकेटकीपर असल्याने (जे तो वेळोवेळी , अगदी कालही, विद्युतवेगाने स्टंपिग रनऑट घेत सिद्ध करतच आहे) त्याची फलंदाजी ही बोनस धरत आजच्या तारखेलाही तो आपला मोस्ट वॅल्यूएबल प्लेअर आहे.
तळटीप - यातून विराटला वगळा. दिवसेंदिवस तो वेगळ्याच ग्रहावरचा खेळाडू बनतोय Happy

मी त्या पोस्ट शोधून देऊ शकतो. > > तू त्या पोस्ट्स शोधल्यास तर तुला हे सापडेल कि त्यावेळी धोनीला निव्वळ 'मिडल ऑर्डरचा फलंदाज' असण्याला विरोध दोन कारणांमूळे होता -
१. त्याची किपींग ढासळली होती. सध्या ती परत सुधारली आहे असे वाटेल. पण देशात स्पिनर्स च्या विरुद्ध धोनीच्या स्पिनिंग बद्दल कधीच प्रश्न नव्हता. होता तो बाहेर फास्त बॉलर्सला किप करण्याबाबत. तो प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. कदाचित टेस्ट मधे खेळत नसल्यामूळे हा एव्हधा गहन प्रश्न राहणार नाही.
२. निव्वळ फलंदाज म्हणून घ्यायचे असेल तर भविष्यकालीन विचार करता पांडे ला preference द्यायला हवा कारण धोनीने अजूनही त्याचे पुढच्या विष्वचषकाचे प्लॅन जाहिर केले नाहीयेत. हि परिस्थिती अजूनही बदललेली नाहिये.

तो गेले काही वर्षं, डोमेस्टीक मधे खूप सातत्यानं परफॉर्म करतोय. >> हे बरोबर आहे. india A टुर्स पण मस्त खेळलाय.

Pages