काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वोत्कृष्ट सून – गौरी – काहे दिया परदेस>>> गवरी आता कुठे सून झालिये आणि लगेच सर्वोत्कृष्ट>>> सहमत

निशा deserve करते हा अवार्ड>>> येस>>> +१

पण सर्वोत्कृष्ट नायिका खरे तर सौभाग्यवती मधी लक्ष्मी ही होती किंवा इव्हन स्वानंदी पण छान काम करत होती की! >>>> उर्मीला विसरलात वाटत.

झी चे अवॉर्ड्स म्हणजे चीटिंग आहे . उर्मी , स्वानंदी खूप मस्त काम करायच्या .
हा व्हिडीओ पाहून वाटते गौरी ला माहिती होते कि तिलाच अवॉर्ड मिळणार ! थोडी आगाऊ पण वाटली थंडाक्का !

माझ्यामते या मालिकेत भरपूर अमराठी कलाकार आहेत .त्यामुळे त्यांच्या मित्रपरिवाराकडून/नातेवाईकांकडून / त्यांच्या गावच्या लोकांकडून " काहे दिया " च्या सगळ्या कलाकारांना आणि मालिकेला भरभरून मत मिळाली जी इतर मालिकांना मिळाली नाहीत ..इतर मालिकांना फक्त मराठी प्रेक्षकांकडूनच व्होट्स मिळाले आणि या मालिकेला अमराठी आणि मराठी दोन्ही प्रेक्षकांकडून व्होट्स मिळाले म्हणून मालिका आणि यातले सगळे कलाकार सर्वोकृष्ठ . याच एका कारणामुळे बाकीच्या सगळ्या मालिका आणि त्यातले कलाकार चांगला अभिनय करूनही पाठी पडले असावेत Happy

हे झी मराठी अवॉर्ड्स अभिनयाला किंवा निर्मितीसंबंधांतल्या कौशल्यांसाठी नाहीत, तर प्रेक्षकांना कोणत्या व्यक्तिरेखा, मालिका, इ. अधिक आवडतात याबद्दल आहेत.

<< झी मराठी अवॉर्ड्स ...प्रेक्षकांना कोणत्या व्यक्तिरेखा, मालिका, इ. अधिक आवडतात याबद्दल आहेत. >> मग नुसतंच 'आपली आवड अ‍ॅवॉर्ड', असं कांहीतरी म्हणांवं ना ! Wink
'सर्वोत्कृष्ट ' या विशेषणामुळे कौशल्य, गुणवत्ता हे घटक सर्वाधिक महत्वाचे ठरतातच ना ! निदान, लोकानी तरी त्यामुळेच तशी अपेक्षा, व त्या अनुषंगाने प्रशंसा /टीका, करणंही स्वभाविकच आहे !

पोरी, तूं सर्वोत्कृष्ट सून आहेस ती माझी कीं 'झी'ची ? मग,
तुझा चेहरा नेहमीसारखा हंसरा, बोलका ठेव ना !!
aabbcc_0.JPG

कालच्या भागात सगळ्यांचा अभिनय मस्त! गवरी सोडून! ती अतिशत कृत्रिम पणे शिवशी बोलत होती. नाकात, सानुनासिक, पाठ केल्या सारखं, निर्विकार चेहेर्‍याने......
इव्हन नचिपण छान वागत होता काल.

गौरी बेस्ट नायिका ? आवरा..

बनारस मधे सोन्याच्या खरेदीला किराणा मालाच्या खरेदी सारखी पावती देतात का? नुसतच शिव चं नाव आणि 2 गोल्ड नेकलेस असं लिहिलेलं. वजन, तोळ्याचा भाव, ट्याक्स काहीच नाही पावती वर.

अस्काय करताय लोखो, बनारसला सोनं १०००० रु तोळा असेल तेंव्हा म्हणुन मग ६ तोळ्यात दोन नेकलेस आणि बाकीची करणावळ असेल. म्हणजे इथे पण तांबं किंवा चांदी मिक्स असेल त्यात दोन दोन तोळे Wink

हो... खेळण्यातलीच वाटत्येय...ती नसते का...बेगडाची, चांदण्या चिकटवलेली तशी!

काल मोजोंनी मस्त अभिनय केला...म्हणजे ते अभिनय करत आहेत असे वाटतच नव्हते, झोपेतून दचकून उठले तेव्हा वगैरे.... शुगो पण मस्त! अगदी साधी, पटकन पाणी देणारी ,काळजी करणारी बायको....
एकुणात सावंतांच्या परिस्थितीच्या मानाने गवरीच्या साड्या व दागिने एकदमच वैविध्यपूर्ण आणि भारी आहेत हं...! शुक्ल लोकांनी दिलेत काय?

मोजो अभिनय चांगला करतात पण त्यांच्या पात्राचा उपयोग दिग्दर्शक कधीही कसाही करत आहे..
नीशावर खुप चिडणारा.. तर एकदम नीशावर विश्वास ठेवणारा..
शिववर विश्वास आहे म्हणुन गौरी ला हो म्हणाले आणि एकदम नीशाने काही सांगितले की एकदम शिव खोटरडा..

सगळी पात्र अशीच दिग्दर्शकाला हवं तस स्वभाव बदल्तात..
सगळ्यात जम बसलेलं पात्र म्हणजे आजी बास..
जशी पहिल्या भागात होती अजुनही तशीच त्यापात्राच्या स्वभावानुसार वागत आहे

काल मोजो आणि उरलेल्या फॅमिलीला घराबाहेर काढायला काही लोक आले होते.
नक्कि काय भानगड आहे? Uhoh

मोजोंच घर नीशाने फसवुन विकुन टाकलं .. गौरीच्या लग्नासाठी पैसे हवे होते तेव्हा, मोजोंनी तिला power of attorney दिली होती... मग आता तो मालक येउन याना धमकी देत आहे

मोजोंच घर नीशाने फसवुन विकुन टाकलं .. गौरीच्या लग्नासाठी पैसे हवे होते तेव्हा, मोजोंनी तिला power of attorney दिली होती... मग आता तो मालक येउन याना धमकी देत आहे>>>>>>> पण मधेच गौराक्का कशी आलेली ब्याग भरुन?

४ सह्यांवर विकलं .. इथे आम्हाला नविन घर घेताना हजार सह्या करायला लागल्या>> तर कै.. हजार लफडी असतात. ही फेरफटका मारल्यागत पटकन घर विकून आली. त्या माणसाने पण घर घ्यायच्या आधी ते कोणत्या कंडीशनमध्ये आहे वगैरे बघायची तसदी घतली नाही. सह्या केल्या आणि घेतलं घर विकत. Uhoh

शिवच्या दादीला कसले राजकुमार टाइप डायलॉग दिलेत.
वो जितनी जमीन के ऊपर है उतनीही जमीन के नीचे भी है

मी उससे दस गुना जमीन के नीचे एक्स्पेक्ट केलं होतं.

काल लैलाचाचीबद्दल पण असाच काहीतरी भारी डायलॉग टाकलेला.

उद्याच्या उद्या सकाळी नचिकेतला विमानाने पाठवा असं सांगून किती दिवस झाले? ती सकाळ कधी येणार? ही मालिका आता २४ सारखी चाललीय का? तासातासाला काय झालं त्यावर एक एपिसोड? गौरीने बॅग भरलेलीही दाखवली ना? मग आता रसोईपूजन कधी करताहेत?

हे रसोईपूजन वगैरे भल्या सकाळी चालले असेल. कारण हम्मा नाश्ता बाहेरून मागवते असं दाखवलं ना? नचिकेत ११-१२ पर्यंत पोचणार असेल.
बादवे ती दादी काय सच सांगणार असते ना ? ते सोडून दुसरेच काहीतरी डायलॉग दाखवले.

Pages