क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन रहाणे !
cricinfo वर Top 10 4th wicket partnerships for India चं टेबल झळकतंय , ज्यातल्या ५ मधे एक नाव कॉमन आहे.... सचिन तेंडूलकर !

कोहलीचं त्याच्या द्विशतकासाठी अभिनंदन! एका वर्षात दोन द्विशतके. तसेच दोन द्विशतके झळकवणारा पहिला भारतीय कप्तान! Happy

प्रत्येक मॅचगणिक भारत एक-एक ओपनर गमावणार असं दिसतय. ह्या रेट नी वर्षातल्या शेवटच्या टेस्ट ला हर्षद खडीवाले चा पण डेब्यू होईल. Wink

सहज विचार करत होतो, तेव्हा जाणवलं, की सध्या सगळ्याच टेस्ट टीम्स संक्रमणातून जाताहेत. कुठलीच टीम वेल-सेटल्ड वाटत नाहीये. भारताचा विचार करता, विजय, पुजारा, कोहली, रहाणे, साहा, शामी आणी अश्विन हे पुढचे काही वर्ष तरी टेस्ट टीम चा कोअर आहेत असं वाटतय.

मला वाटतं ही भारताची टीम बर्‍यापैकीं बॅलन्सड आहे व प्रभावी पण. 'बॅक-अप'साठीही खेळाडू उपलब्ध आहेत. फिटनेस, क्षेत्ररक्षण हे पारंपारीक कच्चे दुवेही गायब झालेत. या सर्वाचे चांगले परिणामही दिसताहेत. अच्छे दिन और क्या होंगे अपने क्रिकेटके लिये ! Wink

"सरांनी मॅचमध्ये काहीही केलं, तरी फेफ त्यांना कोअर म्हणायला काही तयार होणार नाहीत." - भारतात सरांना भरपूर स्कोप आहे. पण कोअर म्हणजे माझ्या दृष्टीने असे खेळाडू की जे मॅच कुठेही असली तरी डोळे झाकून टीम मधे येतील (तसं ह्या यादीत दोन्ही शर्मांना पण बसवण्यात येईल, पण माझं धाडस नाही झालं त्यांची नावं टाकायचं).

सराना कोअरमधें स्थान न मिळायला आणखी एक कारण असंही असावं कीं अश्विनच्या साथीला सरांऐवजी एखादा लेग-स्पीनर घेणं कांहीं कसोटींमधें, इथल्या व बाहेरच्या खेळपट्ट्यांवर , हितावह ठरण्याची दाट शक्यता आहे .

पुजारा शतकाच्या उंबरठ्यावर [९३* ]. शुभेच्छा !
गेल्या १० षटकांत पुजारा-रहाणेनी ६च्या सरासरीने धांवा केल्यात. Shows they mean business !

शतक पुरं करून मालिकेत सर्वाधिक धांवा करण्याचा मानही पटकावला पुजाराने ! अभिनंदन !!

जिंकली 3-0 मालिका विजय!! विजया दशमी विजयाने साजरी!! अश्विन 7 बळींचे सोने!! एकूण 13 बळी सामन्यात!!!

एका दिवसात आपण बॅटींग करून, टारगेट सेट करून, किवीज च्या १० विकेट्स काढून मॅच जिंकली सुद्धा! क्या बात है! वेल प्लेड टीम ईंडिया.

विल्यिमसन्स बाद झाल्यावर बहुधा किवीजनी 'बस्स झालं' म्हणून सोडून दिले असे वाटले. Must have been taxing series. इंग्लंड किंवा ऑसीजकडे किवीजएव्हढे चांगले स्पिनर्स नसल्यामूळे त्यांचा जोर रिव्ह्रस स्विंगवरच अधिक राहिल असे वाटतंय.

गंभीर, विजय, राहुल असे तीन पर्याय सलामीला मिळाल्यामूळे धमाल आहे. लेफ्टी राईटी कॉम्बोसाठी गंभीरला ठेवावे असे वाटते. पुजाराने चांगल्या strike rate मधे शतक मारून पुढच्या सिरीजपुरता तरी वाद मिटवलाय.

असामीजी, या संघाच्या गुणवत्तेबद्दल व त्याने आत्तां मिळवलेल्या विजयांबद्दल मला जराही शंका नाहीं. ' पिच पाटा असलं तरी फलंदाजाला धांवा करण्याचं कसब लागतं व पिच खराब असलं तरी विकेटस घ्याव्या लागतात', हें कांही कोहलीने सांगायलाच पाहिजे असं नाही. तुल्यबळ संघ असलेल्या पाहुण्यांचा कोणताही दौरा संपल्यावर त्यांच्याही कांहीं खेळाडूंचा खेळ व आपणही जिद्दीने झगडून वांचवलेल्या/ जिंकलेल्या कसोटी त्या दौर्‍याच्या आठवणींचा भाग व्हायला हवा. पण तसा तो द. आफ्रिका व न्यूझीलंड यांच्या आत्तांच्या कसोटी मालिकांत झाला नाही; त्याचं कारण ते संघ अगदींच सुमार, 'सब-स्टॅन्डर्ड' होते हें निश्चितच नव्हतं. ' We finished two games in four days on perfectly fine Test cricket pitches ' या कोहलीच्या विधानाशी मीं म्हणूनच १००% नाहीं सहमत होवूं शकत.

पूर्वींही अहमदाबाद, दिल्ली येथील खराब खेळपट्ट्यांवर आपण आपल्याला खूप सरस असलेल्या संघानाही धूळ चारली आहे, जेसू पटेल, हिरवानी अशा अगदीं सुमार दर्जाच्या फिरकी गोलंदाजांचा वापर करून ; पण तें क्वचितच व त्यावेळींही त्या विजयाचा मोठा जल्लोष न करतां. आतां आपल्याकडे इतके दर्जेदार फिरकी गोलंदाज असताना जरा त्यांचीही कसोटी लागावी अशा खेळपट्ट्यांवर त्यांचं कसब पहाणं या दोन्ही दौर्‍यातील कसोटी मालिकांत खर्‍या क्रिकेटप्रेमींच्या नशीबात नव्हतं, हें मला तरी खटकलं.

आतां आपल्याकडे इतके दर्जेदार फिरकी गोलंदाज असताना जरा त्यांचीही कसोटी लागावी अशा खेळपट्ट्यांवर त्यांचं कसब पहाणं या दोन्ही दौर्‍यातील कसोटी मालिकांत खर्‍या क्रिकेटप्रेमींच्या नशीबात नव्हतं, हें मला तरी खटकलं. >> +१

4 गेले पन्नासच्या आत
हर्दिक पांड्याबद्दल मी मागेही एकदा बोल्लेलो.
या फलंदाजीने नटलेल्या देशात त्याला बॅटींग ऑलराऊंडरपेक्षा बॉलिंग ऑलराऊण्डर बनने गरजेचे. तरच त्याला फर्स्ट ऑप्शन म्हणून बघितले जाईल. याचे
एक आणखी उत्तम उदाहरण म्हणजे सर जडेजा.

आतां आपल्याकडे इतके दर्जेदार फिरकी गोलंदाज असताना जरा त्यांचीही कसोटी लागावी अशा खेळपट्ट्यांवर त्यांचं कसब पहाणं या दोन्ही दौर्‍यातील कसोटी मालिकांत खर्‍या क्रिकेटप्रेमींच्या नशीबात नव्हतं, हें मला तरी खटकलं. >> भाऊ हे तुम्ही ह्या दौर्‍यांमधल्या खेळाडूंबद्दल बोलता आहात का ?

महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगळे आणि अंकित बावणे यांनी तब्बल ५९४ रन्स ची भागीदारी केली. अजून तीस केले असते तर वर्ल्ड रेकॉर्ड झाले असते. पण गुगळे ला ते माहीत नव्हते त्याने डिक्लेअर केले तेव्हा.
http://www.espncricinfo.com/ranji-trophy-2016-17/content/story/1061671.html

हो फारेण्ड. दुर्दैव. असा रेकॉर्ड करायची संधी जन्मात एकदाच येते.

आज कोहलीने पुन्हा काही डोळ्यांचे पारणे फेडणारे कडक फटके मारले. त्याचे फूटवर्क, रिस्टवर्क, बॅटस्पीड सारेच एवढे विद्युतवेगाने आणि तरीही अचूक असते जणू काही कॉम्प्युटर गेममध्ये क्रिकेट खेळतोय. हवे तसे हवे तिथे बॅट फिरवून नेमके धावा वसूल करणे जेवढे कन्सिस्टंटली करतोय तितके ते अविश्वसनीय वाटू लागले आहे Happy

हार्ड लक विंडिज
हार्ड लक बिशू
हार्ड लक ब्रावो
हार्ड लक क्रिकेटप्रेमी ...

दोन रन आऊट खेळ संपवायला कारणीभूत ठरले हे जास्त क्लेशकारक

मस्त झाली टेस्ट मॅच. पाकिस्तान अपेक्षेप्रमाणे जिंकले असले तरी वेस्ट-ईंडीज अपेक्षेईतके वाईट रितीनं हारले नाहीत.

भाउ आता तुम्ही वैतागाल पण वाडेकर काय म्ह्णालाय पहा Happy
"Harbhajan Singh recently commented that the turning tracks help India and the spinners.

We have always played on turning tracks. During our time, we also depended on the spinners to take wickets.

India made optimum use of the home advantage and there is no reason to complain."

http://www.rediff.com/cricket/report/kohlis-captaincy-can-help-us-win-ab...

असामीजी, स्पिनर्सना आक्रमकपणे वापरणारा व त्यांच्यावर सर्वस्वी विसंबून रहाणारा वाडेकर हा त्यावेळचा उस्ताद कप्तान होता, याचं कौतुक मीं इथंही बर्‍याच वेळां केलंय. But, question is not about dependence on turning tracks , it's about the degree of dependence and degree of turning on such tracks !!
मीं उगीचच याबाबतींत हट्टीपणा करतोय असं वाटणं अगदीं स्वाभाविक आहे . पण मीं तरी काय करूं -- दिल है जो मानताही नहीं !! Wink

Pages