उपवास श्रद्धा की हत्या?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 October, 2016 - 13:33

हैदराबाद येथे एका १३ वर्षीय मुलीला कुटुंबाच्या भरभराटीसाठी तब्बल १० आठवडे, जवळपास ६८ दिवस उपवास करायला लावला. त्यात त्या मुलीचा अखेर मृत्यू झाला.

चेन्नईतील एका धर्मगुरुने मुलीला चातुर्मासचे उपवास करायला सांगा असा सल्ला दिला होता. यामुळे तुमचे व्यवसायात झालेले नुकसान तर भरुन निघेल आणि तुम्हाला घसघशीत नफाही मिळेल असे सांगितले होते. उपवास संपला त्या दिवशी घरात महाप्रसाद ठेवला होता. आणि या कार्यक्रमाला तेलंगणचे एक मंत्रीदेखील उपस्थित होते.
उपवास सोडल्यानंतर मात्र मुलीची प्रकृती खालावली. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपवासामुळे तिच्या मूत्रपिंडाचेही नुकसान झाले होते. यामुळे ती कोमामध्येच गेली. शेवटी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सविस्तर बातमी ईथे वाचा
http://www.loksatta.com/desh-videsh-news/13-year-old-girl-died-due-to-fa...

मुर्खपणा म्हणावे तर हे लोकं कुठल्या गावखेड्यातले दुर्गम भागातले अशिक्षितही नाहीत. एखाद्या दिवसाचा कडक उपवास, किंवा एक वेळ खात आठदहा दिवस वा महिन्याभराचा उपवास आणि त्यामागील श्रद्धा समजू शकतो. पण एका अल्पवयीन मुलीला एवढ्या प्रदिर्घ कालावधीसाठी उपवास करायला लावणे याला तर नरबळीसारखी अंधश्रद्धा म्हणायला हवी. आणि एखादा समारंभ करत तो साजरा केला जातो, त्याला मंत्री हजेरी लावतो वगैरे सारेच धक्कादायक आहे.

जिथे कायदा आत्महत्येलाही गुन्हा मानतो तिथे हा एक आयुष्य संपवण्याचाच प्रयत्न झाला. दुर्दैवाने त्यात यशही आले. मुलीचे वय लक्षात घेता तिच्यावर हा उपवासाचा निर्णय लादणारे तिचे घरचे आणि ते सो कॉलड धर्मगुरू या सर्वांवर हत्येचाच गुन्हा दाखल करायला हवा. जेणेकरून भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये. आशा करतो की हि आमच्या धर्माची प्रथा परंपरा आहे म्हणत संबंधित यातून मोकळे सुटू नयेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांगणारा कोणीही काहीही सांगेल. आपण विश्वास कशावर ठेवायचा हे आपण ठरवायला नको का? आणि स्वतःच्या मुलीच्या जीवापेक्षा पैसा किंवा भरभराट महत्वाची असू शकते? एवढीच हाव आहे भरभराटीची तर ती हाव असणार्या तिच्या घरच्या सगळ्या मंडळींनी हा उपवास ठेवायला हवा होता. शिक्षा त्या भोंदू धर्मगुरूसोबत घरच्या लोकांनाही व्हायला हवी.

काय मुर्खपणा आहे अरे . हाव माणसाला किती खालच्या पातळीला घेऊन जाते ह्याचं अजुन एक उदाहरण.
त्या मुलीचा निष्कारण बळी गेला .

ही मुलगी जैन कुटुंबातील होती. जैन मुनीच्या सांगण्यावरून हा प्रकार घडला. या धर्मातील उपासाच्या प्रथेबद्दल ऐकून माहीत आहे पण हे असे प्रकार घडत असणे धक्कादायक आहे.

ही बातमी पेपर मधे वाचली तेव्हा खूप धका बसला होता. त्या चिमुरडीबद्दल खूप वाईट वाटले. तिचे पालक आणि संबंधितांचा संताप आला.

आपल्या मुलानं कधी एखाद्य दिवशी नीट खाल्ल नाही तरी आई-बाबा बेचैन होतात. आजारपणात अन्नाची वासना गेली तरी काहीतरी थोडेफार खाव म्हणून पालक जीवाचा आटापेटा करतात. आणि इथे लेकीकडुन अशी अपेक्षा Angry

आत्ताच काही सुवचने वाचली:
- उपाशी राहून फळफळाट होत असती तर सगळे भिकारी सुखी नी श्रीमंत असते.
- विवस्त्र राहील्याने देव जवळ करत असता (दिगंबर, नंगा साधू) तर कपडे न मिळणारे गरीब देवाच्या मांडीवर बसले असते.
देवाला / अल्लाला वाटत असतं की स्रीने पूर्ण अंग कायम झाकून ठेवावं तर त्याने कपड्याचा शोध लागेपर्यंत वाट बघण्यापेक्षा पहिल्यापासूनच स्रीला कासव किंवा गोगलगायीसारखं कवच दिलं असतं.

बातमीत "एका धर्मगुरूने" असा उल्लेख केलेला वाचला, तेव्हाच कळले की ही घटना हिंदू धर्मातली नाही.
>>> घटना कुठल्याही धर्मातली असो, अश्या प्रकारे एका लहान मुलीचा अश्या प्रकारे जीव जाणे हे नक्कीच धक्कादायक आहे.

http://www.religiousforums.com/threads/hyderabad-a-class-xiii-student-di...

ही बातमी धक्कादायक तर आहेच पण त्याहून पुढचा कळस म्हणजे त्या मुलीच्या मृतदेहाची मिरवणूक काढण्यात आली Sad

सारासार बुद्धी गहाण ठेवली की असलं काही घडत. 21 व्या शतकात देखील मागास मनोवृत्ती पाठ सोडायला तयार नाही Angry तिच्या आई वडिलांना यात काही चुकीचे वाटले नाही हे संताप जनक आहे .

<<सारासार बुद्धी गहाण ठेवली की असलं काही घडत. 21 व्या शतकात देखील मागास मनोवृत्ती पाठ सोडायला तयार नाही राग तिच्या आई वडिलांना यात काही चुकीचे वाटले नाही हे संताप जनक आहे .>>

---- मुलगी गेल्यावरही मृतदेहाची मिरवणूक काढली जात असेल तर पालकान्ना मानस तज्ञान्च्या मदतीची नितान्त अवशक्ता आहे. अशा प्रकाराला मानवी हत्या समजण्यात यावे.

इतर लोक नॉनव्हेज खातात म्हणून हे लोक त्यांना आपल्या सोसायटीत फ्लॅट घेऊ देत नाहीत, मग स्वतःच्याच मुलांची अशी हत्या केलेली चालते का? ती कुठल्या नियमात बसते? कुठल्या प्रकारची अहिंसा आहे ही?

न बाप बडा न मैय्या, द होल थिंग इज दॅट के भैय्या सबसे बडा रुपैय्या!

तुम्ही कोणी असे पाहिले नाही म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटते. लांब जायला नको, आमच्या दाराला दार लागून असलेले जैन शेजारी आहेत त्यांच्या मुलीने नववीत असताना अठ्ठाई (८ दिवस उपास) केला. नंतर अधेमधे १/२ दिवसाचे उपास इ. चालूच होते. १२ नंतर पालिताणा (जैन धार्मिक तीर्थस्थळ जे उंचीवर आहे) येथे महिनाभर रोज ४ वेळा चढउतर असे १ महिना केले.. कहर म्हणजे या चातुर्मासात ४८ दिवसांचा उपास केला.. सिध्दीतप म्हणतात त्याला ... २ दिवस उपास १ दिवस जेवण, मग ३ दिवस उपास १ दिवस जेवण, नंतर ४, ६, शेवटचे काहीतरी १६ दिवस सलग उपास... अन याचा पारणा मोठा झोकात मोठ्या मैदानात अनेक लोकांचा झाला. भोजनावळी, शोभायात्रा झाली.. .. ही मुलगी हाडेहाडे दिसतील अशी झालेली... पोलीसांना बोलवावे असे मला वाटलेले.

असे जैन जमातीमधे दुर्देवाने फार चालते.. अन वाईट म्हणजे समाजात हे फार बहुमानाचे मानतात.. कोणी मेले तरी काही वाटत नसावे. Sad

घरची परिस्थिती जर चांगली नसेल, तर मुलींना दिक्षा घ्यावी लागते. म्हणजे लग्न होत नाही, याला कारण अफाट श्रीमंतीचे वेड. काय विडंबनात्मक स्थिती आहे. जो राजकुमार होता, तो वैभवाचा त्याग करुन भगवान महावीर या पदाला पोहोचला. आणी दुसरीकडे हे भगवान महावीरांना आपला आदर्श, आपला देव मानणारे लोक ऐहीक सुखाकडे पळत चाललेत. नुसती हाव चढलीय. आपल्या समाजात ( मराठी ) हुंड्याचे प्रमाण जरा कमी होत चाललेय तर यांच्यात वाढत चाललेय. घरच्या वृद्ध लोकांना सुद्धा हे धर्माच्या नावाखाली संथारा घ्यायला लावतात. ( संथारा हे उच्च व्रत आहे, पण याचा गैरफायदा घेतला जातोय. संथारा म्हणजे अन्न-पाण्याचा त्यात्ग करुन जीवन समाप्त करणे)

घरची परिस्थिती जर चांगली नसेल, तर मुलींना दिक्षा घ्यावी लागते >>> केवळ असेच आहे असे नाही... उच्च शिक्षीत अन श्रीमंत घरातील मुले, मुली, वयस्क सुध्दा दीक्षा घेताना पाहिलेत..

याआधीही मागे अशीच एक बातमी आली होती. एका मोठ्या बिझिनेस फॅमिलीमधली एक मुलगी साध्वी झाली. तिचं तर लग्नंही ठरलं होतं पण तिनं ते रद्द करून साध्वी होण्याचा निर्णय घेतला. असाच मोठा गाजावाजा करून ती साध्वी झाली. मग बातमी आली की बापाला बरंच कर्ज झालं होतं, देणेकरी मागे लागले होते. मग त्यासाठी वेळ काढण्यासाठी, आणि साध्वी होताना तिला मिळणार्‍या भेटींसाठी वगैरे आईबापांनी तिला साध्वी होण्यास भाग पाडले. आपल्या मुलीच्या आयुष्याचं आपल्या हातानी असं मातेरं करून पुढच्या आयुष्यात आईबापांना कशी काय मनःशांती मिळत असेल?

अत्यंत भिकारडी प्रथा आहे. कायद्यानं गुन्हा म्हणून घोषित केली पाहिजे.

<<कायद्यानं गुन्हा म्हणून घोषित केली पाहिजे.>>
------ अन्धश्रद्धेविरुद्ध काही सुधारणा घडवणारा कायदा दाभोलकर आदी सुचवत होते. किती अत्यावश्यक वाटत आहे. पण मग अशा सुधारकान्च्या हत्या होतात, झालेल्या हत्येचा तपासच होत नाही, शिक्षा खुप दुरवरची गोष्ट आहे.

घरच्या वृद्ध लोकांना सुद्धा हे धर्माच्या नावाखाली संथारा घ्यायला लावतात.
>>
इब्लिस यांनी यावर लिहिले होते.

ही बातमी पेपर मधे वाचली तेव्हा खूप धका बसला होता. त्या चिमुरडीबद्दल खूप वाईट वाटले. तिचे पालक आणि संबंधितांचा संताप आला.

आपल्या मुलानं कधी एखाद्य दिवशी नीट खाल्ल नाही तरी आई-बाबा बेचैन होतात. आजारपणात अन्नाची वासना गेली तरी काहीतरी थोडेफार खाव म्हणून पालक जीवाचा आटापेटा करतात. आणि इथे लेकीकडुन अशी अपेक्षा राग >>>>>>>> +१

त्यामानाने आपला स माज चांगलाच सुधारित आहे असे वाटायला लागलेय

अनघा., आमचाच सोसायटीतल्या जैन बांधवांनी या चातुर्मासात एक फलक लावलेला ज्यात कोणी किती दिवस उपास केलेत हे ज्याच्या त्याच्या फोटोसकट अभिमानाने नमूद केलेले. चातुर्मास संपल्यानंतर या मंडळीचा सत्कारही केला गेला .
मिनिमम उपास लिमिट 1 महिन्याची होती . काय बोलणार आता Uhoh

वर्षभरापूर्वी पुण्यात एका मुलाला त्याच्या सख्ख्या आईनेच अनेक दिवस उपाशी ठेऊन शेवटी त्याची हत्या केली. यावर्षी हि घटना. अशा बातम्या वाचून काळजाचा थरकाप उडतो. हि खरेच माणसे आहेत का? या दोन्ही घटनांमागची पार्श्वभूमी भिन्न असली तरी दोन्ही केसेस मध्ये इतक्या दिवसांत आजूबाजूच्या कुणालाही म्हणजे अक्षरशः कुणालाही या विषयी आवाज उठवावा वाटला नाही याचे प्रचंड आश्चर्य वाटते! खरच कम्माल आहे. निदान सोशल मिडियात तरी आवाज उठवायचा. इतकी माध्यमे, इतकी कनेक्टीव्हिटी आहे. फालतू मेसेजेस ग्रुप मध्ये फोरवर्ड करणे मात्र जोमात सुरु असते.

मुलीचा खून केला आहे. पिरीयड.

जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवा. फाशी द्या. आडवे येणाऱ्याना जन्मठेप द्या. विषय संपवा. चर्चा करण्यासारखे काही नाही.

किती दुर्दैवी प्रकार...:-( भारतात आत्महत्या सुद्धा गुन्हा समजतात. You are not allowed to take your own life.
या अशा अतिरेकी श्रद्धेच्या जीव्घेण्या प्रकारांना सुद्धा गुन्हा*च* समजलं जावं.

या दांपत्याला मुलगा होता का आणि त्याला त्यांनी किती दिवस उपवास करायला लावला होता हे सुद्धा पहायला हवे.

Pages