उपवास श्रद्धा की हत्या?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 October, 2016 - 13:33

हैदराबाद येथे एका १३ वर्षीय मुलीला कुटुंबाच्या भरभराटीसाठी तब्बल १० आठवडे, जवळपास ६८ दिवस उपवास करायला लावला. त्यात त्या मुलीचा अखेर मृत्यू झाला.

चेन्नईतील एका धर्मगुरुने मुलीला चातुर्मासचे उपवास करायला सांगा असा सल्ला दिला होता. यामुळे तुमचे व्यवसायात झालेले नुकसान तर भरुन निघेल आणि तुम्हाला घसघशीत नफाही मिळेल असे सांगितले होते. उपवास संपला त्या दिवशी घरात महाप्रसाद ठेवला होता. आणि या कार्यक्रमाला तेलंगणचे एक मंत्रीदेखील उपस्थित होते.
उपवास सोडल्यानंतर मात्र मुलीची प्रकृती खालावली. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपवासामुळे तिच्या मूत्रपिंडाचेही नुकसान झाले होते. यामुळे ती कोमामध्येच गेली. शेवटी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सविस्तर बातमी ईथे वाचा
http://www.loksatta.com/desh-videsh-news/13-year-old-girl-died-due-to-fa...

मुर्खपणा म्हणावे तर हे लोकं कुठल्या गावखेड्यातले दुर्गम भागातले अशिक्षितही नाहीत. एखाद्या दिवसाचा कडक उपवास, किंवा एक वेळ खात आठदहा दिवस वा महिन्याभराचा उपवास आणि त्यामागील श्रद्धा समजू शकतो. पण एका अल्पवयीन मुलीला एवढ्या प्रदिर्घ कालावधीसाठी उपवास करायला लावणे याला तर नरबळीसारखी अंधश्रद्धा म्हणायला हवी. आणि एखादा समारंभ करत तो साजरा केला जातो, त्याला मंत्री हजेरी लावतो वगैरे सारेच धक्कादायक आहे.

जिथे कायदा आत्महत्येलाही गुन्हा मानतो तिथे हा एक आयुष्य संपवण्याचाच प्रयत्न झाला. दुर्दैवाने त्यात यशही आले. मुलीचे वय लक्षात घेता तिच्यावर हा उपवासाचा निर्णय लादणारे तिचे घरचे आणि ते सो कॉलड धर्मगुरू या सर्वांवर हत्येचाच गुन्हा दाखल करायला हवा. जेणेकरून भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये. आशा करतो की हि आमच्या धर्माची प्रथा परंपरा आहे म्हणत संबंधित यातून मोकळे सुटू नयेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या समाजातले पुढच्या पिढीतले तरूण तरी किमान डोकं ताळ्यावर असलेले निपजायला हवे होते. पण दुर्दैवाने असंही फारसं कुठे दिसत नाही. तरणीताठी एक संपूर्ण पिढी अश्या कुजक्या सडक्या विचारांनी बरबटून त्याचेच भुषण मानताना पाहिलं की खरंच जीव कळवळतो.
आमच्या खालीही एका१३-१४ वर्षांच्या जैन मुलीने तो कोणता तो डोंगर दिवसातून ४ वेळा चढा-उतरायचे व्रत केले होते महीनाभर. उपाशी राहून. तिची आई हे मला अभिमानाने सांगायला आलेली मुलीला सोबत घेऊन. मला तिची कीवही येईना!
आणि ही लोकं कुठल्या नक्की आधारावर स्वतःला शुद्ध शाकाहारी आणि अहिंसक समजत असतील? अहिंसक असणं केव़ळ तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर अवलंबून असतं? संपूर्ण शांत डोक्यानं, खूप अनुभवांती आणि विचारांती जर मी मांसाहारी असण्याचा निर्णय माझ्यापुरता घेतलेला असेन तर मी यांच्याहून जास्त अहींसक आहे असं माझं मत आहे!

मला हे वाचून बेफींची हिच कथा आठवली.
मामी | 10 October, 2016 - 11:44 >> तुम्हीही बहुतेक हेच म्हणत आहात.

>>>>>
हा हेच असणार.

बेफी तुमची कथा, खर्‍या घटनेवर आधारीत आहे का?

तुम्ही कोणी असे पाहिले नाही म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटते. लांब जायला नको, आमच्या दाराला दार लागून असलेले जैन शेजारी आहेत त्यांच्या मुलीने नववीत असताना अठ्ठाई (८ दिवस उपास) केला. नंतर अधेमधे १/२ दिवसाचे उपास इ. चालूच होते. १२ नंतर पालिताणा (जैन धार्मिक तीर्थस्थळ जे उंचीवर आहे) येथे महिनाभर रोज ४ वेळा चढउतर असे १ महिना केले.. कहर म्हणजे या चातुर्मासात ४८ दिवसांचा उपास केला.. सिध्दीतप म्हणतात त्याला ... २ दिवस उपास १ दिवस जेवण, मग ३ दिवस उपास १ दिवस जेवण, नंतर ४, ६, शेवटचे काहीतरी १६ दिवस सलग उपास... अन याचा पारणा मोठा झोकात मोठ्या मैदानात अनेक लोकांचा झाला. भोजनावळी, शोभायात्रा झाली.. ... >>>>
हि मुलगी १४ वर्षाची तरी असेल ना. मी जिथे काम करते त्या साहेबाचा मुलगा एक ७ वर्षाचा व एक ८ वर्षाचा. दोघांनीही हे वर दिलेत ते उपवास केले. आता त्यांचे १०८ दिवसाचे उपवास सुरु आहेत ज्यात ते एकदाच सकाळी ६ वाजता जेवतात त्यानंतर दिवसभर कोमट पाणी तेही संध्याकाळी ६ नंतर बंद Sad
मी बोलले साहेबांना की एव्हढ्या लहान मुलांकडून का असे उपवास करुन घेता तर त्यावर ते म्हणाले की त्या मुलांचीच इच्छा होती Uhoh

मी बोलले साहेबांना की एव्हढ्या लहान मुलांकडून का असे उपवास करुन घेता तर त्यावर ते म्हणाले की त्या मुलांचीच इच्छा होती अ ओ, आता काय करायचं>>>>> मला प्रश्न पडतो की ईतक्या लहान वयात कोणाला ऊपास - तापस करायची ईछा कशी होते...

मी तर अजुन ही कधी ऊपास करणार सांगीतले तर मम्मी संध्याकाळी साबुची खिचडी करुन देते आणी दुसर्या दिवशी रोजचे जेवण...

ह्यांचे आईवडील करुच कसे देतात ईतके कडक ऊपवास

मला सुध्दा आईवडीलांचाच राग येतो. शेजारणीला विचारले तर म्हणे, तिची इच्छा आहे अन तिला करु दिले नाही तर आम्हाला पाप लागेल.. काय बोलणार.. अस्सा राग आला मला. कान पकडून जेवायला बसवा की.. :रागः

सकाळ/संध्याकाळ प्रार्थनास्थळी जाऊन 'धर्मगुरूं'ची व्याख्याने ऐकणार्‍या 'अल्पसंख्यांक' समुदायांकडून अशाच प्रकारच्या अतिरेकी वागणूकीची अपेक्षा ठेवता येते.

कुणा मानवाधिकार कार्यकर्त्यामुळे त्या कुटुंबावर गुन्हा दाखल केलाय असे वाचनात आले. (आजकाल मानवाधिकारवाले म्हणजे अतिरेक्यांना मदत करणारे अशी इमेज केली गेलिये.) तेव्हा, अलिया भोगासी..

आपल्या मुलानं कधी एखाद्य दिवशी नीट खाल्ल नाही तरी आई-बाबा बेचैन होतात. आजारपणात अन्नाची वासना गेली तरी काहीतरी थोडेफार खाव म्हणून पालक जीवाचा आटापेटा करतात. आणि इथे लेकीकडुन अशी अपेक्षा
>>>>>>>>>
अगदी हेच सर्वप्रथम मनात आलेले. मी लहानपणी आईवडीलांवर रागावलो तर मुद्दाम उपाशी राहायचो आणि ते मला बाबापुता करत काहीतरी खा म्हणून विनवणी करायची. ईथे अगदी आईलाही दया येऊ नये... या नात्यात जर असे काही घडत असेल तर मूळ विचारसरणीच किती सडलेली आहे याचा अंदाजा येतो.

वरचे काही प्रतिसाद, उपवास मुलीने स्वताच्या इच्छेने करणे याची शक्यताच नाही. एकतर तिचे वय आणि उपवासामागचे कारण पाहता तो लादला होता. तो देखील बळजबरीने. ती बिचारी भूकेने जेवणही मागत असेल. तिला दमदाटी करत ते दिलेच गेले नसेल. बस्स दिवस मोजणे एवढेच तिच्या हातात उरले असेल..

त्या अंत्ययात्रेच्या मिरवणूक सोहळ्याबद्दल नण्तर वाचले. आणि काही उरले सुरले वाटायचेही नाहीसे झाले.

जवळपासच्या कोणीच कसा याबाबत आवाज उठवला नाही, तक्रार केली नाही, एकालाही ही बुद्धी किंबहुना हिम्मत झाली नाही हे खरेच अनाकलनीय आणि तितकेच दुर्दैवी. सोशलमिडीया नावाचे साधन आज प्रत्येकाच्या मोबाईलवर उपलब्ध असताना त्याचा वापर करायचे जरी कोणाला सुचले असते तर..

जवळपासच्या कोणीच कसा याबाबत आवाज उठवला नाही, तक्रार केली नाही, >>> what about electronic and print media? These days they make so much hue and cry about things like "bhagwangadavar Pankaja taina dasara melavyala parvanagi nahi", "dabholkar, kalburginchya khunyana pakadle nahi" and all such news and completely silent on this horrendous news!! On one side they will talk about dabholkar's andhashadhra nirmulan and other side they will show all remote villages devichi/devachi jatra and some bullock race in some village as our rich culture... >:(

कठीण आहे. बातमी वाचुनच कळले की कोणत्या धर्मातली असेल. Sad

मुलीचा खून केला आहे. पिरीयड.
जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवा. फाशी द्या. आडवे येणाऱ्याना जन्मठेप द्या. विषय संपवा. चर्चा करण्यासारखे काही नाही.>>>+१००

झाडू, सहमत.

मला वाटतं पैशाच्या हांवेपेक्षां सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्याची हौस ही या अघोरी प्रकारांमागची व त्याचं प्रदर्शन करण्यामागची प्रेरंणा असावी [ जी 'सती' या प्रकारामागेंही होतीच ]. त्यामुळे दोष [ मानलाच तर ! ] व्यक्तीनिष्ठ आहे तितकाच सामाजिकही आहे.

सगळं जैन समाज त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला आहे, आमच्या धार्मिक बाबीमध्ये लक्ष घालू नका असे त्यांनी सुनावले आहे. हा समाज प्रचंड धनाढ्य आहे आणि जाहिराती बंद होण्याच्या भीतीने सगळे मीडिया वाले शेपूट घालणार हे उघड आहे. आज लोकमत ला त्या मुलीचे पालक कसे दुःखी आहेत आणि कशी चुकीची माहिती मुद्दाम पसरवली जात आहे यावर भला मोठा लेख आला आहे.

@ भाऊ, त्यामुळे दोष [ मानलाच तर ! ] व्यक्तीनिष्ठ आहे तितकाच सामाजिकही आहे.>>> हे पटतंय! समाजानेच अशा व्यक्तींना प्रतिष्ठा आणि प्रोत्साहन देणे बंद केले तर अशा घटना घडणार नाहीत.

<< समाजानेच अशा व्यक्तींना प्रतिष्ठा आणि प्रोत्साहन देणे बंद केले तर अशा घटना घडणार नाहीत. >> आणि , तिथंच तर घोडं पेंड खातंय . उदा. << सगळं जैन समाज त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला आहे, आमच्या धार्मिक बाबीमध्ये लक्ष घालू नका असे त्यांनी सुनावले आहे.>> !!!!

जाहीराती बंद होण्याच्या भितीने मिडीया शेपूट घालणार हे समजू शकतो. पण न्यायालयाचे काय. ते तर न्याय करू शकतात. योग्य निर्णय देऊ शकतात. देत नाहीत नेहमीच हे कबूल, कारण ते पुराव्यावर चालते. तिथे सलमानही सुटतो. पण ईथे जे घडलेय ते उघड आहे. हे कुठल्या कायद्यात बसवून शिक्षा करायचीय किंवा कुठल्या कायद्याच्या पळवाटेचा सहारा घेत मोकळे सोडायचे आहे ईतकेच ठरवायचे आहे. ईथे न्यायव्यवस्थेची इच्छाशक्ती आणि नियत बघायची आहे.

<< ईथे न्यायव्यवस्थेची इच्छाशक्ती आणि नियत बघायची आहे. >> न्यायव्यवस्था कदाचित शिक्षेचा बडगा दाखवूं शकेलही पण त्या त्या समाजातीलच पुरोगामी वर्गाने याबाबत सक्रीय पुढाकार घेणं हाच खरा परिणामकारक उपाय ठरूं शकतो, असं मला वाटतं.

ते लोक इतके कर्मठ आहेत की काही बदल होईल असे वाटत नाही. पुढच्या वेळी अशा बातम्या बाहेर येणार नाहीत याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल

<< ते लोक इतके कर्मठ आहेत की काही बदल होईल असे वाटत नाही. >> याबाबतींत आपल्या कांहीं संतांचे, शाहिरांचे व अगणित समाजसुधारकांचे महाराष्ट्रावर प्रचंड उपकार आहेत याची जाणीव होते. इथला कर्मठपणा त्यानी नाहीसा केला म्हणणं मूर्खपणाचं असलं तरीही नविन,चांगले विचार साफ झिडकारण्याच्याच वृत्तीला जरा तरी पायबंद या मंडळीनी घातला, हेंही निर्विवाद.

>>त्या त्या समाजातीलच पुरोगामी वर्गाने याबाबत सक्रीय पुढाकार घेणं हाच खरा परिणामकारक उपाय ठरूं शकतो, असं मला वाटतं.

इथे मायबोलीवर पुरोगामी हा शब्द शिवी म्हणून वापरला जातो. समाजात तीन तीन पुरोगाम्यांची हत्या होते आणि एकाही गुन्हेगाराला शिक्षा होत नाही. सरकार बीफ खाण्यावर बंदी आणते आणि गोराक्षस मोकाट सुटतात. मंत्री स्वतःच यज्ञ करायला लागतात आणि विचारवंत त्याचं समर्थनच करतात. अशा परिस्थितीत फार हतबल/हताश वाटतं भाऊकाका

मला वाटतं पैशाच्या हांवेपेक्षां सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्याची हौस ही या अघोरी प्रकारांमागची व त्याचं प्रदर्शन करण्यामागची प्रेरंणा असावी [ जी 'सती' या प्रकारामागेंही होतीच ]. त्यामुळे दोष [ मानलाच तर ! ] व्यक्तीनिष्ठ आहे तितकाच सामाजिकही आहे.>>>>>>>>>>>>>>>>>> १.
ज्याप्रमाणे सतीप्रथा कायद्याने बंद करण्यात आली तशा ह्या आणि इतर कोणत्याही धर्मातील अनिष्ट प्रथा ,ज्या मानवी आयुष्याशी निगडित असतील त्या कायद्याने बंद कराव्यात.

बर्‍याच वर्षांपूर्वी आमच्या एका शेजार्‍याच्या मुलीने कोणत्या तरी वेळी (बहुदा पर्युषणाच्यावेळी) उपवास,मौनव्रत घेतले होते.३०-३२ दिवस आंघोळ नाही,नखे कापणे नाही इ. प्रकार होते नंतर तिची रथात बसवून मिरवणूक काढली होती इतकेच आठवते.पण जिवंत होती, अजूनही आहे.

माझ्या ऑफीसातले सी ए झालेले जैन तरुण आणि तरुणी असले उपास करण्यात धन्यता मानतात आणि त्यांनी असे उपवास ठेवलेले आहेत. जैन धर्मातच काय हल्ली सगळ्याच धर्मात नवी पिढी आधीच्या पिढीपेक्षा जास्त कर्मठ निघतेय हे माझे निरीक्षण आहे.

आज लोकमत ला त्या मुलीचे पालक कसे दुःखी आहेत आणि कशी चुकीची माहिती मुद्दाम पसरवली जात आहे यावर भला मोठा लेख आला आहे. >>> लोकमतवाले दर्डा स्वतः जैनच आहेत ना?

जैन धर्मातच काय हल्ली सगळ्याच धर्मात नवी पिढी आधीच्या पिढीपेक्षा जास्त कर्मठ निघतेय हे माझे निरीक्षण आहे.
>>>>>>>>> अगदी बरोबर आहे.त्यातही जातीविषयी अभिमान(?) वाढत चालला आहे.

जैन धर्मातच काय हल्ली सगळ्याच धर्मात नवी पिढी आधीच्या पिढीपेक्षा जास्त कर्मठ निघतेय हे माझे निरीक्षण आहे.
>>>>>>>>> अगदी बरोबर आहे.त्यातही जातीविषयी अभिमान(?) वाढत चालला आहे. >>>
खरय! आणि त्याला व्रुत्तवाहिन्या खत घालत आहेत. रोज कुठल्या ना कुठल्या गावचे देउळ किवा जत्रा अगदि रन्गवुन दाखवल्या जातात

पण न्यायालयाचे काय. ते तर न्याय करू शकतात. योग्य निर्णय देऊ शकतात. देत नाहीत नेहमीच हे कबूल, कारण ते पुराव्यावर चालते. >>> हल्ली काही आठवड्यापुर्वी एका महिला न्यायाधिशाला लाच घेताना पकडले त्याची बातमी आलेली.
आपण वेगाने खड्ड्यात चाल्लो आहोत असे वाटते... Sad

त्या समर्थन करणाऱ्या लेखाची लिंक मिळेल का?
जर लहानपणा पासून असा उपास करून मरण येणे पवित्र असा ब्रेन वॊश झाला असेल तर मुलं स्वतः अन्नपाणी नाकारत असतील, इतरांनी आग्रह करून पण.खूप भयंकर आहे हे.

>> त्या समर्थन करणाऱ्या लेखाची लिंक मिळेल का? >>

http://epaper.lokmat.com/EpaperImages/mum/11102016/d316678-large.jpg

अजून एक लिंक:
http://www.hindustantimes.com/india-news/don-t-interfere-jain-leaders-te...

अत्यंत दुर्दैवी घटना. अर्थात या घटनेचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही.

जैन धर्मातच काय हल्ली सगळ्याच धर्मात नवी पिढी आधीच्या पिढीपेक्षा जास्त कर्मठ निघतेय हे माझे निरीक्षण आहे.
>>>>>
निघतेय पेक्षा बनवली जातेय असे म्हणावे लागेल. कारण येणारा जीव हा कोरी पाटी घेउन जन्माला येतो. सध्या राजकारणातही अचानक जातपात धर्माला अवास्तव महत्व आले आहे. जबाबदार कुठलाही पक्ष वा संघटना का असेना या प्रकारचे घाणेरडे राजकारण करत सारेच आहेत.

वरचे समर्थनाचे लेख वाचायला हवेत.

फारच भयानक!
लहान पणापासून अशा गोष्टींचा उदो उदो ऐकला पाहिला असेल तर त्याचा परीणाम होतोच. सामाजिक दबाव म्हणा, पीअर प्रेशर म्हणा, यातूनही हे होते. समाज धनाड्य आहे, एकजूट आहे त्याचाच परीणाम म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेच्या खुळचट कल्पनांपायी कोंडी देखील केली जाते. लहान मुलांना होणार्‍या परीणामांची जाणीव नसते तेव्हा त्यांची इच्छा असली तरी अनेक गोष्टी आपण त्यांना करु देत नाही, कायदाही मनाई करतो तसे काहीतरी असल्या अघोरी उपास /व्रत वगैरे बाबत करायला पाहीजे. लहान मुलाला कंसेट द्यायचा अधिकार नाही असे करावे म्हणजे ब्रेन वॉश करुन 'त्यांची इच्छा' म्हणून हे उपास करवणे थांबेल.

Pages