उपवास श्रद्धा की हत्या?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 October, 2016 - 13:33

हैदराबाद येथे एका १३ वर्षीय मुलीला कुटुंबाच्या भरभराटीसाठी तब्बल १० आठवडे, जवळपास ६८ दिवस उपवास करायला लावला. त्यात त्या मुलीचा अखेर मृत्यू झाला.

चेन्नईतील एका धर्मगुरुने मुलीला चातुर्मासचे उपवास करायला सांगा असा सल्ला दिला होता. यामुळे तुमचे व्यवसायात झालेले नुकसान तर भरुन निघेल आणि तुम्हाला घसघशीत नफाही मिळेल असे सांगितले होते. उपवास संपला त्या दिवशी घरात महाप्रसाद ठेवला होता. आणि या कार्यक्रमाला तेलंगणचे एक मंत्रीदेखील उपस्थित होते.
उपवास सोडल्यानंतर मात्र मुलीची प्रकृती खालावली. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपवासामुळे तिच्या मूत्रपिंडाचेही नुकसान झाले होते. यामुळे ती कोमामध्येच गेली. शेवटी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सविस्तर बातमी ईथे वाचा
http://www.loksatta.com/desh-videsh-news/13-year-old-girl-died-due-to-fa...

मुर्खपणा म्हणावे तर हे लोकं कुठल्या गावखेड्यातले दुर्गम भागातले अशिक्षितही नाहीत. एखाद्या दिवसाचा कडक उपवास, किंवा एक वेळ खात आठदहा दिवस वा महिन्याभराचा उपवास आणि त्यामागील श्रद्धा समजू शकतो. पण एका अल्पवयीन मुलीला एवढ्या प्रदिर्घ कालावधीसाठी उपवास करायला लावणे याला तर नरबळीसारखी अंधश्रद्धा म्हणायला हवी. आणि एखादा समारंभ करत तो साजरा केला जातो, त्याला मंत्री हजेरी लावतो वगैरे सारेच धक्कादायक आहे.

जिथे कायदा आत्महत्येलाही गुन्हा मानतो तिथे हा एक आयुष्य संपवण्याचाच प्रयत्न झाला. दुर्दैवाने त्यात यशही आले. मुलीचे वय लक्षात घेता तिच्यावर हा उपवासाचा निर्णय लादणारे तिचे घरचे आणि ते सो कॉलड धर्मगुरू या सर्वांवर हत्येचाच गुन्हा दाखल करायला हवा. जेणेकरून भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये. आशा करतो की हि आमच्या धर्माची प्रथा परंपरा आहे म्हणत संबंधित यातून मोकळे सुटू नयेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Firstpost ला एका 16 वर्षाच्या मुलाबद्दल लिहिले आहे, नाव बदलून, तो म्हणतो की त्याच्या आईने त्याला जबरदस्ती केली, बाकीची मुले उपास करू शकतात तर तू का नाही म्हणत त्याला करायला लावला. आता तो म्हणतो की थोडे दिवस उपास ठीक वाटतो पण इतके दिवस झेपलं नसता. म्हणजे तिथे आता मार्कांप्रमाणे किती दिवस उपास करतात याचीही शर्यत आहे का काय?
जो जास्तीत जास्त उपास करेल त्याचा मान मोठा, आराधनाला असेही बाल तपस्विचा दर्जा मिळाला आहे. करा यातही चढाओढ.

लहान पणापासून अशा गोष्टींचा उदो उदो ऐकला पाहिला असेल तर त्याचा परीणाम होतोच. सामाजिक दबाव म्हणा, पीअर प्रेशर म्हणा, यातूनही हे होते. समाज धनाड्य आहे, एकजूट आहे त्याचाच परीणाम म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेच्या खुळचट कल्पनांपायी कोंडी देखील केली जाते. लहान मुलांना होणार्‍या परीणामांची जाणीव नसते तेव्हा त्यांची इच्छा असली तरी अनेक गोष्टी आपण त्यांना करु देत नाही, कायदाही मनाई करतो तसे काहीतरी असल्या अघोरी उपास /व्रत वगैरे बाबत करायला पाहीजे. लहान मुलाला कंसेट द्यायचा अधिकार नाही असे करावे म्हणजे ब्रेन वॉश करुन 'त्यांची इच्छा' म्हणून हे उपास करवणे थांबेल.>>>> +१

धार्मिक कर्मकांडांचे, उपासा- तापासाचे ग्लोरीफिकेशन होते ( बहूतांशी सगळ्याच धर्मात). तसे करणे कमी करावे लागेल.

त्या मुलीने स्वेच्छेने केले असतिल उपास पण तिला ते करू देणे आणि तिला ते उपास करावेसे वाटणे याला तर नक्कीच आईवडील, नातेवाईक आणि धर्मगुरु जिम्मेदार आहेत.

@ साधना, जैन धर्मातच काय हल्ली सगळ्याच धर्मात नवी पिढी आधीच्या पिढीपेक्षा जास्त कर्मठ निघतेय हे माझे निरीक्षण आहे.
>>>>> सद्या नवरात्रात अनवाणी चालण्याचा प्रकार शाळाकॉलेजच्या मुलांमुलींमध्येसुद्धा फारच फोफावताना दिसतोय. पावलांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने असे करणे कितपत बरोबर आहे? असे करताना झालेले अपघात, जखमा, आजार यांचे वार्तांकन आणि चर्चा लोकजागरण होण्याच्या दृष्टीने प्रसिद्धी माध्यमात येणे आवश्यक आहे.

समर्थन वाली लिंक वाचली.अत्यंत इडियॉटिक आणि लूजर समर्थन आहे.
मागच्या वर्षी ३४ दिवस उपास केल्यावर तिचा सत्कार झाला होता.(म्हणजे एक प्रकारचा यशाचा कैफ आणि इगो मसाज द्यायचा हे उपास केल्यावर.)हे जरा कोण गोविंदा किती उंच थरांच्या दही हंडी वर चढतो सारखी स्पर्धा वाटली.
कधीकधी मिळणार्‍या प्रसिद्धी साठी अल्पवयीन मुलं वेड्यासारख्या रिस्क घेत असावीत.आई वडिलांनी स्वेच्छेने केले वगैरे म्हणून अंग काढलेले पटले नाही.
या धर्माचे जाऊदे, कोणत्याच धर्मात कडक व्रतांचे कौतुक केलेले आवडत नाही.
(अपार्ट फ्रॉम धिस, पर्यूषण केल्यावर उपास सोडण्याची एक विशीष्ठ पद्धत आहे, अगदी कमी द्रव पदार्थ, मग डाळीचे पाणी मग हळूहळू खाणे वाढवणे.तेही नीट केले नसावे.या धर्माला हे उपास करताना नॉन जैन विश्वासू फिजिशियन कडून तपासणी आणि परवानगी घेणे,चालू असताना अधून मधून डायट आणि तब्येत तपासणे बंधनकारक करावे.पुण्याची आणी भरभराटीची इतकी हौस आहे तर थोडे पैसे खर्च करायला हरकत नाही.)

धर्मात ढवळा ढवळ करू नका एटीट्यूडचे लाड का पुरवले जातात कल्पना नाही. आणि मग कोणते लाड पुरवायचे आणि कोणते नाही हे कसे ठरवतात. बहुधा नुकतेच तलाक तलाक तलाक बरखास्त करण्यात आलेय तसेच याचेही झाले पाहिजे.

पुढे काहीही झाले नाही आणि काही होणारही नाही. आठवडाभरात सगळे विसरून पण जातील असे काही झाले होते. माध्यमांनी तर दखल घेणेही थाम्बवले आहे.

>> मागच्या वर्षी ३४ दिवस उपास केल्यावर तिचा सत्कार झाला होता.(म्हणजे एक प्रकारचा यशाचा कैफ आणि इगो मसाज द्यायचा हे उपास केल्यावर.)हे जरा कोण गोविंदा किती उंच थरांच्या दही हंडी वर चढतो सारखी स्पर्धा वाटली.

अगदी बरोबर. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्याना शिक्षा झालीच पाहिजे. पण जे ह्या मुलीच्या नावे गळा काढत आहेत त्यातले कितीजण दहीहंडीची उंची कमी करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे समर्थन करत होते आणि कितीजण विरोध करत होते हे पण पाहायला हवे.

जैन धर्मातच काय हल्ली सगळ्याच धर्मात नवी पिढी आधीच्या पिढीपेक्षा जास्त कर्मठ निघतेय हे माझे निरीक्षण आहे.>>> + १००.
वर कोणीतरी अनवाणी पायानी चालायाचे वगैरे ९ दिवसांच्या उपवासा चा उल्लेख केला आहेच.
उपवास ह्य ह्या पदधतीने करा अस कुठे लिहले आहे का जैन धर्मात ????
आठवडाभरात सगळे विसरून पण जातील असे काही झाले होते. >>> Sad अगदी खरंय.

ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.
वाढत्या वयात एक्स्ट्रा न्युट्रिशन ची गरज असताना असे उपास करावेत - करू द्यावेत ही चुकीची गोष्ट वाटतें
पण एका वयानंतर उपास करायला कुणाची हरकत नसावीं.
आपल्या शरीराची आणि मनाची ताकद आपल्याला माहित. कारणं आपल्याला माहित.

>>>> वाढत्या वयात एक्स्ट्रा न्युट्रिशन ची गरज असताना असे उपास करावेत - करू द्यावेत ही चुकीची गोष्ट वाटतें . पण एका वयानंतर उपास करायला कुणाची हरकत नसावीं. <<< अचूक मुद्दा Happy सहमत.

बरोबर, आपला कायदाही १८ वर्षाच्या खालच्या मुलामुलींना सज्ञान मानत नाही. त्यामुळे त्यांच्या स्वेच्छेचा निर्णय असला तरी तो कायद्याने गुन्हा समजून पालकांवर कारवाई करण्यात यावी.

अनु कदाचित आपले reference points वेगवेगळे असतील. माझ्या आजोबांनी सव्वाचार महिने उपास केलेले. फळांवर. त्यातला सव्वा महिना फक्त पाण्यावर. ते करत असताना ते रोज एक नवचंडी करायचे.
वयाच्या ७५ व्या वर्षी ते गिरनारच्या १० हजार पायऱ्या चढून गेले. त्यानंतर बद्रीनाथ केदारनाथ केला.
ते ८० पेक्षा जास्त वर्ष जगले.
त्या वयातही हे सगळं करून ते त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जिवनात अतिशय ॲक्टिव होते. तिथही त्यांनी अचाट कामं केली.

लोकहो,

मी शेवटी ज्या कंपनीत नोकरीला होतो तेथे मी बारा वर्षे नोकरी केली. अनुभव असा की यच्चयावत व्यवसाय जैनांच्या ताब्यात आहेत.

पैश्यापुढे कोणाचेही काहीही चालत नाही. त्यांच्याकडे दोनच गोष्टी आहेत. अतीप्रचंड पैसा आणि अतीप्रचंड एकी!

पहिल्यामुळे दुसरे आणि दुसर्‍यामुळे पहिले असा प्रकार आहे.

कोंबडी की अंडे, ह्यासारखे!

प्रतीसरकार चालवण्याइतके त्यांचे आर्थिक सामर्थ्य आहे. ते उघडपणे हिंसा करत नाहीत आणि त्यांचे गुन्हे कधीही प्रकाशात येत नाहीत. त्यांचे वर्तन अतिशय मैत्रीपूर्ण असते. मात्र कर्मठपणात ते पहिल्या क्रमांकावर आहेत.

इथे आपण सगळेच वेड्यासारखे आपापले राजकीय पक्ष, जात / धर्म वगैरे मुद्दे घेऊन चर्चा गाजवतो. सायलेन्टली सत्ता गाजवणारे वेगळेच आहेत. ते तोवर धोकादायक नाहीत जोवर तुम्ही त्यांच्याबाबत पर्सनल होत नसता. मात्र त्यांच्या खासगी बाबींमध्ये लक्ष घालणे अत्यंत घातक ठरू शकते.

एखाद्या विशिष्ट कम्युनिटीबद्दल हे माझे म्हणणे नाही, असे मी कधीही म्हणणार नाही. हे अगदी त्यांच्याचबाबतचे म्हणणे आहे. इतकी एकी कोणीही दाखवत नाही. इतके कोणीही सुबत्ता गिळंकृत करत नाही.

त्यांच्याकडे काय झाले, हे बाहेर आले हेच खूप आहे.

-'बेफिकीर'!

बेफिकीर तुमच्या आताच्या पोस्टला>>>>>>+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

पैसा आहे हे कबूल. पैश्याने आलेली ताकद आहे हे ही कबूल. पण या किंवा एखाद्या समुदायाची लोकसंख्या किती असते?

जनरल स्टेटमेंट आहे.

एखाद्या समुदायात एकी असते त्यामुळे त्यांची शक्ती वाढते हे ही कबूल पण यांच्याविरोधात कोणी एकवटले तर ..

जगात प्रत्येकाचा बाप असतो....
आणि असतोच

हे प्रकरण बाहेर आले हे नशीब वगैरे ठिक आहे, पण कोणी ठरवलेच तर प्रकरणाला आणखी पुढेही नेऊ शकतो.. प्रश्न ईतकाच कि कोणाला मुद्दामहून पडली नाहीये, कारण मरेनात त्यांच्या कर्माने हा त्यामागचा विचार.. आणि सरकार स्वताहून काही करणार नाहीये, हा झाला सरकारचा नाकर्तेपणा!

बाकी पैसा असूनही ज्यांच्या मुलांच्या वाट्याला असे जगणे आणि मरणे येते त्यांच्या दुर्भाग्याबद्दल खरंच आणखी वाईट वाटते.

>>एखाद्या समुदायात एकी असते त्यामुळे त्यांची शक्ती वाढते हे ही कबूल पण यांच्याविरोधात कोणी एकवटले तर ..
>>जगात प्रत्येकाचा बाप असतो....
>>आणि असतोच

दुर्दैवाने या अशा कम्युनिटीज आणि त्यांच्या अंतर्गत बाबींमधे नाही. Sad

>>>>प्रश्न ईतकाच कि कोणाला मुद्दामहून पडली नाहीये, कारण मरेनात त्यांच्या कर्माने हा त्यामागचा विचार.. आणि सरकार स्वताहून काही करणार नाहीये, हा झाला सरकारचा नाकर्तेपणा!<<<<

असे म्हणता येईल का ऋन्मेष?

इतर समाजांमध्येही प्रॉब्लेम्स आहेत. धाग्यातील प्रश्नापेक्षा अधिक मोठी आणि भीषण संकटे आहेत. आपल्या घरचे प्रश्न सोडून कोणी इतरत्र कसे लक्ष देईल? थोडेसे व्यक्तीगत लिहितो, पण तुम्ही तरी एक धागा काढण्यापलीकडे काही केले आहेत का?

सरकार (कोणत्याही पक्षाचे) मुळात चालतेच ह्या पैश्यांवर! सरकार काय करणार?

शेवटी बळी तो कान पिळी ह्या म्हणीला शरण गेलेले जग आहे हे! जग म्हणजे संपूर्ण सजीवजमात, माणसासकट!

आपल्या घरचे प्रश्न सोडून कोणी इतरत्र कसे लक्ष देईल?
<<

आजकाल आपलं घर दुरुस्त करायचं सोडून इतर धर्म सुधारायची "भाजप"सरकारची पॉलिसी आहे. तेव्हा जे काय चाल्लंय ते बरोबरच आहे.

>>>> झाडू | 13 October, 2016 - 22:42 नवीन

आपल्या घरचे प्रश्न सोडून कोणी इतरत्र कसे लक्ष देईल?
<<

आजकाल आपलं घर दुरुस्त करायचं सोडून इतर धर्म सुधारायची "भाजप"सरकारची पॉलिसी आहे. तेव्हा जे काय चाल्लंय ते बरोबरच आहे.
<<<<

ऋन्मेष,

इच्छा असल्यास आणि शक्य असल्यास प्रतिसाददात्यांना विषयावर बोलण्याची विनंती करावीत.

>>>> झाडू | 13 October, 2016 - 23:00 नवीन

एल ओ एल. कित्ती तो मानभावीपणा.
<<<<

हे कोणाला उद्देशून लिहिले आहे?

You want to talk to me, you can talk to me. Asking the thread maker to tell me something, is humbug.

use vipu if you want. cya bye.

इच्छा असल्यास आणि शक्य असल्यास प्रतिसाददात्यांना विषयावर बोलण्याची विनंती करावीत.
>>>>>>>>>

बेफिकीरजी, हा तुम्हा दोघांचा ईंटरनल प्रश्न आहे. माझ्याकडून तुम्ही मध्ये हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा का करत आहात? मी तर एडमिन सुद्धा नाही. साधा धागाकर्ता आहे

पण त्याचवेळी मी सरकार, न्यायालय, उर्वरीत समाजाकडून काही अपेक्षा करतोय ती तुम्हाला पटत नाहीये, वा अवाजवी अवास्तव वगैरे वाटतेय.

आपण एक बरोबर म्हणालात की मी धागा काढण्याव्यतिरीक्त काय केले? खरं आहे याव्यतीरीक्त काही नाही केले. आणि धागा काढणे किंवा कोणी काढलेल्या धाग्यावर घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवणे वा तसाच विरोधाचा प्रतिसाद टाकणे यात काही तीर मारणे नसते हे देखील कबूल. पण तरीही ते आपल्या लेव्हलला काहीतरी असते. एकंदरीतच आपण सोशलसाईटवर उठणारया आवाजाला अंडरएस्टीमेट करत आहात असे जाणवते.

>>>>हा तुम्हा दोघांचा ईंटरनल प्रश्न आहे. माझ्याकडून तुम्ही मध्ये हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा का करत आहात? मी तर एडमिन सुद्धा नाही. साधा धागाकर्ता आहे<<<<

म्हणूनच इच्छा असल्यास, असे म्हणालो. तुम्ही धागाकर्ता असल्यामुळे तुम्हाला इतरांचे 'ईंटर्नल' प्रश्न कदाचित तुमच्या धाग्याखाली नको असतील असे वाटले. माफ करा.

>>>>पण त्याचवेळी मी सरकार, न्यायालय, उर्वरीत समाजाकडून काही अपेक्षा करतोय ती तुम्हाला पटत नाहीये, वा अवाजवी अवास्तव वगैरे वाटतेय<<<<

मला 'अपेक्षा व्यक्त करणे' अवाजवी / अवास्तव वाटत नाही आहे. अपेक्षा ठेवणे अवाजवी, अवास्तव वाटत आहे.

जशी, ही वाक्ये:

>>>>पण यांच्याविरोधात कोणी एकवटले तर ..
>>>>कोणी ठरवलेच तर प्रकरणाला आणखी पुढेही नेऊ शकतो

>>>>पण तरीही ते आपल्या लेव्हलला काहीतरी असते. एकंदरीतच आपण सोशलसाईटवर उठणारया आवाजाला अंडरएस्टीमेट करत आहात असे जाणवते.<<<<

ह्या विधानातून नकळतपणे तुम्ही तुमची लेव्हल 'फक्त सोशल साईट्सवर आवाज उठवणारा' अशी बनवत आहात. तुमचे सामर्थ्य खूप अधिक आहे. किंबहुना, सोशल साईट्सवर आवाज उठवण्याची गरजच पडू नये इतके सामर्थ्य तुमच्या भूमिकेत आणि प्रतिवादात असते. तसेच, एक दुर्मीळ संयमही आहे तुमच्यात! आशा आहे की मी तुम्हाला ओव्हर एस्टिमेट करत नाही आहे.

बाय द वे, अपेक्षा व्यक्त करणे म्हणजे:

>>>>पण यांच्याविरोधात कोणी एकवटले तर ..

ह्याच्या ऐवजी:

ह्यांच्या विरोधात एकजूट व्हावी!

>>>>कोणी ठरवलेच तर प्रकरणाला आणखी पुढेही नेऊ शकतो

ह्याच्या ऐवजी:

कोणीतरी ठरवून प्रकरण धसास लावावे

चला, आता राजकीय संबंध आणी पार्ट्या इन्डायरेक्टली आत आल्याच आहेत तर स्पष्टच लिहीते. काँग्रेस, समाजवादी, राष्ट्रवादी, कम्युनीस्ट, जनता दल या सारख्यांना मुस्लिम, दलित्,ख्रिश्चन व इतर लोक/ समाज मते देतात. तर भाजप व शिवसेना यांना ब्राह्मण, मराठा, जैन, गुजराथी, मारवाडी व इतर ओबिसी मते देतात ही वस्तुस्थिती आहे.

फार पूर्वी काँग्रेसला, ज्यांना उच्च वर्णिय समजले जाते, ते लोक मतदान करत होते. आता भाजपा आल्याने फरक पडुन व्यापारी समाज काँग्रेसपासुन दूर गेला. पण जेव्हा १९७५ पर्यंत काँग्रेसच मुख्य होते, तेव्हाच जर समान नागरी कायद्यासारखे कायदे निर्माण झाले असते तर बरे झाले असते. निदान समाजावर ( सर्व भारतीय ) वचक बसला असता, पण मतासाठी काहीही करणार्‍या काँग्रेसपासुन तसा धडा गिरवुन इतर पक्षीयांनी तेच सुरु केल्याने सगळी खिचडी झालीय, मग दोष कोणाला द्यावा? पक्षांना? लोकांना की सरकारला?

Pages