उपवास श्रद्धा की हत्या?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 October, 2016 - 13:33

हैदराबाद येथे एका १३ वर्षीय मुलीला कुटुंबाच्या भरभराटीसाठी तब्बल १० आठवडे, जवळपास ६८ दिवस उपवास करायला लावला. त्यात त्या मुलीचा अखेर मृत्यू झाला.

चेन्नईतील एका धर्मगुरुने मुलीला चातुर्मासचे उपवास करायला सांगा असा सल्ला दिला होता. यामुळे तुमचे व्यवसायात झालेले नुकसान तर भरुन निघेल आणि तुम्हाला घसघशीत नफाही मिळेल असे सांगितले होते. उपवास संपला त्या दिवशी घरात महाप्रसाद ठेवला होता. आणि या कार्यक्रमाला तेलंगणचे एक मंत्रीदेखील उपस्थित होते.
उपवास सोडल्यानंतर मात्र मुलीची प्रकृती खालावली. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपवासामुळे तिच्या मूत्रपिंडाचेही नुकसान झाले होते. यामुळे ती कोमामध्येच गेली. शेवटी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सविस्तर बातमी ईथे वाचा
http://www.loksatta.com/desh-videsh-news/13-year-old-girl-died-due-to-fa...

मुर्खपणा म्हणावे तर हे लोकं कुठल्या गावखेड्यातले दुर्गम भागातले अशिक्षितही नाहीत. एखाद्या दिवसाचा कडक उपवास, किंवा एक वेळ खात आठदहा दिवस वा महिन्याभराचा उपवास आणि त्यामागील श्रद्धा समजू शकतो. पण एका अल्पवयीन मुलीला एवढ्या प्रदिर्घ कालावधीसाठी उपवास करायला लावणे याला तर नरबळीसारखी अंधश्रद्धा म्हणायला हवी. आणि एखादा समारंभ करत तो साजरा केला जातो, त्याला मंत्री हजेरी लावतो वगैरे सारेच धक्कादायक आहे.

जिथे कायदा आत्महत्येलाही गुन्हा मानतो तिथे हा एक आयुष्य संपवण्याचाच प्रयत्न झाला. दुर्दैवाने त्यात यशही आले. मुलीचे वय लक्षात घेता तिच्यावर हा उपवासाचा निर्णय लादणारे तिचे घरचे आणि ते सो कॉलड धर्मगुरू या सर्वांवर हत्येचाच गुन्हा दाखल करायला हवा. जेणेकरून भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये. आशा करतो की हि आमच्या धर्माची प्रथा परंपरा आहे म्हणत संबंधित यातून मोकळे सुटू नयेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑगस्त २०१६ ची घटना - हरियाणा विधान सभेला दिगम्बर जैन साधू यान्नी मार्गदर्शन केले. दिगम्बर साधूला भाषण/ विचार मान्डण्यासाठी एका राज्याच्या विधानसभेचे आमन्त्रण मिळते... अशी घटना भारताच्या इतिहासात प्रथमच घडली असेल. अनेक प्रश्न निर्माण होतात. दोन्ही वेग-वेगळ्या घटना आहेत. पण जैन धर्माचा किती मोठा पगडा जन-मानसावर आहे.

गुगलल्यावर (जैन गुरु, हरियाना, विधान सभा) त्यान्चे विधानसभेत झडलेले भाषण एकायला मिळते.

कुठेही चर्चा नाही, आपत्ती नाही. विधानसभेत सर्व धर्माचे लोक येतात, उद्या एखाद्या राज्याच्या विधान सभेत मौलवी आला तर चालेल का ?

उदय, चर्चा आपत्ती नाही असं कोणी सांगितलं? 'आप' त्ती तर झालीच.

आप च्या विशाल ददलानी यांनी या प्रकारावर बोचरी टीका करणारं ट्विट केलं होतं. पण केजरीवाल यांनी विरोध केला, त्यांना हे तुम्ही उल्लेखलेले जैन साधू जवळचे आहेत.
मग विशाल यांनी माफी मागितली. आता बहुधा दिल्ली असेम्बलीत पण या साधूंचं भाषण असेल.
केजरीवाल म्हणाले- "I met Tarun Sagar ji Maharaj last year. Our family regularly listens to his discourses on TV. We deeply respect him and his thoughts."
Tarun Sagar ji Maharaj is a very reverred saint, not just for jains but everyone. Those showing disrespect is unfortunate and shud stop (sic)."

नन्तर विशाल यांनी आपण आम आदमी पार्टि सोडतो आहोत असंही म्हटलं होतं.

सनव.. त्यांनी जी पोस्ट एडिट केली ती मी वाचलीच नाही.. so it doesn't matter.. पण आधीच्या पोस्टसाठी.. बूंदसे गयी वो.. Happy
एकंदर त्यांच्याच कमेंटप्रमाणं.. पूर्वग्रहावर इलाज नसतो Happy

कुठेही चर्चा नाही, आपत्ती नाही >> उदय.. या बाफचा हा विषय नाही तरीही.. त्या भाषणावर बर्‍याच चर्चा झाल्या, अर्थात सगळ्या चुकीच्या कारणासाठी. तरूणसागर महाराजांनी (कुठल्याही महाराजांनी) राजकारणापासून दूरच राहिलेलं चांगलं. विशाल दादलानीनं जे ट्वीट केलं होतं त्यात काहीही चुकीचं नव्हतं. त्यात महाराजांचा किंवा जैन धर्माचा अपमान नव्हता. हरियाणातल्या राजकारण्यांवरची ती टिपण्णी होती. पण बिचार्‍याला त्याचे फारच परिणाम भोगावे लागले. (विशाल दादलानी आप समर्थक असल्यानं, आपला पाण्यात बघणार्‍यांकडून जास्त टीका झाली अशी शंका जरूर येते ;))

विशाल दादलानी आप समर्थक असल्यानं, आपला पाण्यात बघणार्‍यांकडून जास्त टीका झाली अशी शंका जरूर येते डोळा मारा)

आप विरोधकांचं समजू शकतं पण केजरीवाल व आपचे मंत्री यांनी विशालवर टीका केली ही त्यावेळी न्यूज बनली होती.

वर विशाल दादलानी यांनी नक्की काय ट्विट केलं होतं त्याचा उल्लेख नाही. मनीष यांनी म्हटलंय, तसं त्यांची टीका एका का धर्मगुरूला विधानसभेत बोलावून सभापतींपेक्षा उच्चासनावर बसवून त्यांचे प्रवचन तिथे होण्यावर होती.
हाच कार्यक्रम एखाद्या वेगळ्या सभागृहात झाला असता, तर आक्षेपाचे तितकेसे कारण नव्हते.
विशाल दादलानींचे ट्विट : If you voted for these people, YOU are responsible for this absurd nonsense! No #AchcheDin, just #NoKachcheDin."

पुढच्या एका ट्विटमध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे : I apologise to you wholeheartedly, Sir. I hope that religion and governance can be separated, for India's sake.

-----
ही कालची आकाशवाणीवरची बातमी : Mr. Modi will also call on Jain seer Acharyashri Vidhya Sagar Maharaj, who is staying in Bhopal during Chaturmas.

हिंदु असो वा जैन असो वा इतर प्रमुख धर्मीय, कोणाला कुठे, कशासाठी आणी किती महत्व द्यावे यालाही काही मर्यादा आहेत.

I hope that religion and governance can be separated, for India's sake.>>>>>> विशाल दादलानीचे स्टेटमेंट बरोबर आहे.

पण आपले लोक मग ते कोणत्या का धर्माचे असेना, कुठल्या तरी भयगंडाने पछाडले गेलेत की काय असे आता वाटायला लागले आहे.

Pages