Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२४ पासून 100 days चालू होतेय.
२४ पासून 100 days चालू होतेय. आदिनाथ कोठारे इन्स्पेक्टर आहे बहुतेक आणि तेजस्विनी पंडित आहे.>>>>>हो बहुतेक आदिनाथ कोठारेच आहे. मालिकेचे नाव "१०० डेज".
[आणि आजचो रिपोर्टय द्येवा कोणीतरी माकां >>>>>>भाऊकाका आधीच्या भागासारखाच कालचा भाग. जास्त काही विशेष नाही.
>>भाऊकाका मस्त
>>भाऊकाका मस्त व्यंगचित्र
+१
आदिनाथ कोठारेच आहे असं आजच्या लोकसत्तात आलंय. म्हणे ती पण रहस्यमय सिरियल आहे. झाला एव्हढा डोस पुरे झाला. मी काही ती पहायच्या फंदात पडणार नाही. डॅम इट!
लोकसत्तात हेही आलंय की राखेचाने अनेक विक्रम केलेत
सलग ५० दिवस शूटींग वगैरे. आणि म्हणे मालिकेतल्या कलाकारांना पण गुन्हेगार कोण आहे ते माहित नाहीये. कसं माहित असणार? पांडूला स्वतःलाच माहित नसेल ना. वर आणखी 'घराघरात लोकप्रिय झालेले कलाकार' म्हणे. घराघरात शिव्या खात असलेले असं म्हणायचं असेल बहुतेक. तसंच हेही छापून आलंय की व्यक्तिरेखा इतक्या सुरेख लिहिल्या होत्या की नवख्या कलाकारांनाही काम करताना अडचणी आल्या नाहीत. नानांची व्यक्तिरेखा कशी लिहिली होती काय माहित.
माधव हा एक अपृष्ठवंशीय प्राणी
माधव हा एक अपृष्ठवंशीय प्राणी आहे
काल अभिराम आर्चिसला म्हणतो की गाडी घेऊन जा. तो उडत जाणार होता का मग? आणि म्हणे गणेशाला बरोबर घेऊन जा. तू काय करणार आहेस म्हणे इथे बसून?
कालचो आणि परवाचो एपिसोड बघूनशान माका एक प्रश्न पडलो आसा. आवस माधव,दत्ता, अभिरामाची का सरिताची? ते गप र्हवलेत आणि ही कित्याक बोंबलतेय?
भाऊकाका, काल फार काही झालं
भाऊकाका, काल फार काही झालं नाही. कोणी काही करत नाही हे बघून निलिमाने आपल्या डॉक्टरला फोन लावला आणि सासूची लक्षणं सांगितली. टेलेमेडिसिन दुसरं काय! डॉक्टरने सलाईन लावा असं सांगितलं आणि काही औषधं/इंजक्शन्स आणायला सांगितली. ती आणायला आर्चिस गेला. त्याने गणेशला बरोबर यायला सांगितलं तेव्हा दोघांत मेडिसिन आणि जादूटोणा ह्यापैकी आजार बरे करायला काय अधिक उपयुक्त ह्यावर एक मौलिक चर्चा झाली. ती भगत आणि डॉक्टर्स ह्यांना सारखीच उपयुक्त ठरावी. डॉक्टरकडे जुनं का होईना सलाईन सापडलं. जुनं असूनही ते लावा असं निलिमाने त्याला सांगितलं. सरिताने पुन्हा गुरवाक बोलवायचा धोशा लावला. तिची आणि निलिमाची पुन्हा एकदा ह्या विषयावरून तूतू-मैमै झाली. दत्ताने नाथाला पाठवलं. गुरव आला. त्याने पुन्हा मी सांगितलं होतं असं म्हटलं. पुन्हा निलिमाने वाद घातला. पुन्हा गुरव तुमचं काय ते बघून घ्या म्हणून निघून गेला.
दत्ताने पांडूसमोर विश्वासरावने माईला विष दिलं असं पुन्हा म्हटलं. पुन्हा त्याला बघून घेऊन अशी धमकी दिली. त्याला आपण मराठी रजनीकांत असल्याचा साक्षात्कार झालेला दिसतोय. पांडूने आत जाऊन हेच त्या डॉक्टरसमोर म्हटलं. दत्ताने विश्वासरावला फोन करून माझ्या आईला विष दिलंस असं म्हटलं. आता विश्वासचा तो पोलिस (एसीपी प्रद्युम्नची कॉपी करणारा) त्याने फोन करून साहेब येताहेत तोवर अंगार्याला कोणी हात लावू नका असं म्हटलंय. (विश्वासरावचे हात कोकणात गेलेत का? स्वतः फोन करायला काय धाड झाली होती?)
लोकहो, नवीन मालिका येत आहे ,
लोकहो, नवीन मालिका येत आहे , २४ ओक्टोबर पासुन , राखेचा जागी. '१०० days' म्हणुन, आदिनाथ कोथारे, तेजस्विनी पन्डीत हीची, सस्पेन्स आहे. कालच प्रोमो पाहीला.
आतां भुयारतले सांगाडे, नेने
आतां भुयारतले सांगाडे, नेने आणि अजयचो खून ह्ये केसीस जातले पोलीस स्टेशनाच्या कपाटात आणि माईच्या खूनाची/ खूनाच्या प्रयत्नाची केस घेतलो विश्वासराव हातात ! ' ह्याचा छडा मी तीन आठवड्यात लावीनच, हा माझा शब्द आहे तुम्हाला !', ह्यां पालुपदय तो ऐकवतलोच समस्त नाईकमंडळीक [ आणि आमकांय ] !!

रिटायरमेंट जवळ इली कीं सरकारी नोकरीत कोणाची बदली करणत नाय, अशी एक प्रथा आसा; आतां सिरीयल संपत येताहा म्हणान विश्वासरावाची बदली अशीच कॅन्सल केल्यानी कीं काय !
माई डोळे उघडत नाय म्हटल्यार
माई डोळे उघडत नाय म्हटल्यार तिचे झील अर्ध्या अर्ध्या तासाचे दोन भाग झाले तरी तिका तालुक्याच्या हास्पिटलात घेऊन जायत नाय म्हणान माजो जीव कावलेलो. मगे जरा थंड डोक्याने इचार केल्यार लक्षात इला, माई इतक्या टणक्या हत, तेंका उचलणार कोण?!!
एनीवे दोन दिवस शुद्ध मूर्खपणा चालला आहे.
100 डेज म्हणजे १०० दिवस असेल
100 डेज म्हणजे १०० दिवस असेल का मालिका?
<< लोकसत्तात हेही आलंय की
<< लोकसत्तात हेही आलंय की राखेचाने अनेक विक्रम केलेत >> छपाईची चूक ! चक्रम केलेत असतलां तां !! ही सिरीयल बघून मीं पन त्याच वाटेवर जातहंय, असां माकाय जाणवताहा !!!
चक्रम केलेत असतलां तां !!
चक्रम केलेत असतलां तां !!
रात्रीस खेळ चालेच्या सेट वर
रात्रीस खेळ चालेच्या सेट वर चला हवा येऊ द्याची टिम click on the link below
https://www.youtube.com/watch?v=q2AJktSC6F0
रात्रीस खेळ चालेच्या सेट वर
रात्रीस खेळ चालेच्या सेट वर चला हवा येऊ द्याची टिम click on the link below>>>> आता त्यान्च काय काम तिकडे?
ही सिरीयल आधीच विनोदी आहे, तिला आणखी विनोदी बनवायला आले आहेत का इकडे?
खर तर सध्या जी स्टोरी चाललीये त्यानुसार तिथे अस्मिता असायला हवी होती. शोधा म्हणजे सापडेल.
Old Picture of Nilima (when
Old Picture of Nilima (when she was a bit too fat,but still the Nauvari Saree is suiting her)
@सूलू_८२ रात्रीस खेळ चालेची
@सूलू_८२ रात्रीस खेळ चालेची टीम चला हवा येऊ द्यावर येणार आहै...
रात्रीस खेळ चालेच्या सेट वर
रात्रीस खेळ चालेच्या सेट वर चला हवा येऊ द्याची टिम >>> अस उलट लिहीलेल वाचल मी.:हहगलो:
रात्रीस खेळ चालेच्या सेट वर
रात्रीस खेळ चालेच्या सेट वर चला हवा येऊ द्याची टिम >>> अस उलट लिहीलेल वाचल मी.>> अरेच्चा, त्या लिंकवाल्या पोस्टीत तसंच लिवलंय हाॅनेस्टनी.
संपत इली शिरेल तर बघूक हवो, आता पांडून तयार केलेलो ह्यो जांगडगुत्तो विश्वासराव कसो सोडवता तो.
विश्वासरावच खल्नायक असेल .
विश्वासरावच खल्नायक असेल .
@Nidhii हो मी तेच लिहला
@Nidhii हो मी तेच लिहला आहै,
चला हवा येऊ द्याच्या टीम ने रात्रीस खेळ चालेच्या वाड्यात काही सीन शूट केल्यात जे चला हवा येऊ द्या वर टेलिकास्ट होईल.
माझो टीव्ही बंद पडलेलो तांच
माझो टीव्ही बंद पडलेलो तांच बरां होतां. पुढचो भाग लोकानी बघूंचो म्हणान शेवटचीं पांच मिनिटां कायतरी बघण्यासारखां दाखवतत ; बाकी सगळो असलो भुसोच भरतत प्रत्येक भागात - सरिता नवर्याची बाजू घेवन शीरो ताणता, दत्ता डोळे वटारून ' सोडूचंय नाय त्येकां' आराडता, माधव 'अरे हो, जरा शांत हो' म्हणता .... बघूंचां तर शंभर वेळां आपलां तांच तांच !!!
निलिमा नौ-वारी मध्ये भारी
निलिमा नौ-वारी मध्ये भारी दिसतेय की... शीरेल मधले
कपडे कित्ति बकवास आहेत...निदान तिचे तरी कपडे नीट द्यायला पाहीजे होते..सरीता च्या, देविका च्या साड्या तरी बर्या आहेत...
विश्वासरावाच्या कोणालातरी
विश्वासरावाच्या कोणालातरी ह्या लोकांनी ढगात पोचवलं असेल म्हणून तो बदला घ्यायला आला असेल. २२ला संपतेय म्हणजे २१, २२ ता. ला बघेन कदाचित.
निलिमा अंजिरी साडीत जास्त छान दिसतेय.
मला तर असे वाटते कि, काही
मला तर असे वाटते कि, काही रहस्य वगैरे उलगडणार नाही, पान्डु ने आधीच इतते घोळ घातले कि , सिरियल काही उलगडा न करताच बन्द होइल.
<< काही रहस्य वगैरे उलगडणार
<< काही रहस्य वगैरे उलगडणार नाही, पान्डु ने आधीच इतते घोळ घातले कि , सिरियल काही उलगडा न करताच बन्द होइल. >> सहमत. माका वाटता, मूळ कल्पना भूत-जादूटोणा, अघोरी विद्या व कपाटात/बिछान्यात साप, पायाचे उलटे ठसे, हलणारां फर्नीचर, घरावर दगडांचो पाऊस, जेवणात किडे, भिंतीत्सून रक्त, समुद्रावरसून व विहीरीतून पुकारो इ.इ. , दाखवून भयपट [ हॉरर सिरीयल] करूंचीच होती. पण सुरवातीकच त्येच्याविरुद्ध बोंब उठली म्हणान त्येची रहस्यकथा करण्याचो केविलवाणो प्रयत्न चललोहा. त्येना सिरीयलचो विचको आणि प्रेक्षकांचो पचको होताहा.
शेवटीं, अतर्क्य, खुळचट दुवे जोडून मेळ बसवण्याची कसरत केल्यानी तरी << सिरियल काही उलगडा न करताच बन्द होइल.>> ह्यांच खरां !!
काल सरिता ३ वेळा तेच बोलली
काल सरिता ३ वेळा तेच बोलली 'बाकी लोक हत ना. ते काही बोलत नाहीत. तुम्ही कित्याक बोलता. त्यांची आवस नाही हा का'.
माधव त्या भिंतीला टेकताना पाहून जुन्या हिंदी पिक्चरमधल्या नायिका आठवल्या. 'तुम्हारी मांग सुनी हो चुकी है' वगैरे ऐकल्यावर त्या हताश होऊन अश्याच भिंतीला टेकायच्या. तो डॉक्टर तर अशक्य आहे. तरी हे लोक काहीतरी बघा असं त्याला म्हणत होते. इन्स्पेक्टर तावडे उगाच नाथावर डाफरत होता. आणि विश्वासरावचा शर्ट आणि नाथाचे केस तेव्हढे अंधारात चमकत होते. उरलेले दिवस सुध्दा मालिका पाहणं अशक्य आहे.
दत्ताचा आरडाओरडा पाहून ह्या
दत्ताचा आरडाओरडा पाहून ह्या सगळ्यात त्याचाच हात असावा असं आता मला प्रकर्षाने वाटू लागलंय. सुषल्या मात्र गायब आहे. निदान 'ही नाईकांच्या पापाची फळं आहेत' असं म्हणायला सुध्दा खाली आलेली नाहिये.
माई गेल्या??
माई गेल्या??
मला तर असे वाटते कि, काही
मला तर असे वाटते कि, काही रहस्य वगैरे उलगडणार नाही, पान्डु ने आधीच इतते घोळ घातले कि , सिरियल काही उलगडा न करताच बन्द होइल.>+१११११११
त्यांची आवस नाही हा का'. >>
काय झाल, माई वाचल्या का
काय झाल, माई वाचल्या का गेल्या?
त्येना सिरीयलचो विचको आणि प्रेक्षकांचो पचको >>> विचको- पचको.:हाहा: मस्त.यमक जुळ्वलय तुम्ही काका.
Finally suspense is out...
Finally suspense is out... Hey sagla sushlya and neelima milun karat astat..
(No subject)
Pages