क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अजून लिमिटेड टू टेस्टकडे असलेली अ‍ॅडजस्टमेंट झाली नाही असे वाटतेय. >> मग हेच तर वेगळ्या शब्दांत काही दिवसांपूर्वी म्हणत होतो राव.

फा, मलाही मोहिंदर अमरनाथची आज आठवण आली. एका सिरीजच्या दोन्ही बाजूला फॉर्ममध्ये स्टीप स्लोप डाऊनवर्ड्स. ऑफकोर्स कोहलीचे तेवढे नाहीयेत.

ते वाचून मोहिंदर अमरनाथ आठवला. >>> तो देखिल दिल्लीवालाच ना! Happy

येईल! कोहली येईल लवकर फॉर्मात मायदेशी पण!

मला मोहिंदरची ती हँण्डल द बॉल आऊट झालेला तेंव्हाची मुद्रा अजून आठवतेय! कसला खजिल झालेला.. चेंडू ज्या हाताने बाजुला केला तो हात घट्ट धरून पॅव्हेलियनला गेला होता!

कोहलीबाबत कसोटीमध्ये लागणारे टेंपरामेंट आणि शॉट सिलेक्शन यांच्या सुधारणेला अजून वाव आहे हेच मी पहिल्या सामन्यातील त्याचे बाद होण्याचे प्रकार बघून बोलतो होतो. आमच्या व्हॉटसपग्रूपात. पण तेथील एक दोघे जण कोहलीचे टेंपरामेंट जगात बेस्ट आहे करत तावातावाने भांडायला आले. मग मी त्यांना वनडे आणि कसोटी यांच्या टेंपरामेंटमधील फरक समजवायच्या भानगडीत न पडता शांत राहिलो..

पण अर्थात, तो इम्प्रूव्ह करणार नक्कीच! कितीही चमकोगिरी करत असला तरी खेळाला सिरीअसली घेणार पठ्ठा आहे तो.

रहाणेबाबतही त्याचा भारतापेक्षा बाहेरचा परफॉर्मन्स चांगला आहे. अर्थात घरी कमीच खेळलाय तो तुलनेत... पुढे आकडे बदलतील ..

कोहलीच्या बाबतींत 'हाईप', 'चमकेगिरी' शब्द लागू पडत असले तरीही << खेळाला सिरीअसली घेणार पठ्ठा आहे तो.>> हेंही खरं आहे व त्याहीपेक्षां जागतिक दर्जाचा नि:संशय तो एक अप्रतिम फलंदाज आहे, हेंही मान्य केलंच पाहिजे. मला वाटतं त्याच्या ज्या आक्रमक वृत्तीचं वारेमाप कौतुक होतं, तीच त्याच्या प्रगतिच्या आड येत असावी. एक ठराविक पातळी गाठल्यावर जागतिक स्तरावर खेळताना आक्रमक वृत्ती दुय्यम ठरून नव नविन गोष्टी शिकून, आत्मसात करत स्वतःच्या खेळाचा दर्जा उंचावणं यालाच प्राधान्य येतं. कारण, त्या स्तरावर तुमच्याबद्दल गुणवत्तेमुळे आदरभाव व दरारा निर्माण झाला कीं वेगळं आक्रमक होण्याची गरजच नसते. कोहलीने 'ऑल टाईम ग्रेट'च्या सन्मान्य यादींत येण्यासाठी हा उंबरठा ओलांडण्याची वेळ आली आहे. .[ मला काय म्हणायचं आहे त्याचीं विनोद कांबळी व सचिन हीं बोलकीं उदाहरणं असावीत ].

भाऊ, ऋन्मेऽऽष, कोहली च्या टेंपरामेंट आणी सिरियसनेस बद्दल सहमत. कधी कधी माणुस स्वतःच्या प्रतिमेत / प्रतिज्ञेत फार अडकतो आणी भरकटतो. तसं होऊ नये ही सदिच्छा आणी होणार नाही ही अपेक्षा.

३१६ पर्यन्त मजल मारली कशीबशी!

पाहुया आता गोलंदाज काय करतायेत!
सगळी भिस्त त्यांच्यावरच आता!

भारत -३१६. साहाच्या अर्धशतकाचा महत्वाचा सहभाग.
पहिल्या कसोटीत पहिल्या डावाच्या ३१८ धांवा बर्‍या वाटल्या होत्या पण विकेट फिरकीला खास अनुकूल नसलेल्या या विकेटवर ३१६ काळजी वाटण्याइतपत कमी वाटतात. बघूं खेळ कसा उलगडतो तें.
आज कोहली गेंलरीत बसलेल्या गंभीरकडे जावून एक दोनदा बोलताना दाखवला. [ यातून मला कांही सुचवायचं मात्र नाहीय ]
चेंडूच्या टप्प्यांचा आलेख परत परत दाखवतात, तें जरा अति विश्लेषणात्मक वाटतं, निदान मला तरी -

आजी, तूं काय मॅचच्या पीचवर जावून झोपली होतीस ? aaaji.JPG

विकेटवर ३१६ काळजी वाटण्याइतपत कमी वाटतात. >>> असे आता तरी वाटतेय! बोलर्स ने अफलातून कमाल केली तर संगता येत नाही काही.. पण ३१६ गोलंदाजांसाठी समाधान करक नसला तरी अगदीच वाईट स्कोअर नाही..

आजी पीचवर>>> Lol

आज कोहली गेंलरीत बसलेल्या गंभीरकडे जावून एक दोनदा बोलताना दाखवला. [ यातून मला कांही सुचवायचं मात्र नाहीय ]
>>>>>>
मी हेच सुचवायला ईथे आलेलो.
बाजूला बसून छान चर्चाही चालू होती. हसत खिदळत गप्पा नाही तर मॅच डिस्कशन.
त्यातही आयपीएलमध्ये गंभीर आणि कोहली चे फारसे पटत नाही हे जाणवल्यानंतर हे विशेष.
त्यामुळे धवन दुसर्‍या डावातही गळपटला (ज्याचे चान्सेस खूप आहेत) तर गंभीर आत येणार हे नक्की.

पावसाने मॅच थांबलीय. चार विकेट पडल्यात. आणि अजून आश्विनचे खाते खुलायचे बाकी आहेच. फिरकी वेगवान दोघांसाठीही काही ना काही आहे खेळपट्टीत. तसेच थोडीशी अनिश्चितता. जी हळूहळू वाढत जाईन. तीनशे प्लस स्कोअर या पार्श्वभूमीवर चांगला वाटतोय. चौथ्या डावात त्यांना खेळायचेय. चार दिवसांत चार इनिंग सामना दिसतोय. पावसाने पाचव्या दिवसाला जाणार..

आपल्यालाही आता चिकाटी दाखवत सव्वादोनशे अडीचशे टाकावे लागणार.. गळपटलो चुकून सव्वाशे दिडशेत तर पुन्हा त्यांना सामन्यात आणू.. सुरुवातीचा न्यू बॉल पिरीअड महत्वाचा

खेळतोय कोहली!
पन्नासजवळ आलाय.
शतकही ठोकेल बहुधा.
शर्माने फटाफट ५० धावा जमवल्या तर या खेळपट्टीवर उपयुक्त वाटा ठरेल.
बॉल जुना होता जरा सोयीचे पडतय रन जमवायला. रहाणेने उगाच हाराकीरी केली.
२२५-२५० मारून टारगेट ३५० पर्यंत नेल्यास आपल्याला दोनदा नवीन बॉल वापरता येतो.

नोहिट बरा खेळला दुसर्‍या इनिंग मध्ये.. तरी सेंच्युरी हुकलीच... जडेजा टी-२० खेळयला आल्या सारखा खेळला आज.. अरे ही टेस्ट मॅच आहे रे... न्यूझीलंडला आजच परत बॅटींगला बोलवायचा विचार आहे वाटत आपल्या लोकांचा..

दोन इंटरेस्टिंग स्टॅट्स

पुजाराने २१९ बॉल्स मधे ८७ मारले. त्यात त्याचे १७ फोर्स होते. म्हणजे त्यातले ६८ रन्स १७ बॉल्स मधे मारले. बाकी २०२ बॉल्स मधे त्याने १९ रन्स काढले Happy

रोहित शर्माचे १३२ बॉल्स मधे ८२. त्यात ४८ रन्स हे ११ बॉल्स मधे, उरलेले ३४ हे १२१ बॉल्स मधे.

डुप्लेसी (की डुप्लेसिस्? विसरलो) ने ९३ बॉल्स मधे १११ रन्स काढले. त्यात १३ फोर्स. म्हणजे १११ पैकी ५२ रन्स हे १३ बॉल्स मधे. उरलेले ५९ रन्स हे ८० बॉल्स मधे - सगळे पळून काढलेले.

ही एकमेकांशी तुलना नाही. एक टेस्ट मधे आणि एक वन डे मधे आहे हे मला माहीत आहे. फक्त इंटरेस्टिंग वाटले म्हणून दिले.

माझा टीव्ही बिघडलाय. त्यामुळे मॅच पहातां येत नाही व त्यामुळे इथं पचकतांही येत नाहीं. [ एक गंमत- टीव्ही मेकॅनिकला फोन केला. त्याचा पहिलाच प्रतिसाद,- ' कोणता टीव्ही आहे ? म्हणजे फ्लॅट कीं जुना डबडा ? '. खरंच जग खूपच झपाट्याने बदलतंय.. पुजारासारखा नविन रक्ताचा, तंत्रशुद्ध फलंदाजही कसोटीत जरा संथ खेळला तर तात्काळ 'डबडा' छाप पडतोच त्याच्यावरही ! Wink ]

रोहित फलंदाजीपेक्षां विकेटस घेण्यातच अधिक यशस्वी होतोय, असं दिसतंय ;बघा ना, कालच इथंच किती जणांच्या विकेट घेतल्या त्याने ! Wink

पुढच्या कसोटीसाठी गंभीर आहे. रोहितला ओपन करायला सांगून गंभीरला सहावे खेळवावे. काय ते तासाभरात गेम चेंज करायचे आहेते पण होऊन जाईल. त्यालाही ओपन करायची सवय आहे. अश्विन ऐवजी जयंत यादव आणून बघायला हवे. अश्विनला पण विश्रांती पुढचे दौरे बघता. जडेजा ऐवजी मिष्रा असाही विचार होता पण दोन्ही स्पिनर बदलणे भयंकर रिस्की वाटते. जास्तीत जास्त २-१ होईल. पण पुढचे ८ सामने भयंकर चुरशीचे असतील तेंव्हा रोटेशन करायला सुरूवात करायला हवी.

आश्विन शिवाय भारतीय कसोटी संघ... हल्ली कल्पनाही करवत नाही Happy

तसेही आश्विन परदेशात फ्लॉप जातो.. असे म्हणतात... तर विश्रांतीचे खेळ परदेशात एक स्पिनरसह खेळून करणे उत्तम.. किंवा मग २०-२० आणि एकदिवसीय मध्ये जिथे आश्विन फलंदाज म्हणून कामाचा नाही आणि गोलंदाज म्हणून चार ते दहा ओवर टाकतो.

बाकी विश्रांतीची गरज आहे खरी त्याला.. त्याला नाही तर किमान त्याच्या बोटांना तरी.. बोटांशिवाय एखादी मॅच खेळला तर हरकत नाही Happy

ओके ओके. विश्रांतीची गरज आहेच हे म्हटलेय की. हल्ली मी फार पुढचे दौरे बघत नाही. एकेकाळी वर्षभराचे कॅलेंडर (कालनिर्णय) रंगवून कुठे सुट्ट्या आहेत आणि काय बघायला मिळणार हे नोंदवून ठेवायचो. गेले ते दिवस !

अश्विनला फक्त मर्यादित षटकांच्या सामन्यांतच विश्रांति देवून दुसर्‍या कुणा स्पीनरला खेळवणे याचा अर्थ तर त्याला सरळ सरळ असं सांगण्यासारखंच आहे - " अरे बाबा, आतां फलंदाजीला अनुकूल विकेट असणार. तिथं झोडूं देत ना पाहुण्यानी दुसर्‍या कुणा स्पीनरला ; कसोटीसाठी पुन्हा आहेतच ना ' स्पीनींग ट्रॅक्स ' तुला भरपूर विकेट मिळवून द्यायला !". कुंबळे, शेन वॉर्न, मुरली यांच्या प्रदीर्घ कारकिर्दींतही कधीं ऐकल्याचं आठवत नाहीं अशी 'विश्रांतीच्या गरजे'ची भाषा ! आणि खरंच तशी गरज असेलच तर कसोटीमधेही अश्विनच्या जागीं दुसर्‍या स्पीनरना संधी देणं क्रमप्राप्त समजावं, असं मला वाटतं.

Pages