मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी धन्यवाद.

अजय Redmi चाच विचार करत होतो, सोबत moto G4 plus चा.
पण Redmi आणि moto च्या सर्व्हिसबद्दलचे वाईट रिव्ह्युज आहेत. Lenovo ने Moto टेकओव्हर केले असले तरी त्याच सर्व्हिससेंटरमध्ये moto ला हॉरिबल सर्व्हीस मिळते असे वाचण्यात आले.
Lenovo K5 note हा Redmi note आणि G4 plus ला तोडीचा ऑप्शन वाटतोय.

G4 plus चुकून घेउ नका.

फोन चर्जिन्गला लावला कि मालफंक्शन करतो. बर्‍याच डिव्हायसेस ला हा प्रॉब्लेम आहे. अ‍ॅमेझोनची रिटर्न पॉलिसी किचकट तसेच बोगस आहे. त्यांनी वेगळे सर्विस डिपार्ट्मेंट चालू केलेय G4 plus साठी. ते सर्व्हिस अ‍ॅप डालो करायचे मग तो प्रॉब्लेम दिसलाच तेव्हा तर नशिब. शिवाय फोन रिप्लेस करून पाठवला तरी नेक्स्ट फोन तस्साच येतो (इथे मर्फी'स लॉ नाही तर बनावच असवा) असाही अनुभव.

रेडमी चा ऑफिसमधलल्या कलीग चा अनुभव - डोकोमो च्या पोस्ट्पेड सिमवर थ्री-जी चालत नाहीये.
सगळे प्रकार करून झाले. सर्विस सेंटर वाल्यांना पण हा प्रॉब्लेम नवीन. कालपासून व्हॉईस पण क्लिअर नाही म्हणतोय, नेटवर्क स्ट्राँग असूनही.

फिल्मी, मी g4 ऑर्डर केला होता अन दोन वेळेला रीप्लेस करुन फायनली रीफंड मिळाले. कस्टमर केअरला खूप भांड्लो. पण नंतर वेब्साईटवरुन रीटर्न अन रीफंड असे ऑप्शन निवडले. रीफंड झाले पैसे. पहिल्या फोनचा चार्जिंगचाच प्रॉब्लेम होता. कस्टमर केअर वाल्याने सुचवले की रीप्लेस करुन घ्या अन तो परत रीटर्न करुन रीफंड क्लेम करा. सो तसे केले.

त्यांनी वेगळे सर्विस डिपार्ट्मेंट चालू केलेय G4 plus साठी. ते सर्व्हिस अ‍ॅप डालो करायचे मग तो प्रॉब्लेम दिसलाच तेव्हा तर नशिब>> कस्टमर केर वाला खूप मागे होता की अ‍ॅप डालो करा वगैरे पण मी ते केले नाही.

विवो चा फोन २० के चा ऑफीसात दोन तीन जणांनी घेतलाय . ४ जीबी रॅम अन फास्ट आहे . बॅटरी पण चांगलीये. अजून शोधतोच आहे. घाई नाही. पाहू.::फिदी:

माझा मायक्रोमॅक्स युनिट१ बदलायचा आहे. १०के च्या आसपास बजेट आहे. खास काही स्पेशल फीचर्सची अपेक्शा नाही.
( या फोननंतर कोणताही मस्तच वाटेल बहुतेक) दोनेक वर्षं तरी जावा अशी माफक अपेक्षा आहे.

वन प्लस ३ कसा आहे? पुण्यात टेलिफोन शॉपी आणि क्रोमा मध्ये सेल्समन नी खूप नाव ठेवली....सर्विस सेन्टर नाहित भारतात अस त्यान्च म्हणनं....हे खरय का?

बजेट फोन मध्ये रेड मि नोट ३ घ्या १३-१३.५ मध्ये येतो मस्त आहे. दोन घेतलेत

>> आजपासून अ‍ॅमॅझॉन आणि फ्लिपकार्टवर ५ तारखेपर्यंत ११ हजाराला मिळतोय हा.

असुस झेनफोन २ ३२ जीबी ९९९९ मधे मिळत आहे. ५०% पेक्षा जास्त स्वस्त. कसा आहे. रेडमी ३ च्या तुलनेत बराय का?

९९९९ चा स्टॉक संपलाय. असुस मस्तच आहे.

मला फोन इएमआय वर घ्यायचाय. ऑनलाइन घ्यावा का. रिफंड घ्यायची वेळ आली तर बँक फाईन लावते ना.

वन प्लस चांगले आहेत सगळेच.

असुस वगैरे सारखे भारंभार ऍप्स नसतात त्यात. क्लीन नीट युआय आहे.
प्रॉब्लेम बॅटरीचा आहे मात्र. भरभर संपते. अर्थात वापरावर आहे तेही.
आयफोनपेक्षाहि चांगले आहेत वन प्लस हा अनुभव.

ओह ते राहिलेच.
तो चार्जर शक्यतो वापरुच नका.
सगळ्या मोबाईल फोरम वर त्यासंबंधात जे एक्स्पर्ट आहेत त्यांचा सल्ला असा आहे की फास्ट चार्जिंग करणारे चार्जर नकाच वापरू. जितक्या फास्ट चार्जिंग होते तितक्या फास्ट उतरतेही. शिवाय बॅटरी लाईफही कमी होते म्हणे.
मी एक्स्पर्ट नाही पण आपण आपले अजून माहिती घेऊन पाहावे.

थोडं तारतम्य, अधिकची माहिती ,थोडेबहुत नशीब यावर ठरवा कोणता फोन घ्यायचा.
ते सर्विस सेंटर बद्दल का बागुलबुवा करतात कोण जाणे. देशी कंपन्या पण महिना लावतातच. सॅमसंगचा खराब अनुभव स्वतःला व पाहण्यातही आहेच.

दोन महिने वन प्लस थ्री वापरत आहे. उत्तम चालू आहे. बॅटरी लाईफ मस्त.. कमी वापरावर दोन दिवस देखिल चालतो. डॅश चार्जर वापरताना चांगल्या स्टेबल सप्लाय वर लावावा असं वाटतं. तसा लावल्यास मोबाईल आजिबात गरम होत नाही. OS updates वेळेवर मिळत आहेत. सर्व्हीस सेंटर विषयी कल्पना नाही. अॅमेझॉनवरुन घेतला होता.

माझ्यासाठी कॅमेरातले फोटोज चांगले येणं खूप महत्वाचं आहे.
आणि मला Xiomi mi4i ची सवय आहे (होती.. कारण तो आता चोरीला गेला Sad )
तर रेडमी नोट ३ मला त्याच प्रतीचे फोटो देऊ शकेल का?
खरं तर रेडमी नोट थ्री १६ मेगापिक्सेल आहे.. आणि Xiomi mi4i १३ मेगापिक्सेल.
(पण माझ्यामते फक्त मेगापिक्सेल जास्त असणं महत्वाचं नसतं ना?)
तरीही फोन घेण्याआधी कोणी दोन्ही फोन वापरले असतील तर मला कंपेअर करायला मदत करेल का?

मला आईसाठी फोन घेणे आहे.

पर्याय-
१. रेड मी नोट ३

२. मोटो जी ४ प्लस

३. लेनोव्हो क५ वाइब नोट

कोणता घ्यावा

moto e 3 power अजिबात नको.( मिडियाटेक प्रसेसर आहे) स्लो आहे.भारी गेम आणि मल्टिटास्किंग शक्य नाही बॅटरी काढता येते प्लस पॅाइंट. रेडमी ३ नोट मध्ये एफेम रेकॅार्डिंग आहे.

इतर फोनची बॅटरी निघत नाही. रेडमी ३sprime best फोन सांगितलाय . आज रात्रीचा ndtv channelवर CELLGURU कार्यक्रम पाहा साडेदहा वाजता.

मोटो g4 /g4plus मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरचा फरक आहे बाकी दोन्ही प्युअर android Marshmallow आहेत. रूट करायची गरज नाही

आईसाठी फोन:- स्मार्टफोनची सवय असेल तर मोटो जी ३ . ग्रेट फोन. लेनोवोने मोटोरोला घेण्याअगोदरचा शेवटचा मोटोरोला. लॅालिपॅाप androidवर बारा हजाराला दुकानात मिळेल।
अथवा शाओमि mi 2 सहाहजारात ओनलाइन.
प्रवासात नेण्यासाठी iball चे बटणवाले पाहा. स्वस्त आणि मस्त.

मला अँड्रॉइड मोबाईल घ्यायचा आहे . बजेट कमी आहे म्हणजे ५ ते ६. थोडेफार चांगला मोबाइल मिळत असेन तर बजेट वाढवायची तयारी आहे.
माझ्या बेसिक च अपेक्षा आहेत

फोर जी पाहिजे !!
handy असावा म्हणजे मॅक्स ५ इंच डिस्प्ले.
फोटो काढण्याची हौस आहे (general .. सेल्फी नाही ) सो बऱ्यापैकी पिक्सेल कॅमेरा.
मला बॅटरी बॅकअप निदान ok हवा आहे.
इंटर्नल मेमरी चांगली हवी आहे.
निदान PDF , word file ओपन होईल अशा अपेक्षा
मुख्य म्हणजे २ वर्षे चालेल असा हवा आहे

Reliance Lyf कसा आहे ?? मोटो किंवा लेनोवो मिळेल का ??

प्लिज प्लिज कोणी suggest कराल का ??

मोटो इ ३ पॉवर. रु.७४९९/- फ्लिपकार्ट वर.
डिसेंट कॉन्फिग. चांगला कॅमेरा. ४जी/ व्हीओएल्टीई आहे. २ सिम स्लॉट्स + एक मेमरी कार्ड स्लॉट. १६ जिबी मेमरी, २ जीबी रॅम. अ‍ॅन्ड्रॉईड मार्श्मेलो आहे आणि नुगट (अ‍ॅन्ड्रॉईड ७ - लेटेस्ट वन) येऊ घातलीय.

चांगले noise canceling ear buds घ्यायचे आहेत. कोणते घ्यावेत? अॅमेझॉनवर Sennheiser आणि Sony च्या earbuds चे चांगले रिव्ह्यूज आहेत. इथे कोणाला काही अनुभव आहे का त्यांचा?

जिज्ञासा, इअरबड या फॉर्म मध्ये नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स बहुधा नाहीत. इन-इअर टाईप, ओवर इअर टाईप किंवा ऑन इअर टाईप मध्ये बरचसे पर्याय मिळतील.
सोनी, सेन्हायझर बरोबरच स्कलकँडी, फिलिप्स वगैरेही पर्यायांत चांगले हेडफोन्स मिळतील. बजेट असेल आणि आवड असेल तर बोस, बीट्स वगैरे पाहाता येतील.
मीही सध्या एका चांगल्या हेडफोनच्या शोधात आहे. इथे पर्याय, रिव्यूज मिळाले तर उत्तमच... Happy

ओप्पो, विवो चे फोन्स चांगले आहेत पण अपग्रेड्स जवळ जवळ मिळत नाहीत. बाकी फोन्स सध्या अँड्रॉईड नुगट (७.०) वर आहेत आणि हे लोक्स अजूनही लॉलिपॉप (५.१/ ५.०) वर्जन वर आहेत.

योकु, खरंय! माझ्या लक्षात आलं हे! मग मी Seinhiser चे in ear type earphones घेतले आहेत. बेसिक आहेत त्यामुळे १००% noise canceling नाही पण ६०%-७०% होतं ते पुरतंय सध्या तरी.

>>इअरबड या फॉर्म मध्ये नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स बहुधा नाहीत. <<
हा बघा तुमच्या क्रायटेरीयात बसतोय का? हा ब्लुटुथ अहे पण माझ्याकडे या आधिचं मॉडेल (वायर्ड) आहे. कॅरी करायला एकदम सुटसुटीत, एक्स्लंट नॉइज कँसलिंग आणि बोसच्या नांवाला साजेल अशी साउंड क्वालिटी. मस्ट बाय फॉर रोड वॉरियर्स...

प्राची, लिनोवो पेक्षा मोटो मी तरी प्रेफर करेन. समहाऊ एकच कंपनी असूनही मोटो जास्त अपील होतो.
राज, कसले भारी (डीझाईन आणि प्राईसही) होडफोन्स आहेत ते!

हो का योकु?
मोटो जी ४ प्लस पण आहे लिस्टमध्ये. स्पेक्स छान वाटत आहेत.

आता जि५ किंवा जि५+ पाहा. वन प्लस मध्येही पर्याय आहेत. २०के च्या वर अ‍ॅन्ड्रॉईड पेक्षा आयफोन घ्यावा सरळ.

माझ्याकडे सॅमसंग जीटी एस ७५६२ अ‍ॅन्डॉईड ४,०.४ आहे त्यावर युपीआय चालत नाही. नवीन फोन ला गळ्यात घालायची दोरी येत नाही काय करावे?

lolliop version असलेल्या फोनात अॅप्स मेमरी कार्डावर सरकवता येतात का?

आई vivo v5 हा फोन घ्यायचा म्हणतीये..
मला वाटतय सेल्फी कॅमेरा मुळे याची किंमत जास्त आहे.. तर बाकी यातलेच फिचर्स असलेला फोन सजेस्ट करा..

माझ्या लिनोवो क५ स्क्रिनवर खुप स्कॉच आहेत....त्यामुळे सेन्सिंगलाहि प्रॉब्लेम येतोय. तर स्क्रिन बदलून मिळेल का? कि नवीन घ्यावा?

रेड मी नोट ३ घ्यावा का?>>
हरकत नाही!
ठिक ठाक आहे फोन! कॅमेरा पण खूप भारी नसला तरी उजेडात चांगले फोटो येतात! जवळपास वर्षभरात काही त्रास दिला नाही!
किमतीच्या मानाने पैसे वसूल फोन आहे!

blu फोन ब्रॅन्ड कुणि वापरलय का? मुलिसाठी घ्यायचा आहे , आमच्या दोघाकडे आयफोनच आहे त्यामुळे तिच्यासाठी तोच घ्यावा हा विचार होता पण तिचा गोश्टी हरवण्याचा रेट बघता मिनिमम प्राइज्ड एसइ सुधा ४०० डॉलर पर्यत आहे , त्यामुळे जास्तित जास्त १०० ते १५० $ पर्यत बजेट ठेवलय.

मी Honor 5X Unlocked Smartphone, 16GB वापरतो. २ SIM दोन्ही ACTIVE आणि Memory Slot आहे.. घेऊन ६/७ महिने झाले उत्तम आहे, आणि तेव्हा $२०० च्या जवळपास मिळाला. आता १७०$

https://smile.amazon.com/gp/product/B019O8YWR0/ref=oh_aui_detailpage_o00...

>>विचार होता पण तिचा गोश्टी हरवण्याचा रेट बघता<<

तरीहि मी आय्फोनंच रेकमेंड करीन कारण आई-बाबांकडे आय्फोन असल्याने बर्‍याच गोष्टी सुकर होतील. आयोएसचं फाइंड फ्रेंड्स आणि फाइंड माय फोन हि नेटिव फिचर्स वापरुन तुम्ही तिचा फोन (वाटल्यास तिलाहि Happy ) ट्रॅक/मॉनिटर करु शकाल...

थॅन्क्स राज! मलाही आयफोनचे फाय्दे पटतायत त्यामुळेच आधी साधा घेवुन देणार , सक्सेस रेट बघुन आयफोन देता येइल.
धन्यवाद परदेसाइ!

प्राजक्ता, यूज्ड आयफोन वगैरे चालणार असेल तर बर्‍याच स्वस्तात आयफोन मिळू शकेल. आणि वापर (वापर म्हटल्यापेक्षा लेटेस्ट मॉडेल/च हवंय) फारसा नसेल तर ५एस/६ वगैरे चालू शकेल.

इथे सर्चून पाह्यलं पण...

यूज्ड आयफोन वगैरे चालणार असेल तर>> तिने मलाच ही ऑफर दिलीये की तुझा आयफोन ६ एस मला दे आणि तु आयफोन ७ घेsmiley2.gif
रिफर्बिश्ड चा ऑप्शन मी बघितला आधी पण मग त्या युनिटला काही प्रॉब्लेम आला तर अस मनात येत राह्त शिवाय प्राइझेस ही काही फार कमी नाहित , आय्फोनच घ्यायचा असेल तर मग नविन एसई वैगरे परवडेल त्यापेक्षा.

Pages