गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना घडली. एका १२ वर्षाच्या मुलीवर ३ जणांनी बलात्कार केला. मला त्यातील पूर्ण बातमी बघायला मिळाली नाही बाकी कुठेही. पण मिळालेल्या माहितीप्रमाणे, ती मुलगी रात्री लहान बहिणीला घेऊन बाहेर शु करायला गेली असताना हे सर्व झालं. बहीण बिचारी घाबरून पळून गेली. आणि हे तिघे मुलीला घेऊन फरार झाले. पुढे सोसायटी मध्ये हेही कळले की, मुलीला आमच्या सोसायटीतील एकजण भेटायला जाऊन आल्या आणि त्यांनाही ती अतिशय घाबरललेली दिसली. त्या मुलीला, तिच्या घरच्यांना आपण कुठल्या प्रकारची मदत करू शकतो यावर बोलणेही झाले. निदान सार्वजनिक संडास बांधले तर काही मदत होईल का असेही बोलणे झाले. असो. तर माझं त्यावरचं ज्ञान इतकंच. ह्याकडे मी पुन्हा वळेनच.
सध्या एक मावशी आमच्याकडे साफ सफाईला येत आहेत. आईंनी सर्व सेट करून दिल्याने मला त्यांचे नाव, गाव पत्ता फोन काहीच माहित नाही. त्या नियमित घरी येऊन सफाई करून जातात त्यामुळे त्यावाचून काही अडलेही नाही. मध्ये दोनेक दिवस त्या सलग आल्या नाहीत. म्हणून मी त्यांना विचारलेही, "मावशी काय हो आला नाहीत दोन दिवस?"
त्या,"होय, ते परवा आमच्या इथं असा किस्सा घडला ना? त्यामुळे सगळे घाबरले आहेत. "
खरंतर त्यांनी सांगितले तेंव्हा मला पहिल्यांदा कळले की काय झाले होते.
पुढे मग त्या बोलल्या,"अन दुसऱ्या दिवशी आमच्याकडे मुलीला बघायला पाव्हणे आले होते."
मी,"अरे वा ! काय झालं मग?"
त्या,"होय, येतील ते परत बोलनी करायला."
मी,"बरं."
आता हा विषय इथंच संपला असता. पण का कुणास ठाऊक मी विचारलं,"मावशी तुमची मुलगी किती वर्षाची आहे?"
त्या,"१४ झाले की आता."
आणि इथेच माझं धाबं दणाणलं. पण मी शांतपणे त्यांच्याशी बोलत राहिले. म्हटलं,"का हो मावशी इतक्या लवकर करताय? शाळेला जाते का? कितवीला जाते? "
त्या,"आता नववीला आहे. आमचे मिस्टर तर म्हणताय की आता हे असे किश्शे हितं व्हायल्यात. त्यापेक्षा पोरगी तिच्या घरी गेलेली बरी ना? आम्ही पण लवकरच गावाला जाणार आहे. ".
हे ऐकून तर मला अजून काही सुचेना. बरं आता अशा प्रसंगी काय धीर द्यायचा याचे माझ्याकडे हे ऑपशन होते आणि त्यातला कुठलाही योग्य नाहीये.
१. मावशी अहो, असं काय करताय? आता त्या पोरीचं झालं म्हणजे तुमचं असं होईल असं थोडीच आहे? - वा ! म्हणजे जिचं झालं ती बिचारी तर किती कष्टात आहे आणि केवळ त्यांच्या मुलीवर नाही झाला म्हणून हुश्श म्हणायचं? आणि मी तरी कसं सांगणार त्यांना हे ठणकावून?
२. अहो, आपल्या हातात थोडीच आहेत या गोष्टी? आपण आपले प्रयत्न करायचे? - म्हणजे काय? किती होपलेस वाक्य आहे? एक तर त्यात मी त्यांना सरळ सांगतेय की आपल्या हातात काही नाहीये. कुठेही धीर देऊ शकत नाहीये आणि शिवाय आपण प्रयत्न करणे म्हणजे तरी काय? पोरीला नीट अंग झाकून जा म्हणायचं? की आणखी काय?
३. गावी जाऊन किंवा लग्न करून काय होणार आहे?- म्हणजे लग्नानंतरही मुलीला सुरक्षिततेची काहीही अपेक्षा नाहीये आणि दुसऱ्या गावाला जाऊनही नाही. होय ना?
खरंच, यातलं एकही वाक्य मी त्यांना बोलू शकत नव्हते. मग बोलणार तरी काय?
मी म्हटलं,"मावशी, अहो असं काय करताय? १४ वर्षं लहान आहे."
त्या,"आता लगेच नाही करणार. अजून एक वर्ष आहे."
मी,"म्हणजे तरी १५ च ना? आणि तुम्हाला माहितेय ना १८ वर्षापर्यंत लग्न करता येत नाही कायद्यानं?"
त्या जरा बिचकल्या, म्हणाल्या,"होय माहितेय. पन आमच्याकडं लौकरच करत्यात. इतकी वर्ष नाय थांबणार."
मी,"अहो पण १४-१५ वर्षात लग्न करून मुलीला पुढं मुलंबाळं झाली लवकर आणि त्रास झाला तर?"
मी टीव्ही वरच्या सर्व जाहिराती आठवून त्यांना शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्याही मला उत्तरं देत होत्या.
मी,"अहो तिला निदान १२ वि तरी करू दे. शिकली तर पुढं स्वतःसाठी काहीतरी करेल."
त्या,"हा आम्ही करूच एक वर्ष तिचं १० वीचं. पन पुढं तिच्या सासरचे शिकवतील की त्यांना वाटलं तर."
मी आता काय बोलणार? म्हणजे एकतर मुलीला शिकवायचं नाही, इतक्या लहान वयात लग्न करायचं आणि शिवाय वाटलं तर सासरचे शिकवतील असं म्हणायचं? मी त्यांची उत्तरं ऐकून शांत झाले. एकदाच समजावणीच्या सुरात बोलले,"मावशी, उगाच घाई नका करू. मुलीला थोडं मोठं होऊ द्या अजून. शिकू द्या १२ वि तरी. "
हे सर्व बोलून मी तो विषय सोडून दिला. पुढं काही झालं तर बोलू म्हणून गप्प बसले. मध्ये दोन दिवस मी जरा बाहेर गेले होते. परत आल्यावर कळलं आमच्या मावशी कामाला येणार नाहीयेत.
आईंना म्हटलं,"काय झालं हो?"
त्या म्हणाल्या, "माहीत नाही. पण जमणार नाही म्हणाली आणि यायची बंद झाली".
मला वाटलं, त्यांचा नवरा म्हणाला होता की कामं सोडून तिच्यासोबत घरी राहा म्हणून खरंच त्या काम सोडून घरी राहत आहेत की काय. पण परवा मी त्यांना परत बिल्डिंग मध्ये पाहिलं आणि मला कळलं की त्यांनी फक्त माझंच काम बंद केलंय. आणि त्या मला ओळख ना दाखवता घाईत निघून गेल्यात.
खरं सांगू का, थोड्या दिवसांत मी इथून जाणार. म्हणजे पुढं काय झालं ते मला कळणार नाहीच. जे काही होईल त्यात मी तिकडून काहीही करू शकणार नाही. त्यांचं आणि माझं आयुष्य असंच चालू राहील. त्या सोडून गेल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला नवीन व्यक्ती मिळाली कामाला. तीही बिचारी आपल्या लहान मुलींना आता स्वतः शाळेत सोडायला आणि आणायला जात आहे. हे सगळं ऐकून, बघून खूप वाईट वाटतं आणि चीडही येते, या भयानक मनोविकृतीची. आणि मी यात काय करायला हवं हेही कळत नाही. पण सगळ्यात जास्त भीती कशाची वाटतेय माहितेय का? या एका बलात्कारामुळे या अशा किती लहान वयातल्या मुलींची लग्नं होऊन अजून जे बलात्कार होणारेत त्यांची.
विद्या भुतकर.
स्वाती, हा कायदा तेव्हाच
स्वाती, हा कायदा तेव्हाच वापरात येतो जेव्हा तक्रार केली जाते, जर तक्रार केली नसेल तर पोलीस माहित असूनही काही करू शकत नाहीत असे वाचलेय. हे खरे आहे का? राजस्थानसारख्या ठिकाणि काही वर्षांपूर्वीपर्यंत सामूहिक किंवा वैयक्तिक बाल विवाह व्हायचे जिथे मुले 5 किंवा त्या खालील वयाचीही असण्याची जास्त शक्यता असायची. पण आमच्याकडे तक्रार आली नाही याचा आधार घेत पोलीस कारवाई केली जात नसे असे वाचलेले तेव्हा.
इथे सर सकट अमेरीकेत रहाणारे
इथे सर सकट अमेरीकेत रहाणारे किंवा राहिलेल्या लोकांना काहीच कळत नाही असे का धोपटणे
चाललेय? ते ( धोपटणे) पण दयनीयच वाटतेय. आणि अमेरीकेत रहाण्यार्यांनी ढवळाढवळ करु नये म्हणजे काय?
मी अमेरीकेत रहाताना सुद्धा आमच्या आईच्या/सासूच्या घरी काम करणारी बाईची सुख-दुख: एकून होते. इथे परतल्यावर मी सुद्धा तेच करते किंवा गुंतवणूक होतेच.
माझी आई तर इतकी भावनिक रित्या त्या कामवालींच्या ( घरी ३-४ बाया आहेत प्रत्येक कामाला) अडचणीत अडकते की कधी कधी आईच त्रासून जाते त्यांना मदत करताना. कधी पैसे, कधी वस्तु, कधी भरपूर दांड्या मारल्या तरी महिन्याला सगळा पगार, तर कधी बाईने लवकर जाणे... कधी घरी येवून आजारी आहेत समजल्यावर तर डॉक कडे घेवून जा....
ह्यात काही कामवाल्या बाया फायदा घेतात आईचा जसे खोटे बोलून सुट्ट्या घेणे, काम अर्धवट टाकून निघून जाणे(घरी लहान मुल आहे वगैरे). बर्याचदा आईच काम करेल. बाया आजारी असतील आईच चिंता करणार.... पण हि सिस्टम आहे.
आणि कामवालींचे प्रॉबलेम्स एकून खूपच त्रासायचे. पण ह्या निम्न पातळीवर रहाणारे लोकांचे(कामवाली) जग , विचार खूप वेगळं असते. त्यांचे रोजच्या जगण्यातील विषयच वेगळेच असतात. आपण आपल्या विचाराने मदत केली तरी ती नेहमीच लागू होइल वा आवडेल किंवा योग्य असेलच असे नाही.
आणि तक्रार केली पोलीसाला तरी ती कामवाली आपली मुलगी गावी नेवून लग्न लावणारच.
रहाता राहिला प्रश्ण अनुभव अथवा माहिती असणे, राजसी ह्यांना ह्याचे आश्चर्य वाटले की विद्या भुतकर ह्यांना कधीच कसे असे एकले नाही? तर असते हो एकेकाची अनुभव घ्यायची वेळ. ..... आणि त्यांनी अनुभव व्यक्त केला.
या कायद्याचा वापर होताना
या कायद्याचा वापर होताना पाहिला आहे.
अल्पवयीन मुलामुलीने लग्न केल्यास पालक तक्रार करू शकतात.
माझ्या एका पेशंटच्या मुलाने अकरावीतच वर्गातल्या मुलीला पळवून नेले आणि लग्न केले.
दोघेही १७ वर्षे.
मुलीच्या वडिलांनी तक्रार केली.
दोघांनीही आम्ही मर्जीने लग्न केलंय असे सांगितल्यावरही मुलाला कस्टडीआणि मग बेल. मुलीला महिला-बाल सुधारगृहात ठेवलं.
नंतर काय झालं माहित नाही.
माझ्यापेशंटला (म्हणजे संबंधित जोडप्यातल्या मुलाच्या वडिलांना) अॅब्डकशनमध्ये मदत केल्याच्या आरोपावरून विनाकारणबराच त्रास झाला.
सुप्रिम कोर्टाला बर्याच महिला संघटनांनी एक ठाम वय सांगा स्वसंमतीने विवाह करायचे असे सांगूनही कोर्टाला ते देता आले नाही अशी बातमी काल यासंबंधी गूगल करताना वाचली.
<ा? राजस्थानसारख्या ठिकाणि
<ा? राजस्थानसारख्या ठिकाणि काही वर्षांपूर्वीपर्यंत सामूहिक किंवा वैयक्तिक बाल विवाह व्हायचे जिथे मुले 5 किंवा त्या खालील वयाचीही असण्याची जास्त शक्यता असायची. पण आमच्याकडे तक्रार आली नाही याचा आधार घेत पोलीस कारवाई केली जात नसे असे वाचलेले तेव्हा.> यातूनच तर भंवरीदेवी आणि विशाखा गाइडलाइन्स हे प्रकरण आलं.
झारखंड मध्ये एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या मुलाचे एका ११ वर्षांच्या मुलीशी लग्न लागल्याचे प्रकरण गाजतेय.
Ho lagna zalele asate tyaa
Ho lagna zalele asate tyaa cinema t,.नहाण आले म्हणजे शरीरसंबधास मुलगी योग्य zaaली असे मानतात.
>> काकस्पर्श मध्येही दाखवली आहे कि हि पद्धत आणि त्यावरचे गाणे. "जन्म बाईचा बाईचा.. एक आईचा.."असे काहीतरी : https://www.youtube.com/watch?v=RuNe95Rz66s
अमा - चांगल्या
अमा - चांगल्या पोस्ट्स.
साधना , इथे अमेरिकेतल्या कायद्यांचा विषय अमेरिकेतल्या कुणी नव्हे तर राजसीने रँडमली आणला. लेखाच्या विषयात अमेरिकेचा अजिबात संबंध नव्हता म्हणून तर बाकीची अमेरिकासंदर्भातली पोस्ट्स आली - केवळ रिअॅक्शन म्हणून. सुरुवातीची बरीच सार्कॅस्टिकआणि नंतर स्वाती २ आणि इतर काही खरोखर तुलनात्मक कायद्यांची माहिती देणारी. अमेरिकेचे कायदे भारतात लावणे दयनीय (का बरे?) वगैरे पोस्ट काही झेपले नाही.
अमेरिकेत राहिलो म्हणून भारतातल्या कोणत्याच गोष्टीत कसलीच मते देऊ नयेत ही अपेक्षाच ठार चुकीची आहे.
एक तर सगळे जग हेच एक ग्लोबल व्हिलेज आहे ही गोष्ट काही नविन नाही ("डबक्या"च्या पार विरुद्धच फॉर दॅट मॅटर!!)
दुसरे म्हणजे माणसांबद्दल बोलतोय आपण, रोबॉट्सबद्दल नव्हे. देश सोडला म्हणून २०- २५ वर्षे जिथे राहिले, सगे सोयरे, मित्र मंडळी अजूनही तिथे आहेत म्हटल्यावर बाहेर राहून पण देशातल्या परिस्थितीशी काही ना काही देणे घेणे, डायरेक्ट- इन्डायरेक्ट संबंध राहणारच की! हे ऑब्व्हियस नाही का!!
तिथल्या लोकांची भारताबद्दल माहिती अद्यावत नसेलही. मग दुरुस्त करा फार तर ! चुकीचे मुद्दे असतील तर खोडून काढा ! मतेच देऊ नयेत हे काय लॉजिक आहे!!
बाकी तिथे १-२ महिन्यासाठी जाऊन तिथल्या मोलकरणींनी आपल्या मताने त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेण्याची अपेक्षा चु़कीची आहे हे मान्यच.
मैत्रेयी+१. अमेरिकेत कधी पाऊल
मैत्रेयी+१.
अमेरिकेत कधी पाऊल न ठेवता इथे स्थायिक झालेल्या भारतीयांची परिथिती दननीय आहे आणि ते स्वतःच्याच डबक्यात राहतात आणि त्या सो कॉल्ड डबक्यालाच जग समजतात हे जजमेन्ट देण्याला नक्की काय म्हणावे? साधना, यु कॅन डु बेटर दॅन धिस.
मी राजसिंच्या पोस्टवर
मी राजसिंच्या पोस्टवर लिहिलेय. मूळ धागा अशिक्षित लोकांनी लावलेली लग्ने , बलात्कार. यावर अमेरिकेत हायस्कुल डेट , conset इत्यादी ओढून ताणून आणले कशाला. तुलना करायची तर दोन समान गोष्टींची करा की. 13 वर्षाचता मुलीवर जबरी बलात्कार तोही एका पेक्षा जास्त लोकांनी केलेला यात कंसेन्ट ची चर्चा? त्यांनी जे लिहिलेय त्यावरून त्यांना भारतातली परिस्थिती माहीत नाही हेच दिसते. मग माहित नसताना उगीच वाटेल ते लिहायचे? आणि एका अमेरिकनावर लिहिले म्हणजे ते सगळ्यांना लागू होते का?
फक्त हाय सोसातटित पालक स्लिप
फक्त हाय सोसातटित पालक स्लिप ओव्हर, प्ले डेट, हायस्कुल डेटिंग हे शब्द वापरतात. >> स्लीप ओव्हर व प्ले डेट ह्या वेगळ्या संकल्पना आहेत. ही प्रॉपर डेट नव्हे. मुली मुली एकत्र जमतात एका घरी म्हणजे स्लीप ओव्हर. ह्यात मुलग्या चा प्रेझेन्श अभिप्रेत नाही. आता ह्या नावखाली मुली मुलांना भेटतात असे म्हटलेत तर तो पेरेंटिंग इश्यू आहे कारण मुलांना शक्यतो अश्या बाबतीत थापा मारायला लागू नये. ओपन संवाद असावा. पण हे अवांतर आहे इथे.
प्ले डेट मध्ये जरा लहान मुले ठरवून ( आया फोन वर बोलतात) एकत्र खे ळायला जमतात ते. ह्याचा बलात्काराशी संबंध नाही.
लवकर लग्न होउन सुखाने संसार करणार्या मुली देखील अस्तित्वात आहेत. त्यांचे प्रमाण कमी असले तरी. प्रबोधनाचे प्रयत्न देखील चालू असतात. पण त्या यश कितपत येते ते आकडेवारी आता उपलब्ध नाही माझ्याकडे. पण महिला ग्राम प्रधान च्या कार्यक्रमात घरात सुरक्षित टॉयलेट व रस्त्यावर दिवे हे त्या महिला ग्राम प्रधानाने करून दिले आहे त्यामुळे मुलींना सुरक्षित वाटते आहे हे अगदी कमी प्रमाणात का पण आहे.
मग काहीतरी बेसिक गोंधळ आहे
मग काहीतरी बेसिक गोंधळ आहे साधना. राजसी अमेरिकेत नसते. त्यामुळे ते पोस्ट तिला लिहिलेय असे वाटले नाही.
अॅडमिननी काहींची या
अॅडमिननी काहींची या धाग्यावरची पोस्ट उडवलीत म्हणून बेसिक गोंधळ वाटतोय का?

साती, साधनाने अमेरिकेत
साती, साधनाने अमेरिकेत राहणार्यांबद्दल पोस्ट लिहिली आणि आता वरच्या पोस्टीत असेही म्हटले की "मी राजसिंच्या पोस्टवर लिहिलेय." म्हणून म्हटले की काहीतरी गोंधळ आहे. (राजसी काही अमेरिकेत नसते अशी माझी समजूत आहे! )
या लॉजिक ला एक्स्टेन्ड करून
या लॉजिक ला एक्स्टेन्ड करून उद्या कोणी म्हणतील "अमेरिकेत राहून मायबोलीवर कशाला लिहीता"? कोण कुठे राहतंय ह्याचा काय संबंध आहे?
ज्या कोणाला हा प्रश्न आपला, जिव्हाळ्याचा वाटतो ते आपापल्या परी काही करू पाहतात. जे काही करतात ते अगदी चुकीचं असेल तर मत व्यक्त करून योग्य ती दिशा दाखवता येईलच ना?
१८ वर्षांपपेक्षा कमी वयाच्या मुलीचं लग्न हा कायद्याने गुन्हा आहे पण ह्याची अंमलबजावणी वेगवेगळ्या कारणांमुळे होत नाहीये तर त्यावर आपल्याकडून जे शक्य आहे त्या उपायांची चर्चा योग्य नाही का?
मैत्रेयी आणि सशल, साधना
मैत्रेयी आणि सशल,
साधना अमेरिका आणि भारत तुलना करतायत ती आणि राजसी करतायत ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे मला वाटते.
म्हणजे राजसींना असे म्हणायचे आहे की अमेरिकेतपण स्कूलसेक्स , ह्यांव- त्यांव आहे त्यामूळे तुम्ही भारताला नावे ठेऊ नका.
आणि स्लम डॉग सारखं भारतातल्या दु:खांचं प्रदर्शन करणारं लिहू नका.
(जे खरं तर विद्या भूतकर यांनी केलं नाहीये. )
हे असं पोस्ट चुकीचं आहे माझ्या मते. यात 'तुमच्या डोळ्यात मुसळ असताना आमच्या डोळ्यातलं कुसळ का शोधताय' असा अॅटीट्यूड आहे.
साधनाच्या पोस्टचा मला लागलेला अर्थ असा की एका वरच्या सोशिओ इकॉनॉमिक लेवलवरून पाहताना किंवा बघताना आपल्याला या बायकांचे प्रॉब्लेम्स समजणार नाहीत. थोड्याच कालावधीसाठी भारतात आलात तर या भानगडीत पडू नये.
तुमचं ऐकून कुणी आपल्या मुलीचं लग्न करायचं रहाणार नाही.
आणि समजा एखादी राहिली तर नंतर तिला तिच्या समाजात जे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील ते तुम्ही (म्हणजे त्या कामवालीला असा सल्ला देणारे ) सोडवतील का?
भारत अमेरिकेतच कशाला इथल्या इथे आम्ही हे पाहतोय.
आमच्या हास्पिटलात काम करणार्या आयम्मा आमच्या अपरोक्ष स्वतःच्या मुलींची १५-१६ व्या वर्षी लग्ने लावून देतात.
आम्हाला निमंत्रण देत नाहीत कारण एकदोन जणीना पूर्वी आम्ही असे न करण्याबद्दल सल्ला दिला होता.
'तुम्हारा अलग, हमारा अलग' असाच या बायकांचा काहीही करा अॅटीट्यूड असतो आणि त्याकरिता खूप ग्राऊंड लेवलवरची कारणे आहेत.
पण ना लेखिका स्वतः किंवा
पण ना लेखिका स्वतः किंवा त्यांच्यासारख्या सिमीलर घटनांशी संबंध आलेल्या आणि घरच्या मावश्या/कामवाल्या बाया ह्यांनां सल्ले देणार्या कोणी त्यांच्या डोक्यावर बसलेल्या नाहीत "माझा सल्ला पाळला नाहीत तर याद राखा" म्हणत.
प्रत्येकाच्या आपापल्या मर्यादा आहेत आणि त्यात राहून जे जमतंय ते करण्याचा प्रयत्न दिसतो. ज्यांनां सल्ले दिले जातात त्या बायकाही काही बोळ्याने दुध पिणार्या नव्हे. "ऐकावे जनाचे करावे मनाचे" हे प्रत्येक जण जाणून असतो.
असो, चर्चा भरकटायला लागली. वेस्टन वर्ल्ड मधल्या डेटींग चा मुद्दा आला पण तो इथे अॅप्लिकेबल नाही ह्यावर भरपूर चर्चा झाली की. तरी परत, "त्यांच्या भानगडीत पडू नका, तुम्ही भारतात रहात नाही त्यामुळे तुम्हाला काय कळतंय" असा सूर का बरं?
सशल, 'याद राखा' म्हणायची गरज
सशल, 'याद राखा' म्हणायची गरज नाही.
लेखाच्या शेवटी विद्यांनी लिहिलंय पहा.
लग्नावरून थोडंसं अर्ग्यूमेंट काय केलं ती कामवाली बाई बिल्डींगमधल्या बाकीच्यांची कामे चालू ठेवून फक्त त्यांचंच काम सोडून गेल्या.
म्हणजे तेवढेही सांगणे त्या कामवाल्याबाईंना त्रासदायक वाटले.
मैत्रेयी, राजसी जर अमेरिकेत
मैत्रेयी, राजसी जर अमेरिकेत राहत नसतील तर माझे अमेरिकी शब्द मी मागे घेते. राजसीनी जे लिहिलेय ते इथल्या स्थितीशी इतके एलियन आहे की मला वाटले त्या इथे कधी राहिल्याच नाहीत. सातीनी जे लिहिलेय माझ्या पोस्टींबद्दल ते खरे आहे. मला नेमके तेच म्हणायचे आहे.
अमा, मला या सगळ्या शब्दांचा अर्थ माहीत आहे. मी माझ्या घरात हे शब्द ऐकतेय. प्ले डेट पहिल्यांदा ऐकले तेव्हा हसायला आले कारण असे ठरवून मुलांना खेळायला नेणे आधी होत नसे, शेजारीपाजारी येणे जाणे अतिशय सहज होते. पण आता बदल होताहेत. 30 वर्षांपूर्वी माझ्या घरात मित्र हा शब्द बोललेलाही चालत नव्हता तिथे आज आमच्या मुलींचे मित्र मोकळेपणाने घरात बोलावले जाताहेत, डेटिंग करतेय म्हणजे थेट लग्नावरच उडी मारणार असे नाही हे उमजलेय. लफडे हा शब्द या स्तरावरून नाहीसा होतोय, ब्रेकप्स घरचेही स्वीकारताहेत. पण खालच्या वर्गात अजून हे पोचलेले नाही. त्या वयाच्या शारीरिक आणि मानसिक गरजा सारख्या आहेत पण 13 वर्षांची मुलगी कुणा मुलाबरोबर दिसली तर गहजब केला जातो. तिथली परिस्थिती तशी आहे. सामाजिक स्तरांमधून लोकांच्या वागण्यात आणि विचारात खूप फरक पडतोय आता. त्या वर्गात मुलगी मुलाबरोबर फिरतेय म्हणजे आता लग्न करून दिलेच पाहिजे. मग होतात लग्ने 13 व्या आणि 14 व्या वर्षी. नुसते प्रबोधन करून काही होणार नाही तर ज्या परिस्थितीत ते लोक राहतात ते बदलले पाहिजे. शिक्षण फुकटच आहे पण आपण जसे लक्ष देतो तसे दिले जात नाही, तेवढी क्षमता नाहीय त्यामुळे आठवीत जाऊनही साधे वाचता यायची बोंब. त्या इयत्तेपर्यंत पोचतो शाळेत जायचा रस संपतो कारण काय शिकवले जातेय हे कळत नाही. मग ही रिकामी पोरे पोरी पार्टनर शोधत फिरतात. आणि करून घेतात सत्यानाश. बहुतांश हि परिस्थिती आहे. अपवाद खूप थोडे.
खरेतर अमेरिकेत राहून इथे
खरेतर अमेरिकेत राहून इथे सल्ले देऊ नका असे वाचले कि मला हसायला येते. सरसकट सगळ्यांना इथले माहीत नाही असे नाहीय.
त्याचवेळी हेही खरे आहे की तिथले कायदे तिथल्या सामाजिक स्थितीवर आधारित आहेत. ती परिस्थिती इथे नसू शकते. उदा. फॉस्टर होम, फॉस्टर पेरेंट्स हि कल्पना इथे एलियन आहे. नातलगाच्या घरी मुलांना ठेवणेही लोक शक्य तितके टाळायला बघतात. अशा अजून कित्येक बाबी असतील. तिथले कायदे तसेच्या तसे लावता येणार नाहीत.
पण कित्येकदा इथल्या लोकांना त्या कायद्यांचा उल्लेख केलेलाही खटकतो. अमेरिका विरुद्द भारत लढाई सुरु होते जणू. हेही तितकेच अयोग्य आहे. अमेरिकेत काय आहे ते जाणून घ्यायला काय हरकत आहे.
अर्थात ही पोस्ट अवांतर आहे, माझे माबोवरचे निरीक्षण आहे. लेखाशी ह्या पोस्ट चा संबंध नाही.
राजसी ह्यांच्या पोस्ट शी
राजसी ह्यांच्या पोस्ट शी सहमत. विद्या भुतकर ह्यांचे चुकलेच. आपल्याला आलेला अनुभव जसाच्या तसा मायबोलीवर टाकायचा म्हणजे काय? राजसी ह्यांनी सांगितल्या प्रमाणे भारतातल्या आणि अमेरिकेतल्या स्त्रियांच्या परिस्थितीचा तौलनिक अभ्यास करायला हवा होता. आणि फक्त अमेरिकाच का, आफ्रिकेतल्या जमातींमध्ये स्त्रियांच्या माना ताणून लांब करतात, ओठांमध्ये मोठ्या बांगड्या घुसवतात. त्याचाशी सुद्धा तुलना करायला हवी होती. इराक वगैरे ठिकाणी इस्लामिक स्टेट कडून स्त्रियांवर जे अनन्वित अत्याचार होतात त्याबद्दल भुतकर ह्यांना माहिती नाही का? धरणग्रस्त कुटुंबांमध्ये सुद्धा स्त्रियांना वेगळेच प्रश्न भेडसावतात. फ्रांस सारख्या ठिकाणी बुरख्यावर बंदी आणून एक प्रकारे स्त्रियांच्या वेशभूषा स्वातंत्र्यावर गदा आणली गेली आहे. चीन मध्ये स्त्रियांचे पाय बांधून ठेवण्याची अघोरी प्रथा आहे. तर जगातल्या सर्व ठिकाणच्या स्त्रियांच्या समस्यांचा सर्वंकष आढावा घेऊन (अर्थात विश्वसनीय डेटा , सर्व्हे , रिपोर्ट्स ह्यांच्या आधारे) आणि तो मान्यताप्राप्त तज्ज्ञ् लोकांकडून तपासून घेऊन झालेली पोस्ट (किंवा प्रबंध) मायबोलीवर टाकायला हवा होता.
उदाहरणच द्यायचे झाले तर, आपले छत गळत असेल तर आपण ते गळत आहे असे पाहून, मान्य करून, त्याबद्दल घरच्यांशी, शेजाऱ्यांशी बोलण्याचा मूर्खपणा करतो का? आपण आपले छत आणि झोपडपट्ट्यांमधली छते, आणि अमेरिकेत सुद्धा जिथे पाऊस चक्रीवादळे, हिमवर्षाव होतात त्या ठिकाणच्या छतांची परिस्थिती ह्यांचा तौलनिक अभ्यास आधी करत नाही का? जगात कितीतरी लोकांच्या घरांना छतच नसते. उगीच फक्त आपल्या छताला टारगेट करून काय होणार? आणि मुख्य म्हणजे भारत आणि अमेरिका ह्यांच्या परिस्थितीतील फरकाला दोन देशांच्या आर्थिक स्थितीतील फरक जबाबदार आहे. हल्ली अमेरिकेची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नाही. तर अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा खरा मार्ग कोणता ह्याचे विवेचन सुद्धा पोस्टमध्ये करायला नको का? आणि जर असे विवेचन केले नसेल तर त्याची कारणे द्यायला नकोत? आपल्याला महापालिकेच्या उंदीर मारण्याच्या विभागात काम का मिळाले नाही, कि तो विभागाचं बंद झाला आहे, असल्यास का, ह्याचे स्पष्टीकरण तर द्यायला हवेच. भुतकर ह्यांच्या पोस्टसारखी ह्यातलं काही नसलेली पोस्ट पाहून वैताग येणे साहजिक आहे.
_________/\________
_________/\________
अजबराव, प्रतिसाद जतन करून
अजबराव, प्रतिसाद जतन करून ठेवा, बऱ्याच ठिकाणी वापरता येईल .
अजाबराव
अजाबराव
अजबराव! पर्फेक्ट पोस्ट.
अजबराव!
पर्फेक्ट पोस्ट.
Ajabrao, perfect
Ajabrao, perfect
उदा. फॉस्टर होम, फॉस्टर
उदा. फॉस्टर होम, फॉस्टर पेरेंट्स हि कल्पना इथे एलियन आहे. नातलगाच्या घरी मुलांना ठेवणेही लोक शक्य तितके टाळायला बघतात.> हे पण बरोबर नाही. इथे दोन्ही संकल्पना अस्तित्वात आहेत कैक दशकांपासून.
जबरी पोस्ट अजब राव. क्या एंट्री मारा है.
अजबराव ह्यांची पोस्ट भारी.
अजबराव ह्यांची पोस्ट भारी.
Pages