गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना घडली. एका १२ वर्षाच्या मुलीवर ३ जणांनी बलात्कार केला. मला त्यातील पूर्ण बातमी बघायला मिळाली नाही बाकी कुठेही. पण मिळालेल्या माहितीप्रमाणे, ती मुलगी रात्री लहान बहिणीला घेऊन बाहेर शु करायला गेली असताना हे सर्व झालं. बहीण बिचारी घाबरून पळून गेली. आणि हे तिघे मुलीला घेऊन फरार झाले. पुढे सोसायटी मध्ये हेही कळले की, मुलीला आमच्या सोसायटीतील एकजण भेटायला जाऊन आल्या आणि त्यांनाही ती अतिशय घाबरललेली दिसली. त्या मुलीला, तिच्या घरच्यांना आपण कुठल्या प्रकारची मदत करू शकतो यावर बोलणेही झाले. निदान सार्वजनिक संडास बांधले तर काही मदत होईल का असेही बोलणे झाले. असो. तर माझं त्यावरचं ज्ञान इतकंच. ह्याकडे मी पुन्हा वळेनच.
सध्या एक मावशी आमच्याकडे साफ सफाईला येत आहेत. आईंनी सर्व सेट करून दिल्याने मला त्यांचे नाव, गाव पत्ता फोन काहीच माहित नाही. त्या नियमित घरी येऊन सफाई करून जातात त्यामुळे त्यावाचून काही अडलेही नाही. मध्ये दोनेक दिवस त्या सलग आल्या नाहीत. म्हणून मी त्यांना विचारलेही, "मावशी काय हो आला नाहीत दोन दिवस?"
त्या,"होय, ते परवा आमच्या इथं असा किस्सा घडला ना? त्यामुळे सगळे घाबरले आहेत. "
खरंतर त्यांनी सांगितले तेंव्हा मला पहिल्यांदा कळले की काय झाले होते.
पुढे मग त्या बोलल्या,"अन दुसऱ्या दिवशी आमच्याकडे मुलीला बघायला पाव्हणे आले होते."
मी,"अरे वा ! काय झालं मग?"
त्या,"होय, येतील ते परत बोलनी करायला."
मी,"बरं."
आता हा विषय इथंच संपला असता. पण का कुणास ठाऊक मी विचारलं,"मावशी तुमची मुलगी किती वर्षाची आहे?"
त्या,"१४ झाले की आता."
आणि इथेच माझं धाबं दणाणलं. पण मी शांतपणे त्यांच्याशी बोलत राहिले. म्हटलं,"का हो मावशी इतक्या लवकर करताय? शाळेला जाते का? कितवीला जाते? "
त्या,"आता नववीला आहे. आमचे मिस्टर तर म्हणताय की आता हे असे किश्शे हितं व्हायल्यात. त्यापेक्षा पोरगी तिच्या घरी गेलेली बरी ना? आम्ही पण लवकरच गावाला जाणार आहे. ".
हे ऐकून तर मला अजून काही सुचेना. बरं आता अशा प्रसंगी काय धीर द्यायचा याचे माझ्याकडे हे ऑपशन होते आणि त्यातला कुठलाही योग्य नाहीये.
१. मावशी अहो, असं काय करताय? आता त्या पोरीचं झालं म्हणजे तुमचं असं होईल असं थोडीच आहे? - वा ! म्हणजे जिचं झालं ती बिचारी तर किती कष्टात आहे आणि केवळ त्यांच्या मुलीवर नाही झाला म्हणून हुश्श म्हणायचं? आणि मी तरी कसं सांगणार त्यांना हे ठणकावून?
२. अहो, आपल्या हातात थोडीच आहेत या गोष्टी? आपण आपले प्रयत्न करायचे? - म्हणजे काय? किती होपलेस वाक्य आहे? एक तर त्यात मी त्यांना सरळ सांगतेय की आपल्या हातात काही नाहीये. कुठेही धीर देऊ शकत नाहीये आणि शिवाय आपण प्रयत्न करणे म्हणजे तरी काय? पोरीला नीट अंग झाकून जा म्हणायचं? की आणखी काय?
३. गावी जाऊन किंवा लग्न करून काय होणार आहे?- म्हणजे लग्नानंतरही मुलीला सुरक्षिततेची काहीही अपेक्षा नाहीये आणि दुसऱ्या गावाला जाऊनही नाही. होय ना?
खरंच, यातलं एकही वाक्य मी त्यांना बोलू शकत नव्हते. मग बोलणार तरी काय?
मी म्हटलं,"मावशी, अहो असं काय करताय? १४ वर्षं लहान आहे."
त्या,"आता लगेच नाही करणार. अजून एक वर्ष आहे."
मी,"म्हणजे तरी १५ च ना? आणि तुम्हाला माहितेय ना १८ वर्षापर्यंत लग्न करता येत नाही कायद्यानं?"
त्या जरा बिचकल्या, म्हणाल्या,"होय माहितेय. पन आमच्याकडं लौकरच करत्यात. इतकी वर्ष नाय थांबणार."
मी,"अहो पण १४-१५ वर्षात लग्न करून मुलीला पुढं मुलंबाळं झाली लवकर आणि त्रास झाला तर?"
मी टीव्ही वरच्या सर्व जाहिराती आठवून त्यांना शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्याही मला उत्तरं देत होत्या.
मी,"अहो तिला निदान १२ वि तरी करू दे. शिकली तर पुढं स्वतःसाठी काहीतरी करेल."
त्या,"हा आम्ही करूच एक वर्ष तिचं १० वीचं. पन पुढं तिच्या सासरचे शिकवतील की त्यांना वाटलं तर."
मी आता काय बोलणार? म्हणजे एकतर मुलीला शिकवायचं नाही, इतक्या लहान वयात लग्न करायचं आणि शिवाय वाटलं तर सासरचे शिकवतील असं म्हणायचं? मी त्यांची उत्तरं ऐकून शांत झाले. एकदाच समजावणीच्या सुरात बोलले,"मावशी, उगाच घाई नका करू. मुलीला थोडं मोठं होऊ द्या अजून. शिकू द्या १२ वि तरी. "
हे सर्व बोलून मी तो विषय सोडून दिला. पुढं काही झालं तर बोलू म्हणून गप्प बसले. मध्ये दोन दिवस मी जरा बाहेर गेले होते. परत आल्यावर कळलं आमच्या मावशी कामाला येणार नाहीयेत.
आईंना म्हटलं,"काय झालं हो?"
त्या म्हणाल्या, "माहीत नाही. पण जमणार नाही म्हणाली आणि यायची बंद झाली".
मला वाटलं, त्यांचा नवरा म्हणाला होता की कामं सोडून तिच्यासोबत घरी राहा म्हणून खरंच त्या काम सोडून घरी राहत आहेत की काय. पण परवा मी त्यांना परत बिल्डिंग मध्ये पाहिलं आणि मला कळलं की त्यांनी फक्त माझंच काम बंद केलंय. आणि त्या मला ओळख ना दाखवता घाईत निघून गेल्यात.
खरं सांगू का, थोड्या दिवसांत मी इथून जाणार. म्हणजे पुढं काय झालं ते मला कळणार नाहीच. जे काही होईल त्यात मी तिकडून काहीही करू शकणार नाही. त्यांचं आणि माझं आयुष्य असंच चालू राहील. त्या सोडून गेल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला नवीन व्यक्ती मिळाली कामाला. तीही बिचारी आपल्या लहान मुलींना आता स्वतः शाळेत सोडायला आणि आणायला जात आहे. हे सगळं ऐकून, बघून खूप वाईट वाटतं आणि चीडही येते, या भयानक मनोविकृतीची. आणि मी यात काय करायला हवं हेही कळत नाही. पण सगळ्यात जास्त भीती कशाची वाटतेय माहितेय का? या एका बलात्कारामुळे या अशा किती लहान वयातल्या मुलींची लग्नं होऊन अजून जे बलात्कार होणारेत त्यांची.
विद्या भुतकर.
Underage consentual sex
Underage consentual sex because of high school dating (don't know laws about consent age or prevention of sexual abuse ) and underage consentual marriage (parents fixed the marriage and let's assume daughter also understands impending problem and ready to ब्बe married ) hence underage sex; I found consentual underage sex to be the common facto - सo the comparison. One is OK / accepted norm all over the world (even to NRis) and the other one is frown upon.
My point is why one thing is ok and other not? When everyone is worried about sexual abuse. let us say any kind of underage sex is not ok.
I don't want to go into Indian girl becoming mother or housewife later and end of her childhood etc. Because for me that part falls under different category maybe bound labour or child labour, not getting to avail right to education; not sexual abuse.
Anyway, the writer was unaware of any such situations routinely happening hence she was shocked and felt need to express. So I don't want to drag my objections.
राजसी, मला वाटतंय लेखात
राजसी, मला वाटतंय लेखात (टायटल मध्ये) "बलात्कार" हा शब्द वापरलाय तो फक्त शारिरीक संदर्भात नसून त्याचं इंटरप्रिटेशन जास्त जेनेरीक आहे. भारतात अल्पवयात लग्न होणं आणि राजीखुशीने, वाव आहे म्हणून फूलिंग अराउन्ड करता येणं ह्यात काहीच फरक दिसत नाही का?
लैंगिकता व त्या अनुषंगाने
लैंगिकता व त्या अनुषंगाने असणारे कुतूहल यामुळे होणार हायस्कूल डेटींग भारतात होत नाही काय ? अमेरिकन हायस्कूल डेटींगची तुलना करायचीच असेल तर भारतातील गन्नो के खेतो, थेट मळ्यात जाणारे अंडरएज सेक्स बरोबर करावी. वी डू नॉट फ्राऊन अपऑन माही गिल ऑर रिंकूज.
लग्न म्हणजे फक्त सेक्स नाही. २४ तास त्या पुरूषाबरोबर राहणे - टू बॉरो करिश्माज वर्ड्ज फ्रॉम बीबी नं१- उसके मां से प्यार कर, उसके बच्चोंसे प्यार कर, उसके कुत्तेसे भी प्यार कर.. एवढी मोठी कमिटमेंट अंडरएज मुलीवर लादणे काय मस्करी आहे काय..
राजसी.. तुम्ही कृपया मराठीत
राजसी.. तुम्ही कृपया मराठीत देवनागरीतून लिहीणार का? आम्ही (निदान मी तरी) इथे मराठीतून चर्चा, कौतुक, निंदा, भांडणे, साहित्य इत्यादी वाचायला येते. इंग्रजीमध्येच चर्चा वाचायची असेल तर असंख्य फोरम्स आंतरजालावर उपलब्ध आहेत.
Consensual sex ह्यामधे social
Consensual sex ह्यामधे social conditioning हा मोठा factor असतो असं मला वाटतं.
साधनाने मागे एका पोस्ट मधे लिहिल्याप्रमाणे बर्याचदा घरी जर फारसं शैक्षणिक वातावरण नसेल तर, मुलींचं पण शिक्षणातलं लक्ष १३/१४ व्या वर्षानंतर उडतं. नटणं/मुरडंणे आणि कोणीतरी आपल्या रूपावर प्रेम करतंय हे त्यांना अभ्यासापेक्षा जास्त महत्त्वाचे वाटू लागते. हे अमेरिका किंवा भारत कुठेही घडू शकते. अश्यावेळी ती मुलगी अंडरएज सेक्स साठी तयार होऊ शकते/ संमती (consent) देऊ शकते. भारतात असेल तर लग्नाला तयार होते आणि अमेरिकेत असेल तर boyfriend सांगेल ते ऐकते.
भारतात जसं लग्नानंतर संसाराची जबाबदारी गळ्यात पडते, तसचं अमेरिकेत सुद्धा १६/१७ व्या वर्षी pregnant होऊन मुलाची आणि संसाराची जबाबदारी गळ्यात पडू शकते.
मात्र, मुलीला जर खरचं मनापासून शिकायचं असेल, तर तीला ते स्वातंत्र्य मिळायला हवं. तसचं, अंडरएज सेक्स किंवा लग्नासाठी संमती देताना, त्याचे दुरगामी परिणाम तिला आणि जरूर पडल्यास तिच्या आई-वडिलांना समजावून सांगितले पाहिजे. हे समजावून सांगण्याचं काम भारतात किंवा अमेरिकेत दोन्ही ठिकाणी सारखचं जिकीरीचं आहे. असं मला वाटतं. अमेरिकेत शाळा ह्यासाठी बर्यापैकी पुढाकार घेतात.
माझ्या ओळखीच्या एका मुलीला ती high school मधे असताना शाळेतून एक बाहुली घरी दिली होती २ दिवस. ती बाहुली दर २/३ तासानी रडायची. मग तिच्यावर असणारे काही settings (buttons) configure केले की रडणं थांबायचे. जर ते settings configure नाही केले तर, त्याचा record रहायचा. मगं वर्गात teacher समजावून सांगायच्या की, खरच बाळ झालं तर असं करून नाही चालतं. रात्री उठून सुद्धा बाळाला काय हवयं ते बघावचं लागतं. मुली ह्या exercise मधून खूप काही शिकतात.
स्वाती वकील आहे ना? तिने
स्वाती वकील आहे ना? तिने लिहिलीय कि वर एक पोस्ट. >> स्वाती वकील आहे की नाही मला माहीत नाही. पण त्यांनी फक्त "नाही हो" लिहलंय. आणि त्यानंतरच्या कमेंटमधे साती "कंसेंट फॉर सेक्शुअल इंटरकोर्ससाठी १६ वर्षे जर ती मुलगी त्या माणसाची धर्मपत्नी असेल/ नसेल तर आणि १४ (की पंधरा) जर धर्मपत्नी असेल तरिहीअसे आहे. मिनिमम एज फॉर मॅरिज कायद्याने बदलले पण त्याचवेळी कंसेंटचा कायदा मॉडीफाय करायचा बहुदा राहून गेले असावे." असे म्हणतायत. So there seems to be some kinda contradiction in IPC.
===
भारतात, लग्नानंतरही बलात्काराचा गुन्हा दाखल करू शकतो नवऱ्याविरुद्ध अशी एक केस मी मध्ये वाचली होती. ज्यात निकाल मुलीच्या बाजूने लागला होता. >>
www.indianexpress.com/article/business/budget/imarital-rape-concept-mane... या बातमीतून exception 2 of Section 375 of the IPC, as per which any form of intercourse by a man with his wife, who is not under 15 years of age, is not rape.
माझ्या माहितीप्रमाणे, १८ वर्षे हे लग्नाचं वय आहे, संमतीशिवाय किंवा समंतीने. कुणाला तरी विचारून नक्की इथे सांगेन.
>> चालेल. मला कंफ्युजन हे आहे की जर वय १८ असेल तर भारतातली ३० टक्के लग्न क्रिमीनल ऑफेंस होतील.
फॉर अ फॅक्ट हाय स्कूल
फॉर अ फॅक्ट हाय स्कूल डेटिंग भारतातही होते. त्यातु न उद्भवणारे प्रश्न इथे खूप विचित्र पद्धतीने हँडल केले जातात. कारण मुलग्यांच्या फ्युडल अॅटिट्यूड. मुलींना फेस करावे लागणारे प्र॑श्न इत्यादी.
काँ ट्रा सेप्शन फेल गेले तर वापरायच्या गोळ्यांचा खप ह्या वयोगटात जास्त आहे. ( मी नाव विसरले)
नववी दहावी अकरावी वयोगटात मुलींच्या गर्भपातांचे स्टॅटि स्ती क उपलब्ध आहे.
हाय स्कूल डेटिंग मध्ये जो मोकळे पणा अमेरिकेत आहे. तो भारतात नाही पण तसे जगायची उत्सुकता आहे. ह्यात डेट रेप, मुलींन औष धे देऊन अन कॉन्शस करणे क्लबिंग मधून उध्भवणा र्या समस्या वगैरे इथे शहरात तसेच तालुक्याच्या गावाला पण आहे.
मोलकरणींना सुधारणा करण्याचे लेख्चर देणे व प्रश्न सोडवला असे समाधान मानणे म्हणजे बँड एड अॅप्रोच आहे. इथे एन जीओज व इतर संस्था काम करत आहे त्यांच्या कार्याची माहिती आधी करून घ्यावी. तुम्ही एका महिन्यात एकटी बाई काय काय करणार?
मुलींच्या साठी पहाटे शौचाला जाणे ही पण एक जीवघेणी रिस्क ठरू शकते भारतात. अगदी घाटकोपर मध्ये ते यूपी एम पीच्या गावांमध्ये अश्या वेळी मुलींवर असॉल्ट व अत्याच्यार झाले आहेत. घरी शौचालय
बांधणे हा एक उपाय आहे.
आमच्या कंपनीने गुजरातेतील एका गावात( जिथे प्लांट आहे) तिथे मुलींच्या साठी शाळेत तीन स्वच्छ टॉयलेट्स व आयाम्मा ची सोय करून दिली आहे. ( हे अवांतर आहे पन इथे लिहीले कारण जर तुम्हास खूप काळजी वाट्त असेल तर जिथे मोलकरीण बाई राहते त्या वस्तीत शौचालयाची सोय करून द्या.) त्या भागातील एन जीओ ला अर्थ सहाय्य करा. एक डॉलर पास स्ठ रुपयों के बराबर है. पर एक लड्की की इज्जत .....
अंडर एज किंवा मॅरेजिएबल एज
अंडर एज किंवा मॅरेजिएबल एज मुलींचे त्यांच्या स्वतःच्या संमती शिवाय लग्न लावणे हा फार मोठा इथे विषय आहे. आणि अश्या किंवा इतर ही भारतीय लग्नांमध्ये होणा रा मॅरिटल रेप ते लैंगिक उपासमार ह्या सर्व रेंज् मध्ये स्रियांवर होणारे अन्याय ह्यावर वेगळा लेख लिहायचे पोटेन्शिअल आहे. भारतात मॅरिटल रेप ला मिनिस्टर लॉमेकर पासून जनतेत व स्वतः बायकांच्यात सुद्ध्हा काही रेकग्निशनच नाही. आपले लैंगिक शोष्ण होते आहे हे बायकांनाच समजत नाही. त्यांचे प्रबोधन करायची गरज आहे.
तुम्ही मी आपण वर्क शॉप्स घेउ शकतो. त्यांना घटस्फोट घेण्यास, वकील मिळवून देण्यास समुपदेशन मिळवून देण्यास मदत करू शकतो. पती परमेश्वर, त्याणे काहीही केले तरी स्वीकारलेच पाहिजे घरातील दीर सासरे ह्यांचे अत्याच्यार पण सहन केले पाहिजेत ही मानसिकता बदलण्यासाठी काही केले पाहिजे.
तुमच्या कडची उर्जा ह्या सकारात्मक कार्यात लावलीत तर नक्की फरक पडेल. मी सध्या बाहेर आहे एक दोन दिवसांत शोधून एन जीओज ची लिंक देते.
अमेरिकेत राहणारे लोक तिथले
अमेरिकेत राहणारे लोक तिथले कायदे, तिथल्या सामाजिक परिस्थिती आणि तिथले attitude इथल्या परिस्थितीवर लादताना बघून गम्मत वाटली आणि त्यांची दयाही आली. दोन भिन्न परिस्थितीतील फरक या लोकांना माहित नाही. इथल्या कामवाल्या बायांचे प्रश्न किंवा मुळात निम्न मध्यम वर्गीय आणि अगदी तळातले लोक यांच्याबद्दल फत्तरे माहित नाहियेत आणि तिथले कायदे इथे शिकवताहेत. स्वतःच्या इथल्या कुटुंबातल्या परिस्थितीवरून बाकी 120 बिलिओन लोकांविषयी मते मांडताहेत. दयनीय परिस्थिती आहे ह्या स्वतःच्याच डबक्यात राहणाऱ्या आणि त्यालाच जग समजणाऱ्या लोकांची.
विद्या भूतकर, तुम्ही जे लिहिलेत ते बरोबर लिहिलेत.
तक्रार करा म्हणून सांगणारे खूप आहेत इथे पण नुसती तक्रार करून काही होत नाही. आईबाप लग्न करून देऊ लागले आणि तुम्हाला ते नकोय तर त्या मुलीला कुठे ठेवणार? इथल्या सरकारी निवार्याबद्दल काय माहिती आहे हे सल्ले देणाऱ्या लोकांना? आणि जीच्याबद्दल एवढा कळवळा तिचे मत काय हे कोण बघणार? कि आईबाप तिला न विचारता लग्न लावताहेत म्हणून तुम्ही तिला न विचारता शासकीय निवाऱ्यात नेऊन टाकणार? तिला नसेल राहायचे तर?
ज्या मुलीचा तुम्हाला कळवळा येतोय तिला तुम्ही स्वतःच्या घरात तुमच्या मुलांबरोबर वाढवणार आहात का? ते शक्य आहे तरच पुढचे पाऊल उचला. पूर्ण जबाबदारी उचलायची तयारी असेल तर आणि तरच दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करा. नाहीतर सोडा त्यांना. प्रत्येकाला प्राप्त परिस्थितीवर उपाय काढायचे शहाणपण असते. एकाचे शहाणपण दुसऱ्याला मूर्खपणा वाटतो हि गोष्ट वेगळी.
अल्पवयीन मुलींचे लग्न केल्यामुळे होणारी त्यांची शारीरिक हानी हा वेगळा विषय आहे. त्या समाजातली मुले जन्मापासूनच कुपोषित असतात कारण आया कुपोषित. ती साखळी खूप मागे जाते. ती तोडण्यासाठी प्रयत्न नक्कीच करता येतील. पण त्याला dedicated एफफोर्ट हवेत. एका माणसांचे काम नाही आणि एका भारत वारीत करण्याचे तर अज्जिबात नाही. सो भारतवारीत उगीच समाजसुधारणा करायच्या मागे लागू नका. तुमचे नियम तर इथे अजीबात लावू नका. तुम्ही सल्ले देता ते तुमच्या बाया ऐकतात आणि पदरामागे हसतात. तुमच्यासारख्या दोन दिवसांच्या पाहुण्यांच्या सल्ल्याने आयुष्याचे निर्णय त्या घेणार या भ्रमात राहू नका.
भारतात ग्रामीण्/निमशहरी
भारतात ग्रामीण्/निमशहरी भागातही शाळकरी मुलंमुली डेटिंग करतात.
'सातच्या आत घरात' नावाचा एक लेख वाचला होता. त्यात शाळकरी मुलामुलींनी शाळेच्या वेळेत लॉजवरच्या खोल्या तासाने घेण्याच्या प्रकाराबद्दल लिहिलं होतं.
आणखी एक डॉक्टरने लिहिलेला लेख वाचलेला, ज्यात शाळकरी मुलगी आपल्या (शाळकरीच) मित्रासोबत गर्भपात करून घ्यायला आल्याचं आणि या डॉक्टरांनी पालकांना आणल्याशिवाय गर्भपात करायला नकार दिल्यावर त्या मुलीने आणखी कसले कसले सांगीवांगीचे उपचार केल्याने कॉम्प्लिक्लेशन्स होऊन तिचा मृत्यू झाल्याचं लिहिलं होतं. आणि या अनुषंगाने अशा प्रकारांबद्दल.
राजसी अंडर एज डेटिंगला ही लैंगिक शोषणच म्हणताहेत. आणि दबावाखाली, घाबरून लग्नाला तयार होणार्या (जसा काही त्या मुलीकडे नकाराधिकार असतोच) मुलीच्या बाबत राजीखुषीचा मामला म्हणताहेत. बहुतेक होकार नकाराच्या , राजीखुषी, जबरदस्तीच्या व्याख्या देशागणिक बदलत असाव्यात.
तसंही बालविवाहाची परंपरा ज्या काळात बायका घराबाहेर पडत नव्हत्या, अशा वर्गात आणि अशा काळापासून आहे.
त्यामागे बलात्काराची भीती हे एकच कारण नाही. जिथे नवरा बायकोच्या वयांत बापलेकीइतकं अंतर असे अशा प्रकरणांतही त्याला बलात्कार आणि लैंगिक शोषण म्हणायला नकोच. विवाहांतर्गत बलात्काराची अजूनतरी इथल्या कायद्याने दखल घेतलेली नाही.
साधना, भारतातही लग्नाचं
साधना, भारतातही लग्नाचं कायदेशीर वय मुलींसाठी अठराच आहे.
मूळ लेखातला मुद्दा हा आहे की बलात्काराच्या भीतीने लहान वयात लग्न लावून दिलं की ती मुलगी जन्मभर किंवा योग्य वयाची होईतो, लग्नाच्या नावाखाली कायदेशीर बलात्कार सहन करत राहणार. नवरा नवरी दोघेही कायदेशीर वयाच्या खालचे असतील, दोघांच्या वयांत फार अंतर नसेल, तर एकवेळ हाल कमी असं म्हणता येईल. पण तसं नसेल तर?
आणखी एक म्हणजे बलात्कार झाला म्हणजे ती मुलगी आणि तिचं कुटुंब आयुष्यातून उठली, अन्य कोणात्याही पुरुषासाठी अग्राह्य झाली, हा कलंक सार्वत्रिक नसावा. अर्थात हा माझा गैरसमज असू शकतो.
साधना, जरा कडक शब्दात
साधना,
जरा कडक शब्दात लिहिलेली असली तरी तुमची पोस्ट आणि तिच्यातल्या भावना आवडल्या आणि पटल्या.
मुलीचे लवकर लग्न करून
मुलीचे लवकर लग्न करून देण्यात ती वयात आले ली किंवा न आलेली मुलगी सुद्ध्हा घरातील वडील भाउ /शेजारी / दूधवाला यांच्या शोष् णाची व्हिक्टिम होउ शकते ही एक दुर्दैवी शक्यता आहे. त्यामुळे तिची ओनरशिप लवकरात लवकर दुसृयाला सोपवावी हा एक विचार असू शकतो.
तसेच इथे स्कोअर सेटलिंग साठी देखील मुलीवर अत्यचार करून ठेवण्याची मानसिकता आहे. म्हणजे प्रॉपर्टीच्या वादात दोन पार्टी असतील तर एक पार्टी दुसृयाच्या मुली वर अत्याच्यार करू शकते. नव्हे करतेच. धडा शिकवायला.
मध्यांतरी अमेरिकेत एक केस झालेली एका स्टार अॅथलिट मुलाने मुलीवर अत्याचार केला. तर त्याला त्याची करिअर बरबाद होउ नये म्हणून कमीत कमी, व प्रोबेशन अशी शिक्षा दिली गेली. पण म्हणून जज वर देखील खूप आगपाखड झाले आहे. वीस मिनिटांच्या अॅक्षन सा ठी आयुष्य बरबाद करणार का मुलाचे असे त्याच्या वडिलांनी विचारले होते. त्या मुलीने तिच्यावर काय परिणाम झाला ते ओपन लेटर लिहीले होते. हे सर्व फेस बुक वर डिटेल मध्ये उपलब्ध आहे. कँपस रेप ही तिथे एक कॅटेगरी आहे
गुन्ह्याची. मी उगीच भारतात बसून गैरसमजातून लिहीत नाही. मुलीला शिक्षणा साठी पाठवायचे तर काय खबरदारी घ्यावी लागेल, म्हणून रिसर्च केला होता. नो मीन्स नो. वगिरे रिलेटेड मुद्ध्यांवर घमासान चर्चा घरी झाल्या आहेत. जगातल्या कुठल्याही मुलीवर असा प्रसंगच येउ नये म्हणून उपाय योजायला हवेत.
हो भरत, लेखात तोच मुद्दा आहे
हो भरत, लेखात तोच मुद्दा आहे पण त्या वर्गात लवकर लग्ने फक्त पुण्यातल्या त्या सोसातयींच्या आजूबाजूला घडत नाहीयेत तर सगळीकडे अगदी माझ्या सोसायटीच्या आजूबाजूला घडताहेत आणि बलात्कार हे एकच कारण नाहीय
हायस्कुल सेक्स इथेही आहे. फक्त हाय सोसातटित पालक स्लिप ओव्हर, प्ले डेट, हायस्कुल डेटिंग हे शब्द वापरतात. खालच्या वर्गात डेटिंग म्हणजे पोरगी बिघडली म्हणतात. शिकलेल्या मुलांमध्ये गर्भ प्रतिबंधक वापरायची अक्कल आता आलीय पण झोपडपट्टीत मात्र पोरगी गरोदर राहते. पोरगी आपल्या भाषेत डेटिंग आणि त्यांच्या भाषेत लफडे करायला लागली की आधी लग्नाचे बघतात. नाहीतर नाक कापले जायची आपत्ती ओढवायची. आपल्याला कदाचित नाक कापले गेले वाटायचे नाही पण त्यांना वाटते.
बलात्कारानंतर पीडितेला कसे वागवावे हा खरेच गंभीर प्रश्न आहे. यावर खूप काम करणे गरजेचे आहे.
आंध्रप्रदेश आणि तेलंगणात,
आंध्रप्रदेश आणि तेलंगणात, मुलीची पाळी सुरु झाली की एक कार्यक्रम केला जातो.. नात्यातल्या आणि ओळखीपाळखीच्यांना बोलावले जाते. ही पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे इथे ही अजूनही पाळली जाते (इतर राज्यांतही / देशांतही पाळली जात असेल, त्याची कल्पना नाही.) मुलगी वयात आली आहे, हे जाहीर करण्याची ती प्रथा असावी, म्हणजे स्थळे सांगून येतील वगैरे. अशिक्षीत / सुशिक्षीत सुद्धा अजून ही प्रथा पाळतात.
सुशिक्षीत लोक अर्थात लगेच मुलीचे लग्न करत नाही.
पण अशिक्षीत वर्गात मात्र लगेच लग्न केले जाते. आमची मोलकरीण मुलीचा असा कार्यक्रम करायला म्हणुन सुट्टी घेउन गावी गेली ती उगवली चार महिन्यांनी, मुलीचे लग्न आटपूनच. थोडक्यात हे केवळ बलात्काराच्या भयाने होते असे नाही, तर पूर्वापार प्रथा सोडायला हे लोक तयार नाहीत आणि त्यात बलात्कार हे ती परंपरा सुरु ठेवायला निमित्त मिळते, असे मला वाटते.
अमा, साधना म्हणतात त्याप्रमाणे हे काम सोपे नाही. त्यातून काय काय प्रश्न उद्भवू शकतात ते कसे हाताळावे, इद्यादि बघायला हवे. मोठ्याप्रमाणात जागरुकता निर्माण करणे, समुपदेशन करणे, वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई, सल्ला इत्यादि गोष्टी म्हणजे एक मोठी संस्थाच हवी.
साती धन्यवाद. माझी बाई
साती धन्यवाद. माझी बाई माझ्याकडे गेली 10 वर्षे आहे, ती मला तिच्या घरातलीच सदस्य समजते त्यामुळे तिचे प्रश्न माझे बनतात. हे लिहिलेय ते गेल्या 10 वर्षात फक्त त्या घरातच नाही तर त्या पूर्ण झोपडपट्टीत पाहिलेत. तिच्या मुलींची लग्ने मी थांबवू शकले नाही कारण मला त्यांना स्वतःकडे ठेवणे शक्य नव्हते. फक्त 1च समाधान कि मी त्या मुलींना इंग्रजी आणि मराठी अक्षर ओळख करून देऊ शकले. सध्या तिसरी मुलगी शिकतेय माझ्याकडे.
मानव, आपल्याकडेही होती ही
मानव, आपल्याकडेही होती ही परंपरा. २२ जून १८९७ मध्ये तर त्या प्रसंगाचं गाणंही आहे.
अजूनही शिक्षणात मागे राहिलेल्या वर्गांत पाळली जातही असेल. मला वाटतं दया पवारांच्या पत्नीच्या आत्मचरित्रातही तसा उल्लेख आहे. त्या अनाथाश्रमात राहायच्या. तरीही तिथल्या मुलींनी त्यांचासाठी सोहळा केला होता.(नक्की आठवत नाहीए.)
होती का? असेलही कित्येक
होती का? असेलही कित्येक ठिकाणी अजूनही. माझ्या सासरच्या एकीने माझ्या मुलीसंदर्भात मला विचारलेलं केले का म्हणून. मी म्हटले मुलगी हॉस्टेलला असते, इथे नसते. तर म्हणे आपण करायचे तरीही. शेवटी तिला म्हटले मुलीसंदर्भात तिला पटेल तेच मी करू शकते.
<बलात्कार हे ती परंपरा सुरु
<बलात्कार हे ती परंपरा सुरु ठेवायला निमित्त मिळते, असे मला वाटते.> +१
भम, ज्यावेळी आपल्याकडे ही
भम, ज्यावेळी आपल्याकडे ही परंपरा होती त्यावेळी पाळी सुरू व्हायच्या आत मुलीचे लग्न झालेले असलेच पाहिजे अशीही परंपरा होती.
तुम्ही म्हणताय त्या सिनेमात त्या मुलीचे लग्न झालेले असते का?
आठवत नाही. पण दया पवारांच्या
आठवत नाही.
पण दया पवारांच्या पत्नीच्या बाबत लग्न नव्हतं झालं. आणि मुलीमुलींनीच केलेलं ते. जाणत्या मुलींनी.
Ho lagna zalele asate tyaa
Ho lagna zalele asate tyaa cinema t,.नहाण आले म्हणजे शरीरसंबधास मुलगी योग्य zaaली असे मानतात.
"सिताबाईला चाफेकळीला न्हाण
"सिताबाईला चाफेकळीला न्हाण आल"
अस ते गाणं आहे...
साती, 22 जून चित्रपट पाहिला
साती, 22 जून चित्रपट पाहिला नव्हता का? लग्न झालेलं होतं अर्थातच.
येस निरु, बरोबर.
चाफेकळी आहे का? मी चाफेकरी
चाफेकळी आहे का? मी चाफेकरी ऐकायचो.
चाफेकरिण आहे ते. धाकट्याची
चाफेकरिण आहे ते. धाकट्याची बायको असते बहुतेक.
भारतात Prohibition of Child
भारतात Prohibition of Child Marriage Act हा कायदा आहे. या कायद्या प्रमाणे चाइल्ड ची डेफिनेशन आहे मुलीसाठी १८ वर्शाखालील आणि मुलासाठी २१ वर्शाखालील अशी आहे.
या कायद्याप्रमाणे जे कोणी चाइल्ड या डेफिनेशन खाली येणार्या व्यक्तिशी लग्न करेल त्याला शिक्षेची तरतुद आहे.
अजून बाकीच्या प्रोविजन्स वाचायच्या असतील तर खालील लिंक बघा.
http://www.advocatekhoj.com/library/bareacts/prohibitionofchildmarriage/...
अजून काही केसेस मध्ये सुप्रिम कोर्टाने असे ऑब्जर्व केले आहे कि कमी वयातील मुली/मुले स्वताहून आम्ही या लग्नामध्ये रहायला तयार आहोत असे सांगते, तेव्हा कोर्टाने ते लग्न वॉइड ( मराठी?) ठरवलेले नाही.
या खालील वर्तमान पत्रातील लिंक वरून त्याबद्दल थोडीफार माहिती मिळू शकते.
http://timesofindia.indiatimes.com/life-style/relationships/man-woman/Co...
अॅमी, तुमच्या लिंक मधला
अॅमी, तुमच्या लिंक मधला रेफरन्स सेक्शन ३७५ ऑफ इंडिअन पिनल कोड आहे.
हे सेक्शन 'रेप' बद्दल आहे. यामध्ये रेप कशा कशाला म्हणता येऊ शकते हे सांगितले आहे.
हे सेक्शन खालील लिंकमध्ये वाचू शकता.
https://indiankanoon.org/doc/623254/
चाइल्ड मॅरेज हे चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन कायद्या खाली गुन्हा ठरवले जाते.
इंडियन पिनल कोडचे सेक्शन ३७५ (६) exception इंटरप्रिट करायचे झाले, तर ते असे करता येईल-
लग्न झालेल्या जोडप्यांमधील संबंध जर पत्नी १५ वर्षांपुढील असेल तर रेप नाही.
जसे वरच्या पोस्टमधे लिहीले आहे, सुप्रिमकोर्ट सुद्धा म्हणतय कि जर कमी वयाचे मुल स्वताहून म्हणत असेल की "I eloped voluntarily with my beaus" तर कोर्ट ते लग्न मोडा असं सांगत नाही.
पुढचा मुद्दा, भारतात अजुनही marital rape concept नाही.
एकंदर लग्न केलं की सगळं काही
एकंदर लग्न केलं की सगळं काही माफ. एका केसमध्ये बलात्कार्याशीच लग्नाची तडजोड सुचवली गेलेली.
अवांतर. एका केसमध्ये
अवांतर.
एका केसमध्ये बलात्कार्याशीच लग्नाची तडजोड सुचवली गेलेली.<>>>>>>>>>>>>>> मला ह्यावरुन राणी मुख्रजी चा पहिला सिनेमा आठवला.कैच्यकै.
Pages