बॅडमिंटन (रिओ ऑलिम्पिक्स)

Submitted by टवणे सर on 11 August, 2016 - 00:45

उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा सुरु होतील.

पुरुष एकेरीत ली चाँग वेई आणि लिन डॅन अंतिम सामन्यात न भिडता उपांत्य फेरीतच एकमेकांच्या समोर यायची शक्यता आहे. या दोघात जो जिंकेल तो सुवर्णपदकाचा मानकरी होईल असे वाटते. सलग तिसर्‍यांदा हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडतील (हो हे भिडतात, युद्ध केल्यासारखे). दोन्ही महान खेळाडू. ली चाँग वेई किमान या वेळी तरी सुवर्णपदक विजेता ठरावा ही इच्छा.

महिला एकेरीत खूपच ओपन फिल्ड आहे. कुणीच गेल्या वर्षभरात संपूर्ण वर्चस्व गाजवलेलं नाहिये. कॅरोलिना मरिन बिग स्टेज खेळाडू आहे, रन्टानॉक इन्टानॉन गिफ्टेड आहे, वँग यिहान आणि शिझियान वँग मेहनती तर साईना नेहवाल बेभवरशी आहे! साईनाच्या खेळात सातत्य नसल्याने ती कुठल्या सामन्यात चुका करेल याची शाश्वती नाही. इन्टानॉन विजेती ठरेल असे वाटते मात्र साईन विजेती ठरावी अशी मनापासून इच्छा आहे.

पुरुष दुहेरीत दोन्ही कोरियन जोड्या अतिशय सातत्याने खेळल्या आहेत. इन्डोनेशियन जोडी दुसर्‍या क्रमांकावर असली तरी जिंकेल असे वाटत नाही. अर्थात पुरुष दुहेरी हा इन्डोनेशियाचा खास प्रांत. काइ-फु जोडी काई निवृत्त झाल्याने कमजोर झाली असली तरी फु हाइफेंग एकट्याच्या जीवावर मॅच ओढू शकतो. आणि माझे आवडते मथायस बो आणि कार्स्टन मोन्गेसन पण आहेत पण आता ते एव्हडे पॉवरफूल नाहियेत. डार्क हॉर्सः रशियाची साडे-सहा / पावणे सात फूट उंच व्लादिमिर इवानोव आणि इवान सोझोनोव जोडी ज्यांनी या वर्षीची ऑल इंग्लंड जिंकली. यांच्या उंचीमुळे ते जवळपास नेटवर रॅकेट टेकवतात सर्विस रिटर्न करताना. त्यामुळे सर्विस अ‍ॅड्वांटेज निघून जातो प्रतिस्पर्ध्यांचा. यांना जिंकताना बघायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< कमिटेमेंट ती हीच..>> +१ व 'रिअल पॅशन फॉर द गेम' ! सिंधु प्रत्यक्ष फायनल खेळण्यापूर्वीं गोपीचंद ती फायनल
मनातल्या मनात किती तरी वेळ खेळले असावेत. ग्रेट !!! सॅल्यूट !!

मेन्स सिंग्ल्स - चायना गेट्स द गोल्ड !!! २१-१८, २१-१८ !!
<< ली चाँग वेई किमान या वेळी तरी सुवर्णपदक विजेता ठरावा ही इच्छा. >> देवाजीच्या मनांतच नव्हतं त्याला कधींही सुवर्णपदक मिळावं असं !! बिचार्‍याच्या चेहर्‍याकडे पाहावत नव्हतं. ऑलिम्पिक्स किती निर्दयही होवूं शकतं !!!

देवाजीच्या मनात वगैरे काही नाही. तीन वेळा अंतिम फेरीत पोचून हारणे याला सर्वस्वी तो स्वतः जबाबदार आहे. आजचा खेळ तर वैताग होता. दुसर्‍या गेममध्ये एकही अ‍ॅटॅकिंग शॉट नाही. त्याच त्या चुका पुन्हा केल्या.
अतिशय चिडचिड झाली माझी Sad Angry

<< तीन वेळा अंतिम फेरीत पोचून हारणे याला सर्वस्वी तो स्वतः जबाबदार आहे. >> आधीच्या दोन वेळचं माहित/आठवत नाही पण आज मात्र वय [ slower reflexes & errors of judgement ] त्याच्या आड आलं असावं असं खेळ बघताना वाटून गेलं. << दुसर्‍या गेममध्ये एकही अ‍ॅटॅकिंग शॉट नाही.>> ह्याचं श्रेय ऑपोनंटला जातं. तो ली चाँगला बव्हंशीं नेट किंवा बेस-लाईनवरच खेळायला लावत होता. १९- १७ स्कोअर असताना ली चाँगने स्मॅशेस मारले पण ते छान परतवले गेले. चांगल्या एक-दोन रॅलीही झाल्या पण ली चाँगने मनातून हार पत्करल्यासारखंच वाटलं. आजची
ली चाँगची देहबोली विश्वविजेत्याची वाटली नाहीं, हें खरं.

ह्याचं श्रेय ऑपोनंटला जातं. तो ली चाँगला बव्हंशीं नेट किंवा बेस-लाईनवरच खेळायला लावत होता.
?>>>

नाही, चेन लाँग अ‍ॅज उज्युअल बोअर खेळला. आजच्या यशात चेन लाँगचे कर्तुत्व फक्त स्वतःच्या स्ट्रेन्थला चिकटून राहणे व शटल परतावणे इतकेच होते. लिन डान वा इतर वेळी दिसणारा ली चाँग वेईच्या समोर ही स्ट्रॅटेजी टिकणार नव्हती.
पण ली चाँग एक तर जखमी तरी होता किंवा त्याच्यात लिन डानला हारवल्यानंतर पोटात आग शिल्लक नव्हती. पहिल्या गेमच्या १२-१३ पॉइंटनंतर ली च्चाँग वेईने अ‍ॅटॅक केलाच नाही. त्यात चेन लाँगचे काही कर्तुत्व नाही. चेन लाँगचे कोर्ट कवरेज सर्वात उत्तम आहे आणि खेळ सगळ्यात बोअरींग. हे जगाला माहिती आहे. त्याच्याविरुद्ध कुठलीही स्ट्रेटेजी फॉलो न करता त्याच्या जाळ्यात अलगद शिरला चेन लॉंग. यु डोन्ट एक्स्पेक्ट दॅट फ्रॉम अ वर्ल्ड क्लास अ‍ॅथलीट.

<< पहिल्या गेमच्या १२-१३ पॉइंटनंतर ली च्चाँग वेईने अ‍ॅटॅक केलाच नाही.>> मीं १९-१७ स्कोअरच्या वेळचा ली चाँगचा अटॅकींग खेळ म्हटलंय तें दुसर्‍या गेममधल्या खेळाबद्दल.
<<एक तर जखमी तरी होता किंवा त्याच्यात लिन डानला हारवल्यानंतर पोटात आग शिल्लक नव्हती.>> अगदीं खरंय . मला वाटलं वयामुळे असेल. म्हणूनच मीं << आजची ली चाँगची देहबोली विश्वविजेत्याची वाटली नाहीं, हें खरं.>> असं म्हटलं. " जरा सूट दिली तर ही लाडातच आलीय; दाखवते आतां हीला माझा इंगा ! ", ही देहबोली होती मरनची, सिंधुने पहिला गेम घेतल्यावर. पण त्याच परिस्थितीत, ली चाँग जणूं चेन लाँगला म्हणतोय , "अरे बाबा, आतां उगीचच तिसर्‍या गेमपर्यंत मॅच वाढवूं नकोस ",असंच वाटलं !
टण्या, आपण जागतिक बॅडमिंटन अभ्यासपूर्वक 'फॉलो' करतां व स्वतःही चांगलं खेळत/खेळला असणार, हें नक्की. मीं या दोन्ही बाबतींत कच्चाच आहे, जरी या खेळाची आवड मात्र मला जबरदस्त होती /आहे. आपल्या इथल्या पोस्ट म्हणूनच आवडल्या. आतां खेळात 'बॅक-हँड'चा वापर अगदींच नाईलाजास्तव होतो, हें जरा खटकतं. सिंधु व श्रीकांत 'प्लेसिंग'साठी या मनगटी स्ट्रोकचा अधुन मधून तरी वापर करतात, हें छान वाटलं.

Pages