बॅडमिंटन (रिओ ऑलिम्पिक्स)

Submitted by टवणे सर on 11 August, 2016 - 00:45

उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा सुरु होतील.

पुरुष एकेरीत ली चाँग वेई आणि लिन डॅन अंतिम सामन्यात न भिडता उपांत्य फेरीतच एकमेकांच्या समोर यायची शक्यता आहे. या दोघात जो जिंकेल तो सुवर्णपदकाचा मानकरी होईल असे वाटते. सलग तिसर्‍यांदा हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडतील (हो हे भिडतात, युद्ध केल्यासारखे). दोन्ही महान खेळाडू. ली चाँग वेई किमान या वेळी तरी सुवर्णपदक विजेता ठरावा ही इच्छा.

महिला एकेरीत खूपच ओपन फिल्ड आहे. कुणीच गेल्या वर्षभरात संपूर्ण वर्चस्व गाजवलेलं नाहिये. कॅरोलिना मरिन बिग स्टेज खेळाडू आहे, रन्टानॉक इन्टानॉन गिफ्टेड आहे, वँग यिहान आणि शिझियान वँग मेहनती तर साईना नेहवाल बेभवरशी आहे! साईनाच्या खेळात सातत्य नसल्याने ती कुठल्या सामन्यात चुका करेल याची शाश्वती नाही. इन्टानॉन विजेती ठरेल असे वाटते मात्र साईन विजेती ठरावी अशी मनापासून इच्छा आहे.

पुरुष दुहेरीत दोन्ही कोरियन जोड्या अतिशय सातत्याने खेळल्या आहेत. इन्डोनेशियन जोडी दुसर्‍या क्रमांकावर असली तरी जिंकेल असे वाटत नाही. अर्थात पुरुष दुहेरी हा इन्डोनेशियाचा खास प्रांत. काइ-फु जोडी काई निवृत्त झाल्याने कमजोर झाली असली तरी फु हाइफेंग एकट्याच्या जीवावर मॅच ओढू शकतो. आणि माझे आवडते मथायस बो आणि कार्स्टन मोन्गेसन पण आहेत पण आता ते एव्हडे पॉवरफूल नाहियेत. डार्क हॉर्सः रशियाची साडे-सहा / पावणे सात फूट उंच व्लादिमिर इवानोव आणि इवान सोझोनोव जोडी ज्यांनी या वर्षीची ऑल इंग्लंड जिंकली. यांच्या उंचीमुळे ते जवळपास नेटवर रॅकेट टेकवतात सर्विस रिटर्न करताना. त्यामुळे सर्विस अ‍ॅड्वांटेज निघून जातो प्रतिस्पर्ध्यांचा. यांना जिंकताना बघायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप इच्छा आहे आहे हे सामने बघायची, एक बालीश प्र्श्न - केंव्हां व कोणत्या चॅनेलवर पहातां येतील हे सामने ?

<< मॅचेस स्टारस्पोर्ट्स वर आहेत >> स्टारस्पोर्ट्स पहातो पण नेमक्या ह्या मॅचेस केंव्हां असतात हें नाहीं कळत .

Thu 11 16:30 Women's Doubles Group Play Stage - Grp A
JPN
MATSUTOMO Misaki TAKAHASHI Ayaka
IND
GUTTA Jwala PONNAPPA Ashwini

Thu 11 17:30 Men's Doubles Group Play Stage - Grp D
INA
AHSAN Mohammad SETIAWAN Hendra
IND
ATTRI Manu REDDY B. Sumeeth

Thu 11 18:40 Women's Singles Group Play Stage - Grp M
IND
PUSARLA V. Sindhu
HUN
SAROSI Laura

Thu 11 19:50 Women's Singles Group Play Stage - Grp G
IND
NEHWAL Saina
BRA
VICENTE Lohaynny

Fri 12 05:35 Men's Singles Group Play Stage - Grp H
IND
KIDAMBI Srikanth
MEX
MUNOZ Lino

Fri 12 17:30 Women's Doubles Group Play Stage - Grp A
NED
MUSKENS Eefje PIEK Selena
IND
GUTTA Jwala PONNAPPA Ashwini

Sun 14 04:25 Men's Doubles Group Play Stage - Grp D
JPN
ENDO Hiroyuki HAYAKAWA Kenichi
IND
ATTRI Manu REDDY B. Sumeeth

Sun 14 17:25 Women's Singles Group Play Stage - Grp G
IND
NEHWAL Saina
UKR
ULITINA Maria

अधिक माहितीसाठी https://www.rio2016.com/en/badminton-schedule-and-results/day-11 इथे भेट द्या.. आणि तिथे टाईम झोन भारताचा सिलेक्ट करा..

जिंकल्या नेहवाल मॅडम. ब्राझिल्यन सांबा बॅडमिंटन खरेच डिसेप्टिव्ह आहे की काय?

कुणी बघितली का मॅच? साईनाचा फॉर्म कसा होता?
सिंधु आरामात जिंकलेली दिसतेय. सिंधु उंच, शारिरीकदृष्ट्या साईनापेक्षा मजबूत आहे. सध्याच्या खेळाडूंमध्ये वँग यिहान आणि कॅरोलिना मरिनच फक्त तिच्या इतक्या धिप्पाड आहेत. सिंधू रेड हॉट फॉर्ममध्ये खेळली तर डार्क हॉर्स आहे.

मी २०१४ स्विस ओपनमध्ये तिला भेटलो होतो. माझ्या सहकर्मचार्‍याची बायको हैद्राबादमध्ये फ्रीलान्स पत्रकार आहे तिने सिंधुची मुलाखत घेतली होती. योगायोगाने हा माझा सहकर्मचारी आणि त्याची बायको दोघेही माझ्याबरोबर फ्रान्समध्ये होते. त्यामुळे सिंधुशी प्रत्यक्ष बोलता आहे. एकदम सौम्य बोलत होती, कॉन्फिडंट होती. प्रत्यक्ष बघितल्यावर कळते की काय फिजिक कमावलेले आहे. सामन्याच्या आधी जेव्हा ती कोर्टवर आली तेव्हा तिच्या चेहर्‍यावर इतकी एकाग्रता होती की जणू काही ट्रान्समध्येच आहे. त्याउलट साईना एकदम गडबडीत असल्यासारखी वावरते. अर्थात प्रत्येकाची स्वतःची शैली असते.

जिंकली ! दुसरा सेट लवकर आवरला ते बरं!

मी थोडी बघितली मॅच. पहिला सेट. साईना रॅली चांगली बिल्ट करत होती फक्त निर्णायक फटके मारू शकत नव्हती फार. त्यामुळे पाहिला सेट १६ पॉईंट्स पर्यंत बरोबरीत चालला होता. नंतर बहुतेक ते बदललं असावं.

पाहिला दुसरा सेट आत्ता एनबीसीएसएनवर.
साइना फिट दिसत नाहिये. तिचं लँडिंग (शॉट मारल्यावर पाय जमिनीवर जसा आदळतो) नीट होत नाहिये. होप ती सुधारेल पुढल्या मॅचेसमध्ये.
कोर्टवर ड्रिफ्टपण खूप आहे. साइना ड्रिफ्टचापण अंदाज घेत असेल. पण तरिही तिचे फूटवर्क फार सदोष वाटले आज.

<< साइना फिट दिसत नाहिये.>> मलाही ती कांहींशी मरगळलेली असल्यासारखं वाटलं. अर्थात, खेळावर फारसा परिणाम झालेला नाही दिसला.

काल सिंधूचा गेम बघायला मिळाला. कसली कचकचीत खेळली ती. मी पहिल्यांदाच तिला प्रत्यक्ष खेळताना पाहिलं. असाच आग्रेसिवनेस असेल तिच्या खेळात तर भवितव्य उज्ज्वल आहे तिचं.
टॉपशॉट्स मारण्यात एकदम पटाईत आहे. असे शॉट मारून समोरच्यावर दडपण आणता येतं. कोर्टवरचा वावरही जबरा आहे तिचा.
इंग्रजी फूटवर्क या शब्दाला पदलालित्य असा सुंदर मराठी शब्द आहे. स्टेफीचं पदलालित्य खूप सुंदर असायचं. सिंधूचा खेळ बघताना मला स्टेफीच्या खेळाची आठवण येत होती. अर्थात, बॅडमिंटन आणि टेनिस दोन्ही वेगवेगळे खेळ, पण अ‍ॅग्रेशन आणि पदलालित्य दोघींचंही मस्त!

काल साईनाने ज्या ब्राझिलच्या खेळाडूस पराभूत केले ती एका गरीब गुन्हेगारीने भरलेल्या रिओच्या भागातून पुढे आली आहे. तिचे वडिल ड्रग डिलर होते व ती लहान असतानाच एका पोलिस एन्काउंटरमध्ये मारले गेले.
मी रिओच्या मूळ धाग्यावर दिलेली ब्राझिल आणि सांबा बॅडमिंटन लिंक बघितली तर अजून माहिती मिळेल. ब्राझिलचे सर्वच खेळाडू या गरीब भागातले व हालाखीच्या/गुन्हेगारी पार्श्वभुमीतून आलेले आहेत.

अरेच्चा, मला चुकली ही मॅच. हिम्सकूलनी सांगितलेल्या साईटवर ही मॅच ८.५५ वाजतां आहे असं दाखवलंय.
काल श्रीकांतचा सामना पहिला. त्याचे 'स्मॅशेस 'व 'हाफ स्मॅशेस' खूपच प्रभावी वाटले.

साईना स्पर्धेतून बाहेर. मी ही मॅच बघितली नाही मात्र तिच्या पहिल्या सामान्यातच जो काही फॉर्म होता तो पाहून फार आशा नव्हती. साईना बहुतेक जखमी/ अनफिट असावी. गुढग्याला भरपूर पट्ट्या गुंडाळला होत्या, तिच्या हालचाली जड/ फोर्स्ड होत्या.
सिंधू उपउपांत्य फेरीच्या पुढे जायची शक्यता कमीच आहे.

सायनाची अलिटिना बरोबरची मॅच पाहिली. सायना काहीच प्रभाव पाडू शकली नाही. काही चपळता दिसतच नव्हती. प्रतिस्पर्ध्याची कमतरता ओळखून गेम इंप्रूव्ह केलेला दिसला नाही. सतत त्याच चुका करत राहिली. प्लेसिंग करत नव्हती. अलिटिनानं स्वतःच्या उंचीचा पुरेपुर फायदा उठवला.

जागतिक रँकिंग मध्ये ५ व्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूने ६१व्या क्रमांकाकडून इतक्या सहजासहजी हार कशी काय पत्करली?

रच्याकने, सायना ड्रेस अगदीच कायच्याकाय होता. जर छानसा डिझायनर ड्रेस नसेल तर शॉर्ट्स आणि टिशर्ट्स घालायलाही हरकत नव्हती. जे घातलं होतं ते अगदीच धेडगुजरी होतं.

श्रीकांत प्री- क्वार्टरमधे दाखल !
आज अप्रतिम आक्रमक व चलाखीने खेळला श्रीकांत. त्याचे 'ओव्हरहेड क्रॉस-कोर्ट स्मॅशेस ' लाजवाब होते. तसंच नेटजवळचा खेळही ! अभिमंदन. बढते रहो.

श्रिकांत किदम्बी जिंकला ! मस्त खेळला एकदम.
पहिल्या गेममध्ये त्याने मारलेले स्ट्राँग स्माशेस बघून स्विडीश खेळाडूने दुसर्‍या गेममध्ये त्याला तश्या संधी देण्याचे टाळले. ज्यात तो बर्‍यापैकी यशस्वी झाला असं म्हणायला हवं. दुसर्‍या सेटमध्ये नेटजवळ बरेच पॉईंट झाले.

रच्याकने, सायना ड्रेस अगदीच कायच्याकाय होता. >>>> मामी, सायनाचा एकटीचा ड्रेस तसा नाहीये. Happy भारतीय पथकाने ठरवेलेल ड्रेस आहेत. पण एकंदरीत आपल्या पथकाचे ड्रेसेस (अगदी ओपनिंग सेरेमनी पासून) गंडलेले आहेत. तिरंदाजीवाल्या बायांचे ड्रेसपण विचित्र आहेत.

Pages