बॅडमिंटन (रिओ ऑलिम्पिक्स)

Submitted by टवणे सर on 11 August, 2016 - 00:45

उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा सुरु होतील.

पुरुष एकेरीत ली चाँग वेई आणि लिन डॅन अंतिम सामन्यात न भिडता उपांत्य फेरीतच एकमेकांच्या समोर यायची शक्यता आहे. या दोघात जो जिंकेल तो सुवर्णपदकाचा मानकरी होईल असे वाटते. सलग तिसर्‍यांदा हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडतील (हो हे भिडतात, युद्ध केल्यासारखे). दोन्ही महान खेळाडू. ली चाँग वेई किमान या वेळी तरी सुवर्णपदक विजेता ठरावा ही इच्छा.

महिला एकेरीत खूपच ओपन फिल्ड आहे. कुणीच गेल्या वर्षभरात संपूर्ण वर्चस्व गाजवलेलं नाहिये. कॅरोलिना मरिन बिग स्टेज खेळाडू आहे, रन्टानॉक इन्टानॉन गिफ्टेड आहे, वँग यिहान आणि शिझियान वँग मेहनती तर साईना नेहवाल बेभवरशी आहे! साईनाच्या खेळात सातत्य नसल्याने ती कुठल्या सामन्यात चुका करेल याची शाश्वती नाही. इन्टानॉन विजेती ठरेल असे वाटते मात्र साईन विजेती ठरावी अशी मनापासून इच्छा आहे.

पुरुष दुहेरीत दोन्ही कोरियन जोड्या अतिशय सातत्याने खेळल्या आहेत. इन्डोनेशियन जोडी दुसर्‍या क्रमांकावर असली तरी जिंकेल असे वाटत नाही. अर्थात पुरुष दुहेरी हा इन्डोनेशियाचा खास प्रांत. काइ-फु जोडी काई निवृत्त झाल्याने कमजोर झाली असली तरी फु हाइफेंग एकट्याच्या जीवावर मॅच ओढू शकतो. आणि माझे आवडते मथायस बो आणि कार्स्टन मोन्गेसन पण आहेत पण आता ते एव्हडे पॉवरफूल नाहियेत. डार्क हॉर्सः रशियाची साडे-सहा / पावणे सात फूट उंच व्लादिमिर इवानोव आणि इवान सोझोनोव जोडी ज्यांनी या वर्षीची ऑल इंग्लंड जिंकली. यांच्या उंचीमुळे ते जवळपास नेटवर रॅकेट टेकवतात सर्विस रिटर्न करताना. त्यामुळे सर्विस अ‍ॅड्वांटेज निघून जातो प्रतिस्पर्ध्यांचा. यांना जिंकताना बघायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्तां एक किस्सा सांगितला टीव्हीवर- सिंधु खेळताना ओरडत नसे, हुरूप येण्यासाठी तसं करणं आवश्यक असल्याचं गोपिचंदने तिला सांगितलं तरीही. शेवटीं, तसं केल्याशिवाय तिला कोर्ट सोडतां येणार नाही असं बजावल्यावरच तिने तसं करणं सुरुं केलं व आपण तें पाहिलंही ! ऑलिम्पिक्स मेडल मिळवण्यातलं श्रेय प्रशिक्षकालाही उगीच नाही देत !!

भाऊ खरय. कष्यप, साईना, सिंधु, श्रीकांत या सर्वांना 'गेम रेडी' करण्याचे श्रेय सर्व गोपीचंदला जाते. गोपीचंद स्वतःच्या खेळण्याच्या दिवसात एक मोठा धडा शिकला तो म्हणजे स्टॅमिना. भारतीय खेळाडूंचे पदलालित्य निकृष्ट दर्जाचे असते असा नेहेमीच आरोप होत असे. त्याचे एक मोठे कारण त्यांचा कमी पडणारा दमसास.
पण गोपीने घेतलेल्या मेहनतीने या सर्वच खेळाडूंचा दमसास आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इतर कुठल्याही खेळाडूच्या बरोबरीने आहे.

<< लिन डॅनने १९-२० डाउन असताना जो पॉइण्ट घेतला तो बघितला का कुणी. केवळ अशक्य >> बाप रे ! काय रॅली झाली त्या पाँइंटसाठी !अफलातून !!>>>

आजच्या पुरुष एकेरीचा Repeat Telecast कधी आहे...?

चांगली चालली आहे मॅच. सिंधू कालच्या सारखी डॉमिनेट नाही करत आहे. पण फुल टू पकडे रेहेना छोडना नही मोडमध्ये आहे.. Happy
कॉमन सिंधू!

२१-१९ !!!! १५-१७ असतानाची मोठी रॅली जिंकल्यावर सिंधु टॉपला आली. सलग ६पाँइंटस विश्वविजेत्याविरुद्ध !!नेटवर सिंधु खूपच सरस वाटते. गो सिंधु, गो !!

स्पॅनिश भारीच आहे !! हा गेम घेणार ती.

तिला बघून कुणाला तरुणपणची मोनिका सेलेस आठवली का ? किंचाळते पण आहेच Proud

Pages