बॅडमिंटन (रिओ ऑलिम्पिक्स)

Submitted by टवणे सर on 11 August, 2016 - 00:45

उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा सुरु होतील.

पुरुष एकेरीत ली चाँग वेई आणि लिन डॅन अंतिम सामन्यात न भिडता उपांत्य फेरीतच एकमेकांच्या समोर यायची शक्यता आहे. या दोघात जो जिंकेल तो सुवर्णपदकाचा मानकरी होईल असे वाटते. सलग तिसर्‍यांदा हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडतील (हो हे भिडतात, युद्ध केल्यासारखे). दोन्ही महान खेळाडू. ली चाँग वेई किमान या वेळी तरी सुवर्णपदक विजेता ठरावा ही इच्छा.

महिला एकेरीत खूपच ओपन फिल्ड आहे. कुणीच गेल्या वर्षभरात संपूर्ण वर्चस्व गाजवलेलं नाहिये. कॅरोलिना मरिन बिग स्टेज खेळाडू आहे, रन्टानॉक इन्टानॉन गिफ्टेड आहे, वँग यिहान आणि शिझियान वँग मेहनती तर साईना नेहवाल बेभवरशी आहे! साईनाच्या खेळात सातत्य नसल्याने ती कुठल्या सामन्यात चुका करेल याची शाश्वती नाही. इन्टानॉन विजेती ठरेल असे वाटते मात्र साईन विजेती ठरावी अशी मनापासून इच्छा आहे.

पुरुष दुहेरीत दोन्ही कोरियन जोड्या अतिशय सातत्याने खेळल्या आहेत. इन्डोनेशियन जोडी दुसर्‍या क्रमांकावर असली तरी जिंकेल असे वाटत नाही. अर्थात पुरुष दुहेरी हा इन्डोनेशियाचा खास प्रांत. काइ-फु जोडी काई निवृत्त झाल्याने कमजोर झाली असली तरी फु हाइफेंग एकट्याच्या जीवावर मॅच ओढू शकतो. आणि माझे आवडते मथायस बो आणि कार्स्टन मोन्गेसन पण आहेत पण आता ते एव्हडे पॉवरफूल नाहियेत. डार्क हॉर्सः रशियाची साडे-सहा / पावणे सात फूट उंच व्लादिमिर इवानोव आणि इवान सोझोनोव जोडी ज्यांनी या वर्षीची ऑल इंग्लंड जिंकली. यांच्या उंचीमुळे ते जवळपास नेटवर रॅकेट टेकवतात सर्विस रिटर्न करताना. त्यामुळे सर्विस अ‍ॅड्वांटेज निघून जातो प्रतिस्पर्ध्यांचा. यांना जिंकताना बघायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मरिन आज सिंधुपेक्षा उत्तमच खेळली. गुड लक सिंधु, आम्हाला तुझा अभिमान आहे. आत्ता सिंधु फक्त २१ वर्षांची आहे. अजून किमान २ ऑलिम्पिकतरी तू खेळशील आणि अनेक ऑल इन्ग्लंड, वर्ल्ड चँप्स, ग्रांप्री सिरीज. गो सिंधु गो .>> आमेन टण्या !

छान खेळली सिंधू. मरीन ने शेवटी तिचा खेळ खूप उंचावला. वेल प्लेड! फायनल व्हायला हवी तशी चुरशीची झाली. दोघींचं अभिनंदन.

श्रीकांत व सिंधुला पाहिलं खेळताना आणि खूप त्रास झाला; कॉलेजमधे असताना
काय म्हणून भाळले मीं तुमच्या बॅडमिंटनवर, या विचाराने !!!badminton2.JPG

सिन्धु ने फाइट चान्गली दिली पण अन्डर प्रेशर वाटली मला, पहिला गेम जिन्कल्यावर तिला प्रेशर बिल्ड नाही करता आले मरिना वर , मरिना खुप अ‍ॅग्रेसिव्ह होती सुरवातीपासुन, मला वाटत थोड पहिल गोल्ड मिळवुन देण्याच प्रेशर पण असणार.. तरी वेल डन सिन्धु!

सही भाऊ. ते बाजूला टीवी आहे का मायक्रोवेव ते सांगा म्हणजे संवाद किचन मध्ये होत आहे की दिवाणखान्यात ते समजेल आणि अजून मज्जा येईल. Wink

श्रावणी शुक्रवारच्या मेहुणासाठी जेवण बनवताना, काकू हातात झारा घेऊन पुर्‍या तळताहेत असं दृश्य ही दाखवता येईल Lol

काकू हातात झारा घेऊन पुर्‍या तळताहेत >>>>>>>> ते काम सध्या काकांकडे असावं म्हणून तसं दाखवलं नसेल ........ Happy

भाऊ: दिवे .............. Happy

<< ते बाजूला टीवी आहे का मायक्रोवेव ते सांगा .... आणि अजून मज्जा येईल.>> सिंधुला 'गोल्ड' हुकलं या निराशेतून बाहेर यायला तुम्हाला जास्त मदत करेल असं वाटतं, तें समजा; व्यंचिचा उद्देश फक्त तोच आहे !
<< काकू हातात झारा घेऊन पुर्‍या तळताहेत असं दृश्य ही दाखवता येईल >> त्यापेक्षां विषयाला धरून हातांत रॅकेट घेवून मच्छर मारताना कां नको ? Wink

माझ्या मित्राने टाकलेलं स्टॅटस :
आता बॅडमिंटनची मॅच बघतानाही जागेवरून हलता येणार नाही. मातोश्रींचा हुकूम
"एका जागी बस ढेमश्या. तुझ्यामुळे सिंधू मॅच हरतीये."

त्याचाच फॉलोअप स्टॅटस :
मरिन सर्व्ह करताना काहीतरी पुटपुटत होती
त्याची आई : नक्की रामरक्षा म्हणत असणार

बाकी सिंधू मस्तच खेळली पण वेई-डॅन मॅचही क्लासिक झाली. सुपर डॅन फेवरेट प्लेयर असल्याने डबल दु:ख आज!

पुरुष दुहेरी अंतिम सामना पण काय अटीतटीचा चालला आहे. अमेझिंग गेम बाय मलेशियन्स.

गेम ३,
२०-२०
२१-२१

नेल बायटिंग

चायनीज जिंकले २३-२१. चला माझे एक तरी अंदाज बरोबर ठरला. मॅच पॉइण्टवर शॉर्ट सर्व म्हणजे क्रिमिनल एरर. आणि नॅन झांगची हिंमत बघा त्याने ती सोडली मॅच पोइण्ट डाउन असताना. अजब!!
मलेशियन जस्ट क्रम्बल्ड. साधा स्मॅश २१-२१ वर बाहेर मारला.

भारीच चाललाय.
सकाळची लीन ची मॅच पण जबरी झाली. फायनल पहायला धमाल येणार.

झाली मॅच. आता व्हॉलीबॉल कडे मोर्चा... इटली - यूएस मेन्स सेमीज.

सिंधू ... अभिनंदन
मरिन सर्व्ह करताना काहीतरी पुटपुटत होती
त्याची आई : नक्की रामरक्षा म्हणत असणार>>

एच डी स्पोर्ट्स वरची एक हिंदी निवेदक ... हेच म्हणत होती ... एल ओ एल

<< ईन्डियामे सब्जी लाने से मेडल लाने तक सारे काम ladies को ही करने पडते है!! >> पण देवासाठी हार आणायचं काम मात्र पुरुषच करतात -

अहो, काल सिंधु 'गोल्ड'साठी लढत होती तर ५ रुपयांचा साधा हार आणलात; आणि,
त्या दिवशीं श्रीकांतला 'ब्राँझ' तरी मिळावं म्हणून देवाला ५० रुपयांचा हार !!!
sindhu.JPG

सिंधूने कमाल केली , अतिशय चपळाईने खेळत होती , जगातील नंबर एक च्या खेळाडूंसमोर खेळताना प्रेशर असतेच पण तिची जिद्द आणि चिकाटी पाहून थक्क झालो .
पहिली सेट ला तर 3 पॉईंट ने मागे असताना अचानक ग्रीप घेतली आणि सेट जिंकला ,, मनात सुवर्ण पदक नाचू लागले होते माझ्या पण दुसऱ्या सेट मध्ये मारिया ने प्रेशर मध्ये कसा खेळ करावा हे आपल्या अनुभवाने दाखवून 7 पॉईंट ने सेट जिंकला ..............
पण काही हि असो सिंधूने कमाल केली आणि भविष्यात ती नक्कीच अजून चांगला खेळ करेल ...

टण्या, ती गोपीचंद सरांची लिंक तीनदा तरी वाचली. खूप अभिमान वाटतोय त्यांचा. एक भारतीय म्हणून आणि कंपनीतील एक वरिष्ठ अधिकारी म्हणूनही. एकदाच बघितलंय मुंबई ऑफिसला ते आले असताना. माझ्या ऑफिसातल्या एका कर्मचाऱ्याने तर त्याच्या मुलाला दहावी नंतर शिकायला हैद्राबादला ठेवलंय. का? तर गोपीचंद अकादमीत त्याच्या बॅडमिंटन खेळावर संस्कार व्हावेत म्हणून. तोही पठ्ठ्या ११वी पासून तिथे राहून कॉलेजच्या जोडीने सरांच्या हाताखाली धडे गिरवतोय.

सिंधूच्या यशात तिच्या फिटनेसचा मोठा वाटा आहे आणि याच निर्विवाद श्रेय गोपीचंद यांनाच आहे.

टण्या, ती गोपीचंद सरांची लिंक तीनदा तरी वाचली. खूप अभिमान वाटतोय त्यांचा. एक भारतीय म्हणून आणि कंपनीतील एक वरिष्ठ अधिकारी म्हणूनही. एकदाच बघितलंय मुंबई ऑफिसला ते आले असताना. माझ्या ऑफिसातल्या एका कर्मचाऱ्याने तर त्याच्या मुलाला दहावी नंतर शिकायला हैद्राबादला ठेवलंय. का? तर गोपीचंद अकादमीत त्याच्या बॅडमिंटन खेळावर संस्कार व्हावेत म्हणून. तोही पठ्ठ्या ११वी पासून तिथे राहून कॉलेजच्या जोडीने सरांच्या हाताखाली धडे गिरवतोय.>>>> कमिटेमेंट ती हीच..

Pages