बॅडमिंटन (रिओ ऑलिम्पिक्स)

Submitted by टवणे सर on 11 August, 2016 - 00:45

उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा सुरु होतील.

पुरुष एकेरीत ली चाँग वेई आणि लिन डॅन अंतिम सामन्यात न भिडता उपांत्य फेरीतच एकमेकांच्या समोर यायची शक्यता आहे. या दोघात जो जिंकेल तो सुवर्णपदकाचा मानकरी होईल असे वाटते. सलग तिसर्‍यांदा हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडतील (हो हे भिडतात, युद्ध केल्यासारखे). दोन्ही महान खेळाडू. ली चाँग वेई किमान या वेळी तरी सुवर्णपदक विजेता ठरावा ही इच्छा.

महिला एकेरीत खूपच ओपन फिल्ड आहे. कुणीच गेल्या वर्षभरात संपूर्ण वर्चस्व गाजवलेलं नाहिये. कॅरोलिना मरिन बिग स्टेज खेळाडू आहे, रन्टानॉक इन्टानॉन गिफ्टेड आहे, वँग यिहान आणि शिझियान वँग मेहनती तर साईना नेहवाल बेभवरशी आहे! साईनाच्या खेळात सातत्य नसल्याने ती कुठल्या सामन्यात चुका करेल याची शाश्वती नाही. इन्टानॉन विजेती ठरेल असे वाटते मात्र साईन विजेती ठरावी अशी मनापासून इच्छा आहे.

पुरुष दुहेरीत दोन्ही कोरियन जोड्या अतिशय सातत्याने खेळल्या आहेत. इन्डोनेशियन जोडी दुसर्‍या क्रमांकावर असली तरी जिंकेल असे वाटत नाही. अर्थात पुरुष दुहेरी हा इन्डोनेशियाचा खास प्रांत. काइ-फु जोडी काई निवृत्त झाल्याने कमजोर झाली असली तरी फु हाइफेंग एकट्याच्या जीवावर मॅच ओढू शकतो. आणि माझे आवडते मथायस बो आणि कार्स्टन मोन्गेसन पण आहेत पण आता ते एव्हडे पॉवरफूल नाहियेत. डार्क हॉर्सः रशियाची साडे-सहा / पावणे सात फूट उंच व्लादिमिर इवानोव आणि इवान सोझोनोव जोडी ज्यांनी या वर्षीची ऑल इंग्लंड जिंकली. यांच्या उंचीमुळे ते जवळपास नेटवर रॅकेट टेकवतात सर्विस रिटर्न करताना. त्यामुळे सर्विस अ‍ॅड्वांटेज निघून जातो प्रतिस्पर्ध्यांचा. यांना जिंकताना बघायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज ह ब ह री ही !!!
ऑस्सम मॅच.. मी अगदी भर क्लायंट मिटींगमध्ये त्यांना सांगून सवरून लॅपटॉपवर मॅच लावली होती.. लय धमाल आली.

आता गोल्ड मिळवलं पाहीजे.

<< सिंधु पॉइण्ट्स किल न करता तिला अजून दमवते आहे.>> +१. बॅकहँड कॉर्नरचीं शटल्स घेताना ओकुहाराची दमछाक होते , हें हेरून सिंधुने स्मॅशपेक्षां तिला दमवायला याचा छान उपयोग केला ! चांगले डांवपेंच, सहजसुंदर पदलालित्य व स्मॅश , ड्रॉप्स यांचं सुरेख मिश्रण !! गो फॉर गोल्ड नाउ, सिंधु !!
सावली, पुन्हा एकदां धन्यवाद , नेमकी या मॅचची वेळ सांगितल्याबद्दल.

हो. उद्या फायनल भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:५५ वाजता.

ग्रेट गोईंग. जस्ट कीप ईट अप सिंधू.

पहिल्या सेमीफायनलमधली चीनची Li Xuerui दुसर्‍या गेमच्या शेवटी पडली आणि तिचा गुढघा दुखावला.
पण आता रिटायर्ड हर्ट झालो तर ब्राँझ मेडलच्या मॅचमध्ये खेळता येणार नाही म्हणून तिने हा सामना पूर्ण केला.
आधी तिथल्या मेडिकल्सनी तिच्या गुढघ्याला बँडेज केले. तिने उभे राहून पाहिल्यावर प्रेक्षकांतले चीनी डॉक्टर तिला तपासायला आले. ऑफिशियल्स नॉट नॉट अलाउड म्हणत असतानाही त्यांनी ली-चा पाय ज्या प्रकारे ओढून बघितला, ते शॉकिंग होते. अर्थात ते डॉक्टर्स होते (आणि वर हे सगळे चीनी) त्यामुळे ते काय करत होते हे त्यांना नक्की माहीत असेल.

उद्या सर्वजण सिंधुच्य्या सामन्याकडे डोळे लावून बसले असाल तरीसुद्धा क्लॅश ऑफ टायटन्स ली च्च्चाँग वेई वि. लिन डान सामना शक्य असेल तर चुकवू नका. हे दोघे तिसर्‍यांदा ऑलिम्पिक्समध्ये एकमेकांसमोर येत आहेत. मागल्या दोन वेळी ते अंतिम फेरीत तर यंदा उपांत्य फेरीत सामोरे आले आहेत.
या दोघांमधले युद्ध अशक्य सुंदर आणि घनघोर असते.

सिंधु - मारिन सामना दोघी जर कमीत कमी चुका करून खेळल्या तर मस्त होइल. दोघींचे शैली पुरुषी (म्हणजे पुरुष खेळाडू जसे खेळतात तशी) आहे. सिंधु जंप करून स्मॅशेस अफलातून मारते आहे जे महिलांमध्ये दुर्मिळ आहे. कॅरोलिना मरिन कितीही डोक्यात जाणारी असली तरी खेळाडू म्हणुन खुपच भारी आहे. विशेषतः ती शटल स्वतःच्या कोर्टमध्ये येण्याआधीच रॅकेट पोझिशनमध्ये गेलेली असते. त्यामुळे तिला मिळणारा रिअ‍ॅक्शन टाइम इतरांपेक्षा जास्त आहे.

<< तरीसुद्धा क्लॅश ऑफ टायटन्स ली च्च्चाँग वेई वि. लिन डान सामना शक्य असेल तर चुकवू नका. >> या टीपबद्दल धन्यवाद.

<< सिंधु जंप करून स्मॅशेस अफलातून मारते आहे जे महिलांमध्ये दुर्मिळ आहे.>>खरंय. पण कालच्या मॅचमधे हेंही दिसून आलं कीं - १] केवळ स्मॅशेसवर अवलंबून न रहातां, ती समोरचा स्पर्धक बघूनच स्मॅशीसचा नेमका उपयोग करते [ यांत प्रशिक्षकालाही श्रेय असावं] व २] बहुतेक तिचे स्मॅशेस क्रॉस-कोर्ट व म्हणून अधिक प्रभावी असतात. शिवाय, बहुतेक खेळाडू स्पर्धेमधे बॅकहँडचा उपयोग नाईलाजास्तवच करतात, पण सिंधु संधी मिळाली तर स्मॅशेस व त्याहीपेक्षां नेटकडे क्रॉस-कोर्ट ड्रॉप्स टाकायला बॅकहहँडचा मस्त वापर करते.
'तुम रिओ हजारो साssल ...' या आशिर्वादापलिकडे सिंधुला मीं काय सांगणार म्हणा !

मी अगदी भर क्लायंट मिटींगमध्ये त्यांना सांगून सवरून लॅपटॉपवर मॅच लावली होती.

>>> सेम सिंधूचीच जिगर दाखवलीस की... Wink Light 1

<< सेम सिंधूचीच जिगर दाखवलीस की...>> खेळ व खेळाडू यांच्यापासून अशा प्रेरणा मिळतात, हेंच तर खरं क्रिडामहात्म्य ! Wink

दुसर्‍या गेम मधल्या unforced errors सोडल्या तर सिंधूचा खेळ सुंदर झाला... कालची सिंधूची बॉडी लँग्वेज जबरदस्त होती.. या बाबतीत श्रीकांत थोडा कमी पडला लिन डान समोर.

सिंधूला गोल्ड साठी शुभेच्छा!

<< चिनी वर्चस्वाला जबदस्त धक्का बसलाय यंदा बॅडमिंटन मधे..>> आणि, आतां भारत उगवता तारा ठरतोय बॅडमिंटनमधे, असंही म्हणणं वावगं ठरूं नये !

मस्त झाली कालची मॅच. सिंधुने ओकुहाराला २-३ बेळा जवळजवळ झोपवले. भरपुर दंगा केला मॅच बघताना Happy

फायनल भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता >>> नक्क्की का कारण आज सकाळी टीव्ही वर ०६:३० दाखवत होते.

नक्क्की का कारण आज सकाळी टीव्ही वर ०६:३० दाखवत होते.>>>> ऑलम्पिक वेबसाईटवर आताच पाहिले तिथे ६;५५ चा टाईम दिसतोय. काल टिव्हीवर ७;३० दाखवत होते. ६;३० ला टिव्ही ऑन करून बसावे लागणार.

क्लॅश ऑफ टायटन्स ली च्च्चाँग वेई वि. लिन डान सामना शक्य असेल तर चुकवू नका. हे दोघे तिसर्‍यांदा ऑलिम्पिक्समध्ये एकमेकांसमोर येत आहेत. मागल्या दोन वेळी ते अंतिम फेरीत तर यंदा उपांत्य फेरीत सामोरे आले आहेत.
या दोघांमधले युद्ध अशक्य सुंदर आणि घनघोर असते. >> टण्या एकदम करेक्ट.. ह्या दोघांचा सामना खरच भन्नाट असतो.. शटल कोण खाली पडू देत नाही ह्यावरच कोण जिंकेल हे ठरतं.. त्यांच्या साठी अनप्लेयेबल शटल शक्यतो नसतंच कुठलं.. दोघेही एकमेकांचा खेळ पूर्णपणे ओळखून आहेत, श्रीकांतकडून मिळालेल्या टफ फाईट मुळे लिन डान बर्‍यापैकी शांतपणे खेळेल असे वाटते आहे...

कालची डेन्मार्क जपान लेडीज डबल्स फायनल पण जबरी झाली शेवटच्या गेम मधे १५ - १५ पर्यंत दोन्ही टीम्स बरोबरीत होत्या आणि तिथून डेन्स जिंकतील असे वाटत होते कारण १९ - १६ स्कोर झाला होता.. पण तिथून पुढे जपानी खेळाडूंनी मॅच खेचली सलग ५ गुण घेऊन मॅचच संपवली..

<<<<क्लॅश ऑफ टायटन्स ली च्च्चाँग वेई वि. लिन डान सामना शक्य असेल तर चुकवू नका.>>>>>
वेळ कळवणार का प्लिज...?

मी सांगितले होते ना क्लॅश ऑफ टायटन्स!! १-१ गेम बरोबरीत आणि तिसर्‍या गेममध्ये १६-१६. ब्लडी गेम ऑफ आट्रीशन

मी अस्तित्वात नस्सलेले देव पाण्यात टाकून ब्सलोय ली चाँग साठी.

ली चाँग १९-१६ने पुढे

लिन सेव्ज २ मॅच पॉइन्ट्स. १९-२० Sad

थ्री मॅच पॉईन्ट्स सेव्ड.

शिट शिट

ली जिंकला जिंकल!!!!!!
लिन डॅनने १९-२० डाउन असताना जो पॉइण्ट घेतला तो बघितला का कुणी. केवळ अशक्य

<< लिन डॅनने १९-२० डाउन असताना जो पॉइण्ट घेतला तो बघितला का कुणी. केवळ अशक्य >> बाप रे ! काय रॅली झाली त्या पाँइंटसाठी !अफलातून !!
कोर्ट तापलं आहे महिला फायनलसाठी !! सिंधु नक्कीच निराश नाहीं करणार, असं वाटतंय. शुभेच्छा.

महिला एकेरीत चीनला एकही पदक नाही. ली शुरेईने मॅच खेळलीच नाही दुखापतीमुळे.
आता पुरुष एकेरीत दुसर्‍या उपांत्य सामन्यात जर चेन लाँग हारला तर पुरुष एकेरीत पण सुवर्ण/रजत मिळणार नाही. तसेही ली चाँग विरुद्ध कुणालाच आता सुवर्णाचा चान्स नाही

सिंधुची मॅच अजून किमान १ तास तरी सुरु होणार नाही. हा पुरुष एकेरी उपांत्य सामना किमान १ तास चालेल.
नेट प्ले बघायचा असेल तर हा सामना बघा

Pages