बॅडमिंटन (रिओ ऑलिम्पिक्स)

Submitted by टवणे सर on 11 August, 2016 - 00:45

उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा सुरु होतील.

पुरुष एकेरीत ली चाँग वेई आणि लिन डॅन अंतिम सामन्यात न भिडता उपांत्य फेरीतच एकमेकांच्या समोर यायची शक्यता आहे. या दोघात जो जिंकेल तो सुवर्णपदकाचा मानकरी होईल असे वाटते. सलग तिसर्‍यांदा हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडतील (हो हे भिडतात, युद्ध केल्यासारखे). दोन्ही महान खेळाडू. ली चाँग वेई किमान या वेळी तरी सुवर्णपदक विजेता ठरावा ही इच्छा.

महिला एकेरीत खूपच ओपन फिल्ड आहे. कुणीच गेल्या वर्षभरात संपूर्ण वर्चस्व गाजवलेलं नाहिये. कॅरोलिना मरिन बिग स्टेज खेळाडू आहे, रन्टानॉक इन्टानॉन गिफ्टेड आहे, वँग यिहान आणि शिझियान वँग मेहनती तर साईना नेहवाल बेभवरशी आहे! साईनाच्या खेळात सातत्य नसल्याने ती कुठल्या सामन्यात चुका करेल याची शाश्वती नाही. इन्टानॉन विजेती ठरेल असे वाटते मात्र साईन विजेती ठरावी अशी मनापासून इच्छा आहे.

पुरुष दुहेरीत दोन्ही कोरियन जोड्या अतिशय सातत्याने खेळल्या आहेत. इन्डोनेशियन जोडी दुसर्‍या क्रमांकावर असली तरी जिंकेल असे वाटत नाही. अर्थात पुरुष दुहेरी हा इन्डोनेशियाचा खास प्रांत. काइ-फु जोडी काई निवृत्त झाल्याने कमजोर झाली असली तरी फु हाइफेंग एकट्याच्या जीवावर मॅच ओढू शकतो. आणि माझे आवडते मथायस बो आणि कार्स्टन मोन्गेसन पण आहेत पण आता ते एव्हडे पॉवरफूल नाहियेत. डार्क हॉर्सः रशियाची साडे-सहा / पावणे सात फूट उंच व्लादिमिर इवानोव आणि इवान सोझोनोव जोडी ज्यांनी या वर्षीची ऑल इंग्लंड जिंकली. यांच्या उंचीमुळे ते जवळपास नेटवर रॅकेट टेकवतात सर्विस रिटर्न करताना. त्यामुळे सर्विस अ‍ॅड्वांटेज निघून जातो प्रतिस्पर्ध्यांचा. यांना जिंकताना बघायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रच्याकने, सायना ड्रेस अगदीच कायच्याकाय होता. >>>> मामी, सायनाचा एकटीचा ड्रेस तसा नाहीये. स्मित भारतीय पथकाने ठरवेलेल ड्रेस आहेत. पण एकंदरीत आपल्या पथकाचे ड्रेसेस (अगदी ओपनिंग सेरेमनी पासून) गंडलेले आहेत. तिरंदाजीवाल्या बायांचे ड्रेसपण विचित्र आहेत.

>>> अच्छा! असं आहे काय? कमाल आहे. इतकं कल्पनादारिद्र्य? अर्थात सरकारी मामला.

<< सायना ड्रेस अगदीच कायच्याकाय होता.>> वर पदक झळकलं तर ड्रेसकडे लक्षही जात नाही !

वर पदक झळकलं तर ड्रेसकडे लक्षही जात नाही ! >>>> म्हणून तर ती हरल्याच्या पोस्टमध्ये मामींनी तसं लिहिलय. Wink

श्रीकांतची मॅच सुरू आहेत. दोघही चिवटपणे खेळतायत!

श्रीकांतला छान 'टेंपरॅमेंट'ही आहे. दुसर्‍या गेममधे श्रीकांत १४-१७ पिछाडीवर होता. तिथून १७-१७, १९-१७ , १९-१९ व २१- -१९ !! सरळ २-० विजय . कीप अप, श्रीकांत !!

वा, श्रीकांतने यान ओ योर्गासनला हारवलं. ग्रेट. योर्गासन एकदम फिट आणि डिसेप्टिव्ह खेळाडू आहे. त्याला स्ट्रेट सेट्समध्ये हारवणे सोपे नाही.
मात्र आता श्रीकांत समोर हिमालयाएव्हडे उंच आव्हान आहे. बॅडमिंटनच्या इतिहासातील सर्वात महान जगज्जेता लिन डान विरुद्ध त्याची उपउपांत्य फेरीत गाठ आहे. मागल्या वेळी जेव्हा हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले तेव्हा श्रीकांत जिंकला होता. मात्र तेव्हा लिन बर्‍याच मोठ्या गॅपनंतर (खरेतर निवृत्ती जाहीर करुन) पुन्हा उतरला होता. ऑलिम्पिकसाठी गेले १ वर्ष लिन डान तगडी तयारी करतोय. श्रीकांत लिन विरुद्ध कडवी लढत देईल व जिंकेल ही सदिच्छा. मनापासून श्रीकांत जिंकावा असे वाटते, पण शांतपणे विचार केला तर हे अतिशय अवघड आहे.

लिन विरुद्ध जिंकला तर पुढला सामना ली चाँग वेई बरोबर. अनेक वर्षे मानांकनात १ नंबरला असलेला हा मलेशियन खेळाडू मोठ्या स्पर्धात हमखास हारतो. अर्थात लिन डान विरुद्ध (आणि एकदा चेन लाँग विरुद्धसुद्धा वर्ल्ड चँपियनशिपमध्ये).

पुरुष एकेरीत एका देशाचे दोनच खेळाडू पात्र ठरल्याने विटिंगहाउस या वेळी ऑलिम्पिकला डेन्मार्कतर्फे पात्र ठरला नाही. तो योर्गासनला लै शिव्या देत असेल आत्ता!

कोरिया वि. मलेशिया डबल्स [पुरुष] हा चुरशीचा व जोशपूर्ण सामना आत्तांच पहायला मिळाला. तिसर्‍या गेममधे २१-२० वर मलेशियन जोडी जिंकली. [ कांहीं काळ इंडोनेशिया व मलेशिया या खेळाचे दादा होते !].

वाव, हा मोठा धक्का आहे. कोरोयन ली आणि यू फायनलला आरामात पोहोचतील असा अंदाज होता माझा. ते नंबर १ सीड आहेत. अर्थात रशियन्स विरुद्ध ते हारल्यावर त्यांच्या फॉर्मचा अंदाज आला होता.

या वेळचे पुरुष दुहेरी फारच धक्कादायक निकाल लागत आहेत. फु हाइफेंगला पुन्हा एकदा सुवर्णपदक मिळण्याची दाट शक्यता

सिंधुच्या सामन्याचे मी फक्त अपडेट्स वाचतोय. जोरात अ‍ॅटॅक चालू आहे तिचा. लगे रहो!!
गेम १: २१-१३ सिंधूने घेतला.
आता दुसर्‍या गेममध्ये फटाफट जिंकून टाक फार न दमता.

क्वार्टर्समध्ये वँग यिहान नावाच्या घोड्याबरोबर (स्टॅमिनाच्या बाबतीत) खेळायचे आहे

जिंकली सिंधु आरामात. मस्त खेळलेली दिसते आहे - दुर्दैवाने मला नाही बघायला मिळाला सामना.
पण वँग यिहानने बघितला. ती नीट अभ्यास करत आहे.

http://sports.ndtv.com/olympics-2016/news/261866-rio-olympics-2016-badmi...

पुरुष दुहेरीत मलेशियन जोडी अंतिम फेरीत. ही दोघं कुठून उपटली एकदम ऑलिम्पिक स्टेजवर?
मिळणार मिळणार अशा आशेवर गेली ३ ऑलिम्पिक असलेल्या मलेशियाच्या लोकांना बहुतेक ली चाँग वेई ऐवजी या जोडीकडून सुवर्णाची अपेक्षा पूर्ण होणार. अमेझिंग.
ली ऐवजी आमचा किदांबी जिंकावा!!

महिला दुहेरीत जपानी १नंबर मानांकित जोडी अंतिम फेरीत. म्हणजे या ऑलिम्पिकमध्ये कोरिया पुरुष व महिला दोन्ही दुहेरीत सुवर्ण/रजत नाही

महिला एकेरीत मजाच घडली आहे.
थायलंडची रात्चानॉक इन्टानॉन प्री-क्वार्टर्समध्ये पराभूत झाली. साईना बाहेर पडण्यापेक्षा हा मोठा धक्का आहे कारण रात्चानॉक गेल्या २ वर्षातली सगळ्यात जास्त सातत्य राखणारी व यशस्वी खेळाडू होती.
साईना ज्या प्री-क्वार्टरमध्ये खेळली असते तिथे ती युक्रेनची खेळाडू खेळली. त्यामुळे थायलंडची फारशी चर्चेत नसलेली पोर्त्निप बुरानाप्रासेर्त्सुकचा सामना तिच्याविरुद्ध झाला व ही पोर्त्निप आरामात जिंकली. म्हणजे तिचा सामना खरे तर साईनाबरोबर व्हायचा पण झाला या उलितिना बरोबर.

आजचा सामना जर सिंधु जिंकली तर ती अंतिम फेरीत जाण्याची शक्यता अधिक आहे. एकतर तिचा आत्मविश्वास दृढावला असेल आणी तिचा उपांत्य सामना जपानी खेळाडूबरोबर होईल. सिंधुच्या ब्रॅकेटमधल्या दुसर्‍या उपउपांत्य सामन्यात दोन्ही जपानी खेळाडू एकमेकांसमोर आले आहेत. त्या दोघीही अगदी जगातील सर्वोत्तम म्हणता येईल अशा काही नाहियेत.

ली झुरेई चिन्ध्या करतेय पोर्त्निपच्या. ली झुरेईने मागल्या ऑलिम्पिक्समध्ये साईनाला उपांत्य फेरीत हारवले व अंतिम फेरीत सुवर्णपदक मिळवले होते. साईनाबरोबर कांस्यपदकाच्या लढतीत शिझिआन वँग पहिला गेम जिंकला होता व दुसर्‍या गेमच्या सुरुवातील तिने दुखापतीमुळे सामना सोडला. त्यामुळे साईनाचे कांस्यपदक फ्लुक होते असे तुम्हाला बॅडमिंटन बुलेटिन बोर्डांवर लोक बोलताना दिसेल.

ली झुरेईनी जिला अंतिम सामन्यात पराभूत केले त्या वँग यिहान विरुद्ध पी वी सिंधूचा आता सामना आहे. वँगला राउन्ड ऑफ १६ (प्री-क्वार्टर्स)मध्ये बाय होता. त्यामुळे सिंधुपेक्षा ती एक सामना कमी खेळून अधिक ताजीतवानी असेल.

--------------------------

कुणी बघतय का सामना? मी इन्टरनेट अपडेट्स पाहतोय फक्त. स्कोर १३/११ वँग लिडिंग. पण सिंधूने ११/८ वरून थोडीतरी पिछाडी भरून काढली आहे.
गूड वर १३-१३
शिट, मला सामना पाहता येत नाहिये Sad

कोर्ट स्लो आहेत ही. मोठ्या रॅलीज होत असणार

१५-१५

सिंधु आघाडीवर १८-१७
सिंधु गेम पॉइंट २०-१८
लॉस्ट बोथ गेम पॉईंट्स २०-२०. मोठा चान्स घालवला सिंधुने
२१-२० अजून एक गेम पॉइंट
सिंधुने पहिली गेम जिंकली. गो गर्ल!!

भयानक दमली असेल सिंधु. वँग एक सामना कमी खेळली आहे.

अमेझिंग. दुसरा गेम. सिंधु ८-३ ने पुढे.
दुसर्‍या गेममध्ये सिंधु ११-८ ने पुढे. गो यु ब्युटी.
१४-१२ सिंधु पुढे
१८-१६ सिंधु पुढे
शिट, १८-१८. १८-१६ वरचा पोइंट सिंधुने घ्यायला पाहिजे होता
सिंधु डाउन १८-१९. हा तिचा जुना विकनेस आहे, मॅच क्लोज करत नाही
मॅच पॉईंट सिंधु

यु ब्युटी, वॉट अ गेम. गो सिंधू गो.

आणि पी गोपीचंद तितकाच ग्रेट. मागल्या वेळी साईना कांस्य, आणि पी. कश्यप पुढल्या राउंडपर्यंत पोचला होता.

या वेळी सिंधू सेमीजमध्ये आणि किदाम्बी स्रीकांत क्वार्टर्समध्ये.

हे सर्व गोपीचंदचे शिष्य

जबरी गेम !!! एकदम नेल बाईटींग..
भारी खेळली सिंधू. ती दुसर्‍या गेमच्या मध्यात किलर स्मॅश का मारत नव्हती कळलं नाही. त्यांची स्ट्रॅटेजी असेल तशी.

मला परवाच कश्यपची आठवण झाली होती. तो खेळत नाही का आता?

अत्यंत सुरेख खेळ सिंधू जिंकली तीने अक्षरश: वँग ला झुकवले अगदी वाघिणीच्या तडफेने खेळली, चक्क नाचलो एका
डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात हसू

ओकुहारा तिसऱ्या गेममध्ये जिंकली. सिंधुपेक्षा अधिक दमली असेल. तसेच सिंधुच्या तुलनेत ओकुहाराचा खेळ सफाईदार नाहीये.

सिंधुने स्वतःचा फॉर्म फारच उंचावर नेला आहे

चार वर्षांपूर्वी लंडनला सेमी फायनलमध्ये 3 चायनीज आणि 1 भारतीय व अंतिम सामन्यात 2 चायनेज मुली होत्या. या ऑलिम्पिकमध्ये 1 स्पॅनिश, 1 भारतीय, 1 जपानी आणि फक्त 1 चायनीज आहे. कोणी कल्पना तरी केली होती का?
महिला दुहेरी अन मिश्र दुहेरी अंतिम फेरीत एकही चायनीज नाही. पुरुष दुहेरीत एक जोडी आहे. आता पुरुष एकेरीतच बघू काय होते ते.

लंडनमध्ये चीनने 5ही सुवर्णपदके पटकावली होती, त्याखेरीज 2 रजत आणि 1 कांस्य

Sindhu was awesome.... Wow !
Badminton going so well... Totally thrilled to follow the matches .

Pages