काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्यातरी गौरी खोट कृत्रिम का होइना हसत आहे .. प्रेम व्यक्त करत
आहे हे नशिब आहे..
नाहितर बिचारा शिव एकटाच प्यार प्यार करत होता..
शिवची अम्मा काल म्हणाली की गौरीची परिक्षा घेणार ई पण खोटच वाटत आहे सगळं..आणि गौरी येडी काय ती परिक्षा देणार...............

शिवची अम्मा गौरीला म्हणते की, मला चारी ठाव स्वयपाक येणारी, घर साम्भाळणारी सुन हवी. मग मला एक कळत नाही की, तिने राधिका मध्ये असे कुठले " गुण" पाहीले की तिला सुन म्हणुन पसन्त केली? राधिकाला स्वयमपाक तर सोडा, साधी साडीही नेसता येत नाही. फक्त ति आपल्या जातीची आणि सुन्दर आहे म्हणुन शिवच्या अम्माने तिला वेगळा न्याय लावला का?

बाकी अम्माच्या अपेक्षा ऐकल्यावर असे वाटायला लागले आहे कि, कुठल्या काळात राहतात ही माणसे?

झी च्या सगळ्या शिरेली तितक्याच पकाव आहेत एक हि हातात धरण्यासारखी नाहीये .

होम मिनिस्टर च सध्या त्यातल्या त्यात ओके आहे

आपल्या जातीची आणि सुन्दर आहे म्हणुन शिवच्या अम्माने तिला वेगळा न्याय लावला? हो. बहुतेक
बाकी अम्माचं म्हणणं पटलं..त्यांची विचारसरणी तशीच आहे. पहिल्यांदाच सांगितले होते की हमारी घर की बहु बाहर काम नही करती..
अम्मा म्हणते ना वो बनारस है, मुंबई नही. वर हे पण सांगते.. ती अजूनही स्वतः च्या सासूला घाबरते., डोक्याचा पदर खाली पडलेला चालत नाही..
मग अशा घरात मुंबई ची नोकरी करणारी मुलगी कशी चालेल..

आणि शेवटी लग्न होऊन टिपिकल सासबहु मालिका सुरू होणार तर..
गौरी च्या आई चीभूमिका गंडलीये. हे शक्य नाही.. एवढंच म्हणत रहाते. एवढी मोठी गोष्ट नवऱ्याला सांगत नाही. आणि आई जवळ रडते की.. गौरी ला किती त्रास होत असेल ना.. आपण राधिका बद्दल बोलत होतो.. शिवचं कौतुक करत होतो. गौरी ला किती त्रास झाला असेल.. कसं सहन केलं असेल माझ्या गौरी ने.. !अगदीच अ आणि अ.!

http://www.zeefamily.tv/en-US

बर्‍याच प्लॅट्फॉर्मस वर उपलब्ध आहे. लाईव्ह आहे आणि महिन्या भराचे प्रोग्रॅम, जुन्या सिरीयल आणि पिकचर बघता येतात. Happy

>>>>>शिवची अम्मा गौरीला म्हणते की, मला चारी ठाव स्वयपाक येणारी, घर साम्भाळणारी सुन हवी. मग मला एक कळत नाही की, तिने राधिका मध्ये असे कुठले " गुण" पाहीले की तिला सुन म्हणुन पसन्त केली? <<<<<

तेच ना, आणि हि परीक्षा फक्त गौरीलाच का?

बहुतेक राधिका त्यांच्या जातीतली म्हणून गृहित धरलय का की ती अगदी शुक्ल खानदान साठी योग्य आहे.
आपल्या देशात हाच विचार करतात ना, लग्न करताना आणि हाच कळीचाअ मुद्दा आहे.

त्याच जातीतली निशा सून म्हणून इतकं भयानक आहे त्याचं काय? त. Sad

>>>आणि शेवटी लग्न होऊन टिपिकल सासबहु मालिका सुरू होणार तर..
गौरी च्या आई चीभूमिका गंडलीये. हे शक्य नाही.. एवढंच म्हणत रहाते. एवढी मोठी गोष्ट नवऱ्याला सांगत नाही. आणि आई जवळ रडते की.. गौरी ला किती त्रास होत असेल ना.. आपण राधिका बद्दल बोलत होतो.. शिवचं कौतुक करत होतो. गौरी ला किती त्रास झाला असेल.. कसं सहन केलं असेल माझ्या गौरी ने.. !अगदीच अ आणि अ.!<<<

+१

कन्फ्युज्स्ड पार्टी आहे गौरीचेर आए.

काहीच. मत नाही आणि असले तरी मांडत येत नाही.

बर्‍याच प्लॅट्फॉर्मस वर उपलब्ध आहे. लाईव्ह आहे आणि महिन्या भराचे प्रोग्रॅम, जुन्या सिरीयल आणि पिकचर बघता येतात >>>>>>>>>>> सगळ्यात महत्वाचं म्हणजे चकटफु आहे ............. Happy

झी फॅमिली मध्ये झी चे सगळे चॅनल्स दिसतात ........... Happy

गौरीच्या बाबांना कळाल्यावर त्यांची रिअ‍ॅक्शन बघायला मजा येईल.. हो

सध्या शिवचा आणि त्याच्या अम्माचा अभिनय बेस्ट.!

अम्मा चा अभिनय बेस्ट! अगदी शोभलीए..गवरी आताही थंड नजरेने तिच्या कडे पाहातेच!
काय प्रॉब्लेम आहे कळत नाही...पण गौरीच्या डोळ्यांत भाव उमटतच नाहीत!
पसरणी परवडली...........

शिव लय प्रेमात बुडालाय असं वाटत .. गौरी आपली सगळे भाव वर् वर दाखवते...
लाजते पण जरा कृत्रिमच... मला अजुनही ती
प्रेमात वाटतच नाही.. उगाच बळजबरी ..
परवाच्या भागात पण शेवटी डायलॉग होता वेणु म्हणतो तुझ काय होणार गौरी तर ती म्हणते शिवशी लग्न..ते येवढ बेकार म्हंटल आणि खोट्खोट लाजली

शिव मात्र मस्त..

Happy अगदी...!! .किती बेकार डायलॉग डिलीव्हरी!
लाजणं तर त्याहून कृत्रिम!
शिव पुढे बुटकी किती दिसते ती!

गौरी अम्माला म्हणते ना मी होईन तुमच्या सारखी .. ते पण तिला आजिबात शोभलं नाही...
शिव तिच्या साठी थोडा मराठी कडे झुकल्या सारखा वाटतो पण गौरी अजिबात नाही..

गौरीचे कॅरेक्टर खरेतर अगदी ऑर्डिनरी मुलगी आहे. प्रेमात पडण्या सार्खे काय आहे? रूड बोलते. ओरडते.
फार चमकदार हुशार नाही. ती अम्मा सारखी होंणार म्हटले तर शिवने दूर पळून जावे. हा जेन्वीन सल्ला.

ती अम्मा सारखी होंणार म्हटले तर शिवने दूर पळून जावे. Lol
मला तर पहिल्यापासुन प्रश्न पडला आहे..शिव ला काय आवडलय गौरी मधे..!

::खोखो::...

शिव तिच्या साठी थोडा मराठी कडे झुकल्या सारखा वाटतो पण गौरी अजिबात नाही..>>
त्या दिवशी म्हणतो ना " त्यावेळी वेगळं होतं गौरी "

मला तर पहिल्यापासुन प्रश्न पडला आहे..शिव ला काय आवडलय गौरी मधे. >>> अम्माला वाटतं की तो तिच्या निरागस आणि भोळ्या स्वभावावर भाळलायं . Uhoh

निरागस आणि भोळ्या स्वभावावर
मला तर अकडु वाटते ती..
>> बंद डोक्याची. म्हणजे आपले तेच बरोबर कोणत्याही परिस्थितीत. रिजिड अशी वाटते. गोड दिसणे काय उपवेगाचे. असल्या मुली प्रेम अन मैत्रीपण मेहरबानी केल्यासारखी ऑफर करतात. जेन्वीन नाही.
त्यात बाबांवर नको तेव्ढी डिपेंडन्सी. सर्व निर्णय तेच घेतात अरे पंचविशी तर आली असेल ना तिची?
शिवला पण आख्यान घ्यावे लागणार आहे. येळ कोट्ट. येळ कोट्ट.

म्हणूनच मी हि मालिका बघायची सोडून दिली. एकतर त्या थंडाक्काचा अभिनय (?) आणि प्रत्येक वेळी मराठीतच बोलण्याचा आडमुठेपणा.
थंडाक्काला पाहिल्यावर मला पुलंच्या 'माझे पौष्टिक जीवन' मधले ते 'चेहऱ्यावर कुठल्याही भावाचा आभाव' हे वाक्य आठवायचे.
तो शिव बिचारा प्रत्येक वेळा "आप क्या बोल रही है वो हमारे तो कुछ समज मै नहीं आ रहा है" असे सारखे सांगत असताना हिचा मराठीत बोलण्याचा अट्टाहास का? आपण बोललेले समोरच्याला समजत नाही आहे हे कळत असुनसुध्दा ती प्रत्येक वेळी मराठी का रेटत होती?
इथल्या पोस्ट मात्र मी नियमितपणे अगदी न चुकता वाचते.

अरारा. राख आणि गंगाजल.शुद्धी. मराठी मालिका ललिता पवारांच्या काळात पोचली. गौरीची आशा काळे झाली.

ंइतक रिग्रेसिव्ह एखाद्या हिंदी मालिकेत पाहिल्याचंही आठवत नाही.

दोध सुशिक्षित तरुण तरुणींना स्वतःच्य लग्नाबाबत निर्णय स्वातंत्र्य नाही.

Pages