काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिव ची अम्मा पण इरीटेट करते आजकाल! सारखं काय तेच ते!

आणि ती प्रत्येक वाक्याच्या शेवटी अ‍ॅं असा काहीतरी मोस्ट इरीटेटींग उदगार काढते! नाहीतर "हॉ नही तो......!!" म्हणते!! हॉरिबल होत आहे हे!

वेणू चं टॅलंट वाया जातंय! आजी व मोजोंचे संवाद मात्र भारी!

काय झाले आज?>>> शिवचे बाबुजी शिवला घेऊन दुसरीकडे राहायला जायचा विचार करतात.

आणि ती प्रत्येक वाक्याच्या शेवटी अ‍ॅं असा काहीतरी मोस्ट इरीटेटींग उदगार काढते! नाहीतर "हॉ नही तो......!!" म्हणते!! हॉरिबल होत आहे हे!>>> तरी बर, तिच ते नौकरानी कि बेटी, वो नौकरानी, कामवाली वै वै. बन्द झाल.

शेवटचा भाग बरा होता.

त्या मंथराने (निशाने) शुगोला ( सरू) गच्चीत घेवून गेल्यावर तिची प्रतिक्रिया चांगली होती.
पण योग्य न्हवती.
म्हणजे, मुलगी (गौरी) जर एका ओळखीच्या मुलाबरोबर असताना गच्चीत दिसली तर इतकं खचल्यासारखं काय?
नशीब पण तिने गोंधळ नाही घातला त्या हिंदी सिरियल प्रमाणे. एकताची सिरियल असती तर निरनिराळ्या अँगलने कितीदा फिरला असता.

मंथराने चार पाच वेळा डोळे फिरवल्यासारखे दाखवले असते. काय्नीकाय.....

शुगोने आई म्हणून एकटीनेच आधी बोलावं आणि समजून घ्यावं. नाहितर पुढच्या भागात नको तो मेलोड्रामा असायचा.

गच्चीत दिसली तेव्हा मुलीच्या डोळ्यांत पाणी होतं. आता शेजार्‍याला निरोप द्यायचा म्हणून डोळ्यांत पाणी आलंय असं समजणार का ती?

कालच्या भागात, सरूने सिचुएशन हँडल करायचा चार्ज घेतलाय असं वाटतंय.

मी आधी एकदा लिहिलेलं तसं "आमचं जमलंय हे वडिलांनाच का सांगायचं? आईला का नाही?" तसंच होईल. अर्थात लेखक दिग्दर्शकांनी माती खाऊन, गौरीने काहीतरी थापेबाजी केलीय आणि आईला ती पटलीय असं दाखवलं नाही, तर.

>>>"आमचं जमलंय हे वडिलांनाच का सांगायचं? आईला का नाही?" तसंच होईल. अर्थात लेखक दिग्दर्शकांनी माती खाऊन, गौरीने काहीतरी थापेबाजी केलीय आणि आईला ती पटलीय असं दाखवलं नाही, तर.<<<

हो पण दिगदर्शकाला, वडील आणि मुलीचं नातं घट्ट आहे हे दाखवायचा सोस आहे ना? मग, ते चालणार नाही ना... दिगदर्शकाला हो. आमचं मतं कोण विचारात घेतं. Wink

अन्जू,
तुम्ही कुठली लिंक वापरता हो आपली मतं कळवायला... द्या जरा. मी जरा दिग्दर्शकाल सांगते आपल्याला कसं सिरियल मध्ये आवडेल ते. Happy

>>>गच्चीत दिसली तेव्हा मुलीच्या डोळ्यांत पाणी होतं. आता शेजार्‍याला निरोप द्यायचा म्हणून डोळ्यांत पाणी आलंय असं समजणार का ती?<<

तसं न्हवे काय. एक तर तो नुसता शेजारी, तोंडदेखली ओळख असं काही न्हवतं. चांगलं येणं जाणं असणारा, त्यांच्या माहितीतला आणि मुलीचा मित्र आहे दाखवलाय.
मुलीच्या डोळ्यात पाणी पाहून एक साधारण आश्चर्य वाटणं साहजिक आहे की का बुवा हि रडतेय? पण त्याचा सुतावरून अगदी स्वर्ग गाठून एवढं खचून जाणं, विचारात पडणं, गौरी मला बोलायचय, नाहितर 'फार उशिर होइल नाहितर' असे डायलॉग अतिच होतं.
अगदी 'ह्याच्यांत ' काहीतरी आहेच असा समज करून ती प्रतिक्रिया अतिच होती. आणि जरी काही आहे हा संशय आला तरी इतकं खचल्यासारखं कशाला?
आधी खात्री करून घ्यायची ना, मग खचायचं.... Proud

सहज विचारु शकते आई म्हणून की, गौरी मला एका गोष्टीबद्दल समजलं नाही की, तू कशाला रडत होतीस?
नाहितरी, ती शिवला म्हणतेच ना, हम तुम्हे मिस करेंगे.. मग मुलीने मिस केलं तर पहाड कोसळेल?
पण सिरियल आहे ना, म्हणजे मेलोड्रामा फुकाचा असणार....
हिंदी सिरियल सारखे... इज्जत मिट्टी मे मिला दी, कहीं का नही छोडा , घराण्याला काळं फासलं... तोंड दाखवायला जागा नाही , माझा गर्व होतीस गौरी वगैरे वगैरे असे तो मधुसुदन आणि सरीता सावंत म्हणताना दाखवले नाहि तर बरं. Proud
तसाही ह्याचा लेखक आणि दिग्दर्शक कल्पनाशक्तीत तोकडा आहे हे दिसतेच.

हुश्श.... दमले. Happy

हो ते बरोबर. पण कोणत्याही मालिकेचा कल्पक लेखक/दिग्दर्शक दाखवा आणि हजार रुपये घेऊन जा अशी स्थिती आहे. मुंबई बुडल्याच्या एपिसोडमध्ये यांची उरलीसुरली कल्पकताही उघडी पडली.

हो पण त्या निमित्ताने मालिकेची कथा पुढे सरकतेय हे बरं आहे. नाहीतर शिवला काही हे धनुष्य पेलण्यातले दिसत नाही. सावंतांच्या नाजुक तब्येतीमुळे त्यांच्याशी या विषयावर बोलणं त्याला या जन्मात जमलं नसतं.

वेणूबाळाला काय, नको तेव्हा नको ते डायलॉग मारायला आणि सारखं खायला ठेवलंय का मालिकेत? गौरीला शोधायला तो बाहेर का पडला नाही असा प्रश्न शिवच्या हम्माला का पडला नाही? आणि तो आणि शिव पॅकेज डीलमध्ये आहेत का? शिवने घर सोडलं तर हा काय जातोय? त्याने दुसरा पार्टनर शोधून राहायचं की इथेच.

या मालिकेतले संवाद तेवढे चांगले आहेत.

शीर्षकगीतातल्या पुरुष आवाजातल्या हिंदी गाण्यातल्या उच्चारांना वरणभाताचा वास आहे.

शिवच्या काकांची भूमिका करणारा अभिनेता सीनस्टीलर आहे. एखाद्या प्रसंगात काही न करता नुसता हातावर हात ठेवून उभा असला, तरी लक्ष त्याच्याकडेच जातं. सगळ्या रिअ‍ॅक्शन्स मस्त असतात.

शिवच्या काकांची भूमिका करणारा अभिनेता सीनस्टीलर आहे. एखाद्या प्रसंगात काही न करता नुसता हातावर हात ठेवून उभा असला, तरी लक्ष त्याच्याकडेच जातं. सगळ्या रिअ‍ॅक्शन्स मस्त असतात.>> +१. मी काही एपि फक्त त्याच्यासाठी पाहते. Happy

मला तर संशय आहे की, मायबोलीच्या कमेंट्स वाचून कधी कधी बरे असतात भाग.

मला पण तो मजनू चाचा आणि ती आजी बरी वाटते.

पण , हे राम... त्या आजींचे मालवणी इतके सदोष की एकवत नाही. इतकं अशुद्ध मालवणी का बोलतात? कोणी तरी मालवणी लेखकच आणायचा ना..

काहीही आणि कसेही मालवणी बोलतात.

हो. मी खूप आधी शुगोंच्या चष्म्याबद्दल लिहिलेलं तर तो गायब झाला.
आता हे वाचून शोधून आणतील. Wink

आता हे वाचून शोधून आणतील. >> काल होता चष्मा. आजी जरा भोचकच आहे. आणि मालवणि ऐकुन तर अगदी डोक्यात जाते.

आजी खूपच भोचक आहे .
तसं तर चार हि मालिकेतल्या आज्या डोक्यात जाणाऱ्या आहेत.
आणि सगळ्या मालिका हि डोक्यातच जातायतात.

चार मालीकेतल्या कोण?
१. गवरीची आजी
२. नंदीची
३. खुलता कळी तली (खरे तर २!)
४. ऊर्मीची!

Happy ओह!
खरं तर सगळंच - कथानक, अभिनय, दिसणं, कपडे, मूर्खपणा, हाव भाव (उदा- लोलीता!) - डोक्यात जाण्या सारखेच आहेत.

आणि शिवचे काका - ते आले स्क्रीनवर की "जै बजरंगबली .." असे पार्श्वगीत वाजते. काहीही!
किती भडक कपडे घालावेत माणसाने!
पण काम ठीके त्यांचं...... निदान पसरणी पेक्षा आणि तिच्या आईपेक्षा!
मोजो पण खूप सहज अभिनय करतात..."मला उशीर झालाय आज जरा..." वगैरे अगदीच सहज सुरात बोलत होते काल.......................

नंदीची म्हणजे स्वानंदीची. स्वानंदी ला नंदी केलंस . एक नंदी पआमु मध्ये आहे

बाकी सगळे डायरेक्टर नंदी बैलच आहेत म्हणा . माठ सगळे

आणि शिवचे काका - ते आले स्क्रीनवर की "जै बजरंगबली .." असे पार्श्वगीत वाजते. काहीही >> पार्श्वसंगीत हा मोठ्ठा विनोदच आहे. कुठल्याही प्रसंगाला शीर्षक गीताची ट्यून वाजवतात.

झंपी मी झीच्या फेसबुकवर जाते कधीतरी, तिथे मालिकेची पोस्ट असेल तर त्याखाली लिहीते, मागे एकीने गौरीला अभिनय शिकवा, अजिबात येत नाही लिहीलेलं. तिच्याच पोस्टखाली लिहीलं होतं, खरं आहे हे याच कारणाने मी मालिका सोडली बघायची, असं लिहीलं होतं.

कहाणी पुढे चालली आहे..
शिव घर बदलणार (बहुतेक) .. शिवला बनारसला ट्रांसफर मिळाली.. (पुढच्या भागत मधे दाखवलं)
गौरीच्या आईला गुपित कळलं

लग्न होणार हे तर टायटल साँग वरुन निश्चित आहेच बघु आता

आता तर मज्जा येतेय. सरूबाई शिवच्या बाबूंच्या मॅच्युअर हँडलिंगचं कौतुक करत होत्या तेव्हा त्यांनी मस्त रिअ‍ॅक्शन्स दिल्या.
शिव आणि गौरी एकदम कोंडीत पकडले गेलेत.

पण सरुचे जरा जास्तीच क्लोज अप्स दाखवले असे नाही का वाटत?
ठोकळा फीचर्स आहेत तिचे...म्हणजे काम छानच करते पण इतके क्लोज अप्स न दाखवताही जमु शकलं असतं!

कालच्या 'आफ्टरनून' या सायंदैनिकाने टीहीव्ही सिरियल्समधल्या त्यांच्या पांच ' टॉप बहुरानी'ची निवड प्रसिद्ध केली आहे. त्यांत एकमेव मराठी सिरीयलमधील बहुराणी आहे - शुभांगी गोखले [गौरीची आई] ! [' For her grace & poise is hallmark of the show as her mature diplomacy' ]. अर्थात, ती सिरियलमधे 'बहुरानी' नाहीय, कारण घरांत वावरणारी सिनीयर बाई तिची आई आहे सासू नाहीं, हें त्यांच्या लक्षांतच आलं नसावं !

अत्यंत बोर मालिका... मी बॅकग्राऊंडला टिव्ही सुरू ठेवून काम करत असल्याने सगळेच संवाद पल्ले पडत नाहीत. (पल्ले पडण्याजोगे असले तर ना) Angry

काल मोजो आणि शुगो काहीतरी छान बोलत होते बहुधा.. पण सुक्याबरोबर ओले जळते तसं मी वाईट संवादाबरोबरच हे सुद्धा म्युट करून ऐकले Proud

Pages