काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे एक्झॉटिका हॉटेल कुठले म्हणे. Happy ?
फा र च त्याची जाहीरात करत होते काल !!
काल गवरी जरा ब री हासत बोलत होती. आणि पसरणी व नचि चा पुन्हा मेकप झाला का?

काल विनाकारण लांबण लावली व काहीच विशेष घडले नाही......शिव व गौरीला चक्क सालसा करायला लावला?

काल विनाकारण लांबण लावली व काहीच विशेष घडले नाही >>> तेच ना... केसांआडून गौरीचा चेहरा दाखवत नव्हते, तेव्हाच कळलं की तिथे राधिका येऊन बसलेली असणार Uhoh पण सेम टू सेम ड्रेस वगैरे म्हणजे जरा अतीच Uhoh

केसांआडून गौरीचा चेहरा दाखवत नव्हते, >> राधिकाचे केस इतके लांब नाहीत आणि त्यांचा रंगही वेगळा आहे. उगाच पब्लीकला येडं बनवंतात. त्यात दुपारी साल्सा?? आणि तेदेखिल टेबलकडेच??

गवरी किती बावळटपणा करत होती. घाबरत काय होती. एकदम कंटाळवाणा भाग होता कालचा Angry

रच्याकाने - स्वरदा थिग़ळे म्हणजे राधिका का?

नाही, मला नाही वाटत राधिका म्हणजे स्वरदा ठिगळे ए. तिचे नेट वरचे फोटोज वेगळेच आहेत. स्वरदा ही स्वानंदी सारखी दिसते आहे

मी फॉर्वर्ड करुन ओझी वर पाहिला एपिसोड
हो डान्स ई नेहमीच कशाला.. कधी बोलत गप्पा मारतच नाहित की मला हे आवडत ते आवडतं..

दोन मिनिट बसले ... हसले ... उठले डन्स केला झालं
दोघ कधी शांत निवांत खुप बोलतच नाही

तुकड्या तुकड्यात बोलतात..

बोलता बोलता मोस्टली गौरी शेवटी संवाद मधेच सोडुन पळुन जाते... दार बंद करते

ट्युनिंगच वाटत नाही दोघांमधे..

जे सिरियल मधले इतर पात्र बर्यापैकी बोलतात..

Happy खूप फॉर्मल वागतात दोघं......अवघडल्या सारखे. तो हात पुढे करणार व ती हात हातात देणार हे तर रिपीट होतंय सारखं..... Happy आणी तो गिटार वाजविणारा अगदी समोर असतांना कसं नाचता येईल.....?

पसरणीने बिंग फोडले यांचे कालच्या महाभागात्?:अओ: मी फक्त पसरणी, वेणुला गवरी आणी शिव विषयी खोदुन खोदुन विचारत असते तेवढेच बघीतले.किती ही भोचक?

अन्जू, आपली ही लिंक दे त्या फेसबुकवर, म्हणजे धमाल येईल.:फिदी:

नाही पसरणी ने नाही फोडले.....तो सस्पेंस ठेवलाय. तशीही पसरणी हल्ली जरा ठीक वागायचा आव आणत्येय. गवरीशी गोड गोड बोलणं, उगीच समंजसपणा दाखविणं वगैरे......

स्वरदा म्हणजे स्वानंदी, नका रे तुलना करु. स्वरदा कितीतरी पटीने उत्तम काम करते आणि दिसतेही छान तिच्यापेक्षा. सिरियलच्या सुरुवातीला बावरलेली शुभ्रा असं वाटायचं हीची पहिली सिरीयल कसं काम करेल पण तिच्या actingचा ग्राफ इतका उंचावला नंतर की बास रे बास. झी वर हि सिरीयल असती तर नायक-नायिका जास्त फेमस झाले असते. फक्त romantic scenes ती ठीक ठाक करायची, क्वचित चांगले, हिरो तिथला आधीपासूनच सर्व उत्तम करायचा कारण त्याचं सहावा प्रोजेक्ट होता पण हिचा पहिलाच(टीव्हीवरचा) पण हिने तर नंतर अदिती सारंगधरपेक्षा पण उत्तम काम केले. आदिती कमी वाटायची हिच्यापुढे. बाय द वे तिने सिरीयलच्या आधी अजिंक्य देव आणि विक्रम गोखलेच्या एका मुवीत पण काम केलंय.

सॉरी for स्वरदापुराण. विषय निघाला म्हणून लिहिलं.

नताशा मृनिशनी उत्तर दिलेलं बरोबर आहे.

ऑं? बिंग फोडायलाच सगळ्यांना = शिवचे वडील, गौरीचे आईवडील व नचिकेत यांना हॉटेलात नेले किंवा ते जातील याची व्यवस्था केली ना तिने?
शिवच्या वडिलांच्या मनात व्यवस्थित संशयपिशाच्च निर्माण केलं

भरत + १

स्वरदा ठिगळे म्हणजे माझे मन तुझे झाले मधली शुभ्रा कुलकर्णी>>> ओके. ही मालिका मला माहित नाही. इथे तिचा उल्लेख झाला म्हणून मला वाटले ती रधिका / मितू आहे.

महाआआ >>>:हाहा:

स्वरदा थिग़ळे म्हणजे राधिका क?>>> नाही, माझे मन तुझे झालेची शुभ्रा.

हि सिरियल colors मराठी वर लागायची, आता सम्पली.

शिव व गौरीला चक्क सालसा करायला लावला? >>> मधुसुदन सावन्ताच्या मुलीला हे कसे चालते?:अओ:

खूप फॉर्मल वागतात दोघं......अवघडल्या सारखे. >>> अरेन्ज marriage झाल्यासारखे.

गवरी किती बावळटपणा करत होती. घाबरत काय होती. >>> डरपोक गौरी.

कालचा एपिसोड बराच बरा होता..
आपला धागा वाचला बहुतेक त्यानी..

शिव गौरी चक्क गप्पा मारत होते..

गौरी बाई बरी वाटली काल..

महाएपिसोड पेक्शा कालचा एपिसोड नक्कीच चांगला होता

'आमचं आम्ही जमवलंय' हे मुलीच्या वडिलांना मुलानेच का सांगायला हवं? ( इथे वहिनी बिचारी हे काम स्वतःहून करू पाहतेय Wink )
वडिलांनाच का सांगायचं? आईला सांगितलं तर तो फाउल धरतात का?

'आमचं आम्ही जमवलंय' हे मुलीच्या वडिलांना मुलानेच का सांगायला हवं?>>>>>>>>>> +११११
या हिशोबाने शिवच्या आई बाबांना जर निशा कडुन कळाल नसत, तर गौरी ने त्याना सांगायचं अस ठरल असत का?

लडकी के मा - बाप से उसका (लडकी का) हाथ मांगना टाईपवाल लॉजिक वापरत आहेत

पण गौरी काल चक्क मोकळेपणी हासत बोलत होती. छान दिसत होती!
आपला धागा वाचला नक्कीच त्यांनी!
हो ना....शिव नेच का सांगायचं तिच्या वडलांना...मलाही हे खटकलं.

आनंदी + १

काल पहिल्यांदाच गौरी आवडली. तिला गवरी म्हणावस वाटलं नाही Wink

छान हसत होती. शिवची काळाजी करत होती. त्याला बर वाटेल म्हणून काय करावे असा विचार करत होती.

बट स्टील.....!! बरीच सुधारणा आहे.
ब्रेसलेट हसून घेतलं - घातलं......चिड चीड एकदाही केली नाही. गोरीपान आणी फ्रेश दिसत होती.

Pages